Close

स्वच्छ दूध निर्मिती

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि सध्या तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर आले आहेत.  शासन निर्णयाप्रमाणे दर अजून लागू झाले नसल्यास अजूनही 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत आहे. मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की.  लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर बोलवावाच लागतो की. मदत म्हणून खाद्य कंपन्या किंवा औषध कंपन्यांनी दर कमी केल्याचे तर अपेक्षित नाही.  बरं चेरमन वेळेवर पगार भी देईना झालाय. इतका तोटा सहन […]

पुढे वाचा

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे.    हो का? मालक, आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.   अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!      तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन नोंदवही तुमची मदत करू शकते.    तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ?  अशी टेक्नॉलॉजि आहे का ?   तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल – पण […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

उच्च प्रतीचं स्वच्छ दर्जेदार दूध-उत्पादन कसे करावे !

स्वच्छ दूध निर्मिती   दुध धंद्याला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी दुधाला उच्च दर मिळणे जरुरी आहे. अर्थशास्त्रातील सामान्य गणितानुसार, एखाद्या  वस्तूला किंवा सेवेला उच्च किंमत मिळण्यासाठी त्याची ग्राहक वर्गामध्ये उच्च दर्जा किंवा दुर्मिळ वस्तू म्हणून ख्याती असली पाहिजे.  दूध हि गोष्ट दुर्मिळ नाही.  भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच दुधाला देखील दर मिळण्यासाठी उच्च आणि उत्तम प्रतीचे दर्जेदार दूध निर्मितीची खूप निकड आहे.   ही गरज ओळखून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये काही दुग्ध-पुरवठादार  रुपये ७० ते ८०/- प्रती लिटर ने दूध विक्री करत आहेत.  हाच किंवा असाच उच्च दार आपल्या सामान्य शेतकऱ्याला देखील का मिळू नये हा उहापोह पॉवरगोठा टीम […]

पुढे वाचा