Close

पॉवरगोठा.कॉम वर प्रसिद्ध झालेले विविध लेख

दुग्ध व्यवसाय

१.   मुक्त संचार गोठा  मुक्त संचार गोठा पद्धतिची तोंडओळख , तिचे फायदे, प्रकार, विविध फोटो अशी माहिती या लेखात मिळेल.

२.   मुक्त संचार गोठ्याचे फोटो

आपण मुक्त गोठ्याची यशस्वी उदाहरणे येथे पाहू शकता. विविध प्रकारची सावली, कालवडींचा कप्पा इत्यादी फोटो आणि त्यांची माहिती.

३.   गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

गाईंचे आणि बैलाचे नंबर का लिहून ठेवावेत ? गोपैदाशीत नोंदींचे महत्व स्पष्ट करणारा लेख.  आपल्याच गोठ्यात उच्च दूध निर्मिती क्षमतेची आणि कमी आजारी पडणारी गाय तयार करा.

४.   स्वच्छ दूध निर्मितीची तोंड-ओळख : उच्च प्रतीचं स्वच्छ दर्जेदार दूध-उत्पादन कसे करावे !

दुधाला उच्च दर मिळण्यासाठी करा स्वच्छ दूध निर्मिती.  सोमॅटीक पेशी कमी असलेले, प्रतिजैविके नसलेले आणि भेसळ नसलेले स्वच्छ दूध जास्त दर मिळवून देऊ शकते.

५.  यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला 

दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा वाढविण्यासाठी अवलंब करा एका चतुःसूत्रीचा !  मग यश  तुमचेच 

६.  दूध धंद्यातील नफा तोटा

दूध धंद्यात नफा आणि तोटा कशाप्रकारे मोजला पाहिजे हे समजाविणारा लेख. उत्पन्न काय खर्च काय आणि भांडवल काय हे  समजून घ्या

७.  देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

प्राथमिक माहिती घ्या देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जातीची !! खिल्लार, थारपारकर, गीर, साहिवाल, लाल कंधार, ओंगोल इ. ची   तोंडओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. 

८.  मुरघास निर्मिती-१

दुग्धव्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिक आहार पुरवणे फार गरजेचे असते. आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी करण्यात आली. परंतु अशा प्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती हा एकमेव पर्याय आहे.

९. मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट

मुरघास बनवणार असाल तर हा लेख गीता म्हणून वापरा.

प्रत्यक्ष  मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत  क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट.    मुरघास निर्मिती साठी एकरी किती मक्याची लागवड,     प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू.     एका एकरात किती चारा तयार होतो ?    इत्यादी मूलभूत गोष्टींची बारीक तपशीलवार आणि क्रमवार माहिती येथे वाचा

देशी कुक्कुटपालन

१.   कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन

अंडी उत्पादन धडा क्रमांक १ : देशी कुक्कुटपालनातून अंडी उत्पादन घेताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय करावे याची सखोल माहिती या लेखात मिळेल.

२.   अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.   अंडी उत्पादन कमी मिळणे अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत, ते या लेखात सविस्तर चर्चिले आहे.

३.   देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

नवीन कुक्कुटपालन करू पाहण्याऱ्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कोंबडी रवणीला बसल्याप्रमाणे घर करून बसत असतात.  अशा १० सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचायला मिळतील.

४.   देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

देशी कुक्कुटपालनामधील सर्व महत्त्वाच्या जातींची तोंडओळख फोटो सहित करून देण्याची मालिका. त्यातील पहिली जात म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रो लॉर्प.  काळ्या कोंबडीविषयी पूर्ण माहिती येथे वाचा.

शेळी पालन  

१.   शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची – शेळीपालन व्यवसायाबद्दल मूलभूत माहिती देणारा हा लेख.

२.   शेळी पालनातील आहार नियोजन

या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन समजावून सांगितले असून शेळीच्या आहारातील जीवनसत्वे शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवरचे अवलंबन असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज, जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी इत्यादींचे महत्त्व – शेळ्यांना विविध प्रकारचं चारा देण्याची गरज इत्यादी गोष्टी या लेखात वाचायला मिळतील.