अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन - अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय | पॉवरगोठा-PowerGotha
Close

ऑक्टोबर 6, 2017

अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

 

भरघोस अंडी उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी

भरघोस अंडी उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी

*अग ऐकलस का ??

आज अंडी किती सापडली ….

अहो* *

हल्ली खुपच कमी सापड़तायत काय कराव….

जरा पॉवर गोठा.कॉम वर जाऊन बघ बरं *…..!!

देशी कुक्कुटपालन करणाऱ्या कुटुंबातील हा नेहमीचाच संवाद

खरं तर मुक्त पद्धति मधे अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच  अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

 

अंडी उत्पादन कमी मिळणे

अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत ते आज सविस्तर पाहु.

कोंबडी ही साधारण वयाच्या 20 व्या आठवड्यात अंडयावर येते आणि 24 व्या आठवड्या पासून पूर्ण क्षमतेने अंडी उत्पादन सुरु करते. हा शरीरामधे होणार नैसर्गिक बदल असतो.

कमी अंडी मिळण्याचे एक आणि एक च मुख्य कारण आहे – कोंबड्यांवर असणारा ताणतणाव.

अंडी उत्पादनात घट – कोंबड्यांवर ताणतणाव

तुम्हाला स्वतः बद्दल अनुभव असेलच ! की एखाद्या घरगुती किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये मानसिक किंवा शारीरिक तणावात असाल तर तुमची कामे पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाहीत. तसेच काहीसे पशूंचे सुद्धा आहे मग ते दूध देणाऱ्या गाई असोत किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्या !!

अंडी घालणे ही अगदी गाय विण्यासारखी प्रक्रिया असल्याने, ह्याचा कोंबड्यांच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण येतो. आणि त्यात भर म्हणून इतर काही कारणांमुळे तणावात भर पडत असेल तर कोंबड्या कधीच पूर्ण क्षमतेने अंडी देत नाहीत.

कोंबड्यांवर ताण येण्याची प्रमुख कारणे

कोंबडी हा तसा अत्यंत लाजाळु पक्षी घरातील स्त्री वर्गाकडे जास्त जवळीक ठेवणारा त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे फार महत्वाचे आहे

१. वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवणे

कोंबड्या ह्या अत्यंत टेरिटोरियल असतात म्हणजे कळपा मधे वयाप्रमाणे प्रत्येकाची पत ही ठरलेली असते. त्यामुळे मोठ्या कोंबड्या कधीच लहान पिलाना किंवा तलंगाना खपवून घेत नाहीत. अश्या कोंबड्या एकत्र ठेवल्या की मोठ्या कोंबड्या लहान पिल्लांना चोच मारुन जखमी करतात किंवा पाठीवरील पिसे उपसुन उघड्या करतात. अशा संघर्षामुळे सर्वच कोंबड्यांच्या शरीरावर ह्याचा ताण येतो त्यामुळे अंडी उत्पादन बऱ्याच वेळा कमी होते. म्हणून शक्यतो एकाच वयाच्या कोंबड्यांचा किंवा पिल्लांचा कळप असावा. त्यांना एकत्र मिसळू नये.

वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवणे

वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवणे

२. गोठ्याजवळ अचानक मोठे विचित्र आवाज येणे

गोठ्याजवळ कुत्र्यांचे भुंकणे किंवा मांजराचे ओरडणे तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असणे, वाहनांचा कर्णकर्कश आवाज येणे किंवा नेहमी गोठ्यात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणे या कारणांमुळे सुद्धा कोंबड्यांवर ताण येऊ शकतो ज्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो याच साठी गोठा हा मुख्य रस्त्या पासून थोडा सुरक्षित दूर अंतरावर असावा, जेणेकरून आवाजाचा कमी त्रास होईल. तसेच इतर प्राण्यांपासून कोंबड्यांना खास करून अंड्यांवरील कोंबड्यांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.

कुत्र्याच्या आवाजाचा ताण

कुत्र्याच्या आवाजाचा ताण

3 उन्हाळ्यात तीव्र उन्हाचा परिणाम

उन्हाचा अंडी-उत्पादनावर परिणाम

उन्हाचा अंडी-उत्पादनावर परिणाम

साधारण ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हीट मुळे आणि उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अंडी उत्पादनावर तीव्र नकारात्मक परिणाम होतो. अश्या वेळी कोंबड्याना थंड पाण्याचा पुरवठा करावा, तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत.
शेड मधे हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

उन्हाळ्यात कृत्रिम सावली

मुक्त जागेत झाडांची किंवा सुक्या गवताची सावली पुरवावी.
मोकळ्या जागेत मातीवर पाणी शिंपडावे, ज्यामुळे जमीन उकरून शरीराचे तापमान कमी करणे कोंबड्यांना सोपे जाते आणि परजीवी किटकांपासून नैसर्गिक सुटका होते.

उन्हाळ्यात ओली जमीन

उन्हाळ्यात ओली जमीन

4 प्रति पक्षी पुरेशी जागा उपलब्ध नसणे

प्रति पक्षी कमी जागा

प्रति पक्षी कमी जागा

अंडयासाठी कुक्कुटपालन करत असताना प्रती पक्षी किमान 4 ते 5 वर्ग फुट जागा पुरवावी.
मुक्त पद्धत असेल तर रात्री च्या निवाऱ्यासाठी किमान 2 वर्ग फुट जागा प्रती पक्षी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे.
अपुरी जागा असेल तर आजार लवकर पसरतात, कमी जागेत जास्त पक्षी ठेवताना पर्चेस (कपाट किंवा मचाणासारखी रचना) चा वापर करावा.

कमी जागा प्रतिपक्षी

5 लसिकरण केल्यास किंवा आजारपणामुळे

लसिकरण करताना कोंबड्या योग्य प्रकारे न हाताळल्यास कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते.
लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्याना ताण कमी करणारी औषधे आणि लिवर टॉनिक्स द्यावित.

लसीकरणाचा अंडी उत्पादनावर परिणाम

लसीकरणाचा अंडी उत्पादनावर परिणाम

आजार पसरल्यास अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. तसेच वरचेवर कोंबड्याना जंत नाशक औषध देऊन घ्यावित.
लीटर हे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. त्यात 10% चुना मिक्स करावा.

6 अंडी देण्याची खोकी नसणे

अंडी देण्याची खोकी किंवा नेस्ट बॉक्स हे देशी कुक्कुटपालन अंडी उत्पादनासाठी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक साधन आहे.

नेस्ट बॉक्स - अंडी देण्याचे खोके

नेस्ट बॉक्स – अंडी देण्याचे खोके

कोंबडी ही नेहेमी अंधाऱ्या आणि एकांत असणाऱ्या सुरक्षीत जागी अंडी देणे पसंत करते. त्या दृष्टीने प्रती 6 ते 8 पक्षी एक अंडी देण्याचे खोके ज्याला नेस्ट बॉक्स देखील म्हणतात ते पुरवावे.
साधारण 1 फुट उंच आनी एक वर्ग फुट जागा असलेले एक खोके असावे. नेस्ट बॉक्स मधे एखादे अंडे खूण करुन कायम मागे ठेवावे त्यामुळे कोम्बड्याना अंडी घालण्यास प्रोत्साहन मिळते.

उच्च अंडी उत्पादनासाठी नेस्ट बॉक्स

हे खोके नेहमी स्वच्छ ठेवावे अस्वच्छ जागी कोंबड्या अंडी घालत नाहीत. एवढेच नाही तर अस्वच्छतेमुळे अंडी घाण होतात.

7 स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे

कोंबड्याना लागते - स्वच्छ पाणी

कोंबड्याना लागते – स्वच्छ पाणी

अंडयामधे 60 ते 70% पाणी असते. त्यामुळे अंडयावरील कोम्बड्यांना सतत स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यास नेहमी उपलब्ध हवे.
पाणी हे निर्जंतुकीकरण केलेले असावे तसेच पाणी देण्याची भांडी ही वारंवार स्वच्छ करावीत. शक्यतो पाणी स्वच्छ सुती कपड्याने गाळून घ्यावे. तसेच पाण्या मधे ई कोलाई किंवा सालमोनेला ह्या आजारांचे विषाणु येऊ नयेत याचा प्रयत्न करावा. .

8 संतुलित आहार नसणे

कोंबड्यांचा संतुलित आहार

कोंबड्यांचा संतुलित आहार

अंडी स्वतःच उच्च पोषणमूल्ये असणारी असतात. म्हणूनच अंडी घालणाऱ्या कोंबड्याना पोषक आहार पुरवणे अतिमहत्त्वाचे ठरते. अंडी उत्पादन सुरु होताच म्हणजे 20 ते 22 आठवडे वय असताना कोंबड्याना उच्च प्रथिने (16%) आणि ऊर्जा युक्त असलेला संतुलित आहार पुरवावा. मुक्त पद्धत असेल तर नैसर्गिक कीडे, मुंगी, गवत आणि इतर नैसर्गिक आहार यांच्या व्यतिरिक्त प्रति पक्षी किमान 80 ते 90 ग्राम संतुलित आहार द्यायला हवा, अथवा अंडी उत्पादनावर व्यस्त परिणाम होतो.

9 अतिरिक्त कॅल्शिअमचा स्त्रोत

अंडी देणाऱ्या कोंबड्यांना संतुलित आहारा सोबत किमान 5% अतिरिक्त कॅल्शिअम द्यावे.
बाजारात उपलब्ध असलेली खनीज मिश्रण/ कॅल्शिअम कार्बोनेट चा चुरा किंवा शिंपल्याचा चुरा तसेच पाण्यात मिसळलेला कळीचा चुना देखील चांगला पर्याय होउ शकतो.

कॅल्शिअम कमतरता - अंडी फोडून खाणे

कॅल्शिअम कमतरता – अंडी फोडून खाणे

कॅल्शिअम कमतरता - स्वतःचे अंडे खाणे

कॅल्शिअम कमतरता – स्वतःचे अंडे खाणे

कॅल्शिअम कमतरता - २

कॅल्शिअम कमतरता – २

कॅल्शिअम कमतरता - नाजूक अंडी

कॅल्शिअम कमतरता – नाजूक अंडी

योग्य खनिजांचा पुरवठा न झाल्यास कमी अंडी उत्पादना मध्ये कवच विरहित अंडी देणे, कमकुवत कवच असणारी-लगेच फुटणारी अंडी देणे या समस्या उद्भवतात.

10 योग्य वेळ प्रकाश उपलब्ध नसणे

कोंबड्याना उच्च अंडी उत्पादन देण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अंडयावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान 16 तास सलग प्रकाश दिसायला हवा.

उच्च अंडी उत्पादनासाठी - भरपूर सूर्यप्रकाश

उच्च अंडी उत्पादनासाठी – भरपूर सूर्यप्रकाश

त्यादृष्टीने दिवसा नैसर्गिक सूर्य प्रकाश किती तास असतो याचा अभ्यास करून त्याव्यतिरिक्त कृत्रिम प्रकाश पुरवावा लागतो. म्हणजे 12 तास सूर्य प्रकाश असेल तर 4 तास कृत्रिम प्रकाश लावावा. त्या प्रकाशाची तीव्रता शेड मधे सहज वर्तमान पात्र वाचता येईल एवढीच असावी.

11 अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळणे

अंडी उत्पादकांनी फार्म वर दिवसातुन किमान ३ ते ४ वेळा अंडी गोळा करावित. अंडी लवकर गोळा न केल्यास केव्हा तरी अपघाताने अंडे फुटते आणि कोंबड्याना अंडे खायची सवय लागते, ही विकृति वाढल्यास कोंबड्या स्वतः ची अंडी फोडून खायला सुरुवात करतात. साहजिकच तुमचे अंडी उत्पादन घटते.

अंडी उत्पादन कमी मिळणे

अंडी उत्पादन कमी मिळणे – वेळेवर अंडी गोळा करणे 

वेळेवर अंडी गोळा करणे

वेळेवर अंडी गोळा करणे

मुक्त पद्धत असेल तर कोंबड्याना बाहेर अंडी घालायची सवय लागते, हि सवय देखील अंडी उत्पादनासाठी चांगली नाही. त्यामुळे वेळीच कोंबड्यांना नेस्ट बॉक्स पुरवून योग्य सवयी लावाव्यात.

12 कोंबड्यांचे वजन आवाक्यात न राहणे

अंडयावरील कोंबडी ही नेहेमी हलकी असावी. अती वजन वाढ झाल्यास त्याचा अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. त्यादृष्टीने तलंग अंडया वर येताना म्हणजे 20 व्या आठवड्यात 1200 ते 1300 ग्राम वजन असावे. आणि सरासरी अंडी उत्पादक कोंबडीचे वजन 1500 ग्राम असावे. त्यापेक्षा जास्त वजन झाले तर अंडी उत्पादन कमी होउ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोंबड्यांच्या वजनाकडे आणि आहारा कड़े बारीक़ लक्ष असावे.

अंडी उत्पादनासाठी वजन आवाक्यात ठेवणे

अंडी उत्पादनासाठी वजन आवाक्यात ठेवणे

13 मौल्टिंग स्थिती मधे जाणे

वयाच्या 72 आठवड़यान पर्यंत कोंबड्या उच्च अंडी उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्या मौल्टिंग अवस्थेत जातात. या काळात कोंबड्यांच्या अंगावरील पिसे गळून पडतात आणि त्याजागी नवीन पिसे येतात.

मौल्टिंग स्टेज

मौल्टिंग स्टेज

साधारण या प्रक्रिये साठी 2 ते अडीच महीने जातात या काळात अंडी उत्पादन खुपच कमी होते अशावेळी पक्षी कत्तली साठी विकावेत.

14 कळपा मधील नरांचे प्रमाण

कळपामधील नरांचे प्रमाण कळपामधील नरांचे प्रमाण

साधारण 100 पिल्लांमधे किमान 30 ते 40 टक्के नर तयार होतात त्यामुळे अतिरिक्त नर योग्य वेळीच कमी करणे केव्हाही  फायद्याचे. नर सतत माद्यांच्या मागे लागून कळपात ताण निर्माण करतात.

उबवणुकीसाठी साठी अंडी उत्पादन घेत असाल तर प्रती 8 ते 10 मादी एक नर ठेवावा , जर खाण्यासाठी अंडी उत्पादन घेत असाल तर मात्र नर सांभाळायची काहीही गरज नाही.  योग्य वेळीच नर कळपातुन वेगळे करावेत त्यांची योग्य वाढ करुन ते इतर शेतकऱ्यांना ब्रीडिंग साठी विकावेत किंवा कत्तली साठी द्यावेत.

नर बाजूला करणे

नर बाजूला करणे

खुडूक कोंबड्यांचा बंदोबस्त

शुद्ध भारतीय वाण सांभाळत असाल तर कोंबड्या खुडूक होण्या च्या प्रमाणावर लक्ष्य ठेवावे. खुडूक कोंबड्या अंडी देत नाहीत आणि नेस्ट बॉक्स मधील जागा मात्र अडवून इतर कोम्बड्याना ती उपलब्ध होऊ देत नाहीत. त्यामुळे अश्या कोंबड्याना अंडी उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे किंवा त्यांचा वापर घरच्या घरी पिल्लू निर्मिति साठी करावा.

 

तात्पर्य

अशा रीतीने उच्च अंडी उत्पादन मिळवायचे असेल तर कोंबड्यांना अलगद हाताळणे, वेगवेगळ्या सवयी लावणे, आहाराची, पाण्याची सूर्यप्रकाशाची काळजी घेणे, नेस्ट बॉक्स, कोंबड्यांना नेहमी तणावमुक्त, सुरक्षित ठेवणे इत्यादी उपाय करावेत.

तुम्हांला कोणत्याही अडचणी येत असतील तर support@powergotha .com येथे ई-मेल करावा.

54 Comments on “अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

Kiran Namdeo Pawar
मार्च 13, 2021 at 3:56 pm

Sir khupach chan mahiti dili tyabaddal khup khup dhanyawad

Sir mala ajun ek mahit havi ahe, pure Gavran kombadi kashi olkhavi tasech etar Gavran cross komdi kashi olkhavi ya baddal margdarshan kara please

उत्तर
नितिन वैरागे, केज तालुका, जि.बीड..
नोव्हेंबर 23, 2020 at 3:42 am

गावरान अंडी खरेदी करायच एखाद केंद्र किंवा कोणती कंपनी बीड जिल्ह्यात आहे का असेल तर क्रुपया मला त्या अंडी खरेदी केंद्राची किंवा त्या कंपनी ची माहिती द्यावी पत्ता आणि संपर्क नंबर दयावा…

उत्तर
Dr. Ashok Dasharath Satpute
मे 29, 2021 at 10:04 am

पार्वती हचरीज, गेवराई.

उत्तर
Petlover Chirag
नोव्हेंबर 16, 2020 at 4:59 am

खूप छान

उत्तर
Vivek G.Rajput
नोव्हेंबर 7, 2020 at 2:17 pm

nest box kimat kay aani kase uplabd hothil

उत्तर
Ajinath patil
सप्टेंबर 2, 2020 at 4:34 am

Very good

उत्तर
Vinayak patil
सप्टेंबर 1, 2020 at 10:42 pm

आपल मार्गदर्शन खुप चांगले आहे तसेच पुढे कोंबड्याचे रोग,आजार, लसिकरण व ऊपाय यावरही मार्गदर्शन करावे

उत्तर
Narendra parkar
सप्टेंबर 1, 2020 at 2:51 am

मला गावरान अंडी देणारी कोंबडीचे पिलू हवे मी मुरबाड येथे रहातो मला सर्व माहिती हवी मी नवीन व्यवसायासाठी 350 पक्ष्यांचे नियोजन केले आहे.

उत्तर
Narendra
सप्टेंबर 1, 2020 at 2:48 am

मला गावरान अंडी देणारी कोंबडीचे पिलू हवे मी मुरबाड येथे रहातो मला सर्व माहिती हवी मी नवीन व्यवसायासाठी 350 पक्ष्यांचे नियोजन केले आहे.

उत्तर
रणजित गोमणे
ऑगस्ट 5, 2020 at 9:55 am

मी संगमेश्वर येथे राहत असून मला कोंबडी ची पिल्ले विकत घेय्ची आहे तरी जवळ कोणती पोल्ट्री आहे का जेणेकरून मला पिल्ले विकत घेता येतील

उत्तर
गणेश पुंजाजी चेके
एप्रिल 28, 2020 at 11:43 am

खाद्याची माहिती द्या

उत्तर
कुशाबा धांडे
एप्रिल 25, 2020 at 7:35 am

उत्तम चागला प्रोरजक्ट आहे य

उत्तर
Yogesh
फेब्रुवारी 8, 2020 at 6:47 pm

माज्याकडे कावेरी जातीच्या 35 दिवसाच्या 500 कोंबड्या आहेत. मला अंडी उद्पादनासाठी ठेवायच्या विचारात आहे. अंडी उद्पादनाबद्दल मार्केटिंगची माहिती पाहिजे .

उत्तर
Amit
जुलै 14, 2020 at 6:36 pm

9096100002 contact kara info hawiy

उत्तर
सुनिल मुरलीधर वडजकर
ऑक्टोबर 5, 2019 at 2:43 pm

मांसल कोंबडी व अंडी देनारी जात लवकर कळवा
9764647897

उत्तर

[…] वरून घेतली आहे. अधिक माहितीसाठी आपण पॉवरगोठा या वेबसाईट ला भेट […]

उत्तर
संदेश
सप्टेंबर 11, 2019 at 4:09 am

26 आठवड्याच्या कोंबड्या झाल्या तरी अंडी देत नाही
जात ब्लॅक आस्ट्रोलोप

उत्तर
संदेश
सप्टेंबर 11, 2019 at 4:07 am

26 आठवड्याच्या कोंबड्या झाल्या तरी अंडी देत नाही

उत्तर
Suraj
ऑगस्ट 17, 2019 at 6:57 pm

अप्रतिम माहिती मी नवीन सुरू करणार आहे . मला खूप महत्वाची माहिती मिळालेली आहे. Thanks

उत्तर
vishal
जुलै 20, 2019 at 11:58 am

सर माझाकडे कडक नाथ जातीच कोबडी असून त्यची अंडे च प्रमाणत घट पडली असुन उपाय द्वा

उत्तर
Pallavi
जून 29, 2019 at 3:55 pm

Mahiti khup chan aahe.. thank you….
Pan mod yene ha kay prakar aahe?
Tyacha andi kami honyavar parinam hoto ka?

उत्तर

मला गावरान अंडी देणारी कोंबडीचे पिलू हवे मी पुण्यात रहातो मला सर्व माहिती हवी मी नवीन व्यवसायासाठी 350 पक्ष्यांचे नियोजन केले आहे.
हंगाम
कालावधी
संगोपन
औषधे
जागेची निवड
शेड
कृपया मला सांगा राजीनामा दिला आहे मला आता काम करायचे नाही हा व्यवसाय सुरू करायचा आहे

उत्तर
swapnil jadhav
एप्रिल 11, 2019 at 7:44 am

khup khup dhanywad

उत्तर
dsp agrotech
मार्च 18, 2019 at 4:25 pm

सर नमस्कार ,
माझे जामखेड , अहमद नगर येथे गावरान कोंबड्या चा व्यवसाय सुरु आहे , तरी मी डीपी व क्रोस डीपी जातीचे पक्षी सांभाळतो आहे तरी माझ्या पोल्ट्री ची मध्ये ३२ हजार पक्षी क्षमता आहे . पण मला आत्ता बाजार नसल्यामुळे नफा मिळत नाही तरी मला अंड्याच्या वयवसाय करावयाचा आहे तरी माहिती हवी होती
आन्द्यासाठी कोणत्या प्रकारची जात मला पाळावी लागेल व किती अंडी मिळतील याचे मार्गदर्शन करावे ,
धन्यवाद,

उत्तर
Shyam
ऑगस्ट 2, 2020 at 3:08 am

Sir amala 500 कोंबडी

उत्तर
किशन यादवराव ढेंगळे
जानेवारी 15, 2019 at 11:26 am

खुड कोंबडी लवकर आंड्यावर येण्यासाठी काय उपाय करावे सर

उत्तर
Dattatray Namdeorao Deshmukh
नोव्हेंबर 3, 2018 at 3:49 pm

माझ्या कडे साडे सहा महिन्याचे चैतन्य hachri चे 250 पक्षी आहेत
साडे सहा महिने झाले तरी अजून अंडे देत नाही क्रुपया कारण काय असावेत
कृपया माहीत सांगावी

उत्तर
Parag kedar
ऑक्टोबर 28, 2018 at 6:49 pm

केज सिस्टिम मध्ये लेअर फार्मिंग ची माहिती आणि 1000 पक्षी ना लागणारा खर्च ची माहिती मिळेल का

उत्तर
नानासाहेब काळे
ऑक्टोबर 11, 2018 at 5:32 am

खूपच छान माहिती दिली

उत्तर
Rajesh Patil
सप्टेंबर 9, 2018 at 5:58 am

Sir maza kade kadknath 130 pakshi ahet tyat yevda madi 105 ahet ani nar 25 pn andi fkt 5 nighat ahet yavar upay ani aoshadi sucha

उत्तर
प्रमोद पाटील
ऑगस्ट 13, 2018 at 6:05 am

अंड्यावरील कोंबड्यासाठी घरगुती खाद्यात कोणकोणते घटक असावेत?
कृपया माहिती द्या…

उत्तर
पठान एजाज खाॅन
ऑगस्ट 8, 2018 at 11:55 am

पावर गोठा माध्यमातून अंडी उत्पादनाची योग्य माहिती मिळाली धन्यवाद

उत्तर
Digambar sonawane
मार्च 12, 2018 at 2:51 am

धन्यवाद group kadha yek

उत्तर

[…] अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन &#8… […]

उत्तर
BAGWAN
जानेवारी 25, 2018 at 11:19 am

Sir mazykade Satpuda a hey he jat kashi ahey

उत्तर
विजय कदम
जानेवारी 1, 2018 at 4:54 am

देशी कोंबडी मध्ये अंडी देण्यासाठी नराची गरज फार महत्वाची आहे का नाही

उत्तर
ऋषि
नोव्हेंबर 24, 2017 at 4:58 pm

घरी कमीतकमी खर्चात खाद्य कसे तयार करावे.?

उत्तर
sanjay N .Ambhore
ऑक्टोबर 29, 2017 at 3:45 pm

छान उपयुक्त माहीती दिली अंडी utpadanasathi देशी ची कोणती जात फायदे शिर ठरेल

उत्तर
Swapnil
ऑक्टोबर 21, 2017 at 2:13 am

Khup chan information dilit
Dhanywad

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 21, 2017 at 2:35 pm

धन्यवाद सर
तुमच्या कडकनाथ फार्म वरून भरपूर प्रेरणा आणि प्रोत्साहन लोकांना मिळत आहे.

उत्तर
रावसाहेब बेडसे
ऑक्टोबर 11, 2017 at 4:35 am

अशी माहिती जर वेळोवेळी मिळत राहिली तर शेतकऱयांचे अंडी उत्पादन वाढेल व शेतकऱ्याकडे भांडवल खेळते राहील.

उत्तर
निलेश थोरात.
ऑक्टोबर 10, 2017 at 1:51 am

छान माहीती धंन्यवाद

उत्तर
सोनिस श्रीदत्त
ऑक्टोबर 9, 2017 at 2:35 pm

धन्यवाद सर…

उत्तर
Dr. Vinod Panbhare
ऑक्टोबर 9, 2017 at 1:42 pm

Best imformation

उत्तर
Salim Pathan
ऑक्टोबर 9, 2017 at 1:41 pm

Sir ekdum Sundar margadarshan ahe, yamude ghari sudha gawran kombadyache palan yogyaritya karnyas madat hoil, Dhanyawad aple margadarshan amulya ahe

उत्तर
वामन भुरे
ऑक्टोबर 9, 2017 at 12:01 pm

खूप उपयुक्त माहिती आहे अंडी घालण्यासाठी चा बॉक्स साईज 12″*12″*12″ असा असला पाहिजे काय आणि असे रेडी मिळतात का

उत्तर
Team Powergotha
ऑक्टोबर 9, 2017 at 4:31 pm

पॉवरगोठा तर्फे रोल आउट पद्धतीचे नेस्ट बॉक्स विक्रिस् उपलब्ध अहेत
ज्यामधे कोम्बडी ने अंडे देताच ते एका बाजूला येऊन गोळा होतात
अंडी गोळा करण सोप्पा जात अंडी घान होत नाहीत

उत्तर
MAHENDRA somaji kakade
ऑक्टोबर 9, 2017 at 10:42 am

गावराण अंडी चे कोंबडी शेड कुठे पाहण्यासाठी मिळेल

उत्तर
Sachin lande
ऑक्टोबर 9, 2017 at 9:40 am

छान

उत्तर
संजय नारायणराव ambhore
ऑक्टोबर 9, 2017 at 8:55 am

अंडी utpadankaalat कोणते खाद्य द्यावे सविस्तर सांगावे

उत्तर
प्रीतम नलावडे
ऑक्टोबर 9, 2017 at 4:34 pm

अंडी उत्पादन काळात लेयर हे खाद्य वापरावे
साधारण 16 ते 19 % प्रोटीन आणि उच्च ऊर्जा असणारे खाद्य असावे 5% अतिरिक्त कैल्शियम चा पुरवठा करावा

उत्तर
संजय तावरे
ऑक्टोबर 9, 2017 at 6:20 am

खूपच छान आणि अतिमहत्वाची माहिती दिली आहे प्रीतम सर
अजून थोडी माहिती दिली तर खूपच बरे वाटेल ती म्हणजे वरती सांगितल्या प्रमाणे अंडी देणाऱ्या पक्षांचे जास्त वजन वाढू नये म्हणून कोणते आणि किती प्रमाणात खाद्य दिले पाहिजे
आणि मटणासाठी चा कोबड्यां ना कोणते आणि किती प्रमाणात खाद्य द्यावे

उत्तर
Subhash Raut
ऑक्टोबर 9, 2017 at 6:17 am

खुपच सुरेख माहीती …आभार…

उत्तर
Raju haribhau sultane
ऑक्टोबर 9, 2017 at 6:07 am

Very good

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत