दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण

अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमचे महिन्याला प्रति गाय हजारो रु आणि दिवसाला १ लिटर पर्यंत दूध हानी वाचवू शकते ? पुढे वाचा.
विचार करा, कारखाना तुम्ही चालवताय आणि आत मध्ये दुसरीच कंपनी तुमच्या कच्च्या मालापासून आपले उत्पादन तयार करत आहे. भरीस भर म्हणून कारखाना आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी देखील खराब होते आहे, ज्याचा तुम्हाला दंड बसत आहे. कारखाना आजारी पडतो आहे.
दूध-व्यवसायात हे कसे होते ? आदरणीय पाहुण्यांमुळे.
कोण आहेत हे आगंतुक ?
यांचे नाव काय ?
जंत – परजीवी, कृमी, parasite, worm इत्यादी
मित्रांनो, शाळेत शिकलो आहे, मातीत किंवा घाणीत हात घालून त्यावाटे आपल्या पोटात जंत जात असतात आणि पोटदुखी, अपचन, अशक्तपणा आदी आजार लक्षणे आपण माणसाला देखील दिसतात.
तंतोतंत हीच गोष्ट दुधाळ जनावरांसाठी सुद्धा खरी आहे.
जंत कुठून येतात ?
जंत परजीवी आहेत, परजीवी दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणजेच एखाद्या बाधित जनावराच्या शरीरातून, जंतांची अंडी शेणातून बाहेर पडतात. ही अंडी मातीत, गवतात, चाऱ्यात, गव्हाणीत, हौदातील तसेच साठलेल्या पाण्यात अशा बऱ्याच ठिकाणी सुप्तावस्थेत राहतात.
चारा, किंवा पाणी वाटे हे नवीन जनावराच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांची वाढ सुरु होते.
जंत कुठे राहतात ?
जंत जनावरांच्या पचनेंद्रियांमध्ये, पचन मार्गामध्ये, रक्तामध्ये सुद्धा असू शकतात. जास्त वेळा आढळणारे जंत पचन मार्गामध्ये असतात.
जंतांमुळे तुमचा दुग्धव्यवसाय कसा बिघडू शकतो ?
म्हटल्याप्रमाणे जंत परजीवी आहेत. त्यांना स्वतःचे पोट भरणे आणि प्रजनन करून संख्या वाढविणे यासाठी अन्न लागते. परजीवी जंत, हे अन्न ज्या जनावराच्या पोटात आहेत, त्याच्या पोटातील स्त्राव, रक्त, अन्न इत्यादी गोष्टींवर जगतात आणि योग्य उपचाराविना त्यांची संख्या वाढते.
जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास दुग्ध-व्यवसायाला खालील अडचणीच्या गोष्टी होऊ शकतात.
हगवण लागणे, कालवड लवकर तयार न होणे, कालवडींच्या वाढीच्या दरात भरपूर घट (वाढ हळू होणे), दुधाळ जनावरांचे दूध कमी होणे, माजावर न येणे, गाभण न राहणे, ऍनिमिया (रक्त पातळ होणे), लवकर आजारी पडणे इत्यादी परिणाम होऊ शकतात.
कावीळ होणे
पोटफुगी होऊ शकते. शेणामध्ये जंत सुद्धा काही वेळा दिसतात . जंतांच्या हजेरीमुळे पचनक्रियेला आणि पचनमार्गात अडथळा होऊ शकतो.
तीव्र हगवण, शेणातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे, रक्त शोषक जंतांमुळे दिसू शकतात. Hookworm
नाकातून स्त्राव, खोकला, जनावर हवणे अशी लक्षणे सुद्धा असू शकतात.
आपण काय केले पाहिजे ? – जंतनिर्मूलन
जंत झाल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावेत. त्यापेक्षा चांगला उपाय म्हणजे, जंत होऊच नयेत, आणि त्यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून वेळोवेळी जंतनिर्मूलन करावे.
डी-वर्मिंग कसे करावे ?
जंताचे औषध जनावराच्या वजनानुसार द्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जंताचे औषध निवडून योग्य डोस द्यावा. प्रत्येक जंतनिर्मूलन करते वेळी वेगळे औषध वापरावे म्हणजे जंतांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होत नाही.
डी-वर्मिंग कधी आणि किती वेळा करावे ?
मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३ महिनेनंतर तर वासरांना जन्मल्यावर एक महिन्यानंतर ६ महिने होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जंतनिर्मूलन औषध द्यावे. जंतनिर्मूलन प्रभावी होण्यासाठी, सर्व जनावरांना एकत्रच एकाच वेळी औषध पाजावे, म्हणजे जंतांची टोळीचा जास्त चांगल्याप्रकारे नायनाट होतो.
खास काळजी
प्रत्येक वेळी वेगळे औषध द्यावे म्हणजे त्या औषधांविरोधी प्रतिकारशक्ती जंतांमध्ये तयार होत नाही.
किती खर्च येतो ?
तुम्ही इतके समजावून देखील शिस्त लागणे अवघड आहे, आणि वेळच्या वेळी जंताचे औषध पाजणे आम्हाला कसे लक्षात राहणार.
सोपे आहे वहीत लिहून ठेवा, जुने जंताचे औषध दिल्याची नोंद आणि, पुढची ठरलेली नोंद देखील.
पॉवरगोठा ॲप कशाप्रकारे मदत करू शकते ?
पॉवरगोठा ॲप मध्ये, दैनंदिन नोंदी मध्ये प्रश्न आहे
आज जंताचे औषध दिले का ?
हो असे उत्तर दिल्यास, तुम्हाला ॲप मध्ये अधिक खोलात शिरून पुढील प्रश्नांची उत्तरे देखील नोंद करता येतील.
कोणते औषध दिले,
किती खर्च आला.
हे नियमित नोंद केल्यास तुम्हाला ॲप स्वतः च पुढच्या जंतांच्या औषध देण्याची तारीख साठवून ठेवेल आणि योग्य वेळी SMS तसेच ॲप नोटिफिकेशन पाठवेल. तुम्हाला दुग्ध-व्यवसाय सोपे करून देण्यासाठी ॲप तत्पर आहे.
इतकेच नाही तर जंतांच्या औषधाच्या अहवाल मध्ये मागील जंताचे औषध दिल्याची तारीख आणि औषधाचे नाव नोंद दिसते म्हणजेच पुढील वेळी तुम्ही दुसरे औषध वापरू शकता.
ॲप वर खास ऑफर
जंतनिर्मूलनाचे फायदे (Benefits of Deworming)
वासरांची योग्य वाढ होते.
जंतांमुळे दुधात होणारी घट टाळता येते.
जंतनिर्मूलन महत्त्व व्हिडीओ – (NDDB) शॉर्ट फिल्म
जंतनिर्मूलन का करावे आणि न केल्यास काय होऊ शकते याबद्दल एक सुंदर सादरीकरण असलेला व्हिडीओ NDDB (राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास बोर्ड) यांनी बनवला आहे, तो खाली बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=6FAS1yuDElI
हे ही वाचायला आवडेल तुम्हाला : दुग्धव्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स
नानासाहेब गाडे पाटिल
जुलै 2, 2020 at 3:53 pmमाझ्याकडील 2 गायीच्या शेणातून रक्त पडते आहे आणि दूध ही कमी झाले आहे तर हा जंत प्रॉब्लेम असू शकतो का? आणि त्यासाठी योग्य असे औषध काय द्यावे?
कृपया रिप्लाय द्यावा.
Ratan
जून 30, 2020 at 12:56 pmगाय माजावर येत नाही दुसरे वेत आहे घान पण दिसत नाही ओरडत पण नाही
Vikram wakchaure
जून 30, 2020 at 3:04 amKhup chan
सुखदेव येवले
जून 29, 2020 at 2:31 pmखुपच छान माहिती, निश्चितच आम्हाला दुध ऊत्पादनात या माहितीचा उपयोग होईल, आणि जंत व परजिवींमुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते
Vikas Betkar
जून 28, 2020 at 4:02 pmGood information sir,,,