देशी गाय Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

देशी गाय

दूध धंद्याची मार्केटिंग आणि दूध धंद्याचे ४ P

दूध दर खाली वर होताना बऱ्याच वेळा बोलले जाते की पिण्याचे पाणी देखील २० रुपये लिटर ने मिळते, आणि दुधाची किंमत त्यापेक्षाही कमी आहे. हे बोलणारा आणि ऐकणारा त्याचा राग व्यक्त करत असतो. केलेल्या मेहनतीचा योग्य परतावा न मिळणे याबद्दल आलेल्या निराशा आणि रागातून असे व्यक्त होते आणि ते साहजिकच आहे. पण हे योग्य आहे का ? खरच दुधाची किंमत पाण्यापेक्षा कमी केली जाते का ? उत्तर देण्याआधी एक गोष्ट वाचू चला (उत्तर लेखाच्या शेवटी आहे, पूर्ण लेख नीट समजून वाचला तरच उत्तर समजेल आणि तुमचे जीवन ही बदलून जाईल) गोष्ट अशी – गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चालले असताना अनुयायांनी […]

पुढे वाचा

दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण

Deworming in cows marathi | डी-वर्मिंग जंतनिर्मूलन

अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमचे महिन्याला प्रति गाय हजारो रु आणि दिवसाला १ लिटर पर्यंत दूध हानी वाचवू शकते ? पुढे वाचा. विचार करा, कारखाना तुम्ही चालवताय आणि आत मध्ये दुसरीच कंपनी तुमच्या कच्च्या मालापासून आपले उत्पादन तयार करत आहे. भरीस भर म्हणून कारखाना आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी देखील खराब होते आहे, ज्याचा तुम्हाला दंड बसत आहे. कारखाना आजारी पडतो आहे. दूध-व्यवसायात हे कसे होते ? आदरणीय पाहुण्यांमुळे. कोण आहेत हे आगंतुक ? यांचे नाव काय ? जंत – परजीवी, कृमी, parasite, worm इत्यादी मित्रांनो, शाळेत शिकलो आहे, मातीत किंवा घाणीत हात घालून त्यावाटे आपल्या पोटात जंत […]

पुढे वाचा

दूध धंद्यातील नोंदी कोणत्या, कशा आणि कुठे ठेवाल ?

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे. दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल.   त्याच बरोबर त्यांच्या विरोधी मत असणारे आणि त्यांना परावृत्त करणारे दूध व्यावसायिक सुद्धा भरपूर आहेत.     कारण एकच – दूध धंदा परवडत नाही.   आधीच दुष्काळ, मुरघास केलेला नाही, लाळ्या खुरकूत ची साथ, वर्षभर कमी राहिलेले दूध दर आणि सतत आजारी पडणारी जनावरे. […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

Dairy Farm setting

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती,  त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे.  म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे.  ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. १. खिल्लार गाय सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. !!!!   मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय ! खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये. ही दुष्काळी जात […]

पुढे वाचा