Close

Uncategorized

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे.    हो का? मालक, आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.   अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!      तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन नोंदवही तुमची मदत करू शकते.    तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ?  अशी टेक्नॉलॉजि आहे का ?   तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल – पण […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

काय नाव:  ऱ्होड आयलँड रेड ( RIR )     कशासाठी: (प्रकार) उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर ) ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड आइलैंड ह्या बेटावर उगम तेथून निवडक पैदाशी द्वारे जगभर प्रसारीत. इंगलंड मधील काळ्या छातीचे मलय कोम्बड्यांन पासून ही जात तयार करण्यात आली अशी इतिहासात नोंद आहे. अमेरिका आणि उपराष्ट्रामधे मुक्त पद्धतिने अंडी उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध जात आहे. कुठे मिळेल : (उपलब्धता) सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात अनेक […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ? जातीची निवड ही कोंबडीची  उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी. प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा. मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते 1. मांस उत्पादक गिरीराजा वनराजा श्रीनिधी कलिंगा ब्राउन कुरोइलर 2. अंडी उत्पादक रौड आइलैंड रेड ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प देलहम रेड स्वर्णधारा ग्रामप्रिया ग्रामश्री मंजुश्री ब्राउन लेगहॉर्न 3.  दुहेरी वापराच्या डीपी / डीपी क्रॉस सातपुडा सह्याद्री कावेरी निकोबारी आर आर 4.  स्पेशल परपज कड़कनाथ सिल्की असील नेकेड नेक वरील सर्व जाती भारतामध्ये  उपलब्ध असून आपल्याकडील वातावरणामध्ये  उत्तमरीत्या संगोपीत केल्या जाऊ शकतात. 2) कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे ? […]

पुढे वाचा

पॉवरगोठा क्विझ: तुम्ही किती मुरलेले दूध-उत्पादक आणि पशुपालक आहात ??

दुग्ध-व्यवसायाची तुम्हाला कितपत माहिती आहे. हे एक मजेशीर क्विझ खेळून पहा. पहा तुम्ही पाचवी पास आहात का अव्वल नंबर चे एक्सपर्ट. मुक्त गोठा, मुरघास, गव्हाण, संकरित गाय अशा सोप्या साध्या कल्पनांवर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे.

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]

पुढे वाचा

व्हिडिओ – बॅगेतील मुरघास निर्मिती

बॅगेतील मुरघास निर्मिती

या व्हिडिओत आपण पाहणार आहोत – बॅगेतील मुरघास निर्मिती. चिकातील मक्यापासून अतिउत्तम मुरघास छोट्या छोट्या ४०-४५ किलो च्या बॅगेत भरला जातोय. हायड्रोलिक मशीन ने व्हॅकुमिंग करून सायलेज बॅग मधील हवा काढली जाते. ४५ दिवसांनी चारा तयार होतो आणि बॅग उघडली कि ५० दिवसात तो संपवावा लागतो. बॅग लहान असल्याने एकट्या माणसाला किंवा स्त्रीला सुद्धा ती उचलता येते. ६-८ रुपये प्रति किलोंनी हा चारा विकला जातो.   श्री शैलेश राचकर, रा विझोरी, माळशिरस, सोलापूर यांच्या सहयोगाने आणि डॉ शैलेश मदने यांच्या समवेत पॉवरगोठा.कॉम.

पुढे वाचा