दुग्ध व्यवसाय Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

दुग्ध व्यवसाय

दूध धंद्याची मार्केटिंग आणि दूध धंद्याचे ४ P

दूध दर खाली वर होताना बऱ्याच वेळा बोलले जाते की पिण्याचे पाणी देखील २० रुपये लिटर ने मिळते, आणि दुधाची किंमत त्यापेक्षाही कमी आहे. हे बोलणारा आणि ऐकणारा त्याचा राग व्यक्त करत असतो. केलेल्या मेहनतीचा योग्य परतावा न मिळणे याबद्दल आलेल्या निराशा आणि रागातून असे व्यक्त होते आणि ते साहजिकच आहे. पण हे योग्य आहे का ? खरच दुधाची किंमत पाण्यापेक्षा कमी केली जाते का ? उत्तर देण्याआधी एक गोष्ट वाचू चला (उत्तर लेखाच्या शेवटी आहे, पूर्ण लेख नीट समजून वाचला तरच उत्तर समजेल आणि तुमचे जीवन ही बदलून जाईल) गोष्ट अशी – गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चालले असताना अनुयायांनी […]

पुढे वाचा

दूध धंदा सुधारण्यासाठी ५ गोष्टी

कल्पना करा कोणी तुमच्या मनातील गोष्ट हेरून नेमकी तीच गोष्ट केली आणि त्यामुळे तुमचा प्रचंड फायदा झाला. एखादा नवस पावल्यासारखेच असेल ते. आम्ही जाणून आहोत तुमच्या मनातील काही गोष्टी. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण एकसारखा दिनक्रम चालवत असतो. तरी देखील मनामध्ये अनेक गोष्टी घोळत असतात. विविध कामे करणे जसे की “अत्यंत आवश्यक” ते “केले तर फार बरे होईल” अशा कामांची पेंडिंग यादीच आपल्या मनात एका कोपऱ्यात घर करून असते. उदाहरणार्थ, आपल्या हिरो किंवा होंडाची ऑईल बदलण्याची वेळ कधीची टळून गेलेली असते तरी आपण तिला सर्व्हिसिंग करण्यात आज उद्या करत आळस करत असतो. आईची औषधे आणायची राहिलेली असतात. गेलेली ट्यूब बदलून लावायची […]

पुढे वाचा

दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण

Deworming in cows marathi | डी-वर्मिंग जंतनिर्मूलन

अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमचे महिन्याला प्रति गाय हजारो रु आणि दिवसाला १ लिटर पर्यंत दूध हानी वाचवू शकते ? पुढे वाचा. विचार करा, कारखाना तुम्ही चालवताय आणि आत मध्ये दुसरीच कंपनी तुमच्या कच्च्या मालापासून आपले उत्पादन तयार करत आहे. भरीस भर म्हणून कारखाना आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी देखील खराब होते आहे, ज्याचा तुम्हाला दंड बसत आहे. कारखाना आजारी पडतो आहे. दूध-व्यवसायात हे कसे होते ? आदरणीय पाहुण्यांमुळे. कोण आहेत हे आगंतुक ? यांचे नाव काय ? जंत – परजीवी, कृमी, parasite, worm इत्यादी मित्रांनो, शाळेत शिकलो आहे, मातीत किंवा घाणीत हात घालून त्यावाटे आपल्या पोटात जंत […]

पुढे वाचा

दूध धंदयासाठी कर्ज कसे मिळवाल?

दुग्ध व्यवसाय कर्ज 2020

दुग्ध व्यवसाय कर्ज माहिती मराठी । दूध धंद्यासाठी कर्ज कसे मिळवावे हा या लेखाचा मथळा असला तरी थोडा संयम ठेवून वाचकांनी आणि दूध उत्पादकांनी कर्जबाबत मूलभूत माहिती आधी वाचावी ही विनंती आहे. तुम्हाला एकदा चार चाकी चालविणे शिकता आले की कार असो, जीप असो वा मोठा ट्रक असो ते चालविण्यात जास्त अडचण येत नाही. म्हणून बेसिक पासून सुरुवात करूया. कर्ज म्हणजे काय ? कर्ज म्हणजे काय – तर एखादा विशिष्ट हेतूसाठी इतर व्यक्ती, संस्थांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य. पैसे उसने घेणे. म्हणजे हे पैसे कधी ना कधी आणि शक्यतो ठरलेल्या वेळेनुसार परत करावेच लागतात. कर्जाचे खालील गुणधर्म असतात. कर्ज मुदतीनुसार परत […]

पुढे वाचा

सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi

सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi पॉवरगोठा बनवून दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जातिवंत गाय निर्मिती हे मुख्य ध्येय असते. त्यासाठी नैसर्गिक रेतन ऐवजी कृत्रिम रेतन चा सल्ला हमखास दिला जातो. बहुसंख्य शेतकरी, आज चांगली जातिवंत, जास्त दूध देणारी संकरित कालवड किंवा गाय तयार करण्यासाठी कृत्रिम रेतन चाच उपयोग करतात. हे करत असताना, इन-ब्रीडिंग (भावकीतील प्रजनन) टाळण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळ्या वळूचे वीर्य (सिमेन) वापरण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक पिढी मध्ये वेगळा वळू वापरला पाहिजे. आता हे कसे साध्य होईल – तर नोंदी केल्याने. कोणत्या क्रमांकाच्या गाईला कोणता वळू लावला, हे लिहून […]

पुढे वाचा

हंगेरियन दंगल आणि दुग्धव्यवसाय

दंगल, हंगेरी, आणि दुग्धव्यवसाय ?? काय बोलताय काय ? उत्कंठावर्धक गोष्ट आहे, शेवटपर्यंत वाचा. १९६० च्या दशकात लाझलो पोल्गर यांनी आपल्या होणाऱ्या बायकोला पत्रे लिहिली. त्यात लग्नासाठी एक अट घातली. होणाऱ्या मुलांना तुफान प्रतिभाशाली बनवायचे या एकाच उद्देशाने आपले लग्न असेल. क्लारा यांनी ती मान्य केली. युक्रेन सोडून क्लारा लाझलो यांच्याकडे हंगेरी मध्ये आल्या. दोघे मिळून कोणती कला किंवा विषय धरून मुलांना प्राविण्य द्यायचे याबद्दल विचार करत होते. बहुभाषी बनवायचे (खूप साऱ्या भाषा येणारी मुले) की गणिती पंडित बनवायचे – मुलगी झाली तर १९६०-७० च्या काळात महिला गणितज्ञ कोणीच नव्हते, खूप प्रसिद्धी मिळाली असती. पण त्यांनी तिसरा पर्याय निवडला. कोणता […]

पुढे वाचा

दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स । Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

Powergotha - पॉवरगोठा

Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti काही वेळा काही साध्या  गोष्टी आपण क्लिष्ट किचकट करून टाकतो.  दुग्ध-व्यवसाय भलेही थोडा किचकट आणि अवघड असेल, पण त्यात नफा कमविण्याचे शाश्वत मार्ग आहेत. ते काटेकोरपणे पाळले तर प्रत्येक जण नफ्यात धंदा करू शकतो. काय आहेत त्या ७ गोष्टी ज्याने तुमचा धंदा किफायतशीर होऊ शकतो. #१ मुक्त संचार गोठा – कमी खर्च, कमी कष्ट मुक्त गोठ्यात, गाईंना फिरण्याचे स्वातंत्र्य आणि २४ तास स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. गाईंना बंदिस्त, तणावपूर्ण जीवनापासून आणि मालकाला गाईची जागा बदलणे, शेण उचलणे, गाई धुणे, खरारा करणे आदी कष्टदायी कामांपासून मुक्तता मिळते खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ […]

पुढे वाचा

मुक्त गोठ्याची रचना – सोप्या ५ युक्त्या । Mukta Sanchar Gotha Design

मुक्त संचार गोठा डिझाईन mukta sanchar gotha design plan

मुक्त गोठ्याची रचना करताना करायच्या सोप्या ५ युक्त्या (मुक्त संचार गोठा डिझाईन Mukta Sanchar Gotha Design ) बरेचदा  पशुपालक शेतकरी विचारणा करतात की मुक्त गोठ्याचा प्लॅन, किंवा डिझाईन पुरवा  म्हणून.  शक्यतो प्रत्येकाची उपलब्ध जागा आणि इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने एक ढोबळ, ठोकळा  प्लॅन देणे अवघड ठरते.   आपापल्या परसातील, गोठ्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर  शेतकऱ्यांचे गोठे पाहून मुक्त गोठ्याची रचना केलेले फायदेशीर ठरते.  पॉवरगोठा करायचा असेल तर हे करताना खालील ५ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि अंगभूत कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळेल. #१ मुक्त गोठ्याचा आकार मुक्त गोठ्याचा आकार आणि डिझाईन तुमच्या सध्याच्या गोठ्याची रचना आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या […]

पुढे वाचा

स्मार्ट दुग्धव्यवसाय – दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या । Dairy Farming in Maharashtra

CMT test - Dairy Farming Maharashtra Marathi Mahiti

दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या (tips for Success Dairy Farming in Maharashtra) #काय आहे गुपित दुग्ध व्यवसायातील यशाचे?     स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात.     जरा विचार करा – मेहनतीने कमविलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामी होणे, एखादी लस विसरल्याने मरतुक होणे, किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते भांडवलाचे पैसे अक्षरशः महिन्या-२ महिन्यांत फुंकले जातात.    दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते.    असो, दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या  आहेत.    […]

पुढे वाचा

दूध धंद्यावर बोलू काही – मुक्त गोठा आणि चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी युक्ती

मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत.  चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो. सांगू ना ? मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो. का ? ते ठाऊक आहे का ? अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात.  नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई […]

पुढे वाचा