देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मे 29, 2017

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती

बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती,  त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे.  म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे.  ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील.

१. खिल्लार गाय

खिल्लार गाय

खिल्लार गाय

सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. !!!!

 

मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय !

खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार

तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये.

ही दुष्काळी जात मानली जाते. आणि दुधासाठी गायीपेक्षा जास्त शेतीच्या कामासाठी खिल्लार बैल वापरले जातात.

वर्षाकाठी फक्त सरासरी ४५० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.२ % लागते.

 

२. लाल कंधारी गाय

या जातीचा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातील मानला जातो.

लाल कंधार

लाल कंधार

लखलबुंधा असाही या जातीचा नाव आहे.  हीसुद्धा दुष्काळी जात मानली जाते.

साधारणतः गडद लाल रंग असून फिका ते अतिशय गडद (तपकिरी) अशी व्हरायटी देखील पाहायला मिळते. राजा सोमदेवराय याने कंधार गाईंना राजाश्रय दिल्याचे मानले जाते.

भरपूर शेतीच्या कामात या जातीच्या बैलांचा उपयोग होतो.

वर्षाकाठी सरासरी ५९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.५७ % लागते.

 

३. साहिवाल गाय

साहिवाल गाय

साहिवाल गाय

भारतातील सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल ओळखली जाते.

या जातीचा पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्ह्यातून उगम झाला आहे.  मुलतानी, तेली, मॉंटगोमेरी अशी देखील नावे आहेत.  दूध-उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त अशी जात आहे.  तपकिरी लाल, किंवा महोगनी लाल अशा विविधते मध्ये पाहायला मिळतात.

वर्षाकाठी सरासरी २३२५ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सर्वाधिक ६००० किलो दूध दिल्याचं सुद्धा मानले जाते.

ऑस्ट्रेलिया मध्ये या गाईची आयात करून संकरित झेबू गाय तयार केली आहे.

 

 

४. लाल सिंधी गाय

उष्ण हवामानात तग धरून राहणारी म्हणून ही जात प्रसिद्ध आहे.  या गाईचा मूळ उगम पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग असून गडद लाल ते फिका पिवळा अशी विविधता पाहायला मिळते. शिंगे मजबूत आणि आडवे वर्तुळाकार वाढलेले दिसून येतात.

लाल सिंधी

लाल सिंधी

साहिवाल जाती प्रमाणेच भरपूर दूध देणारी हि जात मानली जाते.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, ब्राझील, श्रीलंका इत्यादी देशात निर्यात होऊन या जातीवर संशोधन आणि संवर्धन करण्यात आले आहे.

वर्षाकाठी सरासरी १८०० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.५ % लागते.

 

 

५. गीर गाय

गीर देखील साहिवाल, लाल सिंधी प्रमाणे भरपूर दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.  सुरती, गुजराती या नावाने देखील ओळखली जाते.

गीर गाय

गीर गाय

गुजरातमधील गीर जंगलावरून या गाईचे नाव पडले आहे. बैल भरपूर अवजड कामे करू शकतात. आणि तणावामध्ये तग धरणारी म्हणून ही जात विख्यात आहे.

कमी खाद्यातून जास्त दूध देण्याची खासियत आहे. ब्राझील तसेच अमेरिकेत देखील आयात करून यांचे अतिशय उत्तपा संवर्धन करण्यात आले आहे.

वर्षाकाठी सरासरी २११० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  ब्राझील मध्ये एका गाईने ६४ लिटर दूध दिल्याचे देखील बोलले जाते.

स्तूप आकारातील कपाळ आणि लांब कान ही यांची ओळखू येणारी वैशिष्ट्ये.

 

६. ओंगोले गाय

मुखत्वे आंध्र प्रदेश मध्ये आढळून येणारी जात, शेती काम तसेच दूध या दुधारी कामासाठी उपयोगी आहे. ओंगोले प्रदेशातील असल्यामुळे हे नाव पडले. नेल्लोर म्हणून देखील प्रसिद्ध.

ओंगोले गाय

ओंगोले गाय

रोगप्रतिकारक, काटक आणि कमी चाऱ्यावर गुजराण करू शकणे ही या जातीची वैशिष्ट्ये.

ओंगोल जातीची निर्यात अमेरिकेत मांस, ब्राझील मध्ये मांस आणि दूध, तसेच श्रीलंका, फिजी, जमैका येथे शेतीकामासाठी करण्यात आली.

चमकदार पांढरा रंग असून, मजबूत, छोट्या लांबीची शिंगे असतात. वर्षाकाठी सरासरी ७९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ३.७९ % लागते.

 

 

७. वेचूर गाय

वेचूर गाय

वेचूर गाय

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी जात केरळ मधील वेचूर येथून उगम पावली आहे.

हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी उंची (३ फूट). जगातील सगळ्यात छोटी जात आहे.  हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात.

उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत. उंचीच्या मानाने भरपूर दूध.

वर्षाकाठी सरासरी ५६१ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.७ – ५.८ % लागते.

 

42 Comments on “देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

शशीभूषण जाधव
एप्रिल 26, 2021 at 3:23 pm

सर्व गाईंबाबत संपूर्ण माहिती पाहिजे, कोठे मिळेल? उदा. गाई साधारण दिवसाला काय काय आणि किती प्रमाणात खाते? त्या त्या गाईसाठीचे वातावरण कसे असावे? या गाईंच्या किमान किंमती काय असतील? मला गाईंचा गोठा करून व्यवसाय करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळेल का?

उत्तर
Machhindra khairnar
नोव्हेंबर 6, 2020 at 4:48 am

मला शुद्ध महाराष्ट्रीयन देशी गायिंबद्दल संपूर्ण हवी आहे

उत्तर
Suraj Hole
मे 11, 2020 at 5:54 pm

खात्रपूर्वक गीर गाय कोठे मिळेल आणि किती रकमेपर्यंत मिळेल.कृपया लवकरात लवकर कळवावे

उत्तर
Kumar
जुलै 22, 2020 at 12:34 pm

मला गीर गाय हवी आहे.
कुठं मिळेल व कितीला

उत्तर
prasad gae
एप्रिल 17, 2020 at 2:56 pm

खुप छान माहिती मिळाली

उत्तर
Dattatray
फेब्रुवारी 22, 2020 at 5:29 pm

शीवसह्याद्री बहुउद्देशीय सामाजिक संस्था कासेगाव संचलित , स्वामी समर्थ गोशाळा , पंढरपुर . आपल्याकडे असणाऱ्या देशी गाई , भाकड गाई , कारवडि , अपंग गाई किरकोळ पैशासाठी कसाबला विकू नका . सांभाळण्यासाठी जड वाटत असल्यास मातीमोल किंमतीत कसाबाला विकण्यापेक्षा आमच्या गोशाळेत आणून सोडा , आम्ही त्यांचे संगोपन करू , छोट्याशा गरजे साठी हिंदू संस्कृतीचे पतन करू नका . गोमाता वाचवा देश रोगमुक्त ठेवा .आम्ही गौमतेचे विनामुल्य संगोपन करू . संपर्कासाठी-9503041034 प्रत्येकाने एकदा वाचा डोळ्यात पाणी येईल,,,,,,,,

लाईक नको फक्त आणि फक्त शेअर करा……

मित्रानो तुम्ही जर गाईचे दूध पिले असाल तर २ मि. वाचून शेअर
करा..

मी गाय आहे .

मला तुमची आज खुप गरज आहे.

गाय
तुम्हाला माझ्य दुधा पासुन बनवलेले दही, लोणी खुप आवडते .

आज पण लोक
प्रसादासाठी माझ्या दुधापासुन बनवलेले पदार्थ खातात.

मी खुप शांत
स्वभावाची आहे .

मी कधी कुणाचा वाईट
विचार करत नाही .

तुम्ही मला दिलेला
सुकलेला चारा अन्य काही मी खाते.

माझे शेण गोमुत्र तुम्हाला फायद्याचे आहे.

पण मला आज तुमची गरज आहे.

हिंदू आणि मुस्लिम
मनुष्यांना मी विनंती करतेय

माझी विनंती त्यांना ऐकवतेय ..!

लोक थोडया पैशासाठी मला विकतात,

तुमच्या थोडया पैशासाठी मला किती वेदना सहन कराव्या लागतात.

पहिले मला कत्तलखान्या मध्ये आणतात.
४ दिवस मला उपाशी ठेवले जाते.

कारण माझे हिरोकिन
मासांला चिकटण्यासाठी,
नंतर मला खेचत आणतात.

माझ्यावरती गरम
गरम उकळले पाणी टाकले जाते .

माझे दुध पिणारे सर्वजन

मी तुमची आठवण काढते मला जोराने मारले जाते

माझी त्वचा खेचुन काढतात.

माझे पाय बांधून
मला उलटे टांगले जाते.

अजून पर्यंत मी मेले नाही ,
मी वाट बघत असते.

माझं दुध पिणारा मनुष्य मला वाचवण्यासाठी येईल.

पण

या प्रवित्र आणि पावन भुमीवर कोणीच नाही.

जो धर्म आणि कायदा याचे पालन करून मला वाचवेल ….।

मी ऐवढ्या वेदना होऊन मरते तरी सुध्दा मी तुम्हाला शाप देत नाही.

कारण
मी पण

एक ‘आई ‘ आहे.

उत्तर
Sunil Dashrath Wandhare
नोव्हेंबर 2, 2019 at 8:22 am

1) गीर गाय Kuthe Midel, Chandrapur madhe milel kay? kimmat kay ?
2) साहिवाल गायची Kuthe Midel, Chandrapur madhe milel kay? Kimmat kay?

उत्तर
Sunil Dashrath Wandhare
नोव्हेंबर 2, 2019 at 8:20 am

1) गीर गाय ची किंमत काय, chandrapur जिल्ह्यात कोठे मिळेल
2) साहिवाल गायची किंमत किती, Chandraur जिल्ह्यात कोठे मिळेल

उत्तर
प्रविण शामराव घार्गे
जुलै 11, 2019 at 5:56 pm

मला गीर,सहिवाल, थारपारकर, ह्या गायी साता-यात कोठे मिळतील त्याबद्दल माहिती हवी आहे तरी मार्गदर्शन करावे ही विनंती.

उत्तर
Amit Dilip patil
जानेवारी 17, 2021 at 7:38 am

Mazya kade 2 Sahiwal ahet

उत्तर
श्री . भाऊ ठाकुर
जून 22, 2019 at 3:19 pm

मला गिर गाईचा गोठा करायचा आहे .
तरी माहिती दया .

उत्तर
प्रा गौतम निकम
मे 29, 2019 at 5:33 pm

1)गीर गाय ची किंमत काय, जळगाव जिल्ह्यात कोठे मिळेल
2)साहिवाल गायची किंमत किती, जळगाव जिल्ह्यात कोठे मिळेल

उत्तर
Deshigay
ऑगस्ट 3, 2020 at 4:07 pm

Milel ki

उत्तर
Rushikesh Jarande
मे 23, 2019 at 3:45 pm

गावरान देशी गायींचे दुधाचे दर २०१९ मध्ये किती आहेत

उत्तर
गणेश पवार
एप्रिल 11, 2019 at 5:00 pm

अतिशय उपयुक्त माहिती

उत्तर
Rahul
फेब्रुवारी 25, 2019 at 9:02 am

Sir mala lal Kandahar gay ghuayachi aahe market konte

उत्तर
Pradeep
डिसेंबर 25, 2018 at 10:37 am

माझे दोन एकर क्षेत्र आहे मला गीर गाय घ्यायची आहे कुठून गघ्यावी कशी घ्यावी हया बद्दल कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर
Umesh
डिसेंबर 18, 2018 at 12:51 am

देशी गायीची माहिती मिळाली बरे वाटले

उत्तर
Umesh
डिसेंबर 18, 2018 at 12:49 am
सिद्धार्थ संभाजी गंगावणे
डिसेंबर 1, 2018 at 12:53 pm

माझा व्हाट्सएपच्या नंबर वर ही सांगू शकता
7385728297

उत्तर
सिद्धार्थ संभाजी गंगावणे
डिसेंबर 1, 2018 at 12:51 pm

माझे दोन एकर क्षेत्र आहे मला गीर गाय घ्यायची आहे कुठून गघ्यावी कशी घ्यावी हया बद्दल कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर
A.D.Dhabale
ऑक्टोबर 5, 2018 at 6:02 am

मला यवतमाळ मध्ये नेर मध्ये गायी पालन करायचे आहे. येथील तापमान 35 ते 45 च्या दरम्यान आसते. तर कुठल्या गायींचे पालन करता येईल .कृपया मार्गदर्शन करावे.

उत्तर
madhav madane
सप्टेंबर 13, 2018 at 7:41 am

Mala tal. Rahuri, dist Ahmednagar
Yethe desi go palan karayche ahe konti jat nivdu please suggest kara
Mala lahan pana pasun khup avad ahe

उत्तर
संतोष दासु डूचाल
जुलै 13, 2018 at 9:43 am

मला गाय विकत घेयची आहे मी कोठ माहित घेयची

उत्तर
Ganesh Nakate
जुलै 12, 2018 at 5:49 am

मला महाराष्ट्र मध्ये सोलापूर येथे कोणत्या देशी गाई चे पालन करायचं आहे मी कोणत्या दुधाळू गाई विकत घेऊन,या ठिकाणचे तापमान उन्हाळ्यात खूप जास्त असते.

उत्तर
lalit lanjewar
मे 26, 2018 at 6:10 am

मला विदर्भातील चंद्रपूर,नागपूर,वर्धा या ठिकाणी गाई पालन करायचं आहे मी कोणत्या दुधाळू गाई विकत घेऊन,या ठिकाणचे तापमान उन्हाळ्यात खूप जास्त असते.

उत्तर
राजेंद्र वसंत भोसले
ऑगस्ट 21, 2018 at 2:48 pm

माला रत्नागिरी खेड तालुका मधे देशी गायी पालन करायचे आहे कोणत्या गायी घेऊ व कुटे भेटतील
माझे नाव राजेंद्र वसंत भोसले
मो:9768303191

उत्तर
Dr.A.B.Doifode
मार्च 22, 2018 at 7:28 am
सुभाष बारहाते
मार्च 9, 2018 at 7:38 am

देशी गाईची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

उत्तर
Mahesh
जानेवारी 8, 2018 at 5:34 am

देशी गायची माहीती देल्या बद्दल धन्यवाद.
देशात अजून इतर देशी गाईची जाती आहेत त्या गाईची पण माहीती दूध कीती देतात , हवामान , खादय , तूप व इतर गुनधरम ची महीती दिलयास शेतकरी बाधंवाना महीती मिळेल .

उत्तर
विजयसिंह देशमुख.
ऑक्टोबर 16, 2017 at 4:21 pm

खुप छान व उपयुक्त माहिती मिळाली,
.. धन्यवाद.

उत्तर
Nilesh Kotkar
सप्टेंबर 30, 2017 at 11:32 am

can i get information abt tharparkar cow.

उत्तर
amol tupat
सप्टेंबर 9, 2017 at 12:41 pm

गीर गाय कुठे मिडेल विदर्भात सर

उत्तर
अभिजीत स्वामी
जून 24, 2017 at 5:23 pm

गिर गाय आणि सहिवाल गाईची किंमत किती असेल ? तसेच या गाय महाराष्ट्रात कुठे मिळतील

उत्तर
वाघमारे गुरुनाथ
ऑक्टोबर 12, 2017 at 5:29 pm

सहीवालं व गीर गाय महाराष्ट्रात कोठे मिलतील

उत्तर
भुजंग बाबुराव चिंताकोटे
फेब्रुवारी 10, 2020 at 2:52 pm

देवणी गायीचा उल्लेख दिसून येत नाही.. कृपया सुधारणा करावी.. बाकीच्या गायी बद्दल माहिती छान दिली आहे

उत्तर
अभिजीत स्वामी
जून 24, 2017 at 5:22 pm

गिर गाय आणि सहिवाल गाईची किंमत किती असेल ?

उत्तर
अनिल वसंत चव्हाण
जून 4, 2017 at 5:54 am

धन्यवाद

उत्तर
Dashrath mogal.
जून 3, 2017 at 12:32 pm

Kupshan mahiti .

उत्तर
kiran kapadi
मे 30, 2017 at 6:34 am

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जातीया बद्दल खूप छान माहिती दिल्या बद्दल आभार…

उत्तर
Uttam Dhaygude
जून 1, 2017 at 9:19 am

Very Informative, Excellent. This will surely help to preserve our native breeds of cow.
Keep posting such information, blogs.

उत्तर
श्रीकांत बरकले
मे 30, 2017 at 6:17 am

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जातीया बद्दल खूप छान माहिती दिल्या बद्दल आभार…

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत