Close

नोंदवही

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि सध्या तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर आले आहेत.  शासन निर्णयाप्रमाणे दर अजून लागू झाले नसल्यास अजूनही 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत आहे. मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की.  लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर बोलवावाच लागतो की. मदत म्हणून खाद्य कंपन्या किंवा औषध कंपन्यांनी दर कमी केल्याचे तर अपेक्षित नाही.  बरं चेरमन वेळेवर पगार भी देईना झालाय. इतका तोटा सहन […]

पुढे वाचा

दूध धंद्यातील नफा तोटा

मित्रहो,   खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा !  प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो.   बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते.   आम्ही पॉवरगोठा.कॉम  वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो  आहोत.   कुठल्याही  व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा  मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते.   लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा  कसा ?   आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे : ३ प्रकारचे आर्थिक […]

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]

पुढे वाचा

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर

जनावरांचे टॅग

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित तंत्रज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देऊन तुमच्या गाईंची गळाभेट करण्यास नवीन वर्षापासून निघाले आहेत. त्यांच्याकडे तुमची माहिती (डेटा) गोळा करण्यासाठी ५०,००० टॅब्लेट्स दिले गेले आहेत. हा टॅग किंवा बिल्ला कसा असेल ? जनावरांचे टॅग पिवळ्या रंगाचा बिल्ला असून त्यावर १२ आकडी ओळख क्रमांक असेल तो ८.८ […]

पुढे वाचा

गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ गायी असाव्यात.  उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा व मुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो . परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त होते. कमी दुध देणारी व रोगप्रतिकारक शक्ति कमी असणारी जनावरे, कितीही चांगल्या सुविधा पुरवल्या तरी हा व्यवसाय फायदेशीर करु शकत नाहीत. म्हणून आपल्या गोठयात जातिवंत संकरीत गाय असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की, जातीवंत गाय कोठे शोधायची? ती एक तर खात्रीलायकरीत्या मिळणार नाही आणि मिळालीच तर भरपूर महाग […]

पुढे वाचा