Close

प्रश्नोत्तरे

दुग्ध व्यवसाय, शेळी पालन किंवा पोल्ट्री मधील वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची खाली उत्तरे दिली आहेत.  अजून काही प्रश्न असल्यास वाचकांनी पॉवरगोठा वेबसाईट वरील कोणत्याही लेखाखाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारावेत.

गायी वाढवताना त्यांच्यासाठी पौष्टीक हिरवा चारा मुरघास म्हणून साठवण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे.

मुरघास बनवताना 1 cubic ft (1 घनफूट = 1x1x1 ft) जागेत 15 ते 17 किलो चारा साठवता येतो.

१० टन साठी ५०० घनफूट जागा लागेल. म्हणजे १७ बाय १० चा ३ फूट खोल खड्डा करू शकता.
जास्त मुरघास बनवायचा असेल तर तुम्ही ३-४ खड्डे करून साठवा. कारण एकदा मुरघास तयार झाल्यावर उघडल्यानंतर पुढील 60 दिवसांच्या आत संपला पाहिजे. त्यासाठी गायीच्या संख्येप्रमाणे चारा साठवावा करून ठेवावा.
तुम्ही ५० टन मुरघास बनवताना 10 टन किव्हा 15 टन याप्रमाणे ३-४ खड्डे किव्हा बांधकाम करून चारा साठवा.

जातिवंत गाय तयार करताना नोंदी ठेवणे, उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य वापरणे महत्त्वाचे आहे. तसेच इन-ब्रीडिंग (in-breeding) होऊ देता कामा नये. त्यासाठी एकाच वळूचे वीर्य गाय आणि तिच्या खालच्या पिढी ला वापरू नये.
गाईचे (कालवडीचे) वजन कमीत कमी २७५ ते ३०० किलो असावे.

जातिवंत गाईच्या पैदाशी साठी पॉवरगोठा च्या गोपैदास लेखामध्ये येथे माहिती वाचा

दुग्धव्यवसाय साठी तुम्ही २ लाखांपासून गुंतवणूक चालू करू शकता.
१००० स्क्वे फूट (१गुंठा) जागेत तुम्ही ५ गाईंची मुक्त गोठ्यामध्ये सोय करू शकता. २ गाई पासून चालू करून ५ गाई पर्यंत पोचा. २ गाई घेण्यासाठी अंदाजे १,१०,००० रुपये खर्च येईल.
शेड, कंपाउंड ची जाळी आणि गव्हाण बांधण्यासाठी अंदाजे ७०,००० खर्च येईल.