How to Use PowerGotha Pashupalan App | पॉवरगोठा-PowerGotha
Close

How to Use PowerGotha Pashupalan App

पॉवरगोठा ऑनलाईन नोंदवही ॲप कसे वापरावे  ? (How To Use App)

अनेक भाषांमध्ये ॲप उपलब्ध असून सामान्य शेतकरी सोप्या पद्धतीने नोंदी करू शकला पाहिजे अशा युक्तीने ॲपची रचना करण्यात आली आहे.

तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.  ॲप वर ऑफर साठी खाली स्क्रॉल करा.

ॲप डाउनलोड करा

ॲप चा उत्तम रीतीने उपयोग करण्यासाठी खालील क्रमवार कृती करावी.

कृती करण्यापूर्वी तुम्ही भाषा निवडण्याच्या टॅब मध्ये जाऊन मराठी भाषेची किंवा तुमच्या सोयीच्या भाषेची निवड करावी.

कृती १ – मोफत अकाउंट बनवा : तुमचा मोबाईल क्रमांक भरून तुम्ही पॉवरगोठा नोंदवही चे मोफत सदस्यत्व प्राप्त करू शकता. मोबाईल क्रमांक दिल्यावर एक ओटीपी येईल तो वापरून तुमचे अकाउंट तयार होईल. त्यानंतर तुम्ही सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड तयार करा आणि पुढील वेळेपासून मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा

 

कृती २ – लॉग इन करा  : तुमचा मोबाईल क्रमांक आणि कृती क्र १ मध्ये बनवलेला पासवर्ड वापरून तुम्ही पॉवरगोठा नोंदवही ॲप मध्ये मोफत लॉग इन करू शकता. ॲप मधील सर्व सुविधा उत्तम रीतीने वापरण्यासाठी लॉग इन आवश्यक आहे. तुम्ही दुग्ध व्यवसाय, देशी कुक्कुटपालन, तसेच शेळीपालन या बाबतचे मोफत लेख वाचू शकता.

PowerGotha App Login

कृती ३- तुमची वैयक्तिक तसेच गोठा आणि जनावरांबद्दल माहिती भरा  : ॲप मधील प्रोफाईल संबंधी लिंक वापरून तुम्ही तुमची वैयक्तिक, गोठ्या संबंधित तसेच गोठ्यातील जनावरांसंबंधित माहिती भरावी.  ॲप चा सर्वोत्कृष्ट लाभ मिळविण्यासाठी गोठ्यातील गुंतवणूक, गोठ्याचे नाव, पत्ता, तुमचे नाव, ई-मेल तुमचा मोबाईल क्रमांक, सर्व जनावरांची जन्म/खरेदी माहिती भरून तुम्ही पॉवरगोठा नोंदवही चे वापरायला सुरुवात करावी. सर्व जनावरांना वेगवेगळा टॅग/बिल्ला क्रमांक देणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रत्येक जनावरांसंबंधी जास्तीत जास्त माहिती भरावी. तसेच ही माहिती वेळोवेळी बदलल्यास नवीन माहिती लगेच भरून अपडेट करावी.

PowerGotha app Farm Profile PowerGotha app Fixed Investment Dairy farming app dashboard Animal info

 

कृती ४ – ऑनलाईन नोंदवही पर्याय वर क्लिक करून दैनंदिन नोंदी करा : होम स्क्रीन वर दिलेले पर्याय (लिंक) वापरून नोंदवही वर जा. तुम्ही वर दिसणाऱ्या आयकॉन वर क्लिक करू शकता, फिरणाऱ्या फोटोवर क्लिक करू शकता किंवा खाली दिलेल्या आजच्या नोंदी करा या बटण वर क्लिक करू शकता.  नोंदी करताना हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य, सप्लिमेंट इत्यादींच्या किलो आणि दर रु. प्रति किलोच्या नोंदी करा. दुधाच्या सकाळ संध्याकाळ लिटर, आणि रु प्रति लिटर तसेच फॅट एस एन एफ नोंदी करा. गोठ्यातील डॉक्टर चा खर्च, कामगार खर्च, कृत्रिम रेतन खर्च, औषध खर्च, जनावर खरेदी विक्री, इतर उत्पन्न या नोंदी करा.  

तसेच दैनंदिन कृत्रिम रेतन, गोठ्यातील निर्जंतुक फवारणी, जंताचे औषध या नोंदी देखील न चुकता कराव्यात.

रोजची केवळ ५ मिनिटे देऊन तुम्ही सर्व नोंदी अद्ययावत करू शकता.  तसेच अनावधानाने किंवा इतर कारणामुळे मागच्या नोंदी राहिल्या असल्यास त्या देखील भरू शकता.  

Dairy farming app HomePowerGotha dairy app Write Records

आजच्या नोंदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ॲप मध्ये आजच्या नोंदी करा

कृती ५ – होम स्क्रीन वर जाऊन रोजचा नफा तोटा पहा  : रेकॉर्ड किंवा नोंदी भरल्यानांतर आजचा तुमच्या गोठ्यातील दैनंदिन नफा तोटा पाहण्यासाठी होम स्क्रीन वर जा आणि “तुमच्या गोठ्यातील या आधीचा नफा/तोटा दि. Xxxx  रु. ___ “ या शीर्षकाखालील दिलेला नफा तोटा पहा.

कृती ६ – प्रगतीपुस्तक या पर्यायावर जाऊन रोजचे अहवाल आणि आकडेमोड पहा : मेनू किंवा होम स्क्रीन वरील पर्याय वापरून अहवाल या पर्यायावर जा.  तुमच्या गोठ्यातील उत्पन्न, खर्च, खाद्य खर्च, दूध, पैदास, निर्जंतुकीकरण, जंताचे औषध, स्थावर गुंतवणूक इत्यादी अहवाल सोप्या पद्धतीने आज, काल, मागील आठवडा तसेच मागील महिना किंवा इतर कोणत्याही २ दिवसांमधील काळासाठी पाहू शकता.  
PowerGotha Dairy farming app ReportsBreeding report Dairy app

आधार सदस्यत्व असलेल्या शेतकऱ्यांना मागील ७ दिवसाचे अहवाल पाहता येतील. प्रीमियम सदस्यांना कुठल्याही काळाचे अहवाल तसेच नोटिफिकेशन आणि PDF अहवाल त्यांच्या ई-मेल वर मिळवता येतील.  

 

कृती ७ – नोटिफिकेशन पहा (प्रीमियम वैशिष्ट्य): तुम्ही प्रीमियम सदस्यत्व घेतले असल्यास ॲप द्वारे तुमच्या  मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी गाई गाभण खात्री करणे, जंताचे औषध, निर्जंतुकरण फवारणी इत्यादींबाबत नोटिफिकेशन/सूचना पाठवण्यात येतील.

Dairy app notifications

 

बोनस : या व्यतिरिक्त तुम्ही दुग्ध व्यवसाय, देशी कुक्कुटपालन, तसेच शेळीपालन या बाबतचे मोफत लेख वाचू शकता. आमच्या उत्पादनांविषयी माहिती मिळवू शकता. ऑफर्स चा लाभ घेऊ शकता.  आधार सदस्यत्वामधून प्रीमियम बनण्यासाठी प्रीमियम टॅब / पर्यायाचा वापर करून प्रीमियम सदस्यत्व मिळवू शकता.

 

विशेष कृती १: नोंदवही ॲप मध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे भरायची आहेत. यात चारा किंवा पशुखाद्य किंवा सप्लिमेंट वजन करून टाकणे अपेक्षित आहे. तुमच्या कडे वजनाची माहिती नसल्यास,किंवा कसे करावे हे माहित नसल्यास पुढील कृती करा.

तुम्ही ज्या पाटी किंवा भांड्यातून चारा खायला टाकताय तिचे चाऱ्यासहित आणि चाऱ्याविना वजन करा. हि कृती फक्त एकदाच करण्याची गरज आहे. तुम्हांला एका पाटीत बसणाऱ्या चाऱ्याचे वजन कळेल.

तुम्ही सर्व जनावरांना मिळून किती पाट्या, भांडी भरून चारा टाकताय याचे उत्तर काढल्यास एकूण चाऱ्याचे वजन तुम्हाला मिळेल जे तुम्ही ॲप मधील हिरवा चारा (किलो मध्ये) या प्रश्नाच्या उत्तरासाठी वापरू शकता.  अशीच कृती कोरडा चारा, सप्लिमेंट आणि पशुखाद्यासाठी सुद्धा करू शकता.

 

विशेष कृती २: ॲप मधील गणित आणि आकडेमोड किलोग्रॅम आणि रुपये प्रति किलोग्रॅम अशा स्वरूपात आहे काही शेतकऱ्यांकडे कमी जनावरे असल्यास, खनिज मिश्रण (मिनरल मिक्श्चर) किंवा सप्लिमेंट किंवा पशुखाद्य यांचे प्रमाण १ किलो पेक्षा कमी म्हणजे उदाहरणार्थ १०० ग्राम भरते. अशा वेळी तुम्ही १०० ग्राम किलो मध्ये बदलून लिहावे. तुमचे उत्तर अपूर्णांकामधे असेल.  उदाहरणार्थ १०० ग्राम म्हणजे ०.१ किलोग्रॅम. ५०० ग्राम म्हणजे ०.५ किलोग्रॅम.

नफा-तोट्याचे उत्तर बरोबर येण्यासाठी न चुकता वरील काळजी घ्यावी.

 

पॉवरगोठा प्रीमियम ॲप घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ॲप प्रीमियम करा

PDF अहवाल, SMS नोटिफिकेशन, अमर्याद काळ रिपोर्ट पहा इत्यादी वैशिष्ट्ये.