7 Ways to profitable Dairy Farming in Maharashtra Marathi | दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स
Close

मे 21, 2020

दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स । Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

Powergotha - पॉवरगोठा

Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

काही वेळा काही साध्या  गोष्टी आपण क्लिष्ट किचकट करून टाकतो.  दुग्ध-व्यवसाय भलेही थोडा किचकट आणि अवघड असेल, पण त्यात नफा कमविण्याचे शाश्वत मार्ग आहेत. ते काटेकोरपणे पाळले तर प्रत्येक जण नफ्यात धंदा करू शकतो.

काय आहेत त्या ७ गोष्टी ज्याने तुमचा धंदा किफायतशीर होऊ शकतो.

#१ मुक्त संचार गोठा – कमी खर्च, कमी कष्ट

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Mukta Gotha – Dairy Farming in Maharashtra Marathi

मुक्त गोठ्यात, गाईंना फिरण्याचे स्वातंत्र्य आणि २४ तास स्वच्छ पाणी पिण्यास मिळते.

गाईंना बंदिस्त, तणावपूर्ण जीवनापासून आणि मालकाला गाईची जागा बदलणे, शेण उचलणे, गाई धुणे, खरारा करणे आदी कष्टदायी कामांपासून मुक्तता मिळते

खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ कामगार किंवा गडी मुक्त गोठ्यामध्ये जास्त जनावरे सांभाळू शकतो.  जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. ठराविक संख्ये नंतर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन – दूध काढणी यंत्राचा उपयोग करावा.

#२ मुरघास निर्मिती – वर्षभराच्या चाऱ्याची सोया, चाऱ्यावरील खर्च बचत

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Murghas Nirmiti -Dairy Farming in Maharashtra Marathi

मुरघास निर्मिती म्हणजे हिरवा चारा त्याच्या पाण्याच्या प्रमाणासकट योग्य अवस्थेमध्ये जास्त काळासाठी टिकवून ठेवणे होय.

एक च पीक घेऊन वर्षभरासाठी हिरवा चारा  हवा असेल तर त्या पिकापासून मुरघास बनविणे म्हणजेच तुमचा दुग्ध-व्यवसाय हिट करणे ! मका, ज्वारी, हत्तीघास इत्यादी पिकांचा मुरघास करता येतो.

गुळासारखा वास असलेला मुरघास गुरे आवडीने खातात.

#३ जातिवंत गाय निर्मिती – भरपूर दूध, सुलभ प्रजनन

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Jativant Gaai Nirmiti -Dairy Farming in Maharashtra Marathi

जातिवंत गाई निर्मिती करताना सर्व अचूक रेतन नोंदी ठेवून योग्य पैदास धोरण राबविणे फार महत्वाचे आहे.  आपल्या कालवडी १८-२४ महिने होईपर्यंत आणि २५०-३०० किलोच्या होईपर्यंत भरवू नयेत.

तसेच एका पिढीला लावलेला वळू  दुसऱ्या पिढीला लावू नये.

प्रजनन वंशावळ माहित नसलेल्या गाई विकत आणण्यापेक्षा आपल्याच गोठ्यात गाई तयार कराव्यात.

#४ स्वच्छ दूध निर्मिती – दुधाला दमदार दर

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Clean Milk Production – Dairy Farming in Maharashtra Marathi

स्वच्छ दूध निर्मिती म्हणजे, बाहेरील पदार्थांची भेसळ नसलेले, कमीत कमी जिवाणू असलेले, प्रतिजैविके अंश नसलेले दूध तयार करणे होय.

दुधाचे पदार्थ तयार करणे, किंवा मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दूध पुरविणे यासाठी स्वच्छ दूध च लागते.

तुम्ही योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ दूध निर्मिती केल्यास दुधाला अधिक दर  मिळू शकतो.  अनेक दूध संकलन कंपन्या देखील अँटी-बायोटिक फ्री मिल्क म्हणजे प्रतिजविके नसलेल्या दुधासाठी जास्त दर  देताना दिसून आल्या आहेत.

#५ प्रतिरोधात्मक उपाय आणि लसीकरण – दगडीला आणि इतर आजारांना आळा

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Cow Vaccination – Dairy Farming in Maharashtra Marathi

गोठ्यामध्ये सर्व जनावरांना योग्य वेळी नेमून दिलेले लसीकरण करावे.

डी – वर्मिंग – दर 3 महिने नी सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन करावे.  नवजात वासरांचे जंतनिर्मूलन  प्रत्येक महिन्याला पहिले ६ महिने करावे.

वेळच्या वेळी CMT सीएमटी किट वापरून दगडी चाचणी करावी, आणि सुप्त अवस्थेतील दगडी ओळखून अधिक भयंकर दगडी ला आळा घालावा.

बायोसिक्योरिटी स्प्रे दर  ६ महिन्यांनी घ्यावा.

गोचीड आणि माशा निर्मूलन गरज पडेल तसे करावे.

#६ स्वच्छ आणि निरोगी गोठा – तणावमुक्त पशुपालन

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Cow Shade – Dairy Farming in Maharashtra Marathi

स्वच्छ आणि निरोगी गोठा असल्यास गाई, म्हशी कमी गाई वेळा आजारी पडतात.  सावली व बसायला कोरडी जागा तसेच वेळेवर चारा आणि २४ तास पाणी उपलब्ध करून दिल्यास जनावरे तणावमुक्त जीवन जगतात.

युक्ती क्रमांक ५ मधील उपाय केल्यास जनावरे तणावमुक्त राहण्यास अधिक मदत होते.

जातिवंत गाईंच्या समवेत निरोगी गोठा असल्यास अशा परिस्थितीत दुधाचे अधिक उत्पन्न मिळवणे सोपे होते.

#७ नोंदवही – हिशोब, नियोजन आणि व्यवस्थापन

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Record Book – Dairy Farming in Maharashtra Marathi

दूध धंदा करताना नफा-तोटा, उत्पन्न, खर्च, चारा, दूध, कामगार, रेतन, डी वर्मिंग, गाईंचे वजन, जन्म मृत्यू, खरेदी-विक्री, आजार-औषधोपचार इत्यादी नोंदी ठेवणे क्रमप्राप्त आहे.

जातिवंत गाई निर्मिती साठी पैदास आणि रेतन नोंदी करून योग्य पैदास धोरण राबवणे गरजेचे आहे.

नोंदवही लिहिताना शक्य तेवढ्या नोंदी नियमित कराव्यात.

 

अशा प्रकारे या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा दूध-धंदा प्रगतीपथावर, नफ्याकडे धावू लागेल.

 

हे ही वाचायला आवडेल तुम्हाला :  मुक्त गोठ्याची रचना – सोप्या ५ युक्त्या

 

तळटीप: जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो

जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात.  ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते

आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.

या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा

तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.

ॲप डाउनलोड करा

 

18 Comments on “दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स । Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

अरूण रूपा येवले
मे 25, 2020 at 2:44 am

माहिती खुपच छान व महत्वाची आहे.
नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे

उत्तर
पवन प्रभाकर चव्हाण
मे 24, 2020 at 6:43 pm

आता सध्या देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे दूध व्यवसायावर हीं याचा परिणाम झाला आहे. दुधाचं दर खूपच कमी झालेत प्रति ली 20रु मग अशा परिस्थितीत मुक्त संचार गोठा करणे योग्य आहे का. त्यापासून नफा मिळू शकेल का , का देशातली परिस्थिती सुरळीत होई परेंत हा व्यवसाय नाही केलेला बरा. प्लीज मार्गदर्शन करा..

उत्तर
आनंद नरुडे
मे 24, 2020 at 4:09 am

धन्यवाद

उत्तर
Nilesh
मे 24, 2020 at 4:00 am
Tejas
मे 23, 2020 at 7:24 am

मी नवीन गोटा तयार करतो आहे….. कोणत्या जातीच्या गायी घेऊ….10-15 गाई घ्यायच्या आहेत माझ्याकडे पहिल्या 4 गाई आहेत कसा प्लँन करू…..

उत्तर
Ajay Thombre
मे 22, 2020 at 5:16 pm

I like it information

उत्तर
वैभव पोकळे
मे 22, 2020 at 1:55 pm

आपन हरीयाना वरून चांगल्या प्रतीच्या गाया खरेदी करून देतो….

उत्तर
निलेश गुरव
मे 22, 2020 at 1:14 pm

चांगली माहिती आहे पण आपण जातीवंत गाई सोबत म्हैस पालनाची पण माहीती द्यावी

उत्तर
Bhanudas
मे 22, 2020 at 7:27 am

वरील माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असली तरी अपूर्ण वाटतं आहे. प्लीज गायींच्या संगोपनासाठी चाऱ्याचे नियोजन, पाणी पाजण्याचा सवयी यावर काही माहिती द्या.

उत्तर
टीम पॉवरगोठा
मे 22, 2020 at 10:27 am

नमस्कार सर,
https://powergotha.com/all-articles येथे आणि
https://powergotha.com/blog येथे पूर्ण माहिती वाचावी.

पाणी २४ तास उपलब्ध असले पाहिजे. तहान लागले की लगेच पिता यावे.

उत्तर
Prabodh Padate
मे 22, 2020 at 1:04 am

वेळच्या वेळी CMT सीएमटी किट वापरून दगडी चाचणी कशी करावी, आणि सुप्त अवस्थेतील दगडीची ओळखून अधिक भयंकर दगडी ला आळा कसा घालावा?

उत्तर
Hemant Bawkar
मे 22, 2020 at 7:16 am

जातिवंत गायी म्हणजे नेमके कोणत्या जाती ? तणावमुक्त गोठा साठी गोठा हा मोकळ्या जागेत उभारणे पण पावसात कास मोकळ्या जागेत उभारणार ?

उत्तर
टीम पॉवरगोठा
मे 22, 2020 at 10:29 am

ज्या गाईंची वंशावळ लिहून ठेवली आहे. योग्य पैदास धोरण राबवून प्रजनन केले आहे.
कोण वडील, कोण आई, कोणत्या जातीचे वळू, कोणत्या जातीची गाय, कोणत्या पिढी मध्ये किती दूध दिले, आजाराची हिस्टरी इ नोंदी आहेत. अशा जातिवंत गाई सांभाळणे अपेक्षित आहे.

उत्तर
टीम पॉवरगोठा
मे 22, 2020 at 10:31 am

कॅलिफोर्निया मस्टायटिस किट मध्ये धारेच्या प्रथम चार चिळा मारून द्रावणाचा रंग चेक करणे, दगडी पॉझिटिव्ह आल्यास उपचार करणे.

उत्तर
Vaibhav kinkar patil
मे 22, 2020 at 12:20 am

Account open hot nahi

उत्तर
स्वप्निल जाधव
मे 21, 2020 at 5:50 pm

छान माहिती आहे

उत्तर
अभिजीत तोरस्कर
मे 21, 2020 at 4:09 pm

खूप……..च छान माहिती आहे

उत्तर
Pradip jagtap
मे 21, 2020 at 3:31 pm

30*45 gotha karaycha ahe kiti kharch yeil

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत