Close

डिसेंबर 21, 2017

देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ?

जातीची निवड ही कोंबडीची  उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी.

प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा.

मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते

1. मांस उत्पादक

गिरीराजा
वनराजा
श्रीनिधी
कलिंगा ब्राउन
कुरोइलर

2. अंडी उत्पादक

रौड आइलैंड रेड

ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प
देलहम रेड
स्वर्णधारा
ग्रामप्रिया
ग्रामश्री
मंजुश्री
ब्राउन लेगहॉर्न

3.  दुहेरी वापराच्या

डीपी / डीपी क्रॉस
सातपुडा
सह्याद्री
कावेरी
निकोबारी
आर आर

4.  स्पेशल परपज

कड़कनाथ
सिल्की
असील
नेकेड नेक

वरील सर्व जाती भारतामध्ये  उपलब्ध असून आपल्याकडील वातावरणामध्ये  उत्तमरीत्या संगोपीत केल्या जाऊ शकतात.

2) कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे ?

कोंबडीच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर विशिष्ठ खाद्य द्यावे,  जे सकस आणि पौष्टिक असेल.

तसेच खाद्याची योग्य साठवणूक आणि हाताळणी केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहाते.

1 ते 21 दिवस – चिक स्टार्टर

एक दिवसांच्या पिलाना 21 दिवस पूर्ण होइ पर्यंत चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे, ह्या अवस्तेत पिल्लांचि वाढ अत्यंत झपाट्याने होत असते.
प्रोटीन 18 ते 19 %

21 ते विक्री पर्यंत

जर पक्षी मांस उत्पादनासाठी ठेवले असतील, तर चिक फिनिशर द्यावे.  चिक फिनिशरमुळे जलद वजन वाढ होते.

सोबत योग्य प्रमाणात जीवनसत्व आणि लिवर टॉनिक द्यावे

प्रोटीन 15 ते 16%

21 ते अंडी उत्पादन सुरु होई पर्यंत

जर पक्षी अंडी उत्पादनासाठी वाढवत असाल, तर तलंगाना पहिले 6 महीने ग्रोवर हे खाद्य द्यावे.   ग्रोवरमुळे त्यांचे वजन जास्त न वाढता योग्य शारीरिक वाढ होईल.

प्रोटीन 15 ते 16 %

अंडी उत्पादक कोंबड्यांना

अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रोटीन आणि ऊर्जा युक्त आहार द्यावा. या आहाराला लेयर फीड असे म्हणतात.

सोबत 5% अतिरिक्त कॅल्शिअम आणि योग्य प्रमाणात लिवर टॉनिक द्यावे.

प्रोटीन 16 ते 18 %

3) कोंबड्यांना कोणत्या लसी दिल्या जातात ?

लसिकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.   शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.

1 दिवस      मरेक्स HVT                           मानेतुन इंजेक्शन
7 दिवस     रानीखेत / मानमोडी लसोटा     डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
14 दिवस   गमभोरो IBD                          डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
21 दिवस   लसोटा बूस्टर                           पिण्याच्या पाण्यातून
28 दिवस   गमभोरो बूस्टर                        पिण्याच्या पाण्यातून
35 दिवस   देवी / फाउल पॉक्स                 चामडी खाली इंजेक्शन

अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.

4) गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी किती जागा लागते  ?

बंदिस्त डिप लीटर पद्धत

या पद्धति मधे पक्षी भुश्याच्या गादिवर सांभाळले जातात

मांस उत्पादन
मांस उत्पादनासाठी पक्षी सांभाळायचे  असतील तर 1.5 ते 2 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.

अंडी उत्पादन
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवायचे असतील तर 4 ते 5 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.

अर्ध बंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धत

मुक्त संचार पद्धत असेल तर फ़क्त रात्रीच्या निवाऱ्या साठी बंदिस्त शेड असावे.

मांस उत्पादन – मांस उत्पादनासाठी पक्षी पाळायचे असतील तर 1 वर्ग फुट प्रती पक्षी जागा असावी.

तसेच कमीत कमी 8 ते 10 वर्ग फुट प्रती पक्षी मुक्त जागा उपलब्ध असावी.

अंडी उत्पादन

मुक्त पद्धति ने अंडी उत्पादन घेत असाल तर 2 वर्ग फुट प्रती पक्षी जागा शेड मधे अपेक्षित आहे,  आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ग फुट जागा प्रती पक्षी मुक्त संचार उपलब्ध असावा.

5) कोंबड्यांचे उष्णते पासून रक्षण कसे करावे ?

कोंबड्यांना घाम येत नाही.  कोंबड्या कुत्र्या प्रमाणे मोठ्याने श्वास घेऊन शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

शेडच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टर रंग मारावा, त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते.

शेडची रुंदी 30 फूटा पेक्षा जास्त नसावी.  शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी.   शेडच्या भिंती जास्त उंच नसाव्यात.

पडदे नेहमी वर खाली करता यावेत त्यावर उष्मकाळात पाणी शिंपावे .

मुक्त पद्धत असेल तर जमिनीवर पानी शिंपावे,  ज्यामुळे गारवा रहातो.

मुक्त जागेत दाट सावली असणारी झाडे लावावीत.  झाडे नसतील तर शेडनेट किंवा गवताच्या साह्याने कृत्रिम सावली पुरवावी.

कोंबड्यांना  नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असावे .

पक्ष्यांना वरचेवर ताण कमी करणारी औषध द्यावीत.

6) लीटर ची काळजी कशी घ्यावी

खालील पैकी जे आपल्याला स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याचाच लीटर म्हणून वापर करावा.

भाताचे तुस
लाकडाचा भूसा
शेंगाची टरफले
पोयटा माती किंवा पांढरी माती
चुना मिश्रीत माती

लीटर हे नेहमी कोरडे असावे किंवा ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.

लीटर योग्य वेळी बदलावे.

लीटर वरचेवर हलवावे किवा स्क्रेपिंग करावे म्हणजेच उलटे पालटे करावे.

लीटर मधे नेहमी 10 % चुना मिक्स करावा.

अचानक रात्री लीटर ओले झाले तर 10 ते 15% चुना मिक्स करून चांगले हलवून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी बदलावे.

लीटर चा वास येऊ लागताच बदलावे किंवा E M सोलुशनचा स्प्रे करावा लीटर मधून आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

7) अंडी उत्पादन कमी होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?

कोंबड्यांचे वजन आटोक्यात न राहणे.

कोंबड्यांना  योग्य ठिकाणी अंडी घालण्याची सवय न लावणे.

कोंबड्यांना  योग्य प्रमाणात कैल्शियम आणि खनिजांचा पुरवठा न करणे.

दिवसातून 4 वेळा अंडी न गोळा करणे.

दिवसातून 16 तास सलग प्रकाश मिळू ना शकणे.

कोंबड्यांवर सतत ताण राहणे.

योग्य प्रकारे कोंबड्यांना न हाताळने कोंबड्या आजारी असणे.

पौष्टिक आहार ना मिळणे.

8) पैदाशीसाठी कुक्कुट पालन करताना काय काळजी घ्यावी ?

पैदाशी साठी कुक्कुट पालन करत असाल तर नर मादी संख्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.

प्रति 8 ते 10 मादी मागे 1 या प्रमाणात कळपा मधे नर असावेत.

नर हे अतिशय चपळ आणि रुबाबदार असावेत.  तसेच आपल्या जातीची गुण वैशिष्ठे ठळक दाखवणारे असावेत.

नर आणि माद्या हे एकाच कळपा पासून जन्मलेले नसावेत.

काही काळाने नर बदलावेत.

माद्या ह्या सतत प्रजननासाठी उत्सुक असाव्यात.

9) कोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे ?

अंडी देणाऱ्या कोंबडी ची लक्षणे

अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.

डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.

कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.

कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.

कोंबडीचा मागील (गुदा/योनी)  भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.

कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.

अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते.  अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.

10) खुडूक कोंबडी कशी ओळखावी किंवा रवणीला कोणती कोंबडी बसवावी

जी कोंबडी 3 ते 4 दिवसापासून खुडूक बसली आहे,  अश्या कोंबडीची  रवणीला बसवून अंडी उबवण्यासाठी निवड करावी.

अश्या कोंबडी खाली एखाद्ये अंडे द्यावे, जर ती कोंबडी ते अंडे पोटाखाली घेऊन 2 ते 3 दिवस बसली, तर ती योग्यरीत्या खुडूक आहे अस समजावे.  त्यानंतर तिच्या खाली 15 ते 20 अंडी ठेऊन तिला रवणीला बसवावे.

रावणीला बसवताना एखादी बांबूच्या विनीची टोपली घ्यावी.  त्यात भाताचे तुस किंवा लाकडाचा भूसा किंवा राख टाकावी. त्यावर अंडी ठेवून कोंबडी रवणीला बसवावी.

विशिष्ट सूचना :

पॉवरगोठा टीम ने महाराष्ट्रातील होतकरू शेतकरी पशुपालकांसाठी, देशी-गावरान कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयोजन केले आहे.

त्या उपक्रमा अंतर्गत लवकरच पिल्ले पुरवठा महाराष्ट्र भर सुरु करण्याचे प्रयोजन आहे.

तुम्हांला कोणत्याही जातीची पिल्ले हवी असतील तर खालील फॉर्म भरा.  आम्ही तुमच्याशी संपर्क करून उपलब्ध जातीची पिल्ले योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

येथे क्लिक करून  फॉर्म भरा.

 

40 Comments on “देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:30 pm

देशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहे
Mob . 9860376973
Wts grp add kara

उत्तर
Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:28 pm

देशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहेत

उत्तर
smita surygandh
जानेवारी 18, 2019 at 9:04 am

9767713475 whatsup group la add kara

उत्तर
Ashok
जानेवारी 13, 2019 at 2:54 am

Nice inf

उत्तर
RANJIT MANSING RAJPUT
जानेवारी 1, 2019 at 6:50 pm

nice and very imp information .9145773872 this is my number.so please add to any whats app group.THANK YOU SO MUCH

उत्तर
sachin nehare
डिसेंबर 24, 2018 at 11:47 am

9637306632 what app group la add kara

उत्तर

उत्तर
आकाश रामेश्वर कोकणे
डिसेंबर 20, 2018 at 3:35 am

खुप छान माहिती मिळालि आभारी आहे

उत्तर
sharad
नोव्हेंबर 22, 2018 at 9:28 am

9922358218 what app group la add kara

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत