Close

दूध धंद्याबद्दल का शिकावे ? आणि का शिकू नये ?

stencil.fb-lead-ad
दूध धंद्याबद्दल तुम्हांला बरेच काही माहिती आहे. तुमचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर, आम्ही स्पेशल आणि वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही.

आपण का शिकू नये याची कारणं आधी पाहूया !!
कुठून तरी सर्टिफिकेट मिळेल आणि ते कुठल्या प्रकरणात उपयोगी पडेल म्हणून शिकू नये.
कर्ज किंवा सबसिडी मिळेल म्हणून शिकू नये.
एका रात्रीत जादू होऊन धंदा नफ्यात येईल, खूप पैसे मिळतील म्हणून शिकू नये.
भरपूर दूध देणारी आणि कमी खाणारी, तसेच आजारी न पडणाऱ्या गाईचा पत्ता मिळेल म्हणून शिकू नये.

दूध धंद्याबद्दल का शिकावं याबद्दल पॉवरगोठा टीम कडे बरेच अनुभव आहेत.
रोज पैसे कमवून देणारा, हातात खेळतं भांडवल देणारा दुसरा कोणताच धंदा तुम्ही इतक्या कमी गुंतवणुकीत करू शकत नाही.
योग्य पद्धतीत केल्यास ५ गाईंच्या २५, आणि १०० लिटर चे ५०० लिटर म्हणजे – कमावणारे हात आणि धंद्यातील पक्का माल दोन्ही सुद्धा, एवढ्या वेगात दुप्पट तिप्पट पाचपट होणारा दुसरा कोणताही धंदा नाही.

त्यासाठी तुम्ही घरच्या घरी तुमच्या गोठ्यात, उत्तम निरोगी आणि भरपूर दूध देणारी गाय तयार कशी करायची ते शिकला पाहिजे. कालवडीची काळजी कशी घेतली पाहिजे हे शिकलं पाहिजे. गाय गाभण असताना काय करावे आणि गाय वेळेवर माजावर यावी म्हणून काय करावे हे शिकले पाहिजे. बळस पाहून माज ओळखायला शिकले पाहिजे. याला उत्तम गोपैदास म्हणतात.

गोठ्यात कमी कष्ट आणि कमी खर्च होऊन चांगले उत्पन्न यावे म्हणून काय करावे हे शिकले पाहिजे. मुक्त गोठा, उत्तम गोठ्याची रचना, तणावमुक्त गोठ्याची रचना, त्यात घ्यायची काळजी हे शिकले पाहिजे. यालाच गोठा व्यवस्थापन म्हणतात.

आजारी पडल्यावर दूध कमी होऊन औषधोपचारांवर खर्च होतो. म्हणजेच इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजुंनी तोटा होतो. तर मग गाय आजारीच पडू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. आजारी पडल्यावर डॉक्टर येण्याआधी आणि येईपर्यंत काय काळजी घ्यावी हे शिकले पाहिजे. गोठयात पेटीमध्ये कोणती औषधे, साहित्य ठेवावे हे शिकले पाहिजे. म्हणजेच आजार व्यवस्थापन तुम्हाला करता आले पाहिजे.
धंदा नेहमी फायद्यात राहावा यासाठी त्यातील input म्हणजे कच्चा माल म्हणजेच खाद्य आणि चारा कसा आणि किती वापरावा हे शिकले पाहिजे. उत्तम दर्जाचा हिरवा चारा एकच पीक घेऊन वर्षभर कसा साठवून ठेवावा हे शिकले पाहिजे. हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे तसेच पशुखाद्याचे महत्व आणि योग्य प्रमाण शिकले पाहिजे. यालाच चारा व्यवस्थापन म्हणतात.

एवढ्या छान धंद्यात किती नफा होतो आणि तो उत्तरोत्तर वाढत राहावा हे शक्य होण्यासाठी धंद्यातील नोंदी, आणि पैदाशीच्या नोंदी ठेवायला शिकले पाहिजे. नफा-तोटा कसा मोजायचा हे शिकले पाहिजे.
तुम्ही गैरहजर असताना गोठ्याची काळजी घेणारे कामगार – त्यांनी काय करावे आणि काय करू नये, कोणती माहिती नोंद करून ठेवावी या गोष्टी शिकल्या पाहिजेत. यालाच कामगार प्रशिक्षण म्हणतात.
दुधाला चांगला दर आणि मागणी मिळण्यासाठी कमी सोमॅटीक पेशी असलेले, प्रतिजैविके किंवा कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेले, कमी जिवाणूयुक्त असे दूध म्हणजेच स्वच्छ दूध कसे तयार करायचे, गाई आणि गोठ्याची स्वच्छता कशी ठेवायची हे शिकले पाहिजे. म्हणजेच स्वच्छ दूध निर्मितीचा अवलंब केला पाहिजे.
वरील सर्व गोष्टी योग्य प्रकारे आत्मसात केल्यात तर नक्कीच तुमचा चांगला चालणारा धंदा अजून वेगाने धावायला लागेल यात शंका नाही.

या सर्व गोष्टी शिकवणारे पॉवरगोठाचे १ दिवसीय, २ दिवसीय, ५ दिवसीय प्रशिक्षण शिबीर होतात. वरील सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी या शिबिरामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
अधिक माहिती आणि सहभाग नोंदणी करण्यासाठी खालील पॉवरगोठा प्रतिनिधींशी संपर्क साधावा
9112219612