Close

म्हशी पालन

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर

जनावरांचे टॅग

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित तंत्रज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देऊन तुमच्या गाईंची गळाभेट करण्यास नवीन वर्षापासून निघाले आहेत. त्यांच्याकडे तुमची माहिती (डेटा) गोळा करण्यासाठी ५०,००० टॅब्लेट्स दिले गेले आहेत. हा टॅग किंवा बिल्ला कसा असेल ? जनावरांचे टॅग पिवळ्या रंगाचा बिल्ला असून त्यावर १२ आकडी ओळख क्रमांक असेल तो ८.८ […]

पुढे वाचा

मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा

  पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत  आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना  होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच  बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन  करण्याची सरासरी ही फारच कमी आहे. ९० टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादका कडे २ […]

पुढे वाचा