Close

मे 29, 2017

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती

बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती,  त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे.  म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे.  ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील.

१. खिल्लार गाय

खिल्लार गाय

खिल्लार गाय

सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. !!!!

 

मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय !

खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार

तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये.

ही दुष्काळी जात मानली जाते. आणि दुधासाठी गायीपेक्षा जास्त शेतीच्या कामासाठी खिल्लार बैल वापरले जातात.

वर्षाकाठी फक्त सरासरी ४५० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.२ % लागते.

 

२. लाल कंधारी गाय

या जातीचा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातील मानला जातो.

लाल कंधार

लाल कंधार

लखलबुंधा असाही या जातीचा नाव आहे.  हीसुद्धा दुष्काळी जात मानली जाते.

साधारणतः गडद लाल रंग असून फिका ते अतिशय गडद (तपकिरी) अशी व्हरायटी देखील पाहायला मिळते. राजा सोमदेवराय याने कंधार गाईंना राजाश्रय दिल्याचे मानले जाते.

भरपूर शेतीच्या कामात या जातीच्या बैलांचा उपयोग होतो.

वर्षाकाठी सरासरी ५९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.५७ % लागते.

 

३. साहिवाल गाय

साहिवाल गाय

साहिवाल गाय

भारतातील सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल ओळखली जाते.

या जातीचा पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्ह्यातून उगम झाला आहे.  मुलतानी, तेली, मॉंटगोमेरी अशी देखील नावे आहेत.  दूध-उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त अशी जात आहे.  तपकिरी लाल, किंवा महोगनी लाल अशा विविधते मध्ये पाहायला मिळतात.

वर्षाकाठी सरासरी २३२५ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सर्वाधिक ६००० किलो दूध दिल्याचं सुद्धा मानले जाते.

ऑस्ट्रेलिया मध्ये या गाईची आयात करून संकरित झेबू गाय तयार केली आहे.

 

 

४. लाल सिंधी गाय

उष्ण हवामानात तग धरून राहणारी म्हणून ही जात प्रसिद्ध आहे.  या गाईचा मूळ उगम पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग असून गडद लाल ते फिका पिवळा अशी विविधता पाहायला मिळते. शिंगे मजबूत आणि आडवे वर्तुळाकार वाढलेले दिसून येतात.

लाल सिंधी

लाल सिंधी

साहिवाल जाती प्रमाणेच भरपूर दूध देणारी हि जात मानली जाते.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, ब्राझील, श्रीलंका इत्यादी देशात निर्यात होऊन या जातीवर संशोधन आणि संवर्धन करण्यात आले आहे.

वर्षाकाठी सरासरी १८०० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  सरासरी फॅट ४.५ % लागते.

 

 

५. गीर गाय

गीर देखील साहिवाल, लाल सिंधी प्रमाणे भरपूर दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.  सुरती, गुजराती या नावाने देखील ओळखली जाते.

गीर गाय

गीर गाय

गुजरातमधील गीर जंगलावरून या गाईचे नाव पडले आहे. बैल भरपूर अवजड कामे करू शकतात. आणि तणावामध्ये तग धरणारी म्हणून ही जात विख्यात आहे.

कमी खाद्यातून जास्त दूध देण्याची खासियत आहे. ब्राझील तसेच अमेरिकेत देखील आयात करून यांचे अतिशय उत्तपा संवर्धन करण्यात आले आहे.

वर्षाकाठी सरासरी २११० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत.  ब्राझील मध्ये एका गाईने ६४ लिटर दूध दिल्याचे देखील बोलले जाते.

स्तूप आकारातील कपाळ आणि लांब कान ही यांची ओळखू येणारी वैशिष्ट्ये.

 

६. ओंगोले गाय

मुखत्वे आंध्र प्रदेश मध्ये आढळून येणारी जात, शेती काम तसेच दूध या दुधारी कामासाठी उपयोगी आहे. ओंगोले प्रदेशातील असल्यामुळे हे नाव पडले. नेल्लोर म्हणून देखील प्रसिद्ध.

ओंगोले गाय

ओंगोले गाय

रोगप्रतिकारक, काटक आणि कमी चाऱ्यावर गुजराण करू शकणे ही या जातीची वैशिष्ट्ये.

ओंगोल जातीची निर्यात अमेरिकेत मांस, ब्राझील मध्ये मांस आणि दूध, तसेच श्रीलंका, फिजी, जमैका येथे शेतीकामासाठी करण्यात आली.

चमकदार पांढरा रंग असून, मजबूत, छोट्या लांबीची शिंगे असतात. वर्षाकाठी सरासरी ७९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ३.७९ % लागते.

 

 

७. वेचूर गाय

वेचूर गाय

वेचूर गाय

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी जात केरळ मधील वेचूर येथून उगम पावली आहे.

हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी उंची (३ फूट). जगातील सगळ्यात छोटी जात आहे.  हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात.

उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत. उंचीच्या मानाने भरपूर दूध.

वर्षाकाठी सरासरी ५६१ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.७ – ५.८ % लागते.

 

26 Comments on “देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

Rahul
फेब्रुवारी 25, 2019 at 9:02 am

Sir mala lal Kandahar gay ghuayachi aahe market konte

उत्तर
Pradeep
डिसेंबर 25, 2018 at 10:37 am

माझे दोन एकर क्षेत्र आहे मला गीर गाय घ्यायची आहे कुठून गघ्यावी कशी घ्यावी हया बद्दल कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर
Umesh
डिसेंबर 18, 2018 at 12:51 am

देशी गायीची माहिती मिळाली बरे वाटले

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत