शेळी पालनातील आहार नियोजन | पॉवरगोठा-PowerGotha
Close

ऑक्टोबर 17, 2016

शेळी पालनातील आहार नियोजन

शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची हे आपण मागील लेखात  शिकलो. (तो लेख आपण येथे क्लिक करून वाचू शकता – सुरुवात शेळीपालनाची)
या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन शिकूया.

शेळीच्या आहारातील जीवनसत्वे

शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी,हे घटक येतात.

शेळीच्या आहारातील विविधता

फार पूर्वीपासून शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात आहे. अशा प्रकारच्या फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे एकाच प्रकारचा चारा शेळ्यांना मिळत नाही त्या विविध प्रकारचा चारा खातात. आपणही जेव्हा बंदिस्त शेळीपालन करतो त्या वेळेस शेळीच्या आहारात विविधता ठेवणे फार महत्वाचे आहे.   शेळीचे सुरुवातीचे दूध (चीक) पहिल्या एका तासात पिलांना पाजावे. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लहान पिल्लाना प्रथिनांची व ऊर्जेची आवश्यकता जास्त असते. कोणत्याही वयोगटातल्या शेळीला चारा किव्हा खुराक देताना तिची उत्पादनातील अवस्था लक्षात घेणे गरजेचे असते. जसे लहान वयातील पिल्लाना वजनवाढीच्या खुरकाचे नियोजन करावे लागते.दूध देणाऱ्या गटातील शेळ्या व लहान पिल्ले यांची जीवनसत्त्वाची गरज खूप जास्त असते, या सर्व गोष्टींमुळे शेळीपालन करताना आहाराचे व्यवस्थापन फार महत्वाचे आहे.
 चारा  बदल करतानाची काळजी 
चारा बदल करताना लक्षात ठेवा-
  1. चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये. चारा सावकाश बदलावा.
  2. नवीन चारा चालू करताना 20 ते 25 टक्के नवीन चारा व 75 टक्के जुना चारा याप्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे. पोटातील उपयुक्त जिवाणूंना हा बदल स्वीकारण्यास वेळ लागतो.
  3. चाऱ्याची रोजची वेळ कधीच बदलू नये. व चाऱ्यामध्ये विविधता असावी.
 
शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट
उत्पादन – वजनवाढ
               दूध
               गाभनावस्था
               पैदास
शेळ्यांची ऊर्जेची गरज हि कर्बोदके व फॅट यातून भागवली जाते.  मिनरल्स हि शारीरिक प्रक्रियांसाठी फार महत्वाची असतात. वजनवाढी साठी व दुधउत्पादनासाठी लागणारी कॅलशिअम सारख्या मिनरल्स ची मात्रा पण वेगळी असू शकते.
 
शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. व यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग (ड्राय मॅटर)  हा खूप महत्वाचा असतो. चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्व हि कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्या मध्ये वेगळे असते, जसा कि लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते त्यात कोरडा भाग 10 ते 20 टक्के असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त 10 टक्के पाणी असते व कोरडा भाग जवळपास 90 टक्के असतो, शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.
 
शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थानुसार कोरड्या भागाचे प्रमाण बदलत असते. वजनाच्या 5 ते 7 टक्के कोरडा भाग आहारात दिला जावा. परंतु काही वेळेस 3 ते 4 टक्के एवढे प्रमाणही द्यावे लागते. म्हणून आपल्या गोठ्यातील सर्व शेळ्यांचे वजन माहित असणे फार महत्वाचे आहे. गोठ्याचा आहार ठरवताना सरासरी चाऱ्याच्या गरजेचा अंदाज बांधण्यासाठी शेळ्यांचे वजन व सरासरी कोरड्या भागाचे प्रमाण माहित असणे गरजेचे आहे.
 
शेळ्यांना सर्वात जास्त झाडपाला या प्रकारचा चारा आवडतो. मग कोणत्या प्रकारचा झाडपाला आपण लागवड करून शेळ्यांना पुरवू शकतो हे देखील शिकणे महत्वाचे आहे. शेवरी, सुबाभूळ, दशरथ यांची लागवड बाग पद्धतीने केल्यास कायमस्वरूपी किमान एका वेळेस शेळ्यांना त्यांच्या जास्त आवडीच्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. यापैकी सुबाभूळ या चाऱ्याचे नवीन वाण देखील बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात बीया नसतात. व झाडपाल्याची गुणवत्ता कोणत्याही मोसमात बदलत नाही.
पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास ( लुसर्न) हा देखील खूप पौष्टिक आहे. हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे चांगले स्रोत आहेत.
 
सुका चारा म्हणून मका व ज्वारीचा कडबा , सोयाबीनचे भुसकाट, किंवा प्रक्रिया केलेला इतर सुका चारा वापरता येतो.
मुरघास-  चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हवाबंद करून कमीत कमी 45 दिवस साठवून ठेवल्यास त्याचा पौष्टीक मुरघास तयार होतो व तो आपल्याला शेळ्यांसाठी वर्षभर वापरता येतो. दुष्काळी परिस्थितीत मुरघासाचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी मका या पिकाचा जास्त वापर केला जातो.
 
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. शेळ्यांना पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी असले पाहिजे. बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये तहान लागल्यावर शेळ्यांना मुबलक पाणी पिता येते.
 

हायड्रोपॉनिक्स

या पद्धतीने मकेच्या दाण्यापासून 7 ते 9 दिवसात तयार झालेला हिरवा चारा फार लुसलुशीत असतो व शेळ्या अशा प्रकारचा चारा आवडीने खातात. दुष्काळी परिस्थितीत शेळ्यांना हिरवा चारा पुरविण्यासाठी हि पद्धत फार उपयोगी ठरते.
दिवसभराच्या वैरणीच्या नियोजनामध्ये झाडपाला,हिरवा चारा व सुका चारा यांचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेळ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाणे शक्य होईल.
 
शेळ्यांना खुराक देताना शक्यतो दिवसभरातून 2 वेळेस द्यावा. खुराकामध्ये शेळ्यांसाठी मिळणारे खाद्य हि उपलब्ध आहे. विशेष करून खाद्य वापरात नसलेल्या गोठ्यावर मका, सरकी , खपरी पेंड याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. शेळ्यांची पेंड असो किंवा तयार केलेला खुराक यामध्ये खनिजतत्वाचे मिश्रण टाकणे फार गरजेचे असते,  शरीराच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी (खनिजतत्वे)मिनरल्स लागतात. दररोज मिनरल्स वापरल्याने शेळी वेळेवर माजावर येणे, गाभण राहण्याचे प्रमाण वाढणे, वजन वाढीस मदद होणे, त्वचा चमकदार राहणे, असे वेगवेगळे फायदे होतात.
 
आपण देत असलेला आहार हा सर्व जीवनसत्त्वांचा मिळून तयार झालेला असला पाहिजे. त्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच दररोज खनिजतत्वाचे मिश्रण देऊन आपला आहार परिपूर्ण बनवूया. कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यातील कोरडा भाग जाणून घेऊन त्यानुसार आहाराचे नियोजन करणे हि शेळीपालन व्यवसायातील महत्वाची गरज बनली आहे .

25 Comments on “शेळी पालनातील आहार नियोजन

अरविंद दिगांबर बन्सोड
मे 1, 2021 at 7:28 pm

मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे या व्यवसायाबद्दल माहिती माझ्या व्हॉट्स अप वर पाठवा

उत्तर
Ronak bundhe
सप्टेंबर 18, 2020 at 4:09 pm

Mla ya vyavsayachi adhik mahiti pathava whatsapp la

उत्तर
avinash shivaji parkhande
ऑगस्ट 22, 2020 at 2:07 pm

मला हा व्यवसाय चालु करायचा आहे मला व्यवसायाची माहिती PDF whats app please पाठवा

उत्तर
तुकाराम कचरे
ऑगस्ट 3, 2020 at 7:39 am

मला सरकी पेढ पायजे आहे कुठे मिळेल

उत्तर
gajendra tulshiramji atkari
जून 18, 2020 at 11:37 am

good information

उत्तर
Shubham patil
मार्च 24, 2020 at 7:50 am

मला हा व्यवसाय चालु करायचा आहे मला व्यवसायाची माहिती PDF whats app please पाठवा

उत्तर
Ganesh patil
नोव्हेंबर 22, 2019 at 3:48 pm

शेळी पालन व्यवसाय

उत्तर
Pradip pandurang raut
मे 18, 2019 at 2:02 am

Nice sir

उत्तर
शशिकांत पाटिल.
जानेवारी 17, 2019 at 7:10 am

सर, मला सुबाभुळाचे नविन वाण (बि नसलेले) कुठे मिळेल, व त्याविषयी सविस्तर सांगा. त्या नविन वानाचे नविन नाव काय आहे. ते पण सांगा.

उत्तर
सुरेष
जानेवारी 14, 2019 at 12:52 pm

20 शेळी करिता किती एकर जमीन लागती

उत्तर
Pradip
नोव्हेंबर 6, 2018 at 4:23 am

50 bakri aani tyanichi pille yanch bandhist palan karych jhal tr kiti acer jamin lagel charyasathi

उत्तर
Dhiraj vangate
ऑगस्ट 2, 2018 at 11:02 am

Best sir

उत्तर
Rohit
नोव्हेंबर 23, 2018 at 10:20 am

1 Acer khup jhale

उत्तर
विलास जाधव
जुलै 15, 2018 at 7:40 am

छान मार्गदर्शन केले आहे

उत्तर
राज
जानेवारी 24, 2018 at 10:46 am

खनिजतत्त्वे म्हणजे काय व कोणती आहेत

उत्तर
manoj panchal
जानेवारी 5, 2018 at 10:02 pm

छान लेख आहे

उत्तर
Santosh tambe
ऑक्टोबर 10, 2017 at 8:54 pm

शेवरी सुऴबाबूळ बोर किंवा आनखी झाडेपाला यांचे रोप कुठे मिळेल सागु शेकता का

उत्तर
Santosh tambe
ऑक्टोबर 10, 2017 at 8:45 pm

Nice infarmeshan sar

उत्तर
Sangram Gawade
ऑगस्ट 8, 2017 at 3:04 pm
शुभम
एप्रिल 2, 2017 at 7:08 am

या लेखातून खुप माहिती मिळाली . धन्यवाद …
पण hydroponics बद्दल अजून माहिती मिळाली तर आनंद होईल .

उत्तर
sharad baliram pawar
मार्च 14, 2017 at 8:16 am

nice information sirji

उत्तर
Rajesh
फेब्रुवारी 28, 2017 at 10:57 am

Hydroponics Chara Kasa Tayar kartat. Step by Step kalel ka ?

उत्तर
Ranjit kolekar
जानेवारी 15, 2017 at 10:46 am

छान

उत्तर
Nitin patane
जानेवारी 6, 2017 at 7:31 am

छान लेख

उत्तर
किशोर बामणे
डिसेंबर 26, 2016 at 3:35 pm

उत्तम लेख आहे

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत