दूध धंद्यातील नफा तोटा | पॉवरगोठा-PowerGotha
Close

एप्रिल 19, 2017

दूध धंद्यातील नफा तोटा

मित्रहो,
 
खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा !  प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो.
 
बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते.
 
आम्ही पॉवरगोठा.कॉम  वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो  आहोत.
 
कुठल्याही  व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा  मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते.
 
लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा  कसा ?
 
आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे :

३ प्रकारचे आर्थिक वृत्तांत (फायनान्शिअल स्टेटमेंट्स)

कॉमर्स म्हणजे वाणिज्य  कोणी शिकला असेल तर ३ प्रकारचे स्टेटमेंट्स (वृत्तांत) किंवा गणिते असतात
 
१) profit/loss स्टेटमेंट : नफा-तोटा पत्रक
२) balance sheet : ताळेबंद पत्रक (स्थावर जंगम आणि कर्ज)
३) cash flow statement :  रोखीचे पत्रक
यातल्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये नफा मोजला जातो.
 

प्रॉफिट लॉस स्टेटमेंट

आता नफ्याचे सूत्र पुढीलप्रमाणे
 
नफा = मिळकत – खर्च 
 
 
मिळकतीमध्ये दुधाची प्रत्यक्ष विक्री किंमत, कालवडी विकल्या तर प्रत्यक्ष विक्री किंमत, शेणखत विक्री किंमत, गाई विकल्या तर ती विक्री किंमत ह्या सर्व गोष्टींचा समावेश  होतो. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विक्री किंमत म्हणजे  विकल्यानंतर हातात आलेली रक्कम.  न विकलेल्या गोष्टी ताळेबंद पत्रकामध्ये तुमच्या स्थावर मालमत्तेमध्ये मोजाव्यात. नफातोटा पत्रकात नाही.
 
तुमची वार्षिक १० लाख रुपये विक्री असेल तर व्यवसायाचा टर्नओव्हर (turn-over) १० लाखाचा झाला
 
खर्च: यात प्रत्येक प्रकारचा खर्चाचा समावेश होतो.  खाद्य खर्च, औषधे खर्च, चाऱ्यावरील खर्च, वीज-पाणी खर्च, मजुरांचा खर्च इत्यादी गोष्टी  आल्या.  तुम्ही स्वतः राबत असाल तरीही एक विशिष्ट पगार धरून तोच पगार खर्च म्हणून वजा  करावा.
तुम्ही काही गोष्टी गुंतवणूक म्हणून यात धरल्या नसतील, उदाहरणार्थ गाई विकत घेतल्याचा खर्च, गोठा उभारणीचा खर्च. तर अशी गुंतवणूक समजा १० वर्षासाठी १० लाख रुपये असेल, (गाईंचे आयुष्य, किंवा गोठा फेर उभारणीची वेळ १० वर्षे पकडून)  तर दर वर्षी १ लाख रुपये खर्च म्हणून तुमच्या नफा तोटा पत्रकामध्ये त्याचा समावेश करावा. कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन इत्यादी गोष्टी गुंतवणूक म्हणून पाहाव्यात, परंतु त्यांची खरेदी किंमत त्यांच्या आयुष्यमाना नुसार विभागून नफा-तोटा पत्रकामध्ये खर्च म्हणून समाविष्ट  करावी.
 
तसेच तुमच्या जागेची किंमत (भाड्याची किंवा विकत घेतलेली) ती सुद्धा खर्च म्हणून विभागून वजा करावी.  तुमची वडिलोपार्जित जमीन असेल तर एक ठराविक रक्कम भाड्यापोटी स्वतःलाच देऊ करावी. तोच तुमचा जागा खर्च झाला.
 
 
तसेच तुम्हाला पहिल्या १-२ वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या मानाने परतावा कमी असल्यामुळे (high investment value) हमखास लॉस होणार, तर हा तोटा तुम्ही पुढच्या ३-४ वर्षात विभागून खर्च म्हणून वजा करावा.
 
१० लाख रुपये विक्री किंमत मधून वर दिलेला सर्व खर्च वजा केल्यावर जी रक्कम उरेल ती तुमचा प्रॉफिट असेल. अशा प्रकारे बारीक आकडेमोड केल्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने दुसऱ्याकडून गुंतवणूक देखील उचलू शकता.  या उरलेल्या नफ्यातून तुम्ही त्या गुंतवणूकदाराला परतावा करू शकता. ( व्याज आणि मुद्दल)

ताळेबंद पत्रक

ताळेबंद पत्रकामध्ये एका बाजूला तुमची गुंतवणूक किंमत (assets) आणि दुसऱ्या बाजूला देणे (कर्ज -liability) यांचा समावेश असतो.  ताळेबंद मध्ये नेहमीच गुंतवणूक = देणे (assets = liability  ) हा हिशोब असतो.
 
तुम्ही ५  लाख रुपये स्वतःचे किंवा बँकेमधून कर्ज काढून व्यवसायात टाकले तर ५ लाख तुमचे देणे (liability) झाली. त्यात तुम्ही ३ लाख गाईवर टाकले, १ लाखाचे बांधकाम, आणि १ लाख मशिनरी घेतली तर ५ लाख देणे झाले. तुमची बॅलन्स शीट ५ लाखाची झाली.
 
जर तुम्हांला कालवडी मिळाल्या तर त्यांची विक्री करण्यापूर्वी किंमत ताळेबंद पत्रकामध्ये assets (स्थावर) च्या रकान्यामध्ये बेरीज होईल आणि liability मध्ये गुंतवणूक किंवा विक्रीपूर्व नफा (unrealized profit) मध्ये समावेश होईल.
 
१ कालवड झाली (समजा १०,००० रुपये किंमत ) तर दोन्ही बाजूस १० हजार बेरीज होईल. ताळेबंद पत्रक ५ लाख १० हजारांचे होईल.
 
जर तुम्हाला पहिल्या वर्षी लॉस झाला तर तो तोट्याची किंमत assets मधून वजा होईल. समजा १ लाख रुपये तोटा झाला, तर दोन्ही बाजूला १ लाख वजा होऊन ताळेबंद पत्रक ४ लाखांचे होईल.
मंडळी याचा हिशोब असा असतो कि समजा तुम्ही रातोरात सर्व  गाई,गोठा विकून धदा बंद केला तर गुंतवणूकदाराला ४ लाख रुपये मिळतील.

रोखीचे पत्रक : cashflow statment

तुम्ही दर महा रोखीने किती कमावता आणि रोख पैसे किती येतो जातो, (गुंतवणूक किंवा खर्च, तसेच निव्वळ विक्री किंमत)  त्याचा विचार रोखीचे पत्रक म्हणजे (कॅश-फ्लो स्टेटमेंट ) मध्ये होतो. मोठे मोठे बिझनेस नवीन गुंतवणुकीची संधी शोधताना त्या त्या व्यवसायाच्या कॅशफ्लो स्टेटमेंट चा पुढील ५-१० वर्षांचा अंदाज घेऊन मग गुंतवणूक करतात.
समजा  पहिल्या महिन्यात ५ लाख रुपये गुंतवले, खर्च २० हजार झाला आणि, दूध विक्री १० हजार झाली तर १०,००० वजा ५,२०,००० म्हणजे उणे ५,१०,००० तुमचा कॅशफ्लो झाला.  पूर्ण वर्षाच्या आकडेमोडीमध्ये हा कॅशफ्लो धन (शून्यापेक्षा मोठा ) positive  झाला, तर तुमचा व्यवसाय फायद्यात समजला जातो.
 
सामान्य शेतकरी, पशुपालकाला फक्त जमाखर्च पत्रक व्यवस्थित समजले तरी भरपूर आहे.
 
बारकाईने पाहिले तर, दुधाची विक्री किंमत तुम्हाला (rolling) ला रोख पैसे देते. खरा नफा होतो ते कालवडी तयार करून (गाभण करून किंवा अशाच) विकल्या तर.  आणि मित्रांनो भरपूर वर्षे असाच नफेशीर  धंदा चालू ठेवला तर तुमची मूळ गुंतवणूक (जागा, किंवा गोठा उभारणी खर्च, गाई खर्च, स्वतः राबलेला खर्च) वसूल होते.

नमुना मिळकत पत्रक

एक नमुना मिळकत पत्रक खाली दिले आहे.
यात खालील गोष्टी काल्पनिक घेतल्या आहेत.
गृहीतके (मानलेल्या गोष्टी ):
  1. ६-७ दूध देणाऱ्या गाई, दररोज १५० लिटर दूध देत आहेत.
  2. दरमहा ३-५ हजार रुपयांचे शेणखत विकले जात आहे.
  3. वर्षातून १-२ वेळा  गाय किंवा कालवड विकली आहे.
  4. मजुरी खर्च दरमहा १० हजार
  5. अवमूल्यन: म्हणजेच गुंतवणूक केलेल्या गोष्टींची किंमत विभागून खर्च म्हणून वजा केली आहे.  यात ५ लाख रुपयांच्या गाई, १ लाख रुपयांचा गोठा, १ लाख रुपयांचा कडबा कुट्टी आणि मिल्किंग मशीन यांचा समावेश आहे.  ७ लाख रुपयांची ही गुंतवणूक १० वर्षात संपून जाईल असे समजून दरवर्षी ७० हजार रुपये खर्च म्हणून वजा केले आहेत. म्हणजेच दरमहा ६ हजार रुपये अवमूल्यन म्हणून खर्च धरला आहे.
  6. भाडे: जागेचे भाडे दरमहा ८००० रुपये धरले आहे. ही जागा स्वतःची असली तरीहि जर तुम्ही भाडे स्वतःला देत राहिलात तर व्यवसायातील खरा नफा कळून येतो.  तुम्ही ही रक्कम शून्य देखील धरू शकता. जमिनीचे अवमूल्यन सहसा होत नसल्याने मोजमापात त्यामुळे फरक पडणार नाही.
  7. पशुखाद्य, चारा आणि मिनरल मिक्श्चर चा खर्च अंदाजे दूध विक्री किंमतीच्या ७०% पकडला आहे. तुमचे मिळकत पत्रक बनवताना तुम्ही प्रत्यक्ष खर्च लिहू शकता.  चारा घरचा असेल तरीही तुम्ही तो बाहेर किती रुपयांनी विकाल या हिशोबाने खर्च पकडावा किंवा जर शक्य असेल तर चारा पिकविण्यासाठी खरोखर किती खर्च आला तो लिहावा.
  8. देखभाल खर्च, औषधे खर्च, वीज पाणी खर्च अंदाजे दरमहा प्रत्येकी ५०० रुपये पकडला आहे.
profitloss-dairy-farming

नफा-तोटा पत्रक पॉवरगोठा

वरील नमुना मिळकत पत्रकामध्ये ऑगस्ट २०१७ पर्यंत धंदा (टर्नओव्हर ) १० लाख ३९ हजारांचा असून निव्वळ नफा रु. १ लाख ९५ हजार आहे.

अशा प्रकारे आकडेमोड केल्यानंतर लक्षात येते की  दूध विक्री मधून मिळणाऱ्या नफ्यामध्ये कमी मार्जिन आहे. गाय गाभण राहिली नाही, किंवा आजारी पडली दगडी झाली तर  तुमच्या व्यवसायावर खूप जास्त व्यस्त (निगेटिव्ह) परिणाम होतो.
 
दूध विक्रीतून नफा कमविण्यासाठी खर्च कमी करणे – त्यातल्या त्यात चाऱ्या वरील आणि औषधांवरील खर्च कमी करणे, गाय आजारी पडून न देणे, वेळेवर रेतन करणे हेच महत्वाचे उपाय शिल्लक राहतात.
 
तसेच मोठा फायदा गाय किंवा कालवड विकल्यानंतर होतो.
 
निव्वळ नफ्या मधून तुम्ही बँकेचे व्याज किंवा गुंतवणूकदाराला परतावा देऊ शकता.  अशाप्रकारे पद्धतशीर आकडेमोड केल्याने तुम्ही जागेचे भाडे, आणि मजुरी यातून तुमचा घरखर्च आधीच वजा करून घेतला आहे.  उरलेला नफा तुम्ही बँकेत साठवून, पुढील गुंतवणुकीसाठी, धंदा वाढविण्यासाठी किंवा अडी-अडचणीची सोय म्हणून वापरू शकता.
अशा रीतीने तुम्ही रोजच्या नोंदी एक्सेल मध्ये करून आपला नफा तोटा मोजू शकता.
 
सर्वांनाच कॉम्पुटर किंवा एक्सेल उपलब्ध असेल किंवा वापरता येत असेल असे नाही.  खास करून सामान्य शेतकऱ्यांना हे अधिक अवघड असू शकते.   म्हणूनच सोप्या पद्धतीने नफा तोटा – रोजचा, आठवड्याचा, महिन्याचा, वर्षाचा मोजण्यासाठी पॉवरगोठा टीम ने एक अँड्रॉइड ॲप  बनवले आहे. 
या मध्ये २ मिनिटे वेळ रोज काढून सोप्या प्रश्नांची रोज उत्तरे लिहून पॉवरगोठा पशुपालन ऑनलाईन नोंदवही मध्ये आपला हिशेब नोंदवायचा.  पशुपालन नोंदवही ॲपमधील प्रश्न तुमच्या दिनक्रमामधीलच आहेत.  गोठ्यातील हिरवा चारा, कोरडा चारा, लेबर यावरील खर्च, दुधाचे उत्पादन, फॅट, एस एन एफ, शेंविक्री इत्यादी मिळकत तसेच गोठ्यातील पैदाशीच्या
आणि जनावरांमधील आजार आणि औषधोपचाराचा नोंदी यांचा यात समावेश आहे.    

ही उत्तरे रोज लिहिली की तुम्हाला रोज मिळकत, खर्च, पैदास, आरोग्य, चारा, इत्यादींवरील वेगवेगळे अहवाल
(रिपोर्ट) प्रगतिपुस्तकामध्ये पाहायला मिळतील.  तुमची माहिती तुम्ही रोज आणि मागच्या दिनांकासाठी सुद्धा भरू शकता.  रिपोर्ट मोबाईल स्क्रीन वर पहा किंवा  PDF अहवाल तुम्ही ई-मेल ने मिळवू शकता.

वेळच्या वेळी, गाय गाभण असलेची खात्री करण्यासाठी आठवण करून देणारे नोटिफिकेशन देखील आहेत.
तुम्हाला आम्ही गोठा निर्जंतुक करण्याची आणि जंताचे औषध पाजण्याची सुद्धा आठवण नोटिफिकेशन द्वारे
पाठवू. 
सोबतच पॉवरगोठा वेबसाईट वरील सर्व माहिती, ॲप मधूनच उपलब्ध केली गेली आहे. आधुनिक दुग्ध-
व्यवसाय, मुरघास निर्मिती, देशी कुक्कुटपालन, शेळीपालन माहिती वाचण्यासाठी तुम्हांला इतर कुठेही
जाण्याची गरज नाही.   पॉवरगोठाचे सर्व उत्पादने देखील ॲप मधून विक्री साठी उपलब्ध असतील.
असे हे बहुरंगी, बहुढंगी, उपयुक्त ॲप अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

खालील लिंक वरून तुम्ही पॉवरगोठा पशुपालन ॲप डाऊनलोड करू शकता 
 

55 Comments on “दूध धंद्यातील नफा तोटा

प्रवीण
एप्रिल 25, 2021 at 5:59 pm

सर , मला १० म्हैस गोठा चालू करायचा आहे मला प्रोफ़िट लॉस आनी १ महीन्याचा तालेबंद भेटल का..

उत्तर
मनिष सुतार
जून 23, 2020 at 3:44 am

नमस्कार सर,
मला गाईंसाठी लोन हव आहे, तर सरकारी योजना कोणती आहे का?
व ती अप्लाय कस करावं त्यासाठी योग्य माहिती हवी आहे

उत्तर
Krushna lakhangave
डिसेंबर 30, 2020 at 6:01 am

मला पण लोन बेटेल का

उत्तर
Sadanand Navale
मे 20, 2020 at 7:27 pm

तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे .
दुग्धयव्यसायासाठी प्रक्लप अहवाल कसा बनवावा त्यासंदर्भात मार्गदर्शन किंवा नमुना अहवाल मिळेल का ?

उत्तर
शरद. घोडे
मे 16, 2020 at 10:07 am

सर मला नवीन उद्योग चालू करायचा विचार आहे तर मला तुमच्या माहितीची गरज आहे

उत्तर
Siddharth. Gawai
एप्रिल 23, 2020 at 5:55 pm

सर मला नव्याने दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी काही financial . लोन सुविधा मिळेल का.

उत्तर
Tadmadge Atul
मार्च 12, 2020 at 6:53 am

Sir..
Farm. Update sathi mob ( App ) aahe ka jar asel tar mahiti dhya.
Plz

उत्तर
टीम पॉवरगोठा
मार्च 12, 2020 at 1:17 pm

खालील लिंक वरून तुम्ही पॉवरगोठा पशुपालन ॲप डाऊनलोड करू शकता
https://pxlme.me/cc8uZO_4

उत्तर
दादासाहेब बावडेकर
सप्टेंबर 14, 2019 at 5:32 pm

माहिती आवडली

उत्तर
JAYESH YANDE
सप्टेंबर 2, 2019 at 3:28 pm

सर एका दिवसात एका म्हशीला पुरेसा किती चारा द्यायला हवा..?

उत्तर
Sagar bagade
जुलै 6, 2019 at 9:44 am

दुग्ध व्यवसायाची माहिती पाहिजे सर

उत्तर
BHAGYASHRI
जून 11, 2019 at 5:47 am

HEELO SIR I WANT TO START DAIRY BUSINESS KINDLY GUIDE ME

उत्तर
Rajendra kapase
एप्रिल 19, 2019 at 5:59 am

सर मला १० गाय गोठा चालू करायचा आहें मला प्रोफ़िट लॉस आनी १ महीन तालेबंद भेटल का

उत्तर
Yashvant p ghuge
डिसेंबर 26, 2019 at 3:23 am

सर मला १० गाय गोठा चालू करायचा आहें मला प्रोफ़िट लॉस आनी १ वर्षाचा तालेबंद भेटल का प्लीज

उत्तर
प्रशांत तानाजीराव भोसले
फेब्रुवारी 3, 2019 at 3:53 pm

नमस्कार सर, मला दूध डेअरी (दूध संकलन) सुरू करायची आहे पण माझ्याकडे गाई किंवा म्हशी नाहीत.. तर अश्या परिस्थितीत हे शक्य होईल का..??

उत्तर
amar
जानेवारी 26, 2019 at 11:08 am

Very helful infomation. Thanks.

उत्तर
रोशन सुरेश बोरेकर
जानेवारी 6, 2019 at 7:49 am

नमस्कार सर,
तुमच्या वेबसाईटवरून नेहमी खूप चांगली माहिती शेयर केलो जाते त्यामुळे बरेचसे लोकं स्वयंरोजगाराकडे वळले आहेत.

मला सुद्धा दुग्धव्यवसाय करायचा आहे,स्वतःची जागा आहे, मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा आहे पण अडचण गुंतवणूकीची आहे.

या व्यवसायासाठी शासकीय अनुदान आणि कर्जयोजना कुठून मिळेल या संदर्भात माहिती डिलीत तर बरं होईल.

धन्यवाद

उत्तर
sadiq qureshi
ऑक्टोबर 29, 2018 at 7:57 am

मला गावात डेअरी सुरू करायची आहे तर मला तंतोतंत मार्गदर्शन हवंय.

उत्तर
भूषण सोनार
सप्टेंबर 28, 2018 at 2:13 am

मला गावात डेअरी सुरू करायची आहे तर मला तंतोतंत मार्गदर्शन हवंय.

उत्तर
somnath genbhau agale
सप्टेंबर 18, 2018 at 10:59 am

very nice

उत्तर
सुरज नलगे
ऑगस्ट 1, 2018 at 2:08 pm

खुप उपयोगी माहिती आहे सर्व दुध उत्पादकाना यांचा फायदा होईल

उत्तर
Anmol Karale
जुलै 6, 2020 at 5:59 am

नमस्कार सर,
मला सुद्धा दुग्धव्यवसाय करायचा आहे,स्वतःची जागा आहे, मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा आहे पण अडचण गुंतवणूकीची आहे.

या व्यवसायासाठी शासकीय अनुदान आणि कर्जयोजना कुठून मिळेल या संदर्भात माहिती डिलीत तर बरं होईल.

धन्यवाद

उत्तर
shahrukh makbul patel
जून 22, 2018 at 10:08 am

मला दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे परंतु मला नाबार्ड कडून कर्ज घेऊन १० गायीचं प्रोजेक्ट बनवायचा आहे तरी मला कर्ज कसे मिळवता येईल या बद्दल सविस्तर माहिती द्या हि विनंती

उत्तर
Laxman Gaikwad
मार्च 16, 2018 at 2:18 pm

Sir project report kasya prakare Tatar karawa dudhavyavsay sambadhi

उत्तर
Harshad
जानेवारी 7, 2018 at 3:54 pm

Sir mala 10 cow cha gotha chalu karaycha aahe,project report tayar aahe,lonecase kuthlya banke chi karavi

उत्तर
Pravin Zade
डिसेंबर 27, 2017 at 10:41 am

I would like to start dairy farming, sir. Please guide me.

उत्तर
Yogesh sonwane
नोव्हेंबर 9, 2017 at 9:01 am

दुग्ध व्यवसायासाठी देशी गाय फायदेशीर ठरेल का संकरित गाय.?

उत्तर
Sachin Kasture
ऑक्टोबर 22, 2017 at 4:48 am

What a informative article!!!
very nice simple yet effective.
congratulation to the Team PowerGotha..!!!

उत्तर
Rohit Talegaonkar
ऑक्टोबर 22, 2017 at 3:08 am

Plz send me details,and excel sheet for 3 acres of land,and 5 cows,not yet started,planning to start.

उत्तर
Rohit Talegaonkar
ऑक्टोबर 22, 2017 at 3:06 am

Plz mala pan excel sheet pathva,

उत्तर
रमेश अरूण इंगळे
ऑक्टोबर 19, 2017 at 4:21 am

नमस्कार माझा 10 गाईचा गोठा आहे परंतु मला गाय गाबन घालवताना ञास होतो त्याच्यावर कय मार्गदर्शन

उत्तर
आबाराव भोपळे
सप्टेंबर 27, 2017 at 9:58 am

नमस्कार सर मला १० गाईचा गोठा चालू करायचा आहें मला प्रोफ़िट लॉस आनी १ महीन तालेबंद चा फॉरमेट दिले तर फार उपयोगी पडेल.
समजा त्यात जर मि एखादी गाय खरेदी केली तर
तिचा उल्लेख कुठे करावा कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती .

उत्तर
Ajay more
सप्टेंबर 18, 2017 at 2:20 pm

sir Mala 20 gayi cha ghotha bandhayacha ahe tr shed design mahiti bhetel ka
plot 200/40 cha ahe

उत्तर
Anmol Karale
जुलै 6, 2020 at 6:05 am

नमस्कार सर,

मला सुद्धा दुग्धव्यवसाय करायचा आहे,स्वतःची जागा आहे, मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा आहे पण अडचण गुंतवणूकीची आहे.

या व्यवसायासाठी शासकीय अनुदान आणि कर्जयोजना कुठून मिळेल या संदर्भात माहिती डिलीत तर बरं होईल.

धन्यवाद

उत्तर
sagar wani
सप्टेंबर 17, 2017 at 6:02 pm

Dear sir thank u for such a useful information .please send exel sheet on [email protected]

उत्तर
Pratap salgar
सप्टेंबर 2, 2017 at 4:09 pm

Hi … I would like to start dairy farming… please help

उत्तर
RAVINDRA KHAIRE
एप्रिल 22, 2019 at 10:27 am

दूध व्यवसाय सुरु कार्याचा आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन कुठे मिळेल ?

उत्तर
RAVINDRA KHAIRE
एप्रिल 22, 2019 at 10:28 am

दूध व्यवसाय सुरु कार्याचा आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन कुठे मिळेल ??

उत्तर
Yashvant p ghuge
डिसेंबर 26, 2019 at 3:33 am

सर 15 hf गाईचा सांभाळ करून दूध व्यवसाय सुरु करायचा आहे, शेतकरी कुंटुंबाची परशुभूमी आहे. पण त्यासाठी मला ट्रेणनिंग घ्याची आहे.तर चार दिवसापेक्षय जास्तीची ट्रेणनिंग देणारी एखादी संस्था असेल तर कळवा प्लीज

उत्तर
Chaitanya kharade
ऑगस्ट 8, 2017 at 12:50 pm

सर मला १० गाय गोठा चालू करायचा आहें मला प्रोफ़िट लॉस आनी १ महीन तालेबंद भेटल का..

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 8, 2017 at 1:49 pm

तुमचा ई-मेल चेक करा सर!

उत्तर
Sharad pawar
जुलै 14, 2017 at 4:48 pm

सर हायड्रोफोनीक चारा या बाबत काय सांगाल?

उत्तर
Ashish Nandkumar Dagade
जून 26, 2017 at 7:30 pm

नमस्ते सर
मी regularly तुम्हाला follow करतो मला ही माहिती म्हशींसाठी पाहिजे कारण माझ्याकडे 25 म्हशी आहेत त्या मी व माझे वडील manage करतो आम्ही सुरवात 2 म्हशी पासून केली होती व हळूहळू वाढवत आलो. मी स्वतः B.Tech agri.engg graduate आहे सद्या मी जॉब करतोय परंतु येत्या 3 महिन्यात full throttle हा बिसनेस करणार आहे त्यामुळे आपले मार्गदर्शन मिळाले तर खूप मदत होईल मला तुम्हाला भेटायचे आहे आपणास कसे सोईस्कर होईल तसे मला कळवावे मी माझा मोबाईल नंबर देतो आहे 9096396104

उत्तर
prashant bhosale
जून 25, 2017 at 7:11 pm

niradhaar lokana ubhae kara

उत्तर
Somnath Gunvant Sase
जून 24, 2017 at 3:44 pm

छान माहीती नवीन व्यवसाय चालू करणार्या माणसांसाठी भरपूर उपयुक्त अशी माहीती नक्कीच चांगले सहकार्य होईल. धन्यवाद…!

उत्तर
Suresh kate
जून 24, 2017 at 4:50 am

Mahiti dilya baddal abhari ahot

उत्तर
Swapnil
जून 24, 2017 at 4:12 am

Please send us excel sheet of p&l and BS for future reference. Email- [email protected] I have calculate / draw our live stock Accounting.

Thanks/Regards,
Swapnil Yeralkar

उत्तर
Harshish randive
नोव्हेंबर 14, 2017 at 8:17 am

Sir muze ve 1 excel sheet bhejiye mera email [email protected]

उत्तर
gajendra
एप्रिल 22, 2017 at 2:29 am

Gotha sathii gov. Scheme ahe. Ka

उत्तर
पॉवरगोठा टीम
एप्रिल 22, 2017 at 4:21 am

नमस्कार सर,
गोठ्यासाठी किंवा गाई, मुरघास, कडबा कुट्टी इत्यादींसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याबद्दल माहिती तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईट वर मिळेल. तसेच पंचायत समिती, जिल्हापरिषद कार्यालय, आणि लोकल पशुसंवर्धन विभाग कार्यालय या ठिकाणी सुद्धा माहिती मिळेल.
लवकरच पॉवरगोठा वर या सर्व योजनांविषयी माहिती उपलब्ध करून देण्याचे योजले आहे. तोपर्यंत तुम्हाला वर दिलेल्या ठिकाणी चौकशी करावी लागेल.

उत्तर
Dattatray kondhare
ऑक्टोबर 26, 2017 at 6:48 pm

तुम्ही जे नफा तोटा पत्रकदिलें आहे ते किती गाईचं आहे

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 27, 2017 at 5:15 am

दत्तात्रय जी,
लेखात दिलेल्या गृहीतकाप्रमाणे ६-७ दूध देणाऱ्या गाई आणि एकूण १०-११ गाई च्या हिशोबाने काल्पनिक मिळकत पत्रक बनवले आहे.

उत्तर
Rohit Talegaonkar
नोव्हेंबर 10, 2017 at 5:48 am

Sir plz send me excel sheet for reference [email protected],9545785566

Dadasaheb Wagh
एप्रिल 20, 2017 at 5:49 pm

छान माहिती मिऴाली

उत्तर
पॉवरगोठा टीम
एप्रिल 21, 2017 at 9:53 am

Dhanywad sir

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत