मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट
आपण येथील –> मुरघास निर्मिती लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली. तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले. आज आपण पाहूया प्रत्यक्ष मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू. मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू. एका एकरात किती चारा तयार होतो ? एका एकर जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड […]