दूध धंदयासाठी कर्ज कसे मिळवाल?

दुग्ध व्यवसाय कर्ज माहिती मराठी ।
दूध धंद्यासाठी कर्ज कसे मिळवावे हा या लेखाचा मथळा असला तरी थोडा संयम ठेवून वाचकांनी आणि दूध उत्पादकांनी कर्जबाबत मूलभूत माहिती आधी वाचावी ही विनंती आहे. तुम्हाला एकदा चार चाकी चालविणे शिकता आले की कार असो, जीप असो वा मोठा ट्रक असो ते चालविण्यात जास्त अडचण येत नाही. म्हणून बेसिक पासून सुरुवात करूया.
कर्ज म्हणजे काय ?
कर्ज म्हणजे काय – तर एखादा विशिष्ट हेतूसाठी इतर व्यक्ती, संस्थांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य. पैसे उसने घेणे. म्हणजे हे पैसे कधी ना कधी आणि शक्यतो ठरलेल्या वेळेनुसार परत करावेच लागतात. कर्जाचे खालील गुणधर्म असतात.
- कर्ज मुदतीनुसार परत करावे लागते
- कर्जावर व्याज आकारले जाते.
- कर्ज ठराविक हेतूसाठी दिले जाते. हा हेतू कर्जविषयी करारपत्रात नमूद केलेला असतो. त्या हेतूशिवाय इतर ठिकाणी वापरल्यास तो त्या कराराचा भंग ठरतो.
- कर्जासाठी जामीन रूपाने व्यक्ती किंवा स्थावरजंगम म्हणजे मालमत्ता (जमीन, बंगला, दागिने इ) तारण लागू शकते. जामीन शिवाय देखील कर्ज मिळते.
- बहुतांश कर्ज उदाहरणांमध्ये / प्रकरणांमध्ये कर्जाच्या उद्देशासाठी अंदाजित रक्कमेपैकी काही रक्कम कर्जदाराला स्वतः उभी करावी लागते. म्हणजे घर घेण्यासाठी १० लाख रु लागणार असतील तर २०% कर्ज घेणाऱ्याचे योगदान असेल तर २ लाख रु कर्जदाराने आणि ८ लाख रु कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेद्वारे दिले जातात.
- कर्ज हा अधिकार नाही. तुम्ही अर्ज केला आणि कर्ज मिळालेच पाहिजे असे नाही.
कर्ज कोणाला मिळते?
कर्ज फक्त पात्र व्यक्ती किंवा संस्थेला मिळू शकते.
कर्ज पात्रता कोण ठरवते?
सहसा, बहुतेक वेळा कर्ज पात्रता ठरविण्याचे सारे अधिकार कर्ज देणाऱ्या संस्थांना असतात. म्हणजे बँक, सहकारी संस्था, बिगर सरकारी-खासगी आर्थिक संस्था हे सर्व त्यांचे स्वतःचे कर्ज पात्रता निकष ठरवू शकतात.
काही वेळा मूलभूत पात्रता नियमन करणाऱ्या संस्थांद्वारे म्हणजे नाबार्ड, रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय, राज्य सरकार, केंद्र सरकार आदींद्वारे ठरवली जाते.
हे मूलभूत पात्रता निकष अधिक कठोर करण्याचा अधिकार कर्ज देणाऱ्या संस्थांना असतो. हे पात्रता निकष कमी करण्याचा अधिकार अशा संस्थांना नसतो.
म्हणजे समजा, १० लाखाच्या उद्योग कर्जासाठी ४०% तारण ठेवण्याची अट नियमन संस्थांद्वारे घातली असेल तर कर्ज देणारी बँक समजा SBI – ही अट कठोर म्हणजे ६०%, ८०% पर्यंत मागू शकते. पण ४०% कमी तारण घेऊन कर्ज देता येत नाही.
पुढे जाऊन, कर्ज पात्रता ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार कर्ज वाटप करणाऱ्या स्थानिक पात्र अधिकाऱ्याला असतो. काही वेळा कागदावर सर्व निकष पूर्ण असूनही कर्ज नकार देण्याचे अधिकार अशा अधिकाऱ्याला असू शकतात. म्हणून च वर आम्ही लिहिले आहे की कर्ज हा अधिकार नाही.
कर्जासाठी पात्रता कशी मिळवाल ?
कर्जाची पात्रता, कर्जाच्या उद्देशानुसार आणि प्रकारानुसार ठरते. प्रत्येक कर्ज प्रकारची पात्रता निकष वेगळे असू शकतात. असे असले तरी काही मूलभूत निकष नसल्यास कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणे अवघड होते.
#१. कर्जाचा इतिहास आणि सिबिल गुणांकन – स्कोर
अंडे आधी का कोंबडी आधी अशा प्रकारचे हे कोडे असून, आधी कर्ज घेतलेल्या आणि यशस्वीरीत्या परतफेड किंवा देय झालेले हप्ते भरणाऱ्या व्यक्तींना कर्ज मिळणे सोपे जाते.
म्हणजे मजा अशी की कधी कर्जच काढले नसेल तर नवीन कर्ज मिळणे अवघड होते.
CIBIL ही संस्था कर्ज देणाऱ्या संस्थांकडून माहिती घेऊन कर्जदारांची डेटाबेस बनवते. त्यात सहभागी संस्थांकडून मिळालेली सर्व कर्जदारांची PAN नुसार खालील माहिती, – किती कर्ज, किती मुदत, किती हप्ते, किती फेडले, किती बाकी, किती थकवले इत्यादी माहिती असू शकते.
जितके सिबिल गुण जास्त तितकी पात्रता जास्त. हे गुण कर्ज घेतल्याने आणि वेळेवर फेडल्याने वाढतात तर कर्ज हप्ते थकविल्यास, कर्ज मुदतीत परतावा न केल्यास कमी होतात.
कोणतेही कर्ज देण्यापूर्वी अधिकारी, बँक, किंवा संस्था हि सिबिल माहिती उघडून पाहते आणि पात्रता पडताळते.
कंपनी साठी कर्ज घेताना, डायरेक्टर आणि अधिकारी यांचा सिबिल स्कोर देखील पाहिला जातो.
पार्टनरशिप साठी कर्ज घेताना सर्व पार्टनर्स चा सिबिल स्कोर पाहिला जातो.
सिबिल स्कोर कसा वाढवावा?
१. अजिबात नसलेला सिबिल स्कोर वाढविणे साठी छोटे आणि अल्पमुदतीचे कर्ज घेणे, ते वेळेवर फेड करणे हा उपाय आहे. तुम्ही एखाद्या FD (मुदतठेव) च्या साहाय्याने तारण कर्ज घेऊ शकता, किंवा शासकीय योजनांमधून उपलब्ध असलेले सोपी कर्जे घेऊ शकता.
२. कर्जफेड न केल्यामुळे कमी झालेला सिबिल स्कोर वाढविणे साठी केवळ ते कर्ज देय झालेल्या व्याजासकट फेडणे हाच उपाय आहे. One Time Settlement (तडजोड) मध्ये तुमचा सिबिल स्कोर अधिक खराब होऊ शकतो.
#२. स्वतःचे भागभांडवल
काही कर्ज प्रकारांसाठी आधी म्हटल्याप्रमाणे कर्ज उद्देशासाठी लागणाऱ्या रक्कमेपैकी काही रक्कम स्वतः कर्जदार व्यक्ती ला उभी करावी लागते. स्वतःचे भागभांडवल म्हणून.
#३. तारण
बऱ्याच कर्जांमध्ये कर्जाच्या रकमे इतकी किंवा थोडी कमी किंवा कधी जास्त किंमत असणारी स्थावरजंगम मालमत्ता गहाण किंवा तारण ठेवावी लागते.
काही कर्जांमध्ये इतर व्यक्तीनी कर्जदार व्यक्तीला जामीन राहावे लागते. म्हणजेच कर्जदाराने कर्ज परतफेड न केल्यास जामीन व्यक्तीने ती करावी अशी बँकेची अपेक्षा असते.
#४. उत्पन्न आणि परतफेड क्षमता
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्याचे उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता हे दोन्ही सिद्ध करावे लागतात.
उदाहरणार्थ उत्पन्न शून्य असणाऱ्या व्यक्तीला कर्ज मिळण्याची शक्यता अतिशय कमी असते.
नोकरीतील रिटायरमेंट पूर्वी वर्षे कमी असलेल्या व्यक्तीला दीर्घ मुदतीचे कर्ज मिळणे अवघड असते.
उत्पन्न आणि परतफेड क्षमता दाखविणे साठी उत्पन्नाचा दाखला बनविणे, ITR -आयटीआर म्हणजेच आयकर विवरण पत्र भरणे आणि त्याच्या प्रति जोडणे, बँकेत व्यवहार करून उत्पन्न खर्च आणि धंद्यातील आवक-जावक दाखविणे या मार्गांनी परतफेड क्षमता दाखविता येते.
#५. कागदपत्रे
कर्ज अर्ज पूर्ण करण्यासाठी विविध कागदपत्रे KYC डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, PAN कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादींची गरज लागू शकते.
#६ प्रकल्प अहवाल
धंद्यासाठी कर्ज घेताना प्रकल्प अहवाल हा एक महत्वाचा दुवा असू शकतो. प्रकल्प अहवालामध्ये मी कोणत्या उद्देशाने कर्ज घेतोय, त्या धंद्यामधून मी कर्ज घेऊन किती प्रगती करणार आहे याचे विश्लेषण असते. यामध्ये धंद्याचे स्वरूप, बाजाराचे स्वरूप, विक्री कोठे करणार, उत्पन्न, खर्च, नियोजित उत्पन्न खर्च, नफ्याची शक्यता, भांडवली खर्च, लेबर खर्च, धंद्यासाठी लागणाऱ्या भांडवलापैकी कर्ज व्यतिरिक्त भांडवल कोठून येणार इत्यादी गोष्टींची माहिती द्यावी लागते.
कर्जाची व्याज आकारणी कशी होते ?
प्रत्येक कर्जाची व्याज आकारणी वेगवेगळी असू शकते. कर्जविषयी सर्व मूलभूत बाबी कर्ज करारपत्रामध्ये नमूद असतात.
अगदी सोपे बेसिक म्हणजे दर साल दर शेकडा व्याज आकारणी केली जाते. ६% चे कर्ज असेल तर १ लाखावर एका वर्षासाठी ६००० रु व्याज लागेल म्हणजेच महिना ५०० रु व्याज लागेल
सावकारी कर्जामध्ये ५% म्हणजे १ लाखावर दर महिना ५००० रु व्याज लागते आणि वर्षाला ६०% व्याज आकारणी होते.
म्हणून सावकारी कर्ज कोणत्याही परिस्थितीत घेऊ नये.
चक्रवाढ व्याज – व्याजावर व्याज
काही कर्ज प्रकारांमध्ये परतफेड न केलेल्या कर्जावर आणि व्याजावर नवीन व्याज लागू शकते.
दूध धंद्यासाठी कर्ज कसे मिळवाल ? किंवा इतर कोणत्याही धंद्यासाठी कर्ज कसे मिळवाल ? दुग्ध व्यवसाय कर्ज 2020

दुग्ध व्यवसाय कर्ज 2020
कर्ज घेणे शक्यतो टाळावे. कर्ज घेऊन ते फेडण्यामध्ये भले भले मोठ्या कंपन्या आणि अख्खे देश दिवाळखोर झाले आहेत. म्हणून ज्याला शक्य आहे, पचवू शकतो, त्यानेच कर्ज घ्यावे.
असे असले तरी मोठी प्रगती, अल्प मुदतीत प्रगती किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे भागभांडवल, पूर्वजांची पुण्याई नाही इ गोष्टींसाठी कर्ज घेणे व्यवहार्य असू शकते.
दूध धंद्यासाठी सरकारी योजना
दूध धंद्यासाठी केंद्र, राज्य सरकार यांसह नाबार्ड तर्फे अनेक योजना चालू असतात. या योजनांची माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. तर कोणत्याही योजनेत पात्रता बसले नाही तरी देखील कर्ज कसे मिळवावे याची माहिती लेखात दिली आहे.
दूध धंदयासाठी विना सरकारी योजना कर्ज कसे मिळवाल ?
दूध-धंदा किंवा इतर कोणत्याही धंद्यासाठी कर्ज प्रक्रिया करताना, बँक हा विचार करते की हे कर्ज आणि हा धंदा किती व्यवहार्य आहे. बँकेचे अंतिम ध्येय हे आहे की कर्ज घेतल्यामुळे कर्जदाराचा धंदा वाढीस लागावा, भरपूर नफा व्हावा, वेळेवर कर्ज परतफेड व्हावी. वेळेवर कर्ज परतफेड झाल्यास बँक खुश होऊन अधिक कर्ज द्यायला गालिचा अंथरून तयार होते.
बँकेला तुम्ही कर्ज ऑफर करायला भाग पाडू शकता.
बँकेला गालिचा कसा अंथरायला लावाल ?
क्रमवार कृती आहे. ९०% वेळा तुम्हाला यश मिळेलच.
सर्वप्रथम आपले करंट अकाउंट उघडा बँकेत. बँक खात्याचे बचत आणि चालू (करंट आणि सेव्हिंग) असे दोन प्रकार असतात. करंट अकाउंट बिझनेस साठी असते. करंट अकाउंट मध्ये जमा रकमेवर व्याज मिळत नाही.
हे करंट अकाउंट तुम्ही धर्मग्रंथ असल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे जपा. -> म्हणजे काय ?
तुमच्या धंद्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार याच अकाउंट मधून करा.
वीजबिल, पाणी बिल, चारा खर्च, पशुखाद्य खर्च, डॉक्टर खर्च, लेबर चा पगार सर्व काही याच अकाउंट मधून करा.
दूध धंद्याचे सर्व उत्पन्न याच अकाउंट मध्ये येऊ द्या. दूध संस्थेला या अकाउंट ची माहिती देऊन दूध बिल तिकडे जमा होण्याची खात्री करावी.
तुम्हाला घरासाठी किंवा अडीअडचणी साठी देखील कोणताही खर्च करणे असल्यास रोख आलेले पैसे न वापरता आधी ते पैसे याच अकाउंट मध्ये भरा आणि पुन्हा पैसे काढा आणि वापरा.
कोणत्याही प्रकारे या खात्यावर चेक बाउंस होऊ देऊ नका.
हा सर्व हिशेब वही मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये एक्सेल वर लिहून ठेवा.
सोप्या पद्धतीने हा हिशोब लिहिण्यासाठी पॉवरगोठा ॲप वापरा.
१-२ किंवा ३ वर्षेपर्यंत संयम ठेऊन इमानेइतबारे ही कृती करा. बँकेला अशा ऍक्टिव्ह आणि भरपूर व्यवहार होणाऱ्या खात्यांची भरपूर गरज असते.
तसेच बँक मॅनेजर सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. ओळख ठेवा.
शक्य असल्यास घरातील सर्व व्यक्तींची बचत खाती त्या बँकेत उघडा.
या वाट बघण्याच्या काळात बँकेतून उपलब्ध असलेल्या लोन प्रकारांची तसेच पात्रता निकषांची माहिती घ्या. कागदपत्रांची माहिती घ्या आणि नसल्यास त्याची जुळणी करा.
मजेची बाब म्हणजे इतका सुंदर हिशेब तुम्ही लिहिला असल्यास तुम्हाला आपोआप माहिती होईल की नेमके किती कर्ज तुम्हांला हवे आहे, कोणत्या हेतू साठी – म्हणजे शेड बांधकाम, पशूखरेदी, किंवा चारा खरेदी साठी कर्ज हवे आहे का या प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतील.
बरेचसे दूध-उत्पादक आणि होतकरू तरुण केवळ कर्ज पाहिजे म्हणून आपल्या धंद्याची प्रगती थांबवत असतात. त्यांना नेमके किती कर्ज हवे, त्याची परतफेड कशी होईल याची काही एक माहिती नसते.
वर नमूद केलेली कृती करणारा दूध-उत्पादक शेतकरी मात्र ही सर्व माहिती तोंडपाठ करून असतो.
किती गाई आहेत ?
किती गाई हव्या आहेत ?
किती चारा लागेल ?
नवीन शेड किती फूट चे लागेल ?
नवीन जनावरांची आवक लक्षात घेता किती चारा लागेल ?
त्यासाठी किती मुरघास खड्डे, बंकर किंवा बॅग लागतील?
किती मशिनरी लागेल (मिल्किंग मशीन, पार्लर, हेडलॉक, कडबाकुट्टी मशीन इ)
किती उत्पन्न अधिक मिळेल ?
एका गाईचे एका वेतात किती दूध निघते?
दुधाचा प्रतिलिटर खर्च किती येतो ?
कालवडीवर किती खर्च होतो ?
दूध दर खाली वर आणि दुष्काळ आदि मुळे धंद्यातील नफा किती कमी जास्त होईल ?
या सर्व गोष्टींची माहिती वरील प्रमाणे स्मार्ट दुग्ध-व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकाकडे असते.
ही सर्व माहिती असल्यास प्रकल्प अहवाल बनवणे सोपे जाते.

दुग्ध व्यवसाय कर्ज 2020
दूध धंद्यात स्वतःचे भाग भांडवल । दुग्ध व्यवसाय कर्ज 2020
ज्या कोणत्याही कर्ज प्रकारामध्ये तुम्ही कर्ज मागितले असेल त्यानुसार सेल्फ काँट्रीब्युशन -स्वतःचे भागभांडवल ची गरज लागते. बऱ्याच ईच्छुकांसाठी हे भांडवल उभे करणे हे सर्वात कठीण काम असते. हे भांडवल खालील प्रकारे जमा करू शकता.
धंदा छोट्या स्वरूपात चालवून थोड्या दिवसांनी नफ्यातील पैसे वाचवून ( हा सर्वात रास्त मार्ग आहे)
मित्र मंडळी
घरची मंडळी, नातेवाईक इ कडून (हा ही सोपा मार्ग आहे)
अनोळखी व्यक्ती
आता मित्र, घरचे, नातेवाईक, किंवा अनोळखी यांचे कडून भांडवल मिळवणे साठी त्यांना तुमच्या क्षमतेबद्दल, होतकरू पणाबद्दल, धंद्याच्या नफा आणि उज्ज्वल भविष्याबद्दल खात्री पटविणे महत्वाचे आहे. यात तुमच्या सेलिंग स्किल आल्या म्हणजेच विक्री करताना लागणारे कौशल्य. राऊडी भाषेत बोलायचे झाले तर बोलबच्चन. हे बोलबच्चन जितके खरे असतील तितके चांगले. जितके खोटे असतील तितका तुमच्या आयुष्यात नंतर येणारा संकटकाळ खरा असेल.
दूध धंदयासाठी प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट)
कोणत्याही बिझनेस लोन (व्यावसायिक कर्ज – धंद्यासाठी घेतलेलं कर्ज)साठी प्रकल्प अहवाल जरुरी आहे.
प्रकल्प अहवालात कर्जाचा उद्देश, कर्ज रकमेचा उपयोग कशा प्रकारे करणार, किती वेळात पूर्ण रक्कम वापरणार, कर्जामुळे बिझनेस मध्ये कशी वाढ होईल, पुढच्या ३-५ वर्षांत किती उत्पन्न आणि किती अधिकचे उत्पन्न येईल, खर्च वजा जाता किती नफा शिल्लक राहील, इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात.
दूध धंद्यामध्ये, गाईंची संख्या, त्यातील वाढ, दूध उत्पादनातील वाढ, गाई खरेदीचा खर्च, शेड मशिनरी किंवा तत्सम खर्च आदींचा समावेश होतो.
प्रकल्प अहवाल बनविणे साठी हवेतून काल्पनिक आकडे वापरण्या ऐवजी तुमच्या असलेल्या धंद्यातील खरे आकडे वापरणे केव्हांही उत्तम. पॉवरगोठा अँप मध्ये तुमचा हिशोब लिहून ठेवून ही माहिती जमा करू शकता. तुमचे सर्व अहवाल PDF स्वरूपात तुम्ही स्वतःला ई-मेल करू शकता. त्याची प्रिंट काढून फाईल मध्ये लावू शकता.
दूध धंदयासाठी खास प्रकल्प अहवाल लवकरच उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याबद्दल माहिती पॉवरगोठा वेबसाईट आणि फेसबुक पेज वर उपलब्ध होईल.
हिशोब लिहिणे
हिशेब लिहिणे ही एक चांगली सवय आहे.
माझ्या आयुष्याचे काय ध्येय आहे, मी रोज त्यासाठी काय करतो ? दर आठवड्याला मी काय करतो? दर महिन्याला मी काय करतो? प्रत्येक सहामाही ला आणि प्रतिवर्षी मी किती प्रगती करतो इ हिशोब लिहिणे यामुळे दूध धंद्यातच काय तर आयुष्यात मोठी प्रगती होऊ शकते.
म्हणूनच पॉवरगोठा ही शिस्त दूध-उत्पादकांना लावण्याचा प्रयत्न करत आहे. शिस्त कंटाळवाणी असते. त्यात रिवॉर्ड म्हणजे बक्षीस लांबच्या काळात असून, त्रास (थोडासा) नजीकच्या काळात असतो. म्हणजे असे समजा की ५ लाख रुपये मिळणार आहेत, पण रोज ५० रु द्यावे लागणार आहेत. भीमासारखी ताकद येणार आहे, पण रोज ५०-१०० जोर बैठक काढाव्या लागणार आहेत.
अशी कमिटमेंट करणे कठीण असते पण अशक्य नसते.
म्हणूनच तुमची कमिटमेंट घेण्यासाठी पॉवरगोठा ॲप प्रीमियम केवळ ५०० रु. प्रति वर्ष मध्ये उपलब्ध असून हिशेब लिहिण्याचा कंटाळा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून दररोज ३६५ दिवस भरल्यास वर्षभराने २५० रु कॅशबॅक ची भेट देऊ केली आहे.
तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास ॲप मध्ये किंवा येथील लिंक वर जाऊन प्रीमियम सभासदत्व खरेदी करा आणि खालील फॉर्म भरा.

दुग्ध व्यवसाय कर्ज 2020 । पॉवरगोठा
दूध धंद्यासाठी सरकारी योजना
दूध धंद्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड तर्फे अनेक योजना चालू असतात. या योजनांची माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. तर कोणत्याही योजनेत पात्रता बसली नाही तरी देखील कर्ज कसे मिळवावे याची माहिती लेखात दिली आहे.
कर्ज फेडताना अडचण आल्यास
कर्ज घेताना कर्ज वेळेवर फेडणे हा प्रामाणिक उद्देश असावा. असे कर्ज फेडताना कोणत्याही कारणामुळे (मानवी, नैसर्गिक इ)अडचण आल्यास घाबरून जाऊ नये. याचा तणाव स्वतः वर कुटुंबावर येऊ देऊ नये. प्रत्येक अडचणीवर उपाय असतो. तो शोधण्याचा प्रयत्न करावा. एडिसन ला हजार अपयशी प्रयत्नानंतर च बल्ब चा शोध लागला होता. कर्ज सेटलमेंट, रिस्ट्रक्चर इ मार्ग आजमावून पाहावेत. स्वतःचे कौशल्य एका पेक्षा अधिक क्षेत्रांत वाढवून उत्पन्न इतर ठिकाणांहून वाढविणे चा प्रयत्न करावा.
Sunil hadge
मे 25, 2021 at 10:49 amMala dudha pasun sarva product banwache aasun lagnare machines kuthe miltil
abhishek eknath kute
नोव्हेंबर 2, 2020 at 8:28 amgahv हिवरखेड purna sinkhad raja taluka..
subhash Pawaskar
ऑक्टोबर 24, 2020 at 1:29 amHi my name subhash I want start my milk both so plz gudie me
SUHAS SHAHAJI GHORPADE
ऑक्टोबर 10, 2020 at 2:18 pmमला कपिला गायचा गोठा करायचा आहे मला मदत भेटेल का
Krushna Dongare
ऑगस्ट 30, 2020 at 6:46 pmLone
लखन गजै
ऑगस्ट 26, 2020 at 10:29 amखुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्या बददल.
मी एक तरुन आहे.दुग्घव्यवसाय हा एक आसा व्यवसाय आहे.की आका देश जरी बंद .आसला तरी चालु राहानारा व्यवसाय आहे.माझ्याकडे हल्ली
83 लि.दुध आहे.आमच्या शेजारी …अंबाजोगई शहर आहे ..तर 50 ते 60 रुपय भाव मिळतो .हा व्यवसाय खंरच खुप चांगल आहे पन ? करनारा वेकती आसावा नाही तर घाटा .खुप आहे आणि माझी विनती आहे. जर लोन काडुन व्यवसाय चालु करायचा आसेल तर व्यवसाय च करु नका…आगोदर व्यवसाय चालु करा त्याची माहिती घ्या .नंतर हव असेल तर लोन काडा…
( सर तुमचे खुपच आभार कारनकी तुमचि .अँप पाँवरगोठा आतिशय सुंदरा आहे) मला वाट की दुग्धव्यवसाय करण्याव्या व्यक्तीने स्माटॅ पध्दीतीने हाच वापर करावा,नक्कीच यशस्वी होतील .
Chetan kale
जून 23, 2020 at 12:04 pmNice
Ganesh Nilkanth
जून 22, 2020 at 1:21 amGood morning Ganesh nilkanth Kopargoan Kumbhri. A.nagar
Jotiramsavant
जून 21, 2020 at 2:25 pmJotiram savant
शंकर राघू गोरे
जून 21, 2020 at 7:54 amछान माहिती आहे
Deepak doke
जून 21, 2020 at 7:39 amछान माहिती व महत्वाचे आहे
विलास कोंडबाराव शिंदे
जून 21, 2020 at 5:45 amछान माहिती दिली सर मला पण दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे
Dilip Meshram
जून 21, 2020 at 5:25 amमाहिती बरीच प्रमाणात दिलेली असली तरी नव्याने या क्षेत्रात येणे साठी जसे इतर राज्यात प्रशिक्षण आयोजित केली जाते तसे म.रा.दिसून येत नाही.सेवानिवृत्ती चर्या नंतर बैठक कर्ज देतात का नाही याबाबतची माहिती देण्यात यावी.शेती मध्ये जे प्रोजेक्ट्स सुरू करता येतात त्याबाबत स्वतःला , प्रशिक्षण, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार कुठे करून मिळतात.कर्ज व त्यावरील अनुदान याबाबत माहिती दिली जावी.
दिलीप मेश्राम
Prashant Bhosale
जून 21, 2020 at 5:07 amलोन
Prashant Barkade
जुलै 2, 2020 at 5:12 pmछान माहिती दिली आहे , प्रत्येक दुग्धव्यवसाय करण्याऱ्या व्यक्तीने स्मार्ट पध्दीने ह्याचा वापर करावा , नक्कीच यशस्वी होचाल
Prashant Bhosale
जून 21, 2020 at 5:07 amदुध वेवसाय
गोडसे अविनाश भालचंद्र
जून 21, 2020 at 4:44 amचांगली माहिती आहे आभारी आहोत
अमोल बापुराव गिरमकर
जून 21, 2020 at 4:27 amआपला लेख छान आहे,परंतु आपण सरकारी योजना कोणत्या आहेत त्या बद्दल माहिती दिली नाही माझी आपणास विनंती आहे की मला मेल द्वारे कोणकोणत्या योजना चालू आहेत त्या बदल माहिती द्यावी ही विनंती
vishnu burange
जून 21, 2020 at 4:00 amहे बरोबर आहे आहे कुटलिही बैक याला स्विकार करत नाही
Bhushan shinde
जून 21, 2020 at 1:48 amछान अतिशय सुरेख
Prashant Bhosale
जून 21, 2020 at 5:08 amदुध वेवसाय
Gole Yogesh Janardhan
जून 20, 2020 at 6:30 pmअतिशय सुंदर माहिती दिली आहे.
शिवाजी
जून 20, 2020 at 6:08 pmमला कर्ज काढून पाहिजे
Ganesh
जून 20, 2020 at 5:10 pmOnline apoly karta येईल का
9975814997
रुपेश अरुण पागोटे
जून 21, 2020 at 10:00 amसर नमस्कार मी एक 27 वर्षीय तरुण आहे मी दुग्ध वेवसाय करत आहे हल्ली माज्याकडे 6 गाय आणि 6 वासर आहेत आजून मला वाढवायचं आहे पण माज्याकडे नाण्याची कमतरता असल्यामुळे मला लोण केस ची गरज आहे मी वेवसाय एक गाय पासन सुरू केलेला आहे हल्ली 80 लिटर दुध काडत आहे तुमच्या कडून काही मदत मिळेल तर खूप बरं होईल मदत गायडन्स हवं आहे बस्स नमस्ते सर
विनोद मदने
जून 20, 2020 at 3:50 pmखुप खुप धन्यवाद ,फार महत्त्वपूर्ण माहीती दिल्या बददल…
Suresh Vaishnav
जून 20, 2020 at 3:39 pmछान आहे माहिती मला खूप आनंद झाला
Ganesh javir
जून 20, 2020 at 2:58 pmKhup chan
Vijay Ramanath pangavhane
जून 20, 2020 at 2:44 pmमी विजय रामनाथ पानगव्हाणे व्यवसाय शेती . 40 by 40 गोठा आहे . माझ्याकडे दोन गाय आहेत . चारा भरपुर प्रमाणात उपलब्ध आहे आणि मी चार गाय घेऊ ईच्छितो आहे. त्यामुळे मला कर्ज हवे आहे .
बाळासाहेब आभिमन्यु बहीर
जून 20, 2020 at 2:23 pmछान