मुरघास म्हणजे काय ? फायदे, 3 प्रकार आणि पद्धती पॉवरगोठा
Close

ऑक्टोबर 30, 2016

मुरघास निर्मिती

मधमाशा मध का साठवतात ? आणि मध कधीच खराब का होत नाही?

 

मध मधुर म्हणजे उच्च प्रतीच्या, उच्च तीव्रतेच्या शर्करांनी युक्त असतो.  मधमाशा मिनिटाला ११००० पेक्षा जास्त वेळा पंख फडफडवत असल्याने त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते. हि गरज असा उच्च शर्करायुक्त मध पूर्ण करू शकतो. 

 

ज्या काळात फुलांना बहर नसतो, त्या काळात त्यांना अन्नाची कमी पडू नये, म्हणून मधमाशा त्यांच्या पोळ्यामध्ये मध साठवणूक करतात. अति थंडीच्या ठिकाणी हिवाळ्याची ही सोय असते. 

 

तुम्हाला माहिती आहे का, की मधाला शक्यतो एक्सपायरी डेट  नसते. कधीच मध खराब होत नाही. ना जिवाणू ना बुरशी लागते. 

 

बरे हा मध, खराब का होत नाही ?

 

मधमाशांच्या एकमेकांकडून हस्तांतरण होण्यामुळे मध अतिशय घट्ट होऊन जातो, प्रत्येक पास गणिक त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उच्च मात्रेची शर्करा बाकी राहते.  पाण्याचे प्रमाण कमी असल्याने जिवाणू बुरशी लागत नाही आणि मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट  नसते. बेस्ट बिफोर डेट  असते. 

 

असाच काहीसा प्रकार आपल्या दूध धंद्यात देखील आहे. 

 

हिरवा चारा मुबलक उपलब्ध नसताना देखील आपल्याला साठवून ठेवायचा असेल, तर त्याला पाण्याचे प्रमाण कमी करून हवाबंद करून साठवावे लागते. 

 

अशा साठवलेल्या हिरव्या चाऱ्याला मुरघास म्हणतात. मधासारखेच त्यात मूळ चाऱ्यापेक्षा कमी पाणी असून, हवाबंद असल्याने जिवाणू, बुरशी यांची वाढ होत नाही. मूळ चाऱ्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. 

उलट किण्वन प्रक्रियेने मुरलेला, गुळासारखा वास असलेला, चविष्ट मुरघास तयार होतो जो गुरे आवडीने खातात. 

 

मुरघास निर्मिती

दुग्धव्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिक आहार पुरवणे फार गरजेचे असते. आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी करण्यात आली. परंतु अशा प्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती

मुरघास निर्मिती

मुरघास निर्मिती

हा एकमेव पर्याय आहे.

 

दूध उत्पादक शेतकरी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा जनावरांना उपलब्ध करून देऊ शकत नाही.  म्हणून पाऊस पडल्यावर जे पहिले पीक तयार होते, म्हणजेच ज्या वेळी मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, त्याच वेळी त्याचा मुरघास बनवून दीर्घ काळ साठवुनिकीची सोय करणे फायदेशीर असते.  आणि हे काम अतिशय कमी खर्चात करता येऊ शकते.

 

मागील आठवड्यात आपण येथे मुक्त-संचार पद्धतीच्या  गोठ्याची माहिती घेतली.  या आधुनिक पद्धतीच्या गोठ्याला जर आधुनिक पद्धतीचं  चारा नियोजन म्हणजे मुरघास निर्मितीची जोड दिली तर, सोने पे सुहागा म्हणत तुमचा दूध व्यवसाय वाऱ्याच्या वेगाने नफा कमविण्याकडे वाटचाल करू लागेल. आणि हे कमीत कमी कष्टात जास्त नफा देणारे तंत्रज्ञान आहे.

 

मुरघास म्हणजे काय ?

मुरघास

मुरघास

मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्या सारखा.

हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय.  लोणचे किंवा मोरावळा दीर्घकाळ टिकविण्यासाठी जे पिढ्यानं पिढ्या चालत आलेले मूलभूत तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच काहीसे तंत्रज्ञान मुरघास बनवताना हि लागते.

मुरघासाला इंग्लिश मध्ये silage सायलेज असे म्हणतात.

 

 

मुरघास बनवताना कोणती पिके वापरावीत ?

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा  सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो.

मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो असा अनुभव आहे. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. याबरोबरच ल्युसर्न (lucern) सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनविता येतो.

 

मुरघासाचे फायदे !

  1. आधी सांगितल्याप्रमाणे मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन आगाऊ, पावसाळा असतानाच करता येते.
  2. उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याची कमाल साधता येते.
  3. रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात, तोच वेळ शेतकरी इतर नफेशीर गोष्टींसाठी देऊ शकतो.
  4. वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होऊन आरोग्य वाढते. चाऱ्याच्या प्रतीमध्ये पारंपरिक पद्धतीने पावसाळा आला कि हिरवागार आणि उन्हाळ्यात कडबा, सुकलेले गवत यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते आणि दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
    मुरघास निर्मिती

    मुरघास निर्मिती

  5. कमीत कमी जमीन असणारा दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ करू शकतो, तेदेखील चाऱ्यावरील खर्चाची पर्वा न करता !
  6. स्वतःचे शेत नसेल त्यांनी, किंवा इतर पिके असणाऱ्यांनी – चारा मुबलक असतो, तेव्हा त्याची किंमत कमी असते. अशा वेळी चारा विकत घेऊन त्याचा मुरघास बनविणे आणि साठवणूक करणे अतिशय हुशारीचा सौदा आहे. यामुळे खर्चात भरपूर बचत होते.
  7. मुरघासामुळे हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारते. खुराकामधे काही प्रमाणात बचत होते.
  8. जनावरे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. दूध  उत्पादनात अप्रत्यक्षरीत्या वाढ होते.
  1. दुष्काळाचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.
  2. मुरघासाचा चारा पीक ७५ ते ८० दिवसात तयार होते. त्या जमिनीत पुन्हा लगेच दुसरे पीक घेणे सोपे जाते.

मुरघास न करण्याची सांगितली जाणारी कारणे !!

 

  • चांगला पौष्टिक चारा खराब होण्याची भीती वाटते.
  • काही ठिकाणी मुरघास खराब झालेला पाहिल्याचा अनुभव असतो.
  • मुरघास तयार करणे आणि वापरणे हा फक्त मोठ्या गोठ्यांसाठीच आहे अशी शंका.
  • मुरघास खर्चिक आहे अशी समजूत.
  • मुरघास निर्मिती का आणि कशा पद्धतीने करायची याची योग्य माहिती नसणे.

 

मुरघास बनविण्याचे प्रकार !

 

  1. बॅगेतील मुरघास
    bag-murghas

    बॅगेतील मुरघास

  2. खड्ड्यातील मुरघास
    खड्ड्यातील मुरघास

    खड्ड्यातील मुरघास

  3. बांधकामातील मुरघास

मुरघास बनविण्याची प्रक्रिया !

 

मका व ज्वारी सारखी चारापिके ७५-८० दिवसात कापणीला येतात.  चारापिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आली की कापावीत.

मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असावे.  त्यापॆक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळ साठी चारा सुकू द्यावा.

त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत.  कुट्टी  केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून ना ठेवता त्वरित बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी.

कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी.  धुमश्याने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. व कुट्टी दाबून बसते. कडांवरची कुट्टी विशेषतः चांगली दाबून घ्यावी.

indian-silage

एकावर एक चाऱ्याचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिक चे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो.

त्यानंतर प्लॅस्टिक आच्छादना वर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो.  म्हणून त्यानुसार गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.

मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जिवाणू असलेले द्रावण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही.

बहुतेक वेळा या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात नाही.  त्यामुळे मुरघास तयार करताना अपयश येते.   त्यामुळे  पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये.  प्रायोगिक तत्वावर मुरघास करून पाहावा. शिकून घ्यावे. शक्य असल्यास जिवाणूंचे द्रावण फवारावे. त्यामुळे चार खराब होण्याची शक्यता कमी होते.  पहिल्याच प्रयत्नात चांगला मुरघास तयार होतो.

आपण चारा हवाबंद केल्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या हवेतील प्राणवायूचे श्वसन हिरव्या चाऱ्यामुळे होते.  हवाबंद झाल्याने बुरशी लागत नाही. बुरशीला प्राणवायू मिळत नाही व जिवाणूंमार्फत लॅक्टिक ऍसिडची निर्मिती झाल्यामुळे चारा टिकून राहतो.

मशीन द्वारे देखील तुम्ही मुरघास बनवू शकता.  मुरघास निर्मिती बद्दल व्हिडीओ येथे पहा

murghas-5

हिरवा चारा व्यवस्थित हवाबंद करून साठवून ठेवल्याने फायदाच फायदा आहे.

मनातील शंका कुशंका काढून आत्मविश्वासाने मुरघास निर्मिती करा आणि दुधाचे भरघोस, बक्कळ उत्पादन दरवर्षी घ्या.

मका लागवड, कापणी, कुट्टी, बॅग भरणे इत्यादी क्रमाने नेमका मुरघास कसा बनवावा याच्या माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा
प्रत्यक्ष मुरघास निर्मिती २

106 Comments on “मुरघास निर्मिती

संदीप निकम
ऑगस्ट 12, 2020 at 1:07 am

सर ऊसाचे वाडेचा मुरगास होईल का

उत्तर
Fodder silo - My e Blackboard
जुलै 23, 2020 at 10:09 am

[…] (Souce: https://powergotha.com/murghas-nirmiti) Silage making process (Source: […]

उत्तर
किरण गुंजाळ
एप्रिल 23, 2020 at 1:16 pm

मकेचा मुरघास साधारण किती दिवस टिकतो

उत्तर
पोपट गुलाबराव पाटील
एप्रिल 21, 2020 at 12:45 pm

वाळलेले ऊसाचे वाढे मूरघास करण्यासाठी वापरतात का?

उत्तर
टीम पॉवरगोठा
एप्रिल 24, 2020 at 7:32 am

सुका चाऱ्याचा मुरघास बनविण्याची गरज नाही. तो सुकाच साठवू शकतो.

उत्तर
Fodder silo – My e Blackboard
एप्रिल 20, 2020 at 7:01 pm

[…] (Souce: https://powergotha.com/murghas-nirmiti) Silage making process (Source: […]

उत्तर
शंकर बाण
नोव्हेंबर 30, 2019 at 4:40 pm

सर उसाच्या वाड्याचा मुर घास बनवता येईल का।

उत्तर
Tushar gunjal
मार्च 11, 2020 at 4:10 am
Shahista Khan
सप्टेंबर 19, 2020 at 7:59 am

ho banawata yeto pan kalaji ghya usachya murghas mashe sugar asate aani pachayala jad hoto.

उत्तर
शंकर बाण
नोव्हेंबर 30, 2019 at 4:37 pm

सर उसाच्या वाड्याचा मुर घास बनवता येईल काय।

उत्तर
hanmant
सप्टेंबर 24, 2019 at 8:24 am

PLEASE SHARE CULTURES USED AND ITS USAGE QUANTITY PER TONNE FOR CORN & SUGARCANE CROP IN DETAILS .ALSO GIVE INFORMATION ABOUT PROCEDURE TO USE IT IN DETAILS

उत्तर
देवराव सोनवने
ऑगस्ट 29, 2019 at 12:26 pm

छान आहे

उत्तर
Tushar
ऑगस्ट 9, 2019 at 12:19 pm

Muraghas pr/kg ksa aahe

उत्तर
gore sanjay
जुलै 22, 2019 at 3:18 am

murghas vikrila kuthe aahe

उत्तर
Ganesh kande
जुलै 16, 2019 at 10:48 am

Mala murgas karyacha ahe pan amchi murghas karnyachi hi pahilch vel ahe amala murghas pisvit satwayacha ahe pan to ani kute chopa va v tyavar kutle liquid fovarave nav sanga.te kase fovarave te pan sanga .amchya kade murghasasathi fakat jawari ch ahe chalel ka.

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 4, 2019 at 9:39 am

Ho sir,
Jwari cha murghas karta yeto. Poweder Swarupatil culture amchya office kadun milel. Tumhi te pratyek 1-2 foot thar dilyananatar Favaru shaktat.
Sampark kara 9112219610

उत्तर
SHITAL HAVALE
जून 4, 2019 at 4:14 am

मुरघास चे प्लास्टिक कुठे मिळेल

उत्तर
Sujit Ghadage
मे 11, 2019 at 9:02 am

1एकर मध्ये कीती मूरघास मिळेल

उत्तर
ak
एप्रिल 19, 2019 at 5:06 pm

Sir tumhi magil comment madhe sangitale ughadalela murghas ughadalynantar 20 to 25 divas tikto mag khaddytil murghas 1 varsh kase tikel please comment kara

उत्तर
Chandrakant Rote
जून 7, 2020 at 1:53 am

सर माझ्या कडे ऊस आहे, मुरघास बनविला तर चालेल का?

उत्तर
ak
एप्रिल 13, 2019 at 10:41 am

sir ekda tayar kelela murghas kiti divas vaparta yeto v dararoj gaila murghas deta yeto ka ani eka gaila kiti kg dayva

उत्तर
टीम पॉवरगोठा
एप्रिल 14, 2019 at 4:53 am

योग्य रीतीने तयार केलेला मुरघास उघडला नसल्यास १ ते १.५ वर्षे टिकून राहू शकतो.
एकदा उघडलेला मुरघास उघडल्यानंतर २० ते ३० दिवसात संपवावा

एका गाईला तिच्या क्षमतेप्रमाणे चारा द्यावा. अंदाजे २०-२५ किलो चारा सहसा दिला जातो.
हिरव्या चाऱ्या ऐवजी संपूर्ण मुरघास दिला तरी चालतो.

उत्तर
deepak sonavane
मार्च 28, 2019 at 11:49 am

very nice information sir

उत्तर
रवि काशिद मंळवेढा
मार्च 25, 2019 at 5:50 pm

मुरघास बंकर विषयी माहिती मिळावि मी विट बांधकाम करुन बंकर बांधत आहे 12फुट लांब4फुट रुंद व6फुटउंच

उत्तर
रवि काशिद मंळवेढा
मार्च 25, 2019 at 5:50 pm

मुरघास बंकर विषयी माहिती मिळावि मी विट बांधकाम करुन बंकर बांधत आहे 12फुट लांब4फुट रुंद व6फुटउंच

उत्तर
रवि काशिद मंळवेढा
मार्च 15, 2019 at 4:51 pm

मुरघास कोठरी बद्दल माहीती मिळावी

उत्तर
Yuvaraj patil
मार्च 2, 2019 at 7:29 am

मक्याशीवाय आणखी कोणत्या प्रकारच्या वैरणीपासुन मूरघास तयार केला जातो

उत्तर
Rajendra Dipak Kulkarni
जानेवारी 23, 2019 at 3:13 pm

50 kilo bags kuthe milatil

उत्तर
Kiran c dhokdd
नोव्हेंबर 23, 2018 at 3:09 pm

Usachya wadhyache murghas banvata yeil ka

उत्तर
युवराज सांगळे
नोव्हेंबर 4, 2018 at 11:44 am

अतिशय चांगला उपक्रम आहे

उत्तर
दिनेश मगदूम कोल्हापुर
ऑगस्ट 4, 2018 at 3:40 pm

50 किलो ची बॅग कोठे मिळेल तेथील नंबर द्या

उत्तर
Arun Kolekar
जून 18, 2018 at 2:51 pm

मुरघास कसा टन मिळेल?
संपर्क नंबर द्या.

उत्तर
Sandeep khaire
एप्रिल 26, 2018 at 1:24 am

Silage bags kute bhetil

उत्तर
Sanjay
मार्च 15, 2018 at 3:31 am

Silage bags kute bhetli please contact ..

उत्तर
टीम पॉवरगोठा
मार्च 15, 2018 at 2:28 pm

send your details to support @ powergotha.com

उत्तर
sujay
मार्च 2, 2018 at 1:56 pm

sir 400 kilo vajan aslelya ani andaaze 15 litr dudh denarya gaaila pratidin kiti murghas dyava.

उत्तर
Abhijit
मार्च 1, 2018 at 1:46 pm

Silage Banavanyasathi glucose factory sathi lavalela maka chalato ka?
African tall sodun ajun konata maka chalto?
Jaminitil silage open kelyanantar ki divas chalato ki jo apan cake pieces madhe remove karato

उत्तर
सुजय
फेब्रुवारी 13, 2018 at 6:15 pm

हैड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेला चारा हवाबंद पिशवीत बंद करून मुरघास प्रमाणे साठवता येऊ शकेल का

उत्तर
टीम पॉवरगोठा
फेब्रुवारी 15, 2018 at 1:50 pm

नाही, बनवता येत नाही. हायड्रोपोनिक्स मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
असेही हायड्रोपोनिक्स दररोज बिना पावसाच्या पाण्याने आणि पाणी कमी असलेल्या ठिकाणी होत असल्याने त्याचा मुरघास बनविण्याची गरज नाही.

उत्तर
सुजय
फेब्रुवारी 22, 2018 at 4:30 pm

मुरघास करताना त्यात मिसळण्याकरिता बाजारात तयार silage mixture मिळतात असे ऐकिवात त्याबाबद्दल अधिक माहिती मिळेल का?

उत्तर
टीम पॉवरगोठा
फेब्रुवारी 24, 2018 at 10:01 am

Silage Culture साठी येथे कॉल करा. 9112219612

उत्तर
रमण
फेब्रुवारी 10, 2018 at 8:36 am

मुरघास बनवण्यासाठी प्रति किलो किती खर्च येतो

उत्तर
टीम पॉवरगोठा
फेब्रुवारी 12, 2018 at 12:11 am

अंदाजे 3 ते 4 रुपये खर्च येतो.

उत्तर
Sandip Patil Dorlikar
फेब्रुवारी 3, 2018 at 2:34 pm

Murghas tayar kartanna fakt makach asala tari chalel ka mazya kade charyachi jwari va makach ahe

उत्तर
टीम पॉवरगोठा
फेब्रुवारी 12, 2018 at 12:13 am

मक्याचा मुरघास फार छान होतो. जगभर शक्यतो मकेचाच मुरघास करतात.

उत्तर
सुरज विरकर
जानेवारी 14, 2018 at 11:57 am

मुरघास साठी हत्ती गवत वापरू शकतो काय

उत्तर
टीम पॉवरगोठा
जानेवारी 15, 2018 at 2:19 am

होय, वापरू शकता.

तरीही
मकेचा मुरघास केल्यास बेस्ट रिझल्ट मिळतील.

उत्तर
Gokul Kharde
डिसेंबर 28, 2017 at 4:47 pm

Sir, Murghasa sobat aankhi kay chara dyava, gahu kelyananter jo bhusa urto to dyava ka?, to kiti dyava

Ya vyatirikt maka bharda, pend, etc. Khady kiti pramanat 1 gaila dyave, tyache prman dubhtya gaila, 6-7 mahine gabhan gaila, kiti asave. Plz ya baddal margdarshan kara.

उत्तर
Ankush Bhandare
नोव्हेंबर 5, 2017 at 11:06 am

Sir …..
murghas tayar karnyasaathi maka lagvad karayachi aahe?
kontya jitiche maka beeyane vaaparu sir ?

उत्तर
आबासाहेब देशमुख
सप्टेंबर 28, 2017 at 2:40 am

शैलेश सर नमस्कार !
मुरघास बनविन्याकरीता जागेवर येऊन काही प्रशिक्षण व प्रात्याक्षीक देण्याची व्यवस्था पाँवर गोठा टिम करू शकेल का ?

उत्तर
टीम पॉवरगोठा
सप्टेंबर 28, 2017 at 4:18 am

*पॉवरगोठा ( मार्गदर्शन दौरा )*

सांगली सातारा कोल्हापुर साठी ख़ास.., लवकरच सम्पूर्ण महाराष्ट्रात.

पॉवरगोठा टीम तर्फे मोफत दुग्ध-व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर आता आपल्या गावात
आता टीम पॉवरगोठा चे तज्ज्ञ येतील तुमच्या गावात !!!

फ़क्त 30 ते 35 शेतकरी एकत्र येऊन नियोजन करा आमची टीम आपल्या दारी येऊन मोफत शिकवेल.

दुग्ध व्यवसाय
मुक्त गोठा
चारा व्यवस्थापन – मुरघास

चाऱ्याची निवड
चारा लागवड
चारा कापनी
चारा साठवणुक
मुर्घास निर्मिती ( प्रात्यक्षिक )

*तरुणांना मित्र मंडळाना सामाजिक तसेच सहकारी संस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकार्य करा.

संपर्क :
प्रथमेश पाटील ( प्रबंधक )
8805499750

महाराष्ट्रातील प्रत्येल गोठा पॉवरगोठा बनवण्याच्या दिशेने एक आणखी छोटे पाऊल ! आता प्रत्येक घरातच नाही तर गोठ्यात ही येणार समृद्धि

धन्यवाद

तुमचा मका फुलोऱ्यात आला की लोक जमा करून कॉल करा.

उत्तर
Pravin kharkar
सप्टेंबर 5, 2017 at 4:44 pm

सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्याकरिता कुठल्या विदेशी तसेच देशी गाईची निवड करावी आणि chandrapur मधल्या वातावरणात सूट होईल किंवा नाही क्रुपया माहिती द्यावी

उत्तर
Darshan patil
ऑगस्ट 29, 2017 at 1:48 pm

सर , आंदाजे मूरघास निर्मितीसाठी एकरी किती खर्च येतो तसेच तो मार्केट मधून विकत घ्यायचा असला तर किती रूपये/किलो पडतात.

उत्तर
swapnil pagar
ऑगस्ट 23, 2017 at 12:26 pm

सर मूरघासासाठी मकाचे स्पेशल बियणे आहे का ?

उत्तर
Vishal
ऑगस्ट 13, 2017 at 5:41 pm

मी मूरघास बनऊ इच्छितो. मला plz पूर्ण माहिती द्या,मला large quantity मध्ये production कार्यच आहे. Plz give mi your mobile no . Or contact mi 9421384080

उत्तर
juber attar
ऑगस्ट 11, 2017 at 2:36 pm

सर् मुरघास विकत मिळेल का

उत्तर
पॉवरगोठा टीम
ऑगस्ट 11, 2017 at 5:45 pm

हो मिळेल सर!
तुमचे नाव येथे क्लिक करून नोंदवा

उत्तर
गणेश
सप्टेंबर 2, 2017 at 10:24 am

बॅग कुठे मिळतील

उत्तर
Zishan Zamindar
जुलै 16, 2017 at 9:08 am

I’m interested in silage please call 9824745678 gujarat.

Good hydraulic pressing machine

उत्तर
Sharad pawar
जुलै 14, 2017 at 4:38 pm

सर मला चारा व्यतीरीक्त गाईसाठी खुराक काय व किती द्यावा लागेल please

उत्तर
राहुल जवरे
जून 19, 2017 at 2:09 pm

लॅक्टिक ऍसिड मूळे शेळ्यांना काही त्रास होतो का शेळ्यांना मुरघास खायला घातला तर चालेल का

उत्तर
पॉवरगोठा टीम
जून 21, 2017 at 12:41 am

नमस्कार सर,
मुरघास सर्व जनावरे आवडीने खातात.

उत्तर
समीर मेंडजोगे
जून 17, 2017 at 2:39 am

सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्याकरिता कुठल्या विदेशी तसेच देशी गाईची निवड करावी आणि नागपूर मधल्या वातावरणात सूट होईल किंवा नाही क्रुपया माहिती द्यावी

उत्तर
Prashant D Waghmare
मे 26, 2017 at 6:24 pm

Sir mla tumcha mobile no dya mla murghas banvaycha ahe

उत्तर
Powergotha team
मे 27, 2017 at 3:44 am
योगेश तायडे, जळगाव
मे 24, 2017 at 7:37 am

सर आमचा जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने भागामध्ये खूप जास्त प्रमाणात सरकी ढेप किव्हा सरकी केक म्हशीला दिला जातो कारण कोरडा चारा किव्हा कुट्टी ने चांगल्या प्रकारे दूध मिळत नाही, तर मुरघास म्हशीला दिल्यावर हे सरकी ढेप द्यावी लागेल कि नाही.?

उत्तर
योगेश तायडे
मे 24, 2017 at 7:23 am

धन्यवाद सर , तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माझा शंकेचे निरसन केले आहेत.

उत्तर
योगेश तायडे
मे 21, 2017 at 4:08 pm

सर, तुम्ही तुमचा ब्लॉग असे सांगितले आहे की, मुरघास तयार झाल्यानंतर 60 दिवसात संपवाव , पण सर मी ऐकलेलं आहे की मुरघास एकदा तयार केल्यावर त्याला आपण 2- 3 वर्ष वापरू शकतो, हे खरं कि खोट यावर माझं समाधान करावं

उत्तर
Shailesh Madane
मे 22, 2017 at 2:17 am

नमस्कार , मुरघास उघडून वापरायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही तो 50 ते 60 दिवसात संपवावा असे लिहिले आहे. तुम्ही मुरघास तयार करून ठेवला असेल तर तो तुम्ही कमीत कमी 45 दिवसानंतर एक ते दीड वर्षापर्यंत वापरू शकता.फक्त जेव्हा मुरघास उघडला जाईल तेव्हा तो 50 ते 60 दिवसात संपवावा.

उत्तर
शेखर
मे 13, 2017 at 3:47 am

सर मक्याचा मुरघास बनवला आहे..रंग आणि वास छान झाला आहे..गुर व शेल्या आवडीने खात आहेत..पण बैग उघडून मुरघास काढून परत कितीही व्यवस्थित बंद केलि तरीही फक्त वरच्या लेयर ला बुरशी लागत आहे..बुरशी असल्याने द्यावा की न द्यावा शंका येत आहे..का बैग उघडीच ठेवावी?? मुर्घासा ने खुशीत पन बुरशी ने चिंतीत

उत्तर
Shailesh Madane
मे 22, 2017 at 2:32 am

नमस्कार, आपण चांगला मुरघास बनविण्यात यशस्वी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. जेव्हा आपण मुरघास बनवतो त्यावेळेस जशी काळजी घेतली जाते तशीच काळजी काही गोष्टींच्या बाबतीत मुरघास उघडल्यानंतर घ्यायला हवी. आपल्या बाबतीत आपण रोज मुरघास काढताना बॅग मधील एक थर रोज निघेल याची काळजी घ्यावी, आज आपण मुरघास एक थर जर काढला तर आपल्याला उद्या बुरशी दिसणार नाही. जर काही भाग राहिला तर कदाचित त्या भागाला उद्या हलकी बुरशी लागलेली दिसून येईल. तुम्ही बॅग व्यवस्थित बंद करत आहेत चांगली गोस्ट आहे, फक्त एक पूर्ण चाऱ्याचा थर रोज काढू शकलात तर हा प्रॉब्लेम संपण्यास मदद होईल.

उत्तर
शेखर
मे 22, 2017 at 2:46 am

धन्यवाद सर…बैग भरताना ज्या क्वांटिटी मधे थर भरला होता तेवढाच काढून प्रयत्न करतो..मी कमी काढत होतो..धन्यवाद

उत्तर
ज्ञानदेव भगरे
मे 10, 2017 at 6:09 pm

शेळीला किती प्रमाणात मुरघास दयावा

उत्तर
Shailesh Madane
मे 22, 2017 at 2:35 am

शेळीला तुम्ही जेवढा हिरवा चारा देत होतात तितकाच मुरघास तुम्ही देऊ शकता.

उत्तर
siddhart
मे 2, 2017 at 4:49 am

Sir Mala muraghas pahije tyancha contact no. Bhetel ka

उत्तर
nilesh
एप्रिल 29, 2017 at 9:07 am

50किलो silage bag कुठे मिळेल?

उत्तर
vaishnav
एप्रिल 24, 2017 at 10:29 am

शेळीला मुरघास चालेल का

उत्तर
पॉवरगोठा टीम
एप्रिल 27, 2017 at 1:40 pm

हो नक्कीच चालेल,
शेळ्या आवडीने खातात.

उत्तर
प्रवीण सांगोले
एप्रिल 13, 2017 at 9:53 am

नमस्कार सर
मी एक लातूर (गंगापूर) येथील शेतकरी आहे. तुमच्या यूट्यूब चॅनेल वरील मी बॅगे तील मुरघास हा विडिओ पहिला व मुरघास बद्दल अजून माहिती घेतली व प्रेरणा घेऊन दुधोत्पादन वाढवण्यासाठी मी स्वतः हायड्रॉलिक प्रेस मशीनची अनेक ठिकाणी विचारणा केली असता मशीनची किमंत खूपच जास्त वाटते. यामुळे मी हायड्रॉलिक प्रेस मशिन स्वतः बनवत आहे व पुढील काळात अल्पदरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
प्रवीण सांगोले,
मोबाईल 9403013066

उत्तर
Sanjay
मार्च 26, 2017 at 5:31 am

Please Mo no

उत्तर
Sandeep Farkade
फेब्रुवारी 6, 2017 at 7:28 pm

Very helpful information

उत्तर
Dr Sandeep A farkade
फेब्रुवारी 4, 2017 at 6:40 am

Which type of plastic bag r 2 be used 2 prepare murghas

उत्तर
SRIDHAR SHANKAR SHINDE
जानेवारी 28, 2017 at 8:05 am

Sir 7 HF Gai Aahet Tr Kiti Tan Murghas Tyar Krava Aani Murghas 45 To 50 Divsat Nantr Vapravana

Sadharanta Kiti Divas Murghas Vapru Shakto

Aani Mla Ghasan Sambandhit Mahiti Milel Ka ?

Biyane Kuthe Milel Yachi Mahiti Dyavi Plz Sir

Aani Tumcha Ph No : Dyava Khup Important Aahe

उत्तर
Shailesh Madane
फेब्रुवारी 2, 2017 at 12:54 pm

एका एकरात 15 ते 20 टन मकेचा चारा तयार होतो . एका गायीला दिवसाला कमीतकमी 20किलो याप्रमाणे जरी हिशोब केला तरी महिन्याला 600 किलो मुरघास लागेल. त्याप्रमाणे नियोजन करावे. मुरघास उघडल्यानंतर 50 ते 60 दिवसात संपवावा. किंवा 50 ते 60 दिवसात संपेल या हिशोबाने खड्डे किंवा बांधकाम करावे. बियाण्याबद्दल माहितीसाठी लवकरच एक लेख प्रसारित करू.

उत्तर
SRIDHAR SHANKAR SHINDE
फेब्रुवारी 4, 2017 at 4:19 am

Thanks Sir

उत्तर
santosh jagtap
एप्रिल 19, 2017 at 3:20 pm

मुरघास उघडलातर50ते60दिवसात संपवावा पण नाही उघडला तर कीती दिवस टिकतो ???

उत्तर
पॉवरगोठा टीम
एप्रिल 21, 2017 at 11:55 am

सर,
ना उघडलेल्या मुरघासाला एक वर्षापर्यंत काहीही होत नाही.

उत्तर
SRIDHAR SHANKAR SHINDE
फेब्रुवारी 4, 2017 at 4:26 am

Sir Tumchya Aandajane 50 Te 60 Divasansati Kiti By Kitiche Bandhkam Karu.

उत्तर
Gangaprasad
जानेवारी 27, 2017 at 2:01 am

K P I
We sell Corn Mize and Sugagraze, Bajra (nutrifeed) silage and
silage bag, silage culture
At Kavalapur Tal Miraj Dist Sangli
Gangaprasad Patil

उत्तर
अशोक म वायाळ
जानेवारी 26, 2017 at 12:21 pm

मुरघास पिशवी कोठे मिळेल?

उत्तर
Chaitanya
जानेवारी 15, 2017 at 6:25 pm

सर मला वक़ूम मशीन कुठे भेटल मला महीनेला ६० टन सैलेज लगतेय

उत्तर
Dr.Archana A.nevase
मार्च 8, 2017 at 5:59 am

Sir What should be the Dimensions of Silo pit for preparation
of 25 Metric Tun Silage ?

उत्तर
Powergotha team
मार्च 8, 2017 at 8:00 am

Madam,

1 cubic feet can store upto 17-20 Kg of silage.

Thus you would need 1250 cubic feet space for your requirement of 25 tonne silage.

You can use pit of the size 20 x 12 x 5 feet (L X B X Depth)

Be sure to use up the opened silage within 60 days.

उत्तर
हर्षल पाटील तांगडे
जानेवारी 12, 2017 at 12:50 pm

सर मी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ातील तरूण युवक आहे. मी नुकताच 50×12 चा बंदिस्त गोठा बांधला आहे. माझ्या कडे 2 गावरान गायी आहे. त्या खुप कमी दुध देतात. त्यामुळे मला जास्त दुध देणार्‍या गायी घ्यायच्या आहे .तर त्या जवळपास कोठुन घेऊ.व फसवणूक होणार नाही. क्रुपया मार्गदर्शन करावे.

उत्तर
Sujay
जानेवारी 9, 2017 at 11:53 am

Sir.. Majhakade 6 gayee aahet. murghas tayar karnya aaadhi mala gayeena deun pahyacha aahe.. mi kunakadun vikat gheu shaken.

उत्तर
Dr Avinash Rede-Patil
जानेवारी 6, 2017 at 2:09 am

Gr8 job Shailesh sir.. This website will always guide to people about dairy farming

उत्तर
Kunal ghungarde
जानेवारी 4, 2017 at 4:49 pm

Respected sir, I appreciate your devotion for dairy industry, each one cattle farmer can grab a lot of knowledge which really need to implement by each one,hatss off sir

उत्तर
Sandeep patil
डिसेंबर 28, 2016 at 4:07 pm

मुरघास बनविताना vacuum machine वापरली तरी चालेल का bag मधील हवा काढन्यासाठी

उत्तर
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 31, 2016 at 1:36 pm

हो, संदीप. तुम्ही vaccum मशीन वापरून मुरघास ची बॅग हवाबंद करू शकता. बॅगेतील मुरघास बनविण्याचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता. –> बॅगेतील मुरघास

उत्तर
राहुल खुळे
डिसेंबर 21, 2016 at 7:38 am

सर मी मुरघास बनवला आहे १०/१२/२०१६
पण मी कुट्टी केल्यानंतर 18 ते 24 तासाने बॅग मदे भरला त्यात गुळाचे पाणी या पाण्यात मुरघास saver औषध ,आणि कुटीवर बॅग भरत असताना दोन तीन थरांवर हे पाणी आणि जाड मीठ व मिनरल मिक्सचर पावडर टाकली
तर या पाणी किंवा पावडर मुळे काही नास होणार नाही ना याची शंका मनात येते
मार्गदर्शन राजहंस दुध संघ संगमनेर
मला वाटते मला मार्गदर्शन ok मिळाले नाही

उत्तर
Shailesh Madane
डिसेंबर 21, 2016 at 8:25 am

जर तुमचा मुरघास बनवण्याचा पहिलाच प्रयत्न असेल तर त्यात कोणत्याही मिक्सचर, मीठ गूळ, पाणी विना बनवावा.

फक्त आणि फक्त कुट्टी केलेला मका बॅगेत भरून त्याला हवाबंद करावे. भरताना नीट तुडवावे, जेणेकरून हवा निघून जाईल.

कापणी केल्यानंतर पाणी जास्त राहिल्यास १-२ तास वाळविण्याची गरज असते.

मात्र कुट्टी केल्यानंतर लगेचच बॅग भरावी. कुट्टी नंतर ३-४ दिवस ठेवल्यास त्यातली सर्व पोषणतत्त्वे निघून जातील. सामान्यतः कुट्टी मशीन मधून डायरेक्ट बॅग किंवा खड्ड्यात मका पडावा अशी सोय करतात.

मशीनने मुरघास बनविण्याचा व्हिडिओ तुम्ही या लिंक वर पाहू शकता.

उत्तर
Pradeep Shinde
डिसेंबर 5, 2016 at 9:50 am

नमस्कार साहेब

माझा HFगायचा गोठा आहे माझ्याकडे 11गाय आहेत पुढे 25 गाय वाढवाच्या आहेत तर मला 50टण मुरघास साठी किती बांधकाम करावे लागेल व माप सांगावे

नमस्कार धन्यवाद

उत्तर
Dr. Shailesh Madane
डिसेंबर 7, 2016 at 4:55 am

नमस्कार,
गायी वाढवताना त्यांच्यासाठी पौष्टीक हिरवा चारा मुरघास म्हणून साठवण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. आता तुम्हाला किती किलो चारा साठवायचा आहे त्या प्रमाणे तुम्ही बांधकाम किंवा खड्डा तयार करू शकता.

तुम्ही 50 टन मुरघास बनवताना 10 टन किव्हा 15 टन याप्रमाणे ३-४ खड्डे किव्हा बांधकाम करून चारा साठवा. कारण एकदा मुरघास तयार झाल्यावर उघडल्यानंतर पुढील 60 दिवसांच्या आत संपला पाहिजे. त्यासाठी गायीच्या संख्येप्रमाणे चारा साठवावा करून ठेवावा.

मुरघास बनवताना 1 cubic ft (1 घनफूट = 1x1x1 ft) जागेत 15 ते 17 किलो चारा साठवता येतो.

१० टन साठी ५०० घनफूट जागा लागेल. म्हणजे १७ बाय १० चा ३ फूट खोल खड्डा करू शकता.

उत्तर
SANGRAM
मार्च 8, 2017 at 11:43 am

PLEASE GIVE ME CONTACT NO SIR DR SHAILESH MADANE

उत्तर
hanmant
सप्टेंबर 24, 2019 at 8:24 am

PLEASE SHARE CULTURES USED AND ITS USAGE QUANTITY PER TONNE FOR CORN & SUGARCANE CROP IN DETAILS .ALSO GIVE INFORMATION ABOUT PROCEDURE TO USE IT IN DETAILS

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत