पॉवरगोठा इंटर्नशिप अर्ज २०२० | पॉवरगोठा-PowerGotha
Close

ऑक्टोबर 4, 2020

पॉवरगोठा इंटर्नशिप अर्ज २०२०

शिकलेले होतकरू तरुण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात ? कौशल्य किंवा अनुभवाची कमी आहे?

मग ही संधी तुमच्यासाठी आहे.

घरबसल्या तुमच्या सोयीच्या वेळी करा काम – मिळवा ट्रेनिंग, अनुभव, आणि संपादन करा कौशल्य

बना जॉब रेडी

तुम्ही तरुण, बारावी पास ते ग्रॅज्युएट असाल, अँड्रॉइड फोन असेल, आणि घरी दुभती जनावरे असतील, नवीन गोष्टी शिकण्याची आणि आव्हानात्मक काम करण्याची हौस असेल, तर ही संधी तुमच्या साठी आहे

संधी –

  • अनुभव, आणि पैसे कमविण्याची

  • पॉवरगोठा सोबत इंटर्नशिप

  • सुयोग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग, आणि अनुभव प्रमाणपत्र मिळवा

  • कामावर आधारित स्टायपेंड

  • उत्तम कामगिरीनुसार पूर्णवेळ कामात सामावून घेण्याची संधी

आजकाल प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी कौशल्य आणि अनुभवाचे सर्टिफिकेट मागितले जाते. नोकरी केल्याशिवाय अनुभव किंवा अधिक स्किल (कौशल्य) मिळणे अवघड आहे.

अशावेळी कोणीतरी तुम्हाला संधी देणे गरजेचे असते. कोणीतरी विश्वास ठेवणे गरजेचे असते.

लपलेली क्षमता सिद्ध करण्याची ही संधी तुम्हाला पॉवरगोठा उपलब्ध करून देत आहे.

दूध धंद्यामध्ये आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला रस असल्यास तुम्ही पुढे वाचा आणि नक्की अर्ज करा

पॉवरगोठा साठी तालुकावार इंटर्न (शिकाऊ) प्रतिनिधी नेमणे आहे.

सुरुवातीला सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातून भरती करणे आहे.

पात्रता:

बारावी पास ते ग्रॅजुएशन

अँड्रॉइड फोन धारक

घरी दुभती जनावरे असावीत

वर नमूद केलेल्या जिल्ह्यातील असावेत

खालील कौशल्यगुण असावेत :

दिलेले काम जबाबदारी पूर्वक पार पाडणे

आव्हानात्मक कामांची आवड, अडचणीतून मार्ग काढण्याची खासियत

संभाषण कौशल्य आणि चातुर्य

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा सांगली फॉर्म सांगली फॉर्म

सोलापूर सोलापूर फॉर्म

 

पॉवरगोठा विषयी थोडक्यात

गेल्या ३ वर्षांपासून सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी झटणारी कंपनी

दुग्धव्यवसाय तसेच पशुपालनासंबंधी माहितीचा खजाना सहज समजणाऱ्या गावरान मराठीत सांगणारी एकमेव वेबसाईट

दूध-उत्पादकांना आधुनिक गोठेधारकांच्या पंगतीत नेऊन बसविणे, त्यांचे उत्पन्न वाढविणे, दुभत्या जनावरांची गुणवत्ता वाढविणे यासाठी पॉवरगोठा अँप ची निर्मिती करण्यात आली आहे.

हजारो शेतकऱ्यांनी पॉवरगोठा वेबसाईट, फेसबुक पेज, ई-मेल, आणि अँप द्वारे सेवेचा लाभ घेतला आहे.

पॉवरगोठा वेबसाईट

पॉवरगोठा अँप

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ ऑक्टोबर २०२०
संपूर्णपणे वर्क फ्रॉम होम
अंतिम निवड उमेदवाराची पात्रता, निवडप्रक्रिया, उत्तरे, आणि अटींना अनुसरून असेल.

कंपनी निर्णय बंधनकारक असेल.

2 Comments on “पॉवरगोठा इंटर्नशिप अर्ज २०२०

ganesh nagawade
ऑक्टोबर 14, 2020 at 8:56 am

khup chan..aaplya barobar kam karayla avadel..

उत्तर
Pandurang Namdev kolapate
ऑक्टोबर 11, 2020 at 7:47 pm

म्हैस गोठा करण्यासाठी

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत