मुक्तसंचार गोठा Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मुक्तसंचार गोठा

मुक्त गोठ्याची रचना – सोप्या ५ युक्त्या । Mukta Sanchar Gotha Design

मुक्त संचार गोठा डिझाईन mukta sanchar gotha design plan

मुक्त गोठ्याची रचना करताना करायच्या सोप्या ५ युक्त्या (मुक्त संचार गोठा डिझाईन Mukta Sanchar Gotha Design ) बरेचदा  पशुपालक शेतकरी विचारणा करतात की मुक्त गोठ्याचा प्लॅन, किंवा डिझाईन पुरवा  म्हणून.  शक्यतो प्रत्येकाची उपलब्ध जागा आणि इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने एक ढोबळ, ठोकळा  प्लॅन देणे अवघड ठरते.   आपापल्या परसातील, गोठ्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर  शेतकऱ्यांचे गोठे पाहून मुक्त गोठ्याची रचना केलेले फायदेशीर ठरते.  पॉवरगोठा करायचा असेल तर हे करताना खालील ५ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि अंगभूत कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळेल. #१ मुक्त गोठ्याचा आकार मुक्त गोठ्याचा आकार आणि डिझाईन तुमच्या सध्याच्या गोठ्याची रचना आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या […]

पुढे वाचा

स्मार्ट दुग्धव्यवसाय – दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या । Dairy Farming in Maharashtra

CMT test - Dairy Farming Maharashtra Marathi Mahiti

दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या (tips for Success Dairy Farming in Maharashtra) #काय आहे गुपित दुग्ध व्यवसायातील यशाचे?     स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात.     जरा विचार करा – मेहनतीने कमविलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामी होणे, एखादी लस विसरल्याने मरतुक होणे, किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते भांडवलाचे पैसे अक्षरशः महिन्या-२ महिन्यांत फुंकले जातात.    दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते.    असो, दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या  आहेत.    […]

पुढे वाचा

दूध धंद्यावर बोलू काही – मुक्त गोठा आणि चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी युक्ती

मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत.  चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो. सांगू ना ? मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो. का ? ते ठाऊक आहे का ? अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात.  नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई […]

पुढे वाचा

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दूध-धंदा करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुधाचा उत्पादकाला मिळणारा दर . दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि उदाहरणार्थ 2018 मध्ये तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर खाली होते.  शासन निर्णयाप्रमाणे दर लागू झाले नसल्यास 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत होता.  २०२० मध्ये ही लॉक डाऊन संकटामुळे काही ठिकाणी दर कमी झाले आहेत.  मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय दूध-धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की.  लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर […]

पुढे वाचा

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

Power gotha design dairy farm design

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे.    हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.   अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!      तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी फार्म मॅनेजमेंट नोंदवही तुमची मदत करू शकते.    तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ?  अशी टेक्नॉलॉजि आहे का ?   तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

Dairy Farm setting

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]

पुढे वाचा

मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत  आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना  होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच  बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची […]

पुढे वाचा