दूध धंदा सुधारण्यासाठी ५ गोष्टी
कल्पना करा कोणी तुमच्या मनातील गोष्ट हेरून नेमकी तीच गोष्ट केली आणि त्यामुळे तुमचा प्रचंड फायदा झाला. एखादा नवस पावल्यासारखेच असेल ते.
आम्ही जाणून आहोत तुमच्या मनातील काही गोष्टी.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण एकसारखा दिनक्रम चालवत असतो.
तरी देखील मनामध्ये अनेक गोष्टी घोळत असतात. विविध कामे करणे जसे की “अत्यंत आवश्यक” ते “केले तर फार बरे होईल” अशा कामांची पेंडिंग यादीच आपल्या मनात एका कोपऱ्यात घर करून असते.
उदाहरणार्थ, आपल्या हिरो किंवा होंडाची ऑईल बदलण्याची वेळ कधीची टळून गेलेली असते तरी आपण तिला सर्व्हिसिंग करण्यात आज उद्या करत आळस करत असतो.
आईची औषधे आणायची राहिलेली असतात.
गेलेली ट्यूब बदलून लावायची असते. किती वेळ कामचलाऊ एडिसन बल्ब वापरणार!
अशा यादी ला आपण अत्यंत उपयोगी पण त्रासदायक लिस्ट म्हणूया. कारण आपण त्या लिस्ट मधील कोणत्याच मुद्द्यावर कृती करत नसतो आणि सतत मनाच्या एका कोपऱ्यात अशी लिस्ट आपल्याला सतावते.
तुम्ही दुग्ध-व्यवसाय करत असाल तर गोठ्यात सुधारणा करण्याजोग्या अनेक गोष्टी असतात. तुम्ही युट्युब चॅनेल किंवा फेसबुक लाईव्ह ला पाहिलेले असते किंवा इतर प्रगतिशील गोठ्यांवर भेटी देऊन माहिती घेतलेली असते.
साधे मिल्किंग मशीन चे लायनर बदलण्यात आपण आळस करतो.
रोजचा दिनक्रम तर तोच आहे,
दिवसभराचा कार्यक्रम आटोपला की संध्याकाळी घरी बबड्या, शनाया-गुरुनाथ, आई कुठे काय इत्यादी गोष्टींमधून आपली कामे विसरून जातो.
छोट्या छोट्या करण्याजोग्या गोष्टी केल्या तर आपला प्रचंड फायदा होणार असतो. पण योग्य दिशा न मिळाल्याने किंवा कोणी वयस्कर जाणकार माणसाने कान न पिळल्या मुळे आपण त्यावर कृती करत नाही.
आज तुमचे कान पिळण्यासाठी नाही तर तुम्हाला एक आठवण म्हणून काही गोष्टी सांगत आहोत ज्या केल्यावर तुमचा गोठा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. कालपेक्षा आज रोज १% जरी प्रगती केली, एक गोष्ट जरी चांगली केली तरी वर्षाच्या शेवटी आपण ३६५% नी सुधारलेले असतो.
तर कोणत्या ५ गोष्टी आहेत, ज्या तुम्ही लगेच उद्या करू शकता.
1. खरारा करण्यासाठी खांब लावा
तुमच्या गाईंना तुम्ही भिंतीवर, किंवा तार जाळीवर अंग घासताना पाहिले असेल.
जनावरांना पूर्ण अंगावर केस असतात, तसेच त्यांना माणसांसारखे हात नसल्याने त्यांना जेव्हाही खाज येते, तेव्हा खाजविणे शक्य न झाल्यास ते प्रचंड तणावात येतात.

आधुनिक दुग्धव्यवसाय -kharara khamb – खरारा युक्ती
म्हणून सोप्या पद्धतीने आपण एक खांब रोवून त्याला काथ्या किंवा वरील चित्राप्रमाणे मॅट लावून खरारा करण्याची सोय लगेच करू शकतो.
खरारा करण्यास जागा असल्यास गाईंच्या अंगावरील गोचीड, इतर कीटक गळून पडतात. रक्ताभिसरण चांगले होते. त्वचा टवटवीत राहते. जुने केस गळून पडतात. गाई तणावमुक्त राहायला मदत होते.
चित्रामधील खांब लावल्या लावल्या ५ मिनिटांमध्येच आपले अंग घासण्यासाठी या मुक्त गोठ्यातील गाईंची रांग लागली होती.
2. वजन करून खाद्य टाका
शास्त्रोक्त पद्धतीने पाहायला गेले, तर गाईंना त्यांच्या वजनानुसार आहार द्यावा लागतो. त्या स्टेज ला आपण नंतर जाऊ. आधी आपण गाईंना किती खायला टाकतोय हे मोजुया.
एका पाटीत रोजचा हिरवा चारा/कोरडा चारा टाकून त्याचे वजन करा, आणि अशा किती पाट्या लागत आहेत ते पहा. म्हणजेच एका गाईला रोज किती किलो चारा टाकतोय हे कळेल. ही गोष्ट तुम्ही पॉवरगोठा अँप मध्ये लिहून देखील ठेऊ शकता.

वजन करून खाद्य टाका
शास्त्रोक्त पद्धतीने मोजायला वेळ असला तरी एका गाईला किती चारा रोज लागतो, हे पाहायची एक सोपी पद्धत आहे.
गाईंना चारा टाकल्यानंतर तो किती बाकी राहतोय, हे पहा.
- खूप चारा बाकी राहत असेल तर तुम्ही खूप जास्त चारा टाकत आहात.
- संपूर्ण चारा चाटून पुसून संपला असेल, तर अर्थातच तुम्ही कमी खायला टाकले.
- थोडासा चारा बाकी राहत असेल तर योग्य प्रमाण आहे हे समजावे.
3. जंतुनाशक फवारणी तसेच चुना पसरणे
कोरोना मुळे लोकांना सॅनिटायझर, हात धुणे, जंतूंपासून बचाव, इत्यादी गोष्टींचे महत्व कळले आहे. ज्या प्रकारे, व्यवसायाचे ठिकाण, दुकान, फॅक्ट्री, ऑफिस, बस स्टॅन्ड इत्यादी गोष्टी सॅनिटायझर स्प्रे मारून प्रतिबंधात्मक प्रयत्न केले जात आहेत, तेच प्रयत्न आपण गोठ्यात देखील केले पाहिजेत.
मस्टायटिस, दगडी सारख्या खतरनाक आजारापासून बचाव करण्यासाठी गोठ्यातील बॅक्टेरिया चा नायनाट तुम्ही जंतुनाशक स्प्रे घेऊन करू शकता. असा स्प्रे घेतल्यास, मस्टायटिस सोबत इतरही अनेक आजारांना प्रतिबंध होतो. दर ३ ते ६ महिन्यातून एकदा असा स्प्रे घेतला पाहिजे.

गोठ्यात चुन्याचा उपयोग
याशिवाय, गोठ्यात प्रवेश करताना, तसेच गोठ्याच्या आजूबाजूने चुन्याची फक्की टाकल्यास ही जंतुनाशकाचा हेतू साध्य होतो.
4. पाण्याचा हौद साफ करून घ्या
दुभत्या जनावरांना दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची गरज असते. अगदी २४ तास पाणी उपलब्ध असले पाहिजे. मुक्त गोठ्यात आपण ही हौदात किंवा सिमेंट कुंडी मध्ये सोय करतो.
पण आपण घरी स्वतः पाणी पिताना जेवढी काळजी घेतो, तेवढी जनावरांसाठी घेत नाही. बऱ्याचदा हौदात शेवाळ, कचरा, अस्वच्छता दिसून येते.
हे पाणी स्वच्छ असल्यास आजारांना प्रतिबंध होतो आणि पाणी थंड असल्यास जनावरे अधिक आनंदाने पाणी पितात. म्हणून जर तुम्ही हल्ली केला नसेल तर लगेचच तुमचा पाण्याचा हौद साफ करून घ्या, शक्य असल्यास आतून चुन्याचा थर द्या. शक्य झाल्यास उन्हापासून हौद सुरक्षित ठेवा, जेणेकरून पाणी थंड राहील.
5. सिमेन कांडी वरील माहिती वाचून मग च वळू लावा कृत्रिम रेतन करा.
तुमच्या गोठ्यात तुम्ही कृत्रिम रेतन करत असालच. बहुतांश लोकांना डॉक्टर कोणती कांडी बाहेर काढतात आणि कोणता बैलाचे वीर्य वापरतात हे माहित नसते.
या कांडीवरची सांकेतिक माहिती वापरून तुम्ही या बैलाबद्दल माहिती करून घेऊ शकता. या माहिती वरून तुम्ही पुढच्या वेळी प्रगत पैदाशी साठी कोणता बैल वापरावा हे ठरवू शकता.
ही माहिती कशी वाचायची यासाठी येथे क्लिक करा.

सीमेन स्ट्रॉ वरील माहिती वाचणे
ही संपूर्ण माहिती तुम्ही पॉवरगोठा अँप मध्ये लिहून ठेवू शकता.
तुम्ही हल्ली कृत्रिम रेतन केले नसल्यास, एखाद्या मित्राकडून वीर्य कांडीचा फोटो मागवून घ्या आणि माहिती गुगल वर शोधण्याचा प्रयत्न आणि सराव करा.
तर हे होते ५ सहज करण्याजोगे उपाय ज्यांनी तुमचा गोठा १% कितीतरी अधिक पटीने आधुनिक होईल. ही कामे सहज कारण्याजोगती आहेत. विसरू नये, सोपे पडावे म्हणून या लेखाची PDF देखील उपलब्ध करून देत आहोत. ती कोणा मित्राला whatsapp वर सेंड करून ठेवा म्हणजे गोठ्यात गेल्यावर हा लेख नेटवर वाचता नाही आला तरी व्हाट्सअँप उघडताच या गोष्टींची आठवण होईल.
तळटीप: जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Bibhishan Lendave
एप्रिल 7, 2021 at 1:31 pmNice Article. I like it. I am follower of Power gotha Team. Your Articles & Ideas are very beneficial in our business..
Lot of Thanks. Dr. Shailesh Madane.
किरण विश्वनाथ काटकर
ऑक्टोबर 22, 2020 at 4:42 amपॉवर गोठा अॅप मधील वेळोवेळी मिळालेल्या माहिती व मार्गदर्शनामुळे पारंपारीक पद्धतीने चालत आलेल्या दुधव्यवसामध्ये सुधारणा होऊन आधुनिकता आली , शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन उत्पादन वाढले.शेतकरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.
पॉवर गोठा टिमचे मनःपुर्वक धन्यवाद , असेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळत रहावे हि अपेक्षा.
धन्यवाद.
Samir kotkar
ऑक्टोबर 5, 2020 at 5:46 amस्प्रे करण्यासाठी कोणते जंतूनाशक वापरावे
Sachin B Gunnal
ऑक्टोबर 5, 2020 at 3:49 amChangli mahiti milali Thanks
Pravin Gunjal
ऑक्टोबर 3, 2020 at 4:18 pmGood suggestion
Rupat krushna
ऑक्टोबर 3, 2020 at 3:21 pmVery nice
Shivaji uttam gophane
ऑक्टोबर 3, 2020 at 2:10 pmVery nice sir
Shekhar bhosale
ऑक्टोबर 3, 2020 at 3:30 amखूप छान माहिती मिळाली.
तानाजी बिळासकर
ऑक्टोबर 2, 2020 at 2:42 pmचांगली माहिती दिली
धन्यवाद
Kailas Shelke
ऑक्टोबर 2, 2020 at 12:59 pmस्प्रे करण्यासाठी कोणते जंतूनाशक वापरावे?
Kailas Shelke
ऑक्टोबर 2, 2020 at 12:57 pmस्प्रे करण्यासाठी कोणते जंतूनाशक वापरावे
नानासाहेब रानमाळ
ऑक्टोबर 2, 2020 at 4:43 amछान माहिती आहे
Amit BARHANPURKAR
ऑक्टोबर 2, 2020 at 1:56 amNice information
Avinash abhang
ऑक्टोबर 2, 2020 at 1:41 amChangli mahiti ahe
शिवाजी कुदळे
ऑक्टोबर 2, 2020 at 12:35 amखूप छान माहिती दिली आहे
Vikas Raghunath chavan
ऑक्टोबर 1, 2020 at 3:10 pmMast changali mahit milali
Sachin pawar
ऑक्टोबर 1, 2020 at 2:27 pmVery nice