Close

एप्रिल 19, 2017

दूध धंद्यातील नफा तोटा

मित्रहो,
 
खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा !  प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो.
 
बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते.
 
आम्ही पॉवरगोठा.कॉम  वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो  आहोत.
 
कुठल्याही  व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा  मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते.
 
लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा  कसा ?
 
आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे :

३ प्रकारचे आर्थिक वृत्तांत (फायनान्शिअल स्टेटमेंट्स)

कॉमर्स म्हणजे वाणिज्य  कोणी शिकला असेल तर ३ प्रकारचे स्टेटमेंट्स (वृत्तांत) किंवा गणिते असतात
 
१) profit/loss स्टेटमेंट : नफा-तोटा पत्रक
२) balance sheet : ताळेबंद पत्रक (स्थावर जंगम आणि कर्ज)
३) cash flow statement :  रोखीचे पत्रक
यातल्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये नफा मोजला जातो.
 

प्रॉफिट लॉस स्टेटमेंट

आता नफ्याचे सूत्र पुढीलप्रमाणे
 
नफा = मिळकत – खर्च 
 
 
मिळकतीमध्ये दुधाची प्रत्यक्ष विक्री किंमत, कालवडी विकल्या तर प्रत्यक्ष विक्री किंमत, शेणखत विक्री किंमत, गाई विकल्या तर ती विक्री किंमत ह्या सर्व गोष्टींचा समावेश  होतो. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विक्री किंमत म्हणजे  विकल्यानंतर हातात आलेली रक्कम.  न विकलेल्या गोष्टी ताळेबंद पत्रकामध्ये तुमच्या स्थावर मालमत्तेमध्ये मोजाव्यात. नफातोटा पत्रकात नाही.
 
तुमची वार्षिक १० लाख रुपये विक्री असेल तर व्यवसायाचा टर्नओव्हर (turn-over) १० लाखाचा झाला
 
खर्च: यात प्रत्येक प्रकारचा खर्चाचा समावेश होतो.  खाद्य खर्च, औषधे खर्च, चाऱ्यावरील खर्च, वीज-पाणी खर्च, मजुरांचा खर्च इत्यादी गोष्टी  आल्या.  तुम्ही स्वतः राबत असाल तरीही एक विशिष्ट पगार धरून तोच पगार खर्च म्हणून वजा  करावा.
तुम्ही काही गोष्टी गुंतवणूक म्हणून यात धरल्या नसतील, उदाहरणार्थ गाई विकत घेतल्याचा खर्च, गोठा उभारणीचा खर्च. तर अशी गुंतवणूक समजा १० वर्षासाठी १० लाख रुपये असेल, (गाईंचे आयुष्य, किंवा गोठा फेर उभारणीची वेळ १० वर्षे पकडून)  तर दर वर्षी १ लाख रुपये खर्च म्हणून तुमच्या नफा तोटा पत्रकामध्ये त्याचा समावेश करावा. कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन इत्यादी गोष्टी गुंतवणूक म्हणून पाहाव्यात, परंतु त्यांची खरेदी किंमत त्यांच्या आयुष्यमाना नुसार विभागून नफा-तोटा पत्रकामध्ये खर्च म्हणून समाविष्ट  करावी.
 
तसेच तुमच्या जागेची किंमत (भाड्याची किंवा विकत घेतलेली) ती सुद्धा खर्च म्हणून विभागून वजा करावी.  तुमची वडिलोपार्जित जमीन असेल तर एक ठराविक रक्कम भाड्यापोटी स्वतःलाच देऊ करावी. तोच तुमचा जागा खर्च झाला.
 
 
तसेच तुम्हाला पहिल्या १-२ वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या मानाने परतावा कमी असल्यामुळे (high investment value) हमखास लॉस होणार, तर हा तोटा तुम्ही पुढच्या ३-४ वर्षात विभागून खर्च म्हणून वजा करावा.
 
१० लाख रुपये विक्री किंमत मधून वर दिलेला सर्व खर्च वजा केल्यावर जी रक्कम उरेल ती तुमचा प्रॉफिट असेल. अशा प्रकारे बारीक आकडेमोड केल्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने दुसऱ्याकडून गुंतवणूक देखील उचलू शकता.  या उरलेल्या नफ्यातून तुम्ही त्या गुंतवणूकदाराला परतावा करू शकता. ( व्याज आणि मुद्दल)

ताळेबंद पत्रक

ताळेबंद पत्रकामध्ये एका बाजूला तुमची गुंतवणूक किंमत (assets) आणि दुसऱ्या बाजूला देणे (कर्ज -liability) यांचा समावेश असतो.  ताळेबंद मध्ये नेहमीच गुंतवणूक = देणे (assets = liability  ) हा हिशोब असतो.
 
तुम्ही ५  लाख रुपये स्वतःचे किंवा बँकेमधून कर्ज काढून व्यवसायात टाकले तर ५ लाख तुमचे देणे (liability) झाली. त्यात तुम्ही ३ लाख गाईवर टाकले, १ लाखाचे बांधकाम, आणि १ लाख मशिनरी घेतली तर ५ लाख देणे झाले. तुमची बॅलन्स शीट ५ लाखाची झाली.
 
जर तुम्हांला कालवडी मिळाल्या तर त्यांची विक्री करण्यापूर्वी किंमत ताळेबंद पत्रकामध्ये assets (स्थावर) च्या रकान्यामध्ये बेरीज होईल आणि liability मध्ये गुंतवणूक किंवा विक्रीपूर्व नफा (unrealized profit) मध्ये समावेश होईल.
 
१ कालवड झाली (समजा १०,००० रुपये किंमत ) तर दोन्ही बाजूस १० हजार बेरीज होईल. ताळेबंद पत्रक ५ लाख १० हजारांचे होईल.
 
जर तुम्हाला पहिल्या वर्षी लॉस झाला तर तो तोट्याची किंमत assets मधून वजा होईल. समजा १ लाख रुपये तोटा झाला, तर दोन्ही बाजूला १ लाख वजा होऊन ताळेबंद पत्रक ४ लाखांचे होईल.
मंडळी याचा हिशोब असा असतो कि समजा तुम्ही रातोरात सर्व  गाई,गोठा विकून धदा बंद केला तर गुंतवणूकदाराला ४ लाख रुपये मिळतील.

रोखीचे पत्रक : cashflow statment

तुम्ही दर महा रोखीने किती कमावता आणि रोख पैसे किती येतो जातो, (गुंतवणूक किंवा खर्च, तसेच निव्वळ विक्री किंमत)  त्याचा विचार रोखीचे पत्रक म्हणजे (कॅश-फ्लो स्टेटमेंट ) मध्ये होतो. मोठे मोठे बिझनेस नवीन गुंतवणुकीची संधी शोधताना त्या त्या व्यवसायाच्या कॅशफ्लो स्टेटमेंट चा पुढील ५-१० वर्षांचा अंदाज घेऊन मग गुंतवणूक करतात.
समजा  पहिल्या महिन्यात ५ लाख रुपये गुंतवले, खर्च २० हजार झाला आणि, दूध विक्री १० हजार झाली तर १०,००० वजा ५,२०,००० म्हणजे उणे ५,१०,००० तुमचा कॅशफ्लो झाला.  पूर्ण वर्षाच्या आकडेमोडीमध्ये हा कॅशफ्लो धन (शून्यापेक्षा मोठा ) positive  झाला, तर तुमचा व्यवसाय फायद्यात समजला जातो.
 
सामान्य शेतकरी, पशुपालकाला फक्त जमाखर्च पत्रक व्यवस्थित समजले तरी भरपूर आहे.
 
बारकाईने पाहिले तर, दुधाची विक्री किंमत तुम्हाला (rolling) ला रोख पैसे देते. खरा नफा होतो ते कालवडी तयार करून (गाभण करून किंवा अशाच) विकल्या तर.  आणि मित्रांनो भरपूर वर्षे असाच नफेशीर  धंदा चालू ठेवला तर तुमची मूळ गुंतवणूक (जागा, किंवा गोठा उभारणी खर्च, गाई खर्च, स्वतः राबलेला खर्च) वसूल होते.

नमुना मिळकत पत्रक

एक नमुना मिळकत पत्रक खाली दिले आहे.
यात खालील गोष्टी काल्पनिक घेतल्या आहेत.
गृहीतके (मानलेल्या गोष्टी ):
  1. ६-७ दूध देणाऱ्या गाई, दररोज १५० लिटर दूध देत आहेत.
  2. दरमहा ३-५ हजार रुपयांचे शेणखत विकले जात आहे.
  3. वर्षातून १-२ वेळा  गाय किंवा कालवड विकली आहे.
  4. मजुरी खर्च दरमहा १० हजार
  5. अवमूल्यन: म्हणजेच गुंतवणूक केलेल्या गोष्टींची किंमत विभागून खर्च म्हणून वजा केली आहे.  यात ५ लाख रुपयांच्या गाई, १ लाख रुपयांचा गोठा, १ लाख रुपयांचा कडबा कुट्टी आणि मिल्किंग मशीन यांचा समावेश आहे.  ७ लाख रुपयांची ही गुंतवणूक १० वर्षात संपून जाईल असे समजून दरवर्षी ७० हजार रुपये खर्च म्हणून वजा केले आहेत. म्हणजेच दरमहा ६ हजार रुपये अवमूल्यन म्हणून खर्च धरला आहे.
  6. भाडे: जागेचे भाडे दरमहा ८००० रुपये धरले आहे. ही जागा स्वतःची असली तरीहि जर तुम्ही भाडे स्वतःला देत राहिलात तर व्यवसायातील खरा नफा कळून येतो.  तुम्ही ही रक्कम शून्य देखील धरू शकता. जमिनीचे अवमूल्यन सहसा होत नसल्याने मोजमापात त्यामुळे फरक पडणार नाही.
  7. पशुखाद्य, चारा आणि मिनरल मिक्श्चर चा खर्च अंदाजे दूध विक्री किंमतीच्या ७०% पकडला आहे. तुमचे मिळकत पत्रक बनवताना तुम्ही प्रत्यक्ष खर्च लिहू शकता.  चारा घरचा असेल तरीही तुम्ही तो बाहेर किती रुपयांनी विकाल या हिशोबाने खर्च पकडावा किंवा जर शक्य असेल तर चारा पिकविण्यासाठी खरोखर किती खर्च आला तो लिहावा.
  8. देखभाल खर्च, औषधे खर्च, वीज पाणी खर्च अंदाजे दरमहा प्रत्येकी ५०० रुपये पकडला आहे.
profitloss-dairy-farming

नफा-तोटा पत्रक पॉवरगोठा

वरील नमुना मिळकत पत्रकामध्ये ऑगस्ट २०१७ पर्यंत धंदा (टर्नओव्हर ) १० लाख ३९ हजारांचा असून निव्वळ नफा रु. १ लाख ९५ हजार आहे.

अशा प्रकारे आकडेमोड केल्यानंतर लक्षात येते की  दूध विक्री मधून मिळणाऱ्या नफ्यामध्ये कमी मार्जिन आहे. गाय गाभण राहिली नाही, किंवा आजारी पडली दगडी झाली तर  तुमच्या व्यवसायावर खूप जास्त व्यस्त (निगेटिव्ह) परिणाम होतो.
 
दूध विक्रीतून नफा कमविण्यासाठी खर्च कमी करणे – त्यातल्या त्यात चाऱ्या वरील आणि औषधांवरील खर्च कमी करणे, गाय आजारी पडून न देणे, वेळेवर रेतन करणे हेच महत्वाचे उपाय शिल्लक राहतात.
 
तसेच मोठा फायदा गाय किंवा कालवड विकल्यानंतर होतो.
 
निव्वळ नफ्या मधून तुम्ही बँकेचे व्याज किंवा गुंतवणूकदाराला परतावा देऊ शकता.  अशाप्रकारे पद्धतशीर आकडेमोड केल्याने तुम्ही जागेचे भाडे, आणि मजुरी यातून तुमचा घरखर्च आधीच वजा करून घेतला आहे.  उरलेला नफा तुम्ही बँकेत साठवून, पुढील गुंतवणुकीसाठी, धंदा वाढविण्यासाठी किंवा अडी-अडचणीची सोय म्हणून वापरू शकता.
 

35 Comments on “दूध धंद्यातील नफा तोटा

amar
जानेवारी 26, 2019 at 11:08 am

Very helful infomation. Thanks.

उत्तर
रोशन सुरेश बोरेकर
जानेवारी 6, 2019 at 7:49 am

नमस्कार सर,
तुमच्या वेबसाईटवरून नेहमी खूप चांगली माहिती शेयर केलो जाते त्यामुळे बरेचसे लोकं स्वयंरोजगाराकडे वळले आहेत.

मला सुद्धा दुग्धव्यवसाय करायचा आहे,स्वतःची जागा आहे, मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा आहे पण अडचण गुंतवणूकीची आहे.

या व्यवसायासाठी शासकीय अनुदान आणि कर्जयोजना कुठून मिळेल या संदर्भात माहिती डिलीत तर बरं होईल.

धन्यवाद

उत्तर
sadiq qureshi
ऑक्टोबर 29, 2018 at 7:57 am

मला गावात डेअरी सुरू करायची आहे तर मला तंतोतंत मार्गदर्शन हवंय.

उत्तर
भूषण सोनार
सप्टेंबर 28, 2018 at 2:13 am

मला गावात डेअरी सुरू करायची आहे तर मला तंतोतंत मार्गदर्शन हवंय.

उत्तर
somnath genbhau agale
सप्टेंबर 18, 2018 at 10:59 am

very nice

उत्तर
सुरज नलगे
ऑगस्ट 1, 2018 at 2:08 pm

खुप उपयोगी माहिती आहे सर्व दुध उत्पादकाना यांचा फायदा होईल

उत्तर
shahrukh makbul patel
जून 22, 2018 at 10:08 am

मला दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे परंतु मला नाबार्ड कडून कर्ज घेऊन १० गायीचं प्रोजेक्ट बनवायचा आहे तरी मला कर्ज कसे मिळवता येईल या बद्दल सविस्तर माहिती द्या हि विनंती

उत्तर
Laxman Gaikwad
मार्च 16, 2018 at 2:18 pm

Sir project report kasya prakare Tatar karawa dudhavyavsay sambadhi

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत