Close

जानेवारी 11, 2018

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

काय नाव:  ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

 

RIR-ऱ्होड आयलँड रेड

RIR-ऱ्होड आयलँड रेड

 

कशासाठी: (प्रकार)

उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर )

ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते.

कुठून आली : (उगम)

वर्ग: इंग्लिश

अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड आइलैंड ह्या बेटावर उगम तेथून निवडक पैदाशी द्वारे जगभर प्रसारीत. इंगलंड मधील काळ्या छातीचे मलय कोम्बड्यांन पासून ही जात तयार करण्यात आली अशी इतिहासात नोंद आहे. अमेरिका आणि उपराष्ट्रामधे मुक्त पद्धतिने अंडी उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध जात आहे.

कुठे मिळेल : (उपलब्धता)

सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात अनेक वैयक्तिक तसेच शासकीय अंडी उबवनि केंद्रांमधे उपलब्ध.

कसे ओळखावे : (रंग रूप)

आर आई आर ही जात रंगाने गंजलेल्या लोखंडा प्रमाणे दिसते ताम्बूस काळ्या किंवा तपकिरी भूर्या रंगाचे पक्षी दिसतात बऱ्याचदा माद्यांमधे शेप्टी आणि पंख पांढरे निघतात, डोक्यावर एकेरी किंवा गुलाब पुष्पा प्रमाणे लाल भड़क तुरा, मोठे लाल गलोल, पिवळ्या किंवा काळसर रंगाची चोच, नरांचे उंच आणि भारदस्त शरीर ,पीस मजबूत.

वजन वाढ

3 महिन्यात 1 ते 2 किलो वजन वाढ
वयस्क नर 2 ते 2.5 किलो
वयस्क मादी 1.5 ते 2 किलो

अंडी उत्पादन

अंडी संख्या

मुख्य करुन अंडी उत्पादनासाठी संगोपित केली जात असून एका अंडी चक्रामधे 220 ते 240 अंडी उत्पादन देऊ शकते, योग्य व्यवस्थापन केल्यास प्रती आठवडा 4 ते 6 अंडी उत्पादन देऊ शकते

अंड्यांचा आकार

ऱ्होड आयलँड रेड कोंबडी  भारी वजनाचे अंडे देते
अंडे हे अकाराने मोठे असते सरासरी 50 ते 55 ग्राम वजनाचे अंडे देते.

अंड्यांचा रंग

गुलाबी पांढऱ्या किंवा गडद तपकिरी किंवा गडद भूर्या रंगाची अंडी देते

ऱ्होड आयलँड रेड कोंबडी खुडूक बसते का ?

क्वचित बसते…. शक्यतो नाही

ऱ्होड आयलँड रेड कोंबडी परसातील मुक्त पद्धतीने संगोपनासाठी योग्य आहे का ?

आर आई आर ही अतिशय चांगली रोगप्रतिकार क्षम जात असून कुठल्याही वातावरणात सहज टिकून रहाते योग्य लसिकरण आणि काळजी घेतल्यास परसात किंवा बंदिस्त संगोपना साठी अतिशय उपयुक्त. अतिशय उष्ण आणि थड़ं वातावरणात टिकून राहाते.

यांचा स्वभाव

कणखर आणि आक्रामक … किरकोळ काळजी घेतल्यास संगोपन आणि हाताळनी अतिशय सोप्पी महिला लहान मुले अगदी आरामात सांभाळू शकतात.

एक दिवसाचे पिल्लू

आर आई आर जातीचे एक दिवसाचे पिल्लू हे खालील छायाचित्रा प्रमाणे दिसते, एक दिवसाची पिल्ल ही ताम्बुस भूर्या रंगाची असतात. पिल्ल नेहमी सतर्क आणि चपळ असतात, आर आई आर ही सेमि कलर्ड म्हणजेच एक रंगी आहे त्यामुळे एक दिवसाची पिल्ल लगेच ओळखता येतात, पिल्लात इतर रंगाचे पिल्लू अढळल्यास फसवणूक आहे हे चटकन ओळखावे.
chicks_rhode_island_red1

एक दिवसाचे पिल्लू: ऱ्होड आयलँड रेड

१ दिवसाचे पिल्लू RIR

१ दिवसाचे पिल्लू RIR

अडीच महिन्याची पिल्ले

RIR जातीची 1 महिन्याची पिल्ले ही खालील छायाचित्रा प्रमाणे दिसतात.

1 महिन्याचे ऱ्होड आयलँड रेड

वयस्क मादी

ऱ्होड आयलँड रेड जातीची वयस्क मादी खालील छायाचित्रा प्रमाणे दिसते

RIR hen

वयस्क मादी : ऱ्होड आयलँड रेड

वयस्क नर

ऱ्होड आयलँड रेड जातीचा वयस्क नर खालील छायाचित्रा प्रमाणे दिसतो.

वयस्क नर : ऱ्होड आयलँड रेड

विशिष्ट सूचना :

पॉवरगोठा टीम ने महाराष्ट्रातील होतकरू शेतकरी पशुपालकांसाठी, देशी-गावरान कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयोजन केले आहे.

त्या उपक्रमा अंतर्गत लवकरच पिल्ले पुरवठा महाराष्ट्र भर सुरु करण्याचे प्रयोजन आहे.

तुम्हांला कोणत्याही जातीची पिल्ले हवी असतील तर खालील फॉर्म भरा.  आम्ही तुमच्याशी संपर्क करून उपलब्ध जातीची पिल्ले योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

येथे क्लिक करून  फॉर्म भरा.

 

 

देशी कुक्कुटपालन बद्दल पॉवरगोठा वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले इतर अतिशय उपयुक्त लेख खालीलप्रमाणे 

१.   अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.   अंडी उत्पादन कमी मिळणे अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत, ते या लेखात सविस्तर चर्चिले आहे.

२.   देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

नवीन कुक्कुटपालन करू पाहण्याऱ्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कोंबडी रवणीला बसल्याप्रमाणे घर करून बसत असतात.  अशा १० सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचायला मिळतील.

३.   देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

देशी कुक्कुटपालनामधील सर्व महत्त्वाच्या जातींची तोंडओळख फोटो सहित करून देण्याची मालिका. त्यातील पहिली जात म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रो लॉर्प.  काळ्या कोंबडीविषयी पूर्ण माहिती येथे वाचा.

४. कुक्कुटपालन प्रोत्साहन आणि माहिती कुक्कुटपालनाबद्दल A टु Z माहिती

5 Comments on “देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

आकाश
जानेवारी 30, 2019 at 4:54 am

आपण जर 300 RIR चा कोंबड्या घेतलय तर सगळा अंडी देण्य पर्यंत किती खर्च येईल आणि नंतर फायदा कसा मिळेल

उत्तर
इंद्रजीत घाटगे.
ऑक्टोबर 30, 2018 at 10:09 am

ही जात आपल्याला कोठे मिळू शकते??

उत्तर
Kumar sakat
ऑक्टोबर 23, 2018 at 11:51 am

मासासाठी गावरान जाती कोणत्या

उत्तर
सर्वेश दत्ताराम ठाकूर
ऑक्टोबर 10, 2018 at 8:55 am

अंडी पालन कोंबडी विषयी खुप उपयुक्त माहिती.नेमकी कोणत्या जातीचे वाण पाळून जास्त नफा कमावता येईल हे समजले

उत्तर
किरण चव्हाण
ऑक्टोबर 5, 2018 at 10:25 am

माहिती अप्रतिम आजवर कोणत्याही वेबसाईटवर अशी माहिती मिळाली नाही . पावर गोठा टिम चे आभार

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत