जातिवंत गाई - गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही | पॉवरगोठा-PowerGotha
Close

नोव्हेंबर 5, 2016

जातिवंत गाई – गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

जातिवंत संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व

दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ आणि जातिवंत गाई असाव्यात.  उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठामुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो .

परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त होते. कमी दुध देणारी व रोगप्रतिकारक शक्ति कमी असणारी जनावरे, कितीही चांगल्या सुविधा पुरवल्या तरी हा व्यवसाय फायदेशीर करु शकत नाहीत. म्हणून आपल्या गोठयात जातिवंत संकरीत गाय असली पाहिजे.

जातिवंत गाई १

जातिवंत गाई २

 

आता तुम्ही म्हणाल की, जातीवंत गाय कोठे शोधायची?

ती एक तर खात्रीलायकरीत्या मिळणार नाही आणि मिळालीच तर भरपूर महाग असेल. एवढी गुंतवणूक करूनही नफ्याची किंवा उच्च दूध उत्पादनाची काहीच हमी नाही. अश्या प्रकारची चांगली गाय बाजारात किंवा इतर दूध उत्पादकांकडे शोधत बसण्यापेक्षा आपल्या गोठयात तयार करायला हवी.

होय, तुम्ही बरोबर वाचले. हे सहज शक्य आहे.

अशा प्रकारे घरीच जातिवंत संकरित गाय तयार करण्यासाठी, पारंपरिक वळू रेतन कामी येत नाही.  गावात असलेला वळू लावून आपले काम निघत नाही. त्यासाठी करावे लागते कृत्रिम रेतन.  उच्च प्रतीच्या वळू्च्या वीर्याचा कृत्रिम रेतनाद्वारे वापर करुन आपन जातिवंत गाय तयार करू शकतो.

कृत्रिम रेतन म्हणजे काय ?
चांगल्या प्रतीच्या वळूचे वीर्य वजा तापमानास द्रवरुप नायट्रोजनमध्ये साठवून बरीच वर्षे वापरले जावू शकते. असे वीर्य गाय माजावर आल्यानंतर पशुवैद्यकामार्फत गायीच्या गर्भाशयात सोडन्यात येते या प्रक्रियेस कृत्रिम रेतन म्हणतात.
चांगल्या प्रतीच्या वळूचे वीर्य अश्या प्रकारे आपल्याला उपलब्ध होते.  ६००० लिटर पेक्षा जास्त दुध उत्पादन असणाऱ्या जातीतील वळुंचे वीर्य वापरणे सुद्धा शक्य झाले आहे.

कृत्रिम रेतनामध्ये घ्यावयाची काळजी

कृत्रिम रेतन आपल्या देशामधील किंवा आपल्या राज्यातील दुधउत्पादक शेतकरी बांधवाला माहीत नाही असे नाही. तोही काही वर्षांपासून आजपर्यंत आपल्या गायीना कृत्रिम रेतन करीत आला आहे.

पण त्या कृत्रिम रेतन पासून त्याला हवा तो फायदा मिळू शकला नाही. त्याचे कारण काय असेल ? बंधूंनो, त्याचे कारण असे आहे की, कृत्रिम रेतन किंवा पारंपरिक रेतन पद्धतीत सुद्धा एक महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते.  गाईच्या एका वंशाला म्हणजे, गाय तिची कालवड, कालवाडीची कालवड या सर्वांना तोच तोच वळू लावता काम नये.    आता ह्याची खात्री कशी देणार.  प्रत्येक वेळी रेतन साठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याला कसे माहीत असणार कि गाईच्या आईला कोणत्या वळूने रेतन केले होते.  तसे पाहता ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे.

हे अवघड काम सोपे होऊ शकते, जर एक साधी गोष्ट तुम्ही केलीत तर !! आपल्या गाईंना नंबराची पट्टी किंवा बिल्ला (ज्याला इंग्लिश मध्ये टॅग tag म्हणतात) लावला तर.

नोंदवही आणि टॅगिंग

आपण आपल्या सर्व गाईंना वेगवेगळे नंबर (अनुक्रमांक) देऊन ठेवावेत.  उदाहरणार्थ, सदाशिवभाऊंच्या ४ गाईंना त्यांनी ११, १२, १३ आणि १४ असे क्रमांक दिले आहेंत.

असेच क्रमांक त्यांनी त्या गाईंना होणाऱ्या कालवडींना सुद्धा द्यावेत. उदाहरणार्थ ४ गाईंना ३ कालवडी झाल्या त्यांचे क्रमांक १५, १६, १७.

आता रेतन केल्यानंतर सदाशिवभाऊंनी एका नोंदवहीत कोणत्या क्रमांकाच्या गाईला रेतन केले हे दिनांकासहीत लिहून ठेवावे.

असाच क्रमांक डॉक्टर कडे असणाऱ्या वळूच्या वीर्याला सुद्धा असतो.

तो क्रमांक ते वीर्य ज्या कांडीत भरलेले असते त्या कांडीवर सुद्धा लिहिलेला असतो. तो देखील सदाशिवभाऊंनी लिहून घ्यावा. म्हणजेच दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी, १४ क्रमांकाच्या गाईला, १००५ क्रमांकाच्या वळूने रेतन केले अशी नोंद त्यांच्या वहीत केली जाईल.

म्हणजे पुढच्या वेळी १४ क्रमांकाच्या गाईला १८ क्रमांकाची कालवड झाली तर त्या कालवाडीला रेतन करताना १००५ क्रमांकाचा वळू लावता कामा नये. तसे झाल्यास जवळच्या नातलगांमध्ये प्रजनन झाल्यामुळे पुढची पिढी कमी शक्तीची तसेच रोगट पैदा होऊ शकते.

आपल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने रेतन तर केले परंतु वळूचा क्रमांक अथवा नाव लिहून ठेवले नाही. त्याचबरोबर गायीलाही  कानाला टॅग मारला गेला नाही. त्यामुळे आपण प्रजननासाठीची कोणतीही नोंद ठेवू शकलो नाही.
नोंद न ठेवल्यामुळे एकाच वळूचे वीर्य एखाद्या गायीला वापरल्यानंतर त्या गायीला होणाऱ्या कालवडीलाही त्याच वळूचे वीर्य वापरले गेले त्यामुळे अशक्त पिढी तयार झाली. गायीतील गुणसूत्रांची ताकद कमी झाली. ज्या गायी तयार झाल्या त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्या आजराला बळी पडू लागल्या. गाय दिसायला चांगली पण दूध कमी देते अशी परिस्थिती निर्माण झाली. काही दुध उत्पादकानी नोंद ठेवली त्यांच्याकडे भरपूर दूध देणाऱ्या जातिवंत गाई निर्माण झाल्या.

म्हणून कृत्रिम रेतन करते वेळेस सर्व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

संकरित जातिवंत गोपैदास करताना नोंदी ठेवायच्या वरील प्रक्रियेची आपण पुन्हा एकदा उजळणी करूयात …

  1. सर्वप्रथम आपल्या गायीच्या कानाला नंबरचा टॅग मारून घेतला जावा. त्यामुळे गायीची नोंद ठेवली जावू शकते.
  2. कृत्रिम रेतन करण्यासाठी ज्या वळूचे वीर्य वापरले जाते त्या वळूचे नाव अथवा क्रमांक त्या कांडीवर असतो. आपण कृत्रिम रेतन केल्यानंतर त्या वळूचा क्रमांक / नाव व ज्या गायीला रेतन केले तिचा क्रमांक सदरच्या तारखेला लिहून ठेवावा.
  3. एकदा एका गायीला वापरलेला वळू पुन्हा तिच्या पैदासीतील कालवडीना वापरु नये.
    दर वेळेस नविन पिढीला नविन वळूचे वीर्य वापरावे.
  4. एखाद्या गायीच्या पोटी जन्माला आलेला वळू त्याच गायीच्या पुढील पिढ्यांमध्ये वापरला जावू नये.

जर सर्व दूधउत्पादकानी या नियमांचे पालन केले तर तयार होणाऱ्या नविन पिढीतील गायी कमीतकमी १० ते २० % उत्पादन वाढवुन देतील व चांगल्या संकरित गायीची पैदास होइल.

 

गोठ्याचे उत्तम  व्यवस्थापन, जातिवंत गाय निर्मिती, सर्व प्रकारचा गोठ्यातील हिशेब, आणि दुग्धव्यवसाय संबधी माहिती, तसेच उत्पादने साठी खालील लिंक वरून पॉवरगोठा डेअरी फार्म मॅनेजमेंट ॲप  डाउनलोड करा.

डाउनलोड करा

 

पॉवरगोठा अँप वैशिष्ट्ये

28 Comments on “जातिवंत गाई – गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

Rahul Narhe
डिसेंबर 12, 2020 at 10:52 am

तुमचे पॉवर गोठा अँप्लिकेशन सध्या फक्त अँड्रॉइड युजर्स साठी उपलब्ध आहे. मी IOS ऑपरेटिंग सिस्टिम (iPhone) वापरत असल्याने, माझी इच्छा असूनसुद्धा मला तुमचे अँप्लिकेशन वापरता इतर नाही. आशा करतो कि लवकरच तुम्ही iPhone युजर्स साठी सुद्धा अँप्लिकेशन लाँच कराल.

उत्तर
Santosh gaikwad
जुलै 3, 2020 at 6:02 am

गोपालन विषयवार सातारा विभागासाठी प्रशिक्षण कार्यक्रम कधी आहे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी कोणास संपर्क करावा लागेल???

उत्तर
लक्ष्मण म. शिंदे
जून 5, 2020 at 7:25 am

मा. महोदय, मी मुंबई ला राहणारा व्यक्ती आहे. या lock down मन परिवर्तन झाल आणि माझ्या मनात विचार आला कि आपण हा व्यवसाय करावा का ? आपल्या साईट पूर्ण माहिती वाचली पण एक नवीन माणूस हा व्यवसाय करू शकेल का हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे. जर आपण माझी टिपणी वाचली तर नक्की प्रतिउत्तर द्यावी ही विनंती . खूप जेणे टिपणी आहे पण क्षयावर पण प्रतिउत्तर दिलेलं दिसत नाही. जर आपल मार्ग्द्रश्न्न मिळाल तर फार मदतच होईल .

उत्तर
टीम पॉवरगोठा
जुलै 5, 2020 at 1:44 pm

नमस्कार सर, 
आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद   

नक्कीच कोणीही हा व्यवसाय सुरु करू शकतो.  योग्य जागा, थोडेफार भांडवल आणि शिकण्याची तसेच वाट पाहण्याची तयारी असणारा व्यक्ती यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. 
तुम्हाला दूध व्यवसायात लागणाऱ्या शंका समाधानासाठी पॉवरगोठा ब्लॉग वर भरपूर माहिती उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या अनुभवी दूध-उत्पादकाकडे प्रत्यक्ष गोठ्यात राहून देखील शिकू शकता. 
तसेच, टेपलू कंपनीने एक ऑनलाईन व्हिडीओ कोर्स तयार केला आहे, तो होतकरू नवीन दूध-उत्पादकांसाठी अतिशय उपयोगी ठरेल यात शंका नाही. इथे क्लीक करून  तो कोर्स पाहू शकता
इतर काही मदत लागली तर नक्की सांगा. 
टीम पॉवरगोठा 

उत्तर
Krushndeo
मे 13, 2020 at 9:00 am

Sir mala Gotha chalu karayacaha ahe …sirr mala loan vishayii sarakarii madat milel kay. Sir mala 500janavarancha gotha karaycha ahe ..side madat kara margdarshan kara

उत्तर
Ganesh kakade
मे 3, 2020 at 12:28 am

Mla dairy form chalu kraycha

उत्तर
Argade Shubham shivaji
मे 2, 2020 at 3:51 pm

Good technology sir to develop/increase farmers income

उत्तर
Prabodh Padate
मे 2, 2020 at 2:32 am

Sir mala Deary Form Suru karache aahe mala Deary Form sathi Parshikshan kase ghehu sakto mi panvel , dist. Raygad made rahato plz mala Marg darshan kara.

उत्तर
गजानन परब
जून 12, 2020 at 2:05 am

सुयोग्य व्यवस्थापन संदर्भ. धन्यवाद.
व्यवसाय सुरु करण्याचा मानस आहे. त्या नुसार पावले उचलली आहेत. योग्यवेळी संपर्क साधू.

उत्तर
गणेश कदम
जानेवारी 13, 2018 at 3:12 pm

Thanks sir

उत्तर
Tushar Dhakulkar
जानेवारी 3, 2018 at 5:28 pm

Sir Sankrit gai tayar karnyasathi sthanik gai la HF jatichya valuche krutrim retan kele jateka ani tyachyapasun tayar honare kalvad kiti percent che asel

उत्तर
Vishal
डिसेंबर 19, 2017 at 2:47 pm

Sir,mla Gotha bandhaycha ahe….aadarsh Gotha honyasathi…tips Dyave…..

उत्तर
Dr. A.T.Autee
सप्टेंबर 28, 2017 at 4:28 am

Dear Sir,
Season Greetings!!!
I have gone through the website. I am very much impressed for detail guidance/knowledge from experts. It is motivation for the young farmer for development of their carrier in this field.
Hope that in future also you will able to provide us more technical details.
with warm regards
Dr. A.T.Autee
Aurangabad

उत्तर
टीम पॉवरगोठा
सप्टेंबर 28, 2017 at 4:43 am

धन्यवाद सर !
संपर्कात राहा ….
नवनवीन लेख आणि आधुनिक पद्धती वेबसाईट वर वेळोवेळी प्रकाशित करत राहू।

उत्तर
sudhir
सप्टेंबर 12, 2017 at 2:07 pm

Jr vikat kalvadi gyaychya zalya try tya change dudh detil ks olkhav please help me mo no.9561931488

उत्तर
Surendra Ranade
सप्टेंबर 5, 2017 at 3:54 pm

Keep informed on minimum period required to raise hf heifers to first lactation

उत्तर
Quraishi Sadiq
ऑगस्ट 27, 2017 at 2:50 pm

mala Deary Form Suru karache aahe mala Deary Form sathi Parshikshan kase ghehu sakto
plz majhi help kara

9860719877
[email protected]

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 27, 2017 at 4:32 pm

सर, फेसबुक पेज च्या माध्यमातून संपर्कात राहा. लवकरच धुळे औरंगाबाद विभागासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल.

उत्तर
Vishal Gawali
जुलै 10, 2017 at 5:40 pm

मला कृत्रिम रेतनासाठी लागणा-या ट्यूब चे उत्पादन करायची इच्छा आहे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती

उत्तर

[…] कशी पैदा करायची याविषयी माहिती –>गोपैदास या लेखात तुम्ही वाचू […]

उत्तर
jay
एप्रिल 7, 2017 at 8:18 am

Where can i get good HF cow in maharashtra

उत्तर
सुजय भडकमकर
फेब्रुवारी 14, 2017 at 6:23 pm

सर कृत्रिम रेतन करून ते यशस्वी होण्यासाठी काय खबरदारी घ्यावी ?

दर ९० दिवसांनी गर्भधारणा होईपर्यंत कृत्रिम वेतन केल्यास काही धोका संभवतो का?

उत्तर
पॉवरगोठा टीम
फेब्रुवारी 19, 2017 at 2:09 pm

नमस्कार सुजय,
उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य हे आपल्याला कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते.

कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी ते करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.
पुढील प्रमाणे

१. गाय माजावर आल्याची वेळ तपासणे व त्यानुसार पशु-वैद्यकांना माहिती देणे
२. गाईचे सोट/बळस तपासणे
३. गाय व्यायलानंतर शक्यतो पहिल्या मजावरती गाय लावू नये

गाईच्या २ माजांमधील अंतर २१ दिवस असते. जर गाय गाभण राहिली नाही तर पुढच्या २१ दिवसांनी पशु-वैद्यकाच्या सल्ल्याने कृत्रिम रेतन तुम्ही पुन्हा करू शकता.

उत्तर

[…] गोपैदास च्या लेखा मध्ये यापूर्वीच पॉवरगोठाने आपणांस टॅगिंग चे महत्व समजावले आहे. उच्च प्रतीचे भरपूर दूध देणारी गाय बाजारात मिळत नसून ती आपल्या गोठ्यात च तयार करायची असते. त्यासाठी आपल्या जनावरांना एक ओळख क्रमांक द्यावा लागतो. जेणेकरून एक च बैल किंवा वळू गाय आणि तिच्या पुढील पिढीला रेतन करताना वापरला जाऊ नये. […]

उत्तर
shailesh Bhagwat
डिसेंबर 27, 2016 at 8:33 am

Is it mandatory to tag the COW on ear only? Also is it necessary to tag on ear for insurance purpose? Have heard that insurance tagging has to be on ear only .why cant it be done on a neck – belt.

उत्तर
पॉवरगोठा टीम
डिसेंबर 31, 2016 at 1:31 pm

कानावरील टॅग हे कायमस्वरूपी (permanent) असतात. त्याचे फायदे म्हणजे, त्यांचा जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. अपघाताने, नजरचुकीने टॅग निघू शकत नाही. म्हणूनच पानावरील टॅग्स ना प्राधान्य दिले जाते.
इन्शोरन्स कंपन्या जनावरांचा विमा उतरविताना कानावरील टॅग (ear टॅग) ची सक्ती करतात. त्याविना विमा होऊ शकत नाही.
केवळ ओळख म्हणून (identification साठी) आपण कानाला किंवा गळ्या मध्ये टॅग करून रेकॉर्ड कीपिंग (नोंदवही) प्रक्रियेची सुरुवात करू शकतो.

-पॉवरगोठा टीम

उत्तर
Santosh gaikwad
जुलै 3, 2020 at 6:02 am

गोपालन विषयवार सातारा विभागासाठी प्रशिक्षण कार्यक्रम कधी आहे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी कोणास संपर्क करावा लागेल???

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत