ब्लॉग | Page 2 of 4 | पॉवरगोठा-PowerGotha
Close

दूध धंद्यावर बोलू काही – मुक्त गोठा आणि चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी युक्ती

मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत.  चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला […]

पुढे वाचा

लॉकडाउन दिवस क्र २

शहरातील सुशिक्षित जनता जीव धोक्यात घालून सूचना डावलून सुपर मार्केट आणि किराणा समोर चिकटून लाईन लावत असताना, एक सुंदर चित्र महाराष्ट्रातील डेअरीत पाहायला मिळाले दूध जमा करायला आलेले शेतकरी अतिशय संयमाने एकेमकांपासून ३-४ फूट अंतरावर उभे आहेत, डेअरी ने देखील लक्ष्मणरेखा आखून या प्रक्रियेला सोपे केले आहे. मित्रांनो याला सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे […]

पुढे वाचा

दुग्ध व्यवसाय आणि लॉकडाऊन दिवस क्र १

लॉक डाऊन दिवस क्र १ नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा काल रात्री २४ मार्च २०२० रोजी ८ वाजता केली. आज पासून पुढील २१ दिवस आपल्याला ही बंदी निभवायची आहे. लॉकडाऊन का जरुरी आहे, त्यावर उहापोह पोस्ट च्या शेवटी आहे. तत्पूर्वी आपण हे २१ दिवस सत्कारणी […]

पुढे वाचा

दूध धंद्यातील नोंदी कोणत्या, कशा आणि कुठे ठेवाल ?

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे. दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल. […]

पुढे वाचा

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दूध-धंदा करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुधाचा उत्पादकाला मिळणारा दर . दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि उदाहरणार्थ 2018 मध्ये तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर खाली होते.  शासन निर्णयाप्रमाणे दर लागू झाले नसल्यास 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत होता.  २०२० मध्ये ही लॉक […]

पुढे वाचा

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

Power gotha design dairy farm design

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे.    हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.   अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!      तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

काय नाव:  ऱ्होड आयलँड रेड ( RIR )     कशासाठी: (प्रकार) उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर ) ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेतील हा अजून एक लेख.  देशी कुक्कुटपालन करताना शेतकरी वर्गाला पडणारे १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. खाली वाचा. 1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ? जातीची निवड ही कोंबडीची  उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी. प्रत्येक जात ही जन्माला येताना काही […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

काय नाव:  ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प   कशासाठी: (प्रकार) दुहेरी वापर (डीपी – DP ड्युअल पर्पज ) ऑस्ट्रोलॉर्प ही जात तशी दुहेरी वापरची आहे परंतु योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादन सुद्धा देते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश ऑस्ट्रोलॉर्प ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे, किंबहुना तेथील स्थानिक जातींचा संकर आहे. ऑस्ट्रोलॉर्प हे नाव ऑस्ट्रेलियन ओर्पिंगटन या शब्दांच्या […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

Dairy Farm setting

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा