हंगेरियन दंगल आणि दुग्धव्यवसाय

दंगल, हंगेरी, आणि दुग्धव्यवसाय ?? काय बोलताय काय ?
उत्कंठावर्धक गोष्ट आहे, शेवटपर्यंत वाचा.
१९६० च्या दशकात लाझलो पोल्गर यांनी आपल्या होणाऱ्या बायकोला पत्रे लिहिली. त्यात लग्नासाठी एक अट घातली. होणाऱ्या मुलांना तुफान प्रतिभाशाली बनवायचे या एकाच उद्देशाने आपले लग्न असेल. क्लारा यांनी ती मान्य केली. युक्रेन सोडून क्लारा लाझलो यांच्याकडे हंगेरी मध्ये आल्या.
दोघे मिळून कोणती कला किंवा विषय धरून मुलांना प्राविण्य द्यायचे याबद्दल विचार करत होते. बहुभाषी बनवायचे (खूप साऱ्या भाषा येणारी मुले) की गणिती पंडित बनवायचे – मुलगी झाली तर १९६०-७० च्या काळात महिला गणितज्ञ कोणीच नव्हते, खूप प्रसिद्धी मिळाली असती.
पण त्यांनी तिसरा पर्याय निवडला. कोणता ?
लाझलो यांना खात्री होती, की योग्य नियोजन आणि चांगल्या प्रशिक्षणामुळे कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवता येईल.
दोघांनी तिसरा पर्याय निवडला. ज्यातील प्राविण्य मोजता येते आणि वस्तुनिष्ठ आहे, सहज तुलना करता येण्यासारखं.
बुद्धिबळ – चेस
लाझलो आणि क्लारा यांना ३ अपत्ये झाली.
सगळ्यात मोठी होती मुलगी – सुझान
त्याकाळी चेस किंवा बुद्धिबळ केवळ पुरुषी खेळ मानला जाई. महिला बुद्धिबळ स्पर्धा वेगळ्या होत आणि त्यांना सेकंड क्लास ची वागणूक मिळत असे. कमी लेखले जाई.
पोल्गर दांपत्याने निवडलेला मार्ग अजून खडतर झाला.
पण त्यांनी हार मानली नाही.
४ वर्षाची असताना सुझान ने पहिली चेस स्पर्धा जिंकली. ११ वर्षांखालील मुलींची स्पर्धा तिने लीलया जिंकली सर्व स्पर्धकांना सपाट केले.
१५ वर्षाची असताना ती जागतिक प्रथम क्रमांकाची महिला बुद्धिबळ खेळाडू झाली आणि जगातील पहिली महिला ग्रँडमास्टर झाली (ज्या खडतर मार्गाने पुरुष ग्रँडमास्टर बनत त्याच मार्गाने). तिच्या आधीच्या २ महिला ग्रँडमास्टर ना केवळ जागतिक महिला स्पर्धा जिंकल्याने खिताब देण्यात आला होता.
ही तर फक्त सुरुवात होती.
सुझान ला २ बहिणी झाल्या – त्यांनी त्यापेक्षा ही पुढे जाऊन झेंडा रोवला.
मधली बहीण सोफिया सुद्धा बुद्धिबळ खेळात निपुण झाली.
१९८९ मध्ये एकाच स्पर्धे मध्ये ९ पैकी ८ डाव जिंकून आणि एक बरोबरीत सोडवून एकाच स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवण्याचा (२७३५ गुण) विक्रम तिने केला- विराट किंवा सचिन ने एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमासारखे.
या स्पर्धेत बरेच पुरुष ग्रँडमास्टर देखील होते.
दुर्दैवाने पुरुष प्रधान संस्कृती बरोबर जास्त जुळवून न घेणे, फटकळ स्वभाव, या चेस शी संबंधित नसलेल्या कारणांमुळे २५४० मानांकन गुण (ग्रँडमास्टर साठी २५०० गुण लागत होते.) मिळवून देखील तिला कधीही ग्रँडमास्टर दर्जा नाही मिळाला.
महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक ६ व्या क्रमांकापर्यंत तिने मजल मारली.
२ बहिणींनी मंदिर रचला असेल, तर कळस चढवला शेंडेफळाने – ज्युदित ने.
लाझलो आणि क्लारा यांना तिसरी देखील मुलगीच झाली आणि तिचे नाव ज्युदित !
ती जगातील सर्वात तरुण (महिला किंवा पुरुष) ग्रँडमास्टर बनली १५ वर्ष ५ महिने वय असताना.
तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर अगदी २०१४ मध्ये रिटायर होईपर्यंत ती २५ वर्ष सलग सर्वोत्तम महिला खेळाडू राहिली. जागतिक बुद्धिबळ (वर्ल्ड कप) स्पर्धेत (पुरुषांसोबत)खेळणारी ती एकमेव महिला खेळाडू ठरली. पुरुष क्रमवारीत देखील तिने ८ क्रमांकापर्यंत मजल मारली.

हंगेरियन दंगल – पोल्गर परिवार Source
आहे की नाही हंगेरियन दंगल ? जसे फोगट बहिणींनी कुस्तीत प्राविण्य मिळवून देशाचे नाव उज्वल केले. तसेच पोल्गर बहिणींनी आपल्या देशाचे आणि पालकांचे नाव उज्वल केले.
रोचक गोष्ट आहे, याचा दुग्ध-व्यवसायाशी काय संबंध ?
बरोबर आहे, तुमचे !
तुम्ही म्हणाल याचा दुग्ध-व्यवसायाशी काय संबंध ?
बुद्धिबळ एक्स्पर्ट असणाऱ्या ३ असामान्य बहिणींची अनोखी कथा, आपल्याला नियोजन आणि स्मार्ट मेहनतीबद्दल बरेच काही सांगून जाते.
एवढेच नाही तर, हीच गोष्ट पुन्हा घडते कुस्ती मध्ये, फोगट परिवारात !!
दुग्ध-व्यवसायात देखील जातिवंत गाई नियोजनाने घडविता येतात.
अशाच शिस्तबद्ध नियोजनाने अमेरिकेत ६०-६५ लिटर देणारी गाय आणि ब्राझील मध्ये भारतीय गीर चे अंश असणारी आणि भरपूर दूध देणारी गाय जन्माला घडविल्या आहेत.
तुम्ही सामान्य दूध-उत्पादक देखील गीता बबिता आणि संगीता, विनेश घडवू शकता. तुम्ही देखील सुझान, सोफिया ज्युदित घडवू शकता.
नियोजन बद्ध पैदास धोरण राबवून.
वर्षाला ६ ते १० हजार लिटर दूध देणारी गाय लाखो रुपये देऊन विकत आणायची गरज नाही.
दुग्धव्यवसायातील नियोजन
दुग्धववसाय करताना शेकडो बाबींचे नियोजन करावे लागते, तरच यशाची खात्री देता येते. जातिवंत गाईनिर्मिती, मुरघास, पाण्याचे नियोजन, दूध काढल्यानंतर चे नियोजन इ गोष्टी प्लॅन करता येतात.
जातिवंत गाय निर्मिती
आज तुमच्या गोठ्यात ज्या काही गाई असतील त्यांची वंशावळ पुढे कशी असेल याचे नियोजन करा. ५ गाई असतील तर पुढच्या ५ वर्षांत २५ गाई कशा होतील याचे नियोजन करा.
जातिवंत गाई निर्मिती साठी पुढील प्रमाणे कृती करा.
- सर्वप्रथम आपल्या गायीच्या कानाला नंबरचा टॅग मारून घेतला जावा. त्यामुळे गायीची नोंद ठेवली जावू शकते.
- कृत्रिम रेतन करण्यासाठी ज्या वळूचे वीर्य वापरले जाते त्या वळूचे नाव अथवा क्रमांक त्या कांडीवर असतो. आपण कृत्रिम रेतन केल्यानंतर त्या वळूचा क्रमांक / नाव व ज्या गायीला रेतन केले तिचा क्रमांक सदरच्या तारखेला लिहून ठेवावा.
- एकदा एका गायीला वापरलेला वळू पुन्हा तिच्या पैदासीतील कालवडीना वापरु नये.
- दर वेळेस नविन पिढीला नविन वळूचे वीर्य वापरावे.
एखाद्या गायीच्या पोटी जन्माला आलेला वळू त्याच गायीच्या पुढील पिढ्यांमध्ये वापरला जावू नये.
वरील सर्व नोंदी करण्यासाठी पॉवरगोठा अँप तुमची सर्वतोपरी मदत करेल.
जर सर्व दूधउत्पादकानी या नियमांचे पालन केले तर तयार होणाऱ्या नविन पिढीतील गायी कमीतकमी १० ते २० % उत्पादन वाढवुन देतील व चांगल्या संकरित गायीची पैदास होइल.
अलौकिक प्रतिभा नियोजनाने घडवता येते.
पुढील ५ वर्षे तुमचे काय नियोजन आहे ? पुढच्या वर्षी तुम्ही काय करणार आहात ? इतकेच काय तर पुढील १ महिन्यात तुम्हांला काय करायचे आहे ? उद्या काय करायचा विचार आहे ? अशा जवळच्या कालावधी बद्दल देखील आपल्याकडे उत्तर नसते.
विचार करा आणि नियोजन करा.
जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Milind Dudhe
जून 2, 2020 at 7:12 amRelly awesome knowledge …..and present very good….I am also interested in any training program
Hemant Bawkar
मे 31, 2020 at 7:01 amखूप छान मार्गदर्शन केलेलं आहे , आपली कोठे कार्यशाळा , शिबिर आयोजित होत असेल आणि त्यातून दुग्धव्यवसाय , शेळीपालन याबाबत अभ्यासपूर्ण माहिती मिळत असेल तर आम्हाला कलवा – 9892508876 / hbawkar@gmail. com
Popat keskar
मे 30, 2020 at 4:24 pmThanks for making powergotha apps.