मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा
पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष
भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली.
उदाहरणार्थ,
एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात.
त्याच बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन करण्याची सरासरी ही फारच कमी आहे.
९० टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादका कडे २ ते ३ याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळी ची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही.

पारंपरिक गोठा
दुग्धव्यवसायातील अपयशाची कारणे
दुभत्या गाई व म्हशींची प्रति दूध उत्पादक शेतकरी संख्या मर्यादित राहण्याची प्रमुख दोन कारणे पुढील प्रमाणे आहेत.
- पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करताना दिवसभर अति कष्ट करावे लागणे.
दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो.
- संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन नसणे.
दूध धंद्यामध्ये हमखास बक्कळ उत्पन्नासाठी काय कराल
दिवसभरातील अति कष्ट वाचावेत यासाठी मुक्तसंचार गोठा व वर्षभराच्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन व्हावे म्हणून मुरघास निर्मिती केली पाहिजे.
दुभत्या गाईचे संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामतः दूध उत्पादनात वाढ होते.
या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण मुक्तसंचार गोठा पद्धतीची माहिती घेऊया.
मुक्त संचार गोठा पद्धत म्हणजे काय
- मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.
- गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
- त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
- शेण वारंवार काढले जात नाही.
- गाई एकेमकाना मारत नाहीत.
आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. वरील सर्व गोष्टी खालील माहिती द्वारे स्पष्ट होतील.

पारंपरिक गोठा

मुक्त संचार गोठा
एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्या साठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते. गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.

मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा
या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी. गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात. परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत. जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट घालणे होय. अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो.
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचे फायदे

मुक्त संचार गोठा – Dairy Farming in Maharashtra
कमी खर्च
मुक्त गोठा पद्धतीचा गोठा हा कमीत कमी खर्चात सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी करू शकतो.
निर्जंतुक गोठा
तार-जाळी व लोखंडी अँगल च्या साहाय्याने कंपाउंड करून कोणत्याही एका बाजूला गव्हाण केली जाऊ शकते. शक्यतो वैरण खाताना गाईंचे तोंड सूर्याच्या उगवत्या किंवा मावळत्या दिशेला असावे, जेणेकरून गोठा कोरडा व निर्जंतुक राहण्यास मदत होते. यामुळे गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्ताइटिस ) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.
मुक्त संचार गोठा मध्ये सावली आणि रोगप्रतिकारक शक्ती
संकरित गाईंचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते. मुक्तसंचार गोठ्या मध्ये झाडांची, किंवा शेडची सावली गाईंना लाभदायक ठरते. उन्हाळ्याच्या किंवा उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे गाईंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारकशक्ती टिकण्यास मदत होते. परिणामतः दूध उत्पादन वाढते.

मुक्त संचार गोठा – Dairy Farming in Maharashtra
माज येणे
गाई व वासरे मुक्त असल्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होऊन शरीराची संतुलित वाढ होते. गाई चांगल्या प्रकारे माजावर येतात. माजाची लक्षणे लवकरात लवकर ओळखता येतात. गाय माजावर आली कि बाहेर काढावी व कृत्रिम रेतन करून माज कमी झाल्यावर पुन्हा गोठ्यात सोडावी.
पिण्याचे पाणी आणि दूध देण्याची मात्रा
पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत गाईंना तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळते. हिरवा चारा, वाळला चारा व पिण्याचे पाणी या सर्व माध्यमातून जेव्हा गाईच्या शरीरात ४-५ लिटर पाणी जाते, तेव्हा गाईच्या कासेमध्ये कमीतकमी एक लिटर दूध तयार होते. यामुळे तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुक्त गोठा हा एकमेव पर्याय आहे.

मुक्त संचार गोठा – Dairy Farming in Maharashtra
खरारा
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्या मध्ये गाईंना खरारा करणे सोपे जाते. यासाठी एखादा खांब मधोमध रोवून, त्यावर नारळाचा काथ्या ओला करून गुंडाळावा. गाई त्यावर आपले शरीर घासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे गाई तणावमुक्त होऊन त्यांची त्वचा व्यवस्थित राहते.
शेण आणि मेंटेनन्स
दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो. परंतु मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेण महिन्यातून एकदा काढले तरी चालते. सूर्यप्रकाशामुळे शेण वाळते जाऊन शेणखताची भुकटी तयार होते. त्यामध्ये गाईची लघवी मिसळली गेल्याने उत्तम प्रकारचे शेणखत तयार होते. त्याचबरोबर होमनी नावाच्या किड्याची निर्मिती सुद्धा या भुकटी झालेल्या खतामध्ये होत नाही. हे शेणखत शेती चे उत्पादन वाढविण्यास उपयोगी पडते. मुक्त गोठा पद्धतीमध्ये फक्त पावसाळ्या मध्ये पाऊस चालू असे पर्यंत दररोज शेण उचलावे लागते.

मुक्त संचार गोठा – Dairy Farming in Maharashtra
मजुरी खर्च
मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जनावरांची जागा बदलणे, शेण उचलणे, पाणी पाजणे ही तिन्ही कामे करण्याची आवश्यकता राहत नाही. कष्ट वाचते, वेळ वाचतो. याचा परिणाम म्हणजे मजुरांवरील खर्च वाचतो. मजुरांचे प्रमाण कमी लागते, म्हणून कमीत कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त गाईंचा सांभाळ शक्य होतो.
गाईंचे संरक्षण
गाईभोवती कंपाउंड असल्याने रानटी प्राणी किंवा पिसाळलेले कुत्रे यापासून गाईंचे संरक्षण फक्त मुक्त संचार गोठ्या मधेच शक्य आहे. प्रत्येक वयोगटाच्या जनावरांची व्यवस्था स्वतंत्रपणे करता येते. व्यायलेल्या गाई, गाभण गाई व वासरे यांचे कप्पे स्वतंत्र केल्याने चारा व खुराक (पशुखाद्य) उत्पादनाप्रमाणे देणे सोयीचे जाते. त्यामुळे अनावश्यक खर्च वाचून बचत होते. नफ्यात वाढ होते.
निरोगी गाई
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामुळे गाईंमधील आजारांचे प्रमाण देखील कमी होते. अशा प्रकारे बहुपयोगी मुक्त गोठा पद्धत आता लोकप्रिय होत आहे
ही होती मुक्त संचार गोठा पद्धत – कमी कष्टात आणि कमी खर्चात दुग्ध-व्यवसाय करण्यासाठी. तुमचा गोठा पॉवरगोठा करण्यासाठी ही पहिली पायरी आहे.
नफ्यातील दूध – धंदा करण्यासाठी मोफत माहिती पुस्तक – दुग्ध व्यवसाय PDF
आपल्या गोठ्याला संपूर्ण पॉवर गोठा बनविण्यासाठी आमच्या कडून एक मोफत माहितीपुस्तक PDF स्वरूपात मिळवा
आजच्या या लेखात आपण दुग्धव्यवसाय करताना मुक्त संचार गोठा पद्धतीचे महत्त्व शिकलो. मुक्त संचार गोठा हि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नफ्याची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. या पद्धती चा अवलंब आपण करावा व इतरांनाही प्रवृत्त करावे या अपेक्षेने आपली रजा घेतो.
डॉ. शैलेश मदने
याबद्दल किंवा दूध धंद्या बाबत इतर काही शंका असतील तर खालील कमेंट सेक्शन मधून त्या विचाराव्यात.
N.K.MORE
फेब्रुवारी 4, 2020 at 10:35 amनमस्कार पावर टीम
सर मी पण व्यवसाय करू इच्छितो माझे पण स्वप्न आहे कि माझा पण खूप मोठा गोठा असावा , माझी २ एकर जमीन आहे आणि पाणी पण चांगले आहे आता तर मी जॉब करतो पण मला दूध व्यवसाय करावा वाटतो त्या साठी मला तुमच्या टीम ची मार्गदर्शनाची गरज आहे . तुमचा काही WHATUP ग्रुप असेल तर मला ऍड करा किंवा काही माहिती वगरे मला माझ्या नंबर वर पाठवा ७५५८७८६१८०
पॉवर टीम चा आभारी आहे
शिवाजी पाटील
मार्च 10, 2020 at 3:00 amसर दुध काढण्यासाठी मशीन चा वापर करणे योग्य की अयोग्य?
Rahul patil
जानेवारी 21, 2020 at 3:12 pmMala10 mashinch gota tyar kraycha aahe to kasa karaycha surwat kashi sanga
Umesh Tiwari
ऑगस्ट 10, 2019 at 10:33 amMi navin farm takat aahe gothyat gavan kiti uncha v kiti runda pahije don mashi madhe kiti antar pahije mahshi samora samor kiva virudha dishela bhandavi
आनंद जगदाळे
ऑगस्ट 5, 2019 at 5:07 amसर पोल्ट्री फार्म जवळ करु शकतो का? उत्तर भेटेल अशी आशा बाळगतो
Sagar kanwade
जून 9, 2019 at 5:23 pmNamaskar sir.
Murghas kontya kontya charyapasun karta yeto
Ani hydroponic chara janvaransathi yogy ahe la
Ani 10 gayinsathi roj kiti litter panyachi soy asavi
Mi navin suruvat kartoy
Sagar kanwade
जून 9, 2019 at 5:18 pmNamaskar sir.
Murghas kontya kontya charyapasun karta yeto
Ani hydroponic chara janvaransathi yogy ahe la
Amol khengare
मे 20, 2019 at 7:47 amमला HF गाई घ्य।यच्च आहे पुढचा महिण्यत 22 लिटरपुढे
ak
एप्रिल 30, 2019 at 10:34 amSir 30 cow mukt gota sathi v tynchi vasare kiti gunthe jameen lagel?
shatrughna samadhan shelke
मार्च 5, 2019 at 3:36 pmmala gopalan vyavsay karaycha aahe. mazya kade 1 aker koradwahu sheti aahe.
Dipak dhage
मार्च 2, 2019 at 1:47 pm10 गाई करिता किती फूट शेड व मोकळी जागा हवी.
NAGESH PRALHAD GAYAKAWAD
ऑक्टोबर 6, 2018 at 11:34 amसर/मैडम
मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे,गाई व म्हशींच्या गोठ्या बाबत जर कोणी consultant असेल तर मला सुचवा.तुमच्या मार्गदर्शनाची अवश्यक्ता आहे.
संदर्भ:जागेचे ठिकाण -तालुका-शहापूर,जिल्हा ठाणे
नाव-नागेश प्रल्हाद गायकवाड
मो.7758863069/9969172259.
Mail id:[email protected]
हरपालसिंग जाधव
सप्टेंबर 5, 2018 at 2:39 amसर मला घरच्या घरी संतूलीत पशू खाद्य तयार करण्या बाबत माहीती द्या.
Vishal
ऑगस्ट 29, 2018 at 7:52 amMukt gothyasathi lavkar vadhanari Ani jast takat asanari konati zade trees lavave
रविंद्र पावरा
ऑगस्ट 28, 2018 at 4:08 amसर, सुरवातीला दुध व्यवसायला व गोठा तयार करण्यासाठी कमीत कमी किती खर्च लागतो.
नाज़ीम सलीम शेख
ऑगस्ट 18, 2018 at 7:13 amएका म्हेशी ला दिवसात कामित कमी किती खर्च लागतो
सोमनाथ आडाव
ऑगस्ट 11, 2018 at 1:23 pmसर माझ जनरल स्टोअर्स आहे माझा कडे12 एकर जमीन आहे मला दुध व्यवसाय सुरू करायचा आहे मला
महेश गोतपागरे
ऑगस्ट 11, 2018 at 6:26 amखुप छान माहिती दिली पण आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल का
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 21, 2018 at 3:02 pmआमच्या बारामती येथील ऑफिस ला भेट देऊ शकता.
Sachin bhalerao
जुलै 30, 2018 at 3:31 amनमस्कार सर, मला सांगा म्हैस साठी mukt संचार पद्धत चालते का, 15-30 म्हशींना मुक्त संचार गोठ्यात ठेवता येईल का आणि दुसरा प्रश्न गोठा हेड to हेड असावा ki tail to tail
Pradeep Shinde
जुलै 22, 2018 at 7:27 amनमस्कार सर
नेपीयर घासाचे मुरघास होते का हे सांगावे होत असल्यास प्रक्रिया सांगावी
नमस्कार
Vijay
जुलै 17, 2018 at 5:41 amSir mala mishr ani mukt gotha kraycha ahe. Tyat 10 gir gay, 50 sheli,& 100 kombdi, tr tyachi rchana kshi asavi??? Tyana hydroponic chara devaycha ahe…
महेश भोरडे
जुलै 12, 2018 at 2:38 amसर माझा मुक्त गोठा आहे पण माझा गाईचं दूध हे 16 17 लिटरच्या पुढे जात नाही.आणि त्याच गाई मी विकल्या तर 3गाई मध्ये 65 लिटर दुध काढलं मित्राने.
चारा पोटभर आहे,
खुराक पण एक वेळी 4किलो आहे
मग प्रोब्लेन कुठे आहे
माझा मो.नं. ८८८८६५५९५१
गजानन परब
मार्च 15, 2021 at 5:20 amकसल्या जातीच्या गाई होत्या?
Priya Nitsure
जुलै 5, 2018 at 7:12 amRainy season madhe mukta sanchar gothyat kasa kam karava lagel? Mahaeastrat
टीम पॉवरगोठा
जुलै 8, 2018 at 8:11 amमुक्त संचार गोठा केला असल्यास पावसाळ्यात रोज शेण उचलावे. पाऊस पडत असताना गाईंना बसण्यासाठी कोरड्या जागेची व्यवस्था करावी. पावसाळा चालू होण्यापूर्वी आधीचे सर्व शेणखत गोळा करून काढून घ्यावे.
Sachin bhalerao
जुलै 8, 2018 at 8:23 amMala 50 mhashisathi gotha bandhaycha ahe sample design ani andajit kharch sangava pls
Sachin भालेराव
जून 15, 2018 at 5:40 amSir mala 100 gayincha project karaycha ahe tari roj kiti chara lagel ani sampurn kharxh kiti jail yachi mahiti dyavi. Apan adhunic cow farming project ubha karun deta ka
DIGAMBAR LUGADE
जून 9, 2018 at 11:26 amMURGHAS NIRMITI KASHI KARAVI V TI KARTANA KONTI KALJI GHAYVI. ANNI MUKTA SANCHAR GOTYCHI AAKHANI KASHI KARAVI.
मनोज माने
जून 9, 2018 at 3:32 amखूप छान नाहीती आहे सर all इन one दुधव्यवसाय
Swapnil mane
जून 1, 2018 at 3:41 pm30-35 ltr dudh denarya gai chi nigha Kashi ghavi
विश्वनाथ टोपे
मे 19, 2018 at 7:27 pmमाहीती खूप छान आहे सर तुमची आवडली आपल्याला माझ्या पण मनात अशीच कल्पना होती आणि तुमच्यामुळे ती मला अमलात आणण्यात एक प्रकारची प्रेरणा मिळाली आहे धन्यवाद सर
सोमनाथ गुणवंत ससे
मार्च 18, 2018 at 4:48 pmमुक्त गोठ्यामध्ये चेनलिंक जाळी ही अंगलच्या बाहेरून असावी की आतून
Shailesh Madane
मार्च 24, 2018 at 11:45 amJali hi nehmi aatun asavi, tyamule angle cha support milto
सोमनाथ गुणवंत ससे
मार्च 4, 2018 at 9:58 amमुक्त गोठ्या मध्ये पाईपच्या गव्हानी व पाण्याच्या गव्हानीची उंची जमीनी पासून कीती असावी
हरपालसिंग नरेंद्रसिंग जाधव
फेब्रुवारी 28, 2018 at 11:16 amसर माझ्या कडे HF गाई आहेत. दुधाचे प्रमान कमी आहे.एक वेळचे 4ते5 लि.पाण्याचा TDS 1000 पर्यंत आहे.RO बसवल्यावर ऊपयोग होईल का?
Anil Dattatray Pattekari
फेब्रुवारी 24, 2018 at 10:21 amChan mahiti Milali Ankhin Asel Tar Pathawa
टीम पॉवरगोठा
फेब्रुवारी 24, 2018 at 12:38 pmपॉवरगोठा.कॉम वरील सर्व लेख तुम्ही येथे वाचू शकता. –> सर्व लेख
sai
फेब्रुवारी 15, 2018 at 10:05 amSir Mla Navin Survat Kraychi Aahe MUKT SANCHAR PADHTISATI Tr Mla Kiti Guntavnuk Keli Pahije.
Mi Kasa Gotha Bandhava Yachipn Mahiti Havi Aahe.
Ani Kahi Loan Padhat Uplabdh hoti Ka?
kale swapnil
जानेवारी 31, 2018 at 12:22 pmKiti kharch hoil sadharpne
swapnil kale
जानेवारी 31, 2018 at 4:23 amMukt sanchar gotyala sadharpne kiti kharch hoil
AshokShamraoPatil
जानेवारी 8, 2018 at 3:58 pmSir mala navin suruvat karayachi aahetar kiti
Gayi pasunsuruvat karu.
M
Tushar Dhakulkar
जानेवारी 3, 2018 at 4:05 pmसर मी अमरावती जिल्ह्यात राहतो मला मुक्त संचार गोठा पध्दती करायची आहे तर मी कोणत्या गायी घेऊ आणि त्या गायीची खरी किंमत मला कशी कळेल
Pravin Zade
डिसेंबर 26, 2017 at 9:14 amSir Mla Navin Survat Kraychi Aahe MUKT SANCHAR PADHTISATI Tr Mla Kiti Guntavnuk Keli Pahije Aani Mla 7 HF Gai Pasun Survat Kraychi Aahe
Mi Kasa Gotha Bandhava Yachipn Mahiti Havi Aahe
गणेश कदम
जानेवारी 13, 2018 at 12:12 pmसर सध्या माज्या कड़े 6 गायी आहेत होस्टन गायी ची निवड कशी करायची होस्टन गाय जात कशी ओलकाची
बिभिशनवराट
नोव्हेंबर 9, 2017 at 10:08 amसर, आमच्या अचानक दोन गाईदगावल्या सर विम्या विषयी काही माहीती मिळेल का ? माझ्याकडे ऐकुण तेरा जणावरांचा गोठा आहे
amit suresh gavit
ऑक्टोबर 24, 2017 at 11:54 amSir,
आमचा शेतकरी गट आहे आम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे. ..आम्हाला मार्गदर्शन मिळेल का?
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 25, 2017 at 1:50 amनककीच सर
पॉवरगोठा टीम तर्फे मोफत दुग्ध-व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर आता आपल्या गावात
आता टीम पॉवरगोठा चे तज्ज्ञ येतील तुमच्या गावात !!!
फ़क्त 30 ते 35 शेतकरी एकत्र येऊन नियोजन करा आमची टीम आपल्या दारी येऊन मोफत शिकवेल.
दुग्ध व्यवसाय
मुक्त गोठा
चारा व्यवस्थापन – मुरघास
चाऱ्याची निवड
चारा लागवड
चारा कापनी
चारा साठवणुक
मुर्घास निर्मिती ( प्रात्यक्षिक )
*तरुणांना मित्र मंडळाना सामाजिक तसेच सहकारी संस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकार्य करा.
संपर्क :
प्रथमेश पाटील ( प्रबंधक )
8805499750
ANANT THROAT
ऑक्टोबर 23, 2017 at 4:50 amपण सर .मुक्त संचार गोठ्यात
दूध काढताना म्हैस /गाय एका जागी उभा राहिल का?
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 23, 2017 at 6:35 amदूध काढ़ताना बांधू शकता
सवय झाली की गाय स्वतः च येऊन उभी राहते ।
रितेश पाटील
ऑक्टोबर 21, 2017 at 6:12 amसर, मला शेळी व म्हैसपालन व्ययसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून काही मदत होऊ शकेल का? कृपया त्या बद्दल माहिती मिळावी सर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 21, 2017 at 2:37 pmसद्यस्थितीला पतपुरवठा किंवा कर्ज, आर्थिक मदत इत्यादी बाबत पॉवरगोठा मधून मार्गदर्शन केले जात नाही.
कृपया पॉवरगोठा संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून –> पॉवरगोठा लेखमाला १ लाभ घ्यावा.
वैभव
ऑक्टोबर 18, 2017 at 9:10 amमुक्त संचार गोठा बांधताना कोणती काळजी घ्यावी व
मुक्त गोठ्याचे कोणते तोटे आहेत का
Sudhir
ऑक्टोबर 13, 2017 at 6:00 amMala 5 Acre madhe DAIRY ani Goat Farm Karavyacha Ahe. Shetat Vihir ahe, State Highway pasun 2 Km side la ahe. 2-5 lakh invest karaychi tayari ahe, Projectsathi LOAN milel ka
?
hemant anil khandale
ऑक्टोबर 1, 2017 at 4:48 pmsir mala mukt sanchar gothya badal purn mahiti havi aahe
आबासाहेब देशमुख
सप्टेंबर 28, 2017 at 2:17 amअतिशय चांगली माहीती दिली आहे !
त्या बद्दल धन्यवाद !
दापोली , जिल्हा रत्नागीरी या ठिकाणी HF गायींचा गोठा यशस्वी होऊ शकेल का ?0
हरपालसिंग नरेंद्रसिग जाधव
सप्टेंबर 17, 2017 at 3:16 amसर माझ्या शेतातील पाण्याचा टी.डी.एस.9000 ppm आहे. त्याचा दूधावर किती परीनाम हाेताे.आता HF गाई साधारन 3 ते 3.5 ली. दूध देत आहे.RO बसवण्याचा वीचार आहे.त्याचा ऊपयाेग हाेईल का?
विकास पाटील कांडेकर
सप्टेंबर 14, 2017 at 9:18 amसर आम्ही मुरघाससाठी मका केलेली होती पण पाण्याअभावी तिला कणीस थोड्याच प्रमाणात लागले व ती मका पोच्यात झालेली आहे तिचा मुरघस चांगला होईल का
टीम पॉवरगोठा
सप्टेंबर 14, 2017 at 9:52 amसर तुमचा मोबाईल क्रमांक द्या
vikas
सप्टेंबर 14, 2017 at 9:59 am8308899637
Prakash Dnyandev Kshirsagar
सप्टेंबर 2, 2017 at 10:24 amgood and useful information.
D R Sonawane
ऑगस्ट 30, 2017 at 3:15 pmमिल्क पार्लर म्हणजे काय
Nanasaheb
ऑगस्ट 27, 2017 at 5:16 amगाय पालन हा व्यवसाय आहे
Jayadeep Patil
ऑगस्ट 26, 2017 at 1:39 amकोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात म्हैस पालन करायचे असल्यास म्हैशिचि कोणती जात योग्य. व एक म्हैस दिवसभरात साधारणपणे किती दुध देते.
Pravin londhe
ऑगस्ट 14, 2017 at 3:21 amNamaskar sir Mi 10 maishi gheun mukta gotha padhatine dugdha vyavsay ulhasnagar ethe suru Kharat. Ashe… Murghas uplabdha nasel tr hydrophonic chara banaun khau ghatla tr chalel ka.. Divsatun Kiti Vela Kiti ola ni sukha chara dyava plz margadarshan karave
Manthan Gade
ऑगस्ट 12, 2017 at 1:30 pmसर मला 10 गाईंचा मुक्त गोठा करायचा आहे तरी कृपया आपण मला गोठ्यासाठी लागणारी जागा, आहार व्यवस्थापन ,चारा लागवडीसाठी लागणारे क्षेत्र इ माहिती द्यावी।आणि आपले प्रशिक्षण असल्यास जरूर कळवावे।
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 13, 2017 at 3:25 amसर,
तुमची माहिती येथे क्लिक करून भरा .
तुम्हाला कॉल येईल.
तुषार शिंदे
ऑगस्ट 11, 2017 at 8:27 amम्हशीं साठीपण आपण मुक्त संचार गोठा करू शकतो का????
lookintothematrix
ऑगस्ट 11, 2017 at 2:07 pmहो तुषार जी, नक्कीच करू शकतो
पुढील लिंक वर म्हशीच्या मुक्त गोठ्याचे फोटो देखील तुम्ही पाहू शकता. –> येथे क्लिक करा
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 11, 2017 at 2:08 pmतुषार जी, नक्कीच म्हशीचा मुक्त गोठा करू शकता.
तुम्ही म्हशीच्या मुक्त गोठ्याचे फोटो पुढील लिंक वर पाहू शकता –> येथे क्लिक करा
अशोक शिंदे.
ऑगस्ट 4, 2017 at 11:07 amनमस्कार सर तुमचे कार्य कौतुकास्पद आहे.मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमचे शिबिर पण ठेवू इच्छीतो. आता माझा गोट फार्मचे बांधकाम होवून पोल्ट्री फार्म चे बांधकाम चालू आहे.तसेच मला गोपालन पण करावयाचे आहे. त्याबद्दल तुम्ही दिलेली माहीती आम्हाला मार्गदर्शक ठरेल. आपले अभिनंदन …. सर.
Akshay chiparge
जुलै 20, 2017 at 3:22 pmचागंली गाय कसी निवडावी
Mahesh Tukaram Bansode
जुलै 16, 2017 at 5:48 pmसर
मी महेश बनसोडे, सोलापूर…
माझी जर्सी गाय आहे.ती आज व्यायली आहे….तर तिला काय चारल्याने दुधाला वाढ होईल?????
Pranit Yawalikar
जुलै 7, 2017 at 7:04 pmPlease guide me to start a dairy farm with minimum 10 cows.
योगेश तांगतोडे
जून 22, 2017 at 9:16 pmसर मला दूध धंदा सुरू करायचा आहे त्याची सुरुवात कशी करू आणि गोठ्याची निर्मिती कशी करू तसेच मार्केटिंग काशी करू
Vishal Badhe
जून 15, 2017 at 6:33 pmReally appreciate and thank yoy for sharing best information. Could you please guide me to where and how approach banks for loan or any subsidy.
Regards,
Vishal Badhe
9975162124
अभिजीत स्वामी
जून 5, 2017 at 4:18 pmसर मी कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी असून माझ्याकडे फक्त 15 गुन्ठे जमीन आहे आणि मला एवढ्या जागेत च मुक्त गोठा आणि चारा याची सोय करावी लागणार आहे जर मी पाच गायीं साठी मुक्त गोठा करायचा ठरवला तर एवढी जमीन पुरेशी होईल का ?
Avdhut
मे 31, 2017 at 1:50 pmsir kahi government economical help bhatay ka
Arjun kadam
मे 28, 2017 at 3:38 amSir,
Mukt gothyat Gaila chara divsatun kiti time dyaycha Ani kiti dyaycha Ani rubber mat gai sathi faydeshir aahet ka sir plz
Ajay Kale
मे 27, 2017 at 10:56 amSir Im Ajay Kale From Narayangaon Pune.
Plz give me the ur Contact.
Vishal chandgude
मे 16, 2017 at 6:14 amसर मला मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करायचे आहे तर ते कमी भांडवली खर्च करून कसे होईल याची माहिती द्यावी
….
Shailesh Madane
मे 22, 2017 at 2:25 amनमस्कार तुम्ही मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन सहज करू शकता, त्यासाठी एका शेळीला किती जागा असावी, गोठ्यातील कप्यांचे नियोजन कसे असावे, लहान करडे, मोठी बॊकडे, गाभण शेळ्या,यांच्या जागा कुठे असाव्यात, तसेच हे सर्व कमीतकमी खर्चात कसे करावे यासंदर्भात एक लेख लवकरच वाचकांसाठी पॉवरगोठा वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात येईल. आपण आपला email id नाव नोंदवा येथे नमूद करा.
दशरथ पाटील
एप्रिल 22, 2017 at 3:03 amनमस्कार सर,
मी गिर गायींचा मुक्त गोठा तयार केला आहे. मी आपला मुरघास बनवण्याचा व्हिडिओ पाहिला आहे. त्यानुसार 50 किलो च्या बॅग भरण्याचे नियोजन करत आहे. यासाठी लागणाऱ्या बॅग कुठे उपलब्ध होतील याची माहिती कृपया मिळावी.
विजया सावंत
एप्रिल 22, 2017 at 9:56 amदशरथभाऊ, तुम्ही गव्हान, गोमुत्र, चारा साठविण्याची काय सोय केली आहे त्याचे फोटो पाठविता का?
rahul
ऑगस्ट 28, 2017 at 11:59 ampatilsaheb tumacha mobile no milel kay?
विजया सावंत
एप्रिल 21, 2017 at 9:25 amगीर गाईसाठी गव्हाणाची आणि पाण्याच्या हौदाची उंची किती असावी लागते?
विजया सावंत
एप्रिल 21, 2017 at 9:20 amमुक्त गोठ्यामध्ये गोमुत्र कसे गोळा करायचे? दुध काढताना गाय बांधायची लागते ना? त्या ठिकाणी कोबा करायचा.का?
मयूर खरात
एप्रिल 13, 2017 at 1:44 pmडाॅ.साहेब नमस्कार.
कुडूॅवाडी कडे आल्यास आमच्या गोठ्याकडे या.मस्तपैकी तुमच्या आवडीचे कोंबडीचे जेवण करु आम्हाला तुमच्या मागॅदशॅनाची गरज आहे.
आपला विश्वासु
मयुर खरात.
प्रवीण भामरे.धुळे.
एप्रिल 7, 2017 at 6:33 pmबेस्ट माहिती.
शिवाजी नखाते
मार्च 29, 2017 at 5:22 amमुक्त गोठा भधल माहिती मिळाली थांस
धनेवाद
समर्थ
मार्च 24, 2017 at 5:37 pmसर, परंपरीक ते मुक्त संचार गोठा असा बदल मी माझ्या शेतामध्ये केला आहे …वेबसाईट वरची सर्व माहिती मी वाचली आहे..सध्या माझ्याकडे 14 पंढरपुरी म्हशी आहेत…मी अजून 9 म्हशी घेत आहे,3 एकर मध्ये हत्तीगवत लावला आहे, 2 एकर मका केली आहे,आधी मी सरळ मका,ऊस तोडून खायला टाकत होतो यामध्ये काही बदल व आधुनिकता करू ?
SRIDHAR SHANKAR SHINDE
मार्च 4, 2017 at 11:14 amसर मुक्तगोठा पद्धती ची training किंवा संपूर्ण नियोजन कस करायचं , म्हणजे किती वेळ गोठ्यात ठेवायचं , खाद्य किती प्रमाणात द्यायचं, निगा कशी राखायची या विषयी माहिती Dyavi..
Mla Mail Varti Send Krana Plz ..
SRIDHAR SHANKAR SHINDE
मार्च 1, 2017 at 9:12 amSir Mla Navin Survat Kraychi Aahe MUKT SANCHAR PADHTISATI Tr Mla Kiti Guntavnuk Keli Pahije Aani Mla 7 HF Gai Pasun Survat Kraychi Aahe
Mi Kasa Gotha Bandhava Yachipn Mahiti Havi Aahe
dipak
फेब्रुवारी 28, 2017 at 5:38 pmvary nice
Pradeep Shinde
फेब्रुवारी 22, 2017 at 1:01 pmडॉक्टर साहेब नमस्कार
मुक्त गोठा मध्ये तापमान वाढी पासुन गाय कशा वाचवाव्यात कृपया माहिती सांगावी.
नमस्कार
चेतन देवतळे
फेब्रुवारी 15, 2017 at 12:31 pmसर मी चंद्रपूर जिल्ह्यात राहतो.मला मुक्त संचार गोठा करायचाय आणि गाई ठेवायच्याय.कोणत्या ठेऊ आणि नियोजन कसे करु कृपया माहिती द्या
सर मला जातिवंत आणि जास्त दूध उतपादन देणाऱ्या गायी ग्याच्या आहेत. कुठे मिळतील.याची सुद्धा माहिती द्या
पॉवरगोठा टीम
फेब्रुवारी 19, 2017 at 2:08 pmमुक्त संचार गोठ्याच्या नियोजनासाठी आमचा लेख वाचा –> येथे क्लिक करा
मुक्त गोठ्यामध्ये तुम्ही देशी किंवा संकरित गाई तसेच म्हैशी सुद्धा ठेवू शकता.
कृत्रिम रेतन करून आपल्याकडेच जातिवंत संकरित गाय तयार करणे हे केव्हाही फायदेशीर ठरते.
शक्यतो गाई ओळखीच्या गोठ्यामधून खरेदी कराव्यात.
hemant
फेब्रुवारी 13, 2017 at 4:33 pmwhat a way to give professional kind of information to peoples who are interested in Dairy farming. people like me who are new to dairy farming. Powergotha will work as a dairy farming specialist. Team you are doing very nice work which will help persons like me to reach their Dream dairy business
Powergotha Team
फेब्रुवारी 14, 2017 at 8:26 amThank you sir,
Your words of appreciation mean a lot to us.
Motivating us further to work for the betterment of Maharashtrian dairy farmers.
Tukaram Binnar
फेब्रुवारी 9, 2017 at 2:22 pmसर मी नाशिक जिल्ह्यात राहतो.मला मुक्त संचार गोठा करायचाय आणि गाई ठेवायच्याय.कोणत्या ठेऊ आणि नियोजन कसे करु कृपया माहिती द्या
पॉवरगोठा टीम
फेब्रुवारी 19, 2017 at 2:21 pmभरपूर दूध उत्पादन वाढीसाठी संकरित गाईंचा सांभाळ करणे फायद्याचे ठरेल. यामध्ये HF Holstein Frisian गाई, जर्सी गाई आपण सांभाळू शकतो.
Er. B.M.Veer
फेब्रुवारी 8, 2017 at 6:01 pmSir.Training chi mahiti dya.training chi tarikh dya.
प्रसाद चव्हाण
फेब्रुवारी 8, 2017 at 1:14 pmसर माझी 1 एकर शेती असून मला मुक्त गोठा तयार करायचा आहे तरी मला 10 म्हशी साठी किती गुंठे वैरण करावी लागेल या म्हशींचे संगोपन कसे करावे याबद्दल माहिती द्यावी
Rohan Patil
फेब्रुवारी 6, 2017 at 10:34 amDear sir,
Mi nuktch engineering complete kele ahe pn mla job n krta, mukt sanchar Gotha nirmiti kraychi ahe tr sir mla guide krav aapn .
Ankin ek sir as bolalo jatay ki Panjab ani Haryana madhil murrah mhaisi aplya yete Maharashtra t jaast dudh Det nahi t, tr sir mla please sanga ki Kay reason ahe ani khrch mhaisi dudh kmi krtat kay .
सर मुक्तगोठा पद्धती ची training किंवा संपूर्ण नियोजन कस करायचं , म्हणजे किती वेळ गोठ्यात ठेवायचं , खाद्य किती प्रमाणात द्यायचं, निगा कशी राखायची या विषयी माहिती कुठं मिळेल .
3G
जानेवारी 28, 2017 at 8:50 amसाधारणपने 10गायींसाठी शेडसाठी व मोकळी जागा किती बाय किती आवश्यक आहे.
Shailesh Madane
फेब्रुवारी 2, 2017 at 12:43 pmनमस्कार , मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये सर्वसाधारणपणे एका गायींसाठी 200 ते 250 sq ft जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार 10 गायीसाठी 2000 ते 2500 sq ft जागा लागेल. यामध्ये उन्हापासून व पावसापासून संरक्षणासाठी गायीला गरजे एवढी कृत्रिम सावली आपण शेडच्या रुपाने किंवा इतर माध्यमातून देऊ शकता.जेणेकरून पावसाच्या दिवसात गायीला बसण्यासाठी कोरडी जागा मिळेल. प्रति गाय कमीत कमी 30 ते 40sq ft जागा सावलीसाठी देण्याचा प्रयत्न करावा . या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनानुसार केल्यास फायद्याचे ठरते.
Yuvraj Patil
जानेवारी 22, 2017 at 10:18 amKhup chan mahiti aahe
Shailesh Madane
फेब्रुवारी 2, 2017 at 12:56 pmधन्यवाद
Pradeep Shinde
जुलै 2, 2017 at 11:39 amडॉक्टर साहेब नमस्कार
माझ्याकडे 12HF गाय आहेत बाजारात अनेक खनिज मिश्रण आहेत मी दोन वर्षापासून खनिज मिश्रण वापरतोय परंतु योग्य फरक दिसत नाही तर कुठले मिनरल मिश्रण वापरावे ते सांगावे
नमस्कार
Pradeep Shinde
जानेवारी 21, 2017 at 2:19 pmडॉक्टर साहेब
नमस्कार
गाय लाथ मारत असेल तर चाप लावला तर गायला ञास होईल का
कृपया माहिती सांगावी
नमस्कार
Sharad Bagate
जानेवारी 19, 2017 at 5:45 amKhup chan
santosh
जानेवारी 17, 2017 at 1:19 pmsupper
विनोद सपकाळ, कराड, सातारा
जानेवारी 17, 2017 at 11:08 amमाहिती खूपच सुंदर आहे समजण्यास ही सोपी आहे . मस्त
Vaibhav
जानेवारी 17, 2017 at 9:58 amमुरघास हा मका वापरून तयार करता येतो पण अजून काही पिके आहेत का मुरघास तयार करण्यासाठी ?
Aniket
जानेवारी 19, 2019 at 12:07 pmKonta hi hirwa character chalto,mix chara pan
chandrakant
जानेवारी 16, 2017 at 11:18 amSir
mazya kade buffalo 7 & HF Cow 1& kalwadi 2 ahet tyachya sathi mala mukth gotha karayacha ahe &murghas pan karayacha ahe
shubham
जानेवारी 14, 2017 at 2:58 pmSir aamhala pure hf vasare pahijet ti aamhala kuthe miltil
siddharth patil
जानेवारी 14, 2017 at 5:38 amSir sadharan eka gai che divas bharache khane Kase asave sagal ka?
Mhanje kiti khdya; vairan;bharda;pani.vagere
Time teble.
Rohit
जानेवारी 12, 2017 at 11:41 pmReally appreciate and thank yoy for sharing best information. Could you please guide me to where and how approach banks for loan or any subsidy.
Regards,
Rohit Mahalankar
08446292471
Pradeep Shinde
जानेवारी 13, 2017 at 9:12 amफार छान माहिती आहे आपल्या माहितीने खुप फायदा झाला आभारी आहे
thanks
Sunil Jadhav
जानेवारी 12, 2017 at 10:17 amफार छान माहिती आहे
Pradeep Shinde
जानेवारी 9, 2017 at 1:45 pmनमस्कार साहेब
गायला रोजच्या रोज कँलशीयम देणे योग्य
आहे ?असेल तर किती ml देणे
अती कँलशीयम मुळे काही वाईट परिणाम होतात का? माहिती सांगावी.
Shailesh Madane
जानेवारी 11, 2017 at 2:29 pmनमस्कार, गायीच्या दुधातून कॅल्शिअम व त्याच बरोबर इतर महत्वाची सर्व खनिजतत्वे शरीराबाहेर पडत असतात. दूध निर्मिती होत असतात खनिजांची झालेली झीज भरून काढताना खुराकात ती देणे गरजेचे असते. गाय व्ययलानंतर पहिल्या महिन्यात दररोज कमीतकमी 50 ml कॅल्शिअम देणे महत्वाचे असते. त्यांनतर पुढील 5 ते 6 महिने महिन्यातून 10 दिवस तुम्ही कॅल्शिअम गायीला तिच्या खुराकात मिक्स करून देऊ शकता. अश्या प्रमाणात कॅल्शिअम दिल्यास दूध उत्पादनमध्ये सातत्य राहील.
Pradeep Shinde
जानेवारी 31, 2017 at 9:30 amडॉक्टर साहेब नमस्कार
माझ्याकडे एक महिना वेयायलेली गाय आहे दिवसाला 28 30 लीटर दूध देत परंतु खाध्य खात नसल्यामुळे दूधला कमी आली आहे आता फक्त 10 11 लीटर दूध देत आहे सर्व उपाय केले काही फायदा झाला नाही कृपया उपाय सांगावा
नमस्कार
समीर मोहिते
जानेवारी 8, 2017 at 10:08 amफार छान माहिती आहे
टीम पॉवरगोठा
जानेवारी 8, 2017 at 10:42 amधन्यवाद समीर
-पाॅवरगोठा टीम
siddhart patil
जानेवारी 6, 2017 at 3:34 pmSir Mi 10 Hf gai kelya asun Maja muktA gota pan aahe
Pan tyachya khdya kadun Mala parvadena jhalay gharchi sheti pan aahe pan bhusa aani pend cha Kharach karun mhanave Tasa fhayda urat Nahi…
siddhart patil
जानेवारी 6, 2017 at 3:36 pmPlease.. .reply
Powergotha Team
जानेवारी 8, 2017 at 1:43 amनमस्कार पाटील सर,
तुम्ही मुक्त गाईंचा गोठा केला आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. पॉवरगोठा दूध धंद्याला फायद्यात आणण्यासाठी ज्या ३-४ गोष्टी शेतकऱ्यांच्या मनात कोरण्याचा प्रयत्न करत आहे त्यातील मुख्य कृती तुम्ही अगोदरच केली आहे, त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
दूध धंदा तोट्यात असण्याची अनेक कारणे असू शकतात. गाईच्या चाऱ्याचा खर्च ना परवडणे हे त्यातील एक कारण असू शकते. त्यावर उपाय म्हणजे गाईला वर्षभर एकसारख्या क्वालिटी चा हिरवा चारा उपलब्ध करणे. आता हे करण्यासाठी तुम्हांला मुरघास बनवायला लागेल. पावसाळा असताना हिरवा चारा जेव्हा मुबलक उपलब्ध असतो तेव्हा त्याचा मुरघास बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवावा. त्यामुळे तुमचा वैरणीवरचा खर्च आटोक्यात राहतो. तसेच मुरघास एक उच्च दर्जाचे खाद्य असल्याने इतर खाद्यावरचा खर्च कमी होतो.
वर्षभर एकसारख्या दर्जाचा चारा मिळाल्यामुळे गाईंचे आरोग्य सुधारून त्यांच्या दूध देण्याच्या प्रमाणात वाढ होते आणि दूध धंदा फायद्यात यायला मदत होते.
मुरघास निर्मितीचा लेख येथे वाचा मुरघास निर्मिती . मुरघासाचे अनेक प्रकार आहेत, तुम्ही बॅगेतील मुरघास बनवून सुरुवात करू शकता.
मुरघास निर्मितीचा एक प्रकार व्हॅक्युम मशीन ने मुरघास बनवणेचा व्हिडीओ येथे पहा मुरघास व्हिडीओ
याव्यतिरिक्त गोठ्याचे आरोग्य चांगले ठेवणे, जातिवंत गाईची आपल्या गोठ्यात च पैदास करणे, गाईंचे आरोग्य चांगले ठेवणे, जंतनाशक वापरणे, इत्यादी गोष्टींची सर्वंकष काळजी घेतली, तर तुमचा धंदा नफ्यात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
siddharth patil
जानेवारी 14, 2017 at 5:30 amThanku sir
Parat kahi madat lagli tar SMS karin
Sir ha Maja no.
7709957937
uday
जानेवारी 6, 2017 at 8:28 amNice information
sandip kurane
डिसेंबर 30, 2016 at 9:02 amsir mala Gaincha khadyacha vela kalu shaktil ka manje kadi aani kiti dyaych
Nitin Bhos
डिसेंबर 28, 2016 at 10:22 amThank’s
drrohinigaikwad
डिसेंबर 23, 2016 at 6:17 amvery nice information
Shailesh Madane
डिसेंबर 24, 2016 at 5:44 pmधन्यवाद!! लवकरच संपर्क करू
किशोर शंकर
डिसेंबर 22, 2016 at 4:16 amSir मला होस्टेन जातीच्या गाई पालन करायचं आहे. सद्धया माझ्या कडे 3 जर्सी गायि आहेत. त्यांच पारंपरिक पद्धतीने संगोपन सुरु आहे. मी भंडारा जिल्ह्यात राहतो , आमच्या कडे उन्हाड्यात temp 46 पर्यंत जात . तर होस्टेन गायी मुक्त गोठा पद्धती मध्ये जमणार काय . मी एका vet doctor ला विचारले तर ते म्हणत आहेत कि गोठ्यात कुलर लावूनच जमेल संगोपन होऊ शकतं . Please मार्गदर्शन करा.
Shailesh Madane
डिसेंबर 24, 2016 at 5:48 pmतुम्ही नक्कीच परदेशी जातीच्या गाई सांभाळू शकता. तुमच्या मुक्त गोठ्यात झाडाची पुरेशी सावली उपलब्ध करून द्या. तसेच शेड ची देखील सावली द्या. शेड गाईच्या उंची पासून ४-५ फूट वर असावे (10-11 फूट उंच शेड ). पत्र्याचे शेड असेल तर त्याला वरून पांढरा रंग मारून घ्यावा. या सर्व उपायांनी गाईला गारवा बनून राहील.
किशोर शंकर
डिसेंबर 26, 2016 at 4:54 pmThank you sir , सर मुक्तगोठा पद्धती ची training किंवा संपूर्ण नियोजन कस करायचं , म्हणजे किती वेळ गोठ्यात ठेवायचं , खाद्य किती प्रमाणात द्यायचं, निगा कशी राखायची या विषयी माहिती कुठं मिळेल .
Shailesh Madane
डिसेंबर 28, 2016 at 10:47 amतुमच्या ईमेल वर माहिती पाठविली आहे. वाचून पहा.
सचिन पवार
जानेवारी 6, 2017 at 9:47 amकूपया सर माझा पण ईमेल वर हि माहिती पाठवली तर बरे होईल
Powergotha Team
जानेवारी 8, 2017 at 2:02 amतुम्हाला माहिती देण्यास आनंद होतो कि, डॉ शैलेश मदने यांचे ट्रेनिंग लेक्चर महाराष्ट्र भर होत असतात. ते पूर्णतः मोफत असतात. त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
यापलीकडे पॉवरगोठा.कॉम स्वतः एक ट्रेनिंग कार्यक्रम करणार आहे. त्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतला जाईल. गोठा कसा बांधावा, गाईंना किती मोकळे सोडावे, कप्पे कसे करावेत, लसीकरण, मुरघास कसा बनवावा, टॅगिंग कसे करावे, नोंदवही कशी लिहावी, आपला जमा खर्च लिहून नफा कसा मोजावा, तसेच धंदा करताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी बाबी शिकविण्यात येतील.
त्यासाठी दूध-उत्पादक शेतकरी आणि हौशी विद्यार्थी यांची माहिती आम्ही गोळा करत आहोत, त्या माहिती वरून आम्हाला योग्य ट्रेनिंग प्रोग्रॅम बनविणे शक्य होईल. तुम्ही तुमच्या बद्दल ची माहिती येथे फॉर्म भरून कळवावी. येथे फॉर्म भरून नाव नोंदवा
तुमचे नाव, वय, तुमचे उत्पन्न, किती गाई आहेत, किती वर्षांपासून दूध धंदा करत आहात , शेतजमीन किती, इत्यादी माहिती पाठविल्यास आम्हाला मदत होईल.
धन्यवाद
पॉवरगोठा टीम
Samadhan Dhondiram Nehatrao
जून 28, 2017 at 10:18 amसर मला पण पाठवा
Samadhan Dhondiram Nehatrao
जून 28, 2017 at 10:19 amसर मला पण माहीती पाठवा
Dattatray Tike
डिसेंबर 17, 2016 at 7:25 amसर मला जातिवंत आणि जास्त दूध उतपादन देणाऱ्या गायी ग्याच्या आहेत. कुठे मिळतील.
Powergotha Team
जानेवारी 8, 2017 at 2:20 amनमस्कार सर,
आपल्याला जातिवंत आणि भरपूर दूध देणाऱ्या गाई विकत हव्या आहेत.
परंतु वस्तुस्थिती ही आहे की, जास्त दूध देणाऱ्या जातिवंत गाई कोणीही विकत नाही.
विक्रीस आलेल्या गाई काहीतरी अडचण, कमतरता असलेल्या असतात. एखादी गाय परवडेना झाली, दुधाला कमी आली की लोक विकायला काढतात असा अनुभव आहे.
यावर उपाय म्हणजे जातिवंत गाय आपण आपल्या गोठ्यातच स्वतः तयार करणे.
जातिवंत गाय तयार करताना नोंदी ठेवणे, उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य वापरणे महत्त्वाचे आहे. तसेच इन-ब्रीडिंग (in-breeding) होऊ देता कामा नये. त्यासाठी एकाच वळूचे वीर्य गाय आणि तिच्या खालच्या पिढी ला वापरू नये.
गाईचे (कालवडीचे) वजन कमीत कमी २७५ ते ३०० किलो असावे.
जातिवंत गाय पैदास विषयी लेख आपण येथे वाचू शकता. जातिवंत गाय पैदास .
तुम्हाला विकत च घ्यायची असेल तर, बाजारात खरेदी साठी न जाता एखाद्या शेतकऱ्याच्या घरातून खात्री करून मग च घ्यावी.
-पॉवरगोठा टीम
दत्तात्रय कोंढारे
ऑक्टोबर 24, 2017 at 10:11 pmएकाच गाईला एक वळू किती वेळेस कुर्तीम रेतन करण्यासाठी वापरवा म्हणजे 1 वेता पर्यंत की 2 वेता पर्यत की दर 3 वर्षाला बदली करावा
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 25, 2017 at 1:36 amगाईच्या खालच्या पिढीला (म्हणजे मुलगी, नात, इत्यादिसाठी) तो वळु वापरू नये.
एका गाईला वापरू शकता. कालवडी चांगल्या झाल्या तर अनेक वेळा वापरा.
तानाजी तरंगे
जुलै 29, 2017 at 10:57 amलोणी. जिल्हा अहमदनगर
Rupesh
डिसेंबर 14, 2016 at 3:18 pmVery good information sir ..
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 19, 2016 at 1:26 amThank you for appreciation and encouragement.
प्रीतम नलावडे
डिसेंबर 2, 2016 at 5:08 pmउत्कृष्ट माहिती। साध्या आणि सोप्प्या भाषेत योग्य ते मुद्दे अगदी छान मांडले आहेत। याचा शेतकऱ्यांना नक्कीच खुप फायदा होईल।
मुक्त संचार पद्धत अवलम्बत असताना धार काढ़ने साठि गायी कश्या प्रकारे हाताळाव्यात। मिल्किंग पार्लर या संदर्भात अधिक माहिती हवि आहे।
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 2, 2016 at 5:14 pmप्रीतम
प्रतिसादाबद्दल आभार
लवकरच मिल्कींग मशीन बद्दल लेख प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन आहे.
Wasim inamdar
नोव्हेंबर 16, 2016 at 3:51 pmसर मी 2 एकर 12 माही बागायत जमीन भाडे तत्त्वावर शेळी पालनासाठी घेतलीआहे .त्यामध्ये मका ज्वारी काडीघास मेथीघास चारा साठी लावला आहे. तर मी दुध व्यवसाय करू की शेळी पालन करू. अधिक उत्पन्न व नफा कशा मध्ये आहे
कळावे
आपला शिष्य
Shailesh Madane
नोव्हेंबर 18, 2016 at 10:33 amनमस्कार वसीम , आपण शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय करताना सर्व नियोजनपूर्वक केले तर दोन्हीही व्यवसाय फायदेशीर आहेत . तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडतो हे देखील महत्वाचे आहे, तुम्ही शेळीपालन करण्यासाठी भाड्याने जमीन घेतली आहे तर कोणत्याही कारणाने तुमचे उद्दिष्ट बदलू नका. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागवड केली आहे. याचा फायदा तुम्हाला शेळीपालन करताना नक्कीच होईल, शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा आवडतो. आता शेळीपालन करताना ज्या गोष्टी तुम्हाला शिकणे गरजेचे आहे त्यासाठी पॉवरगोठा.कॉम आपल्याला नेहमी सहकार्य करेल. आमच्या शेळीपालन या सदरात तुम्हाला शेळीपालन विषयीची महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कोणत्याही शंकेचे निरसन तुम्ही या कॉमेंट्स सदरात प्रश्न विचारून करू शकता
Akash waghmare
एप्रिल 8, 2017 at 6:03 amSir mahithi chagali ahe pan
Maza 1prashan ahe
20 gai sati kiti gunte jameen yug rahil mukat sanchar gotesathi
Shilpa Behere
नोव्हेंबर 9, 2016 at 5:31 pmडॉक्टर मदने,
अतिशय माहितीपूर्ण लेख आहे | कमी खर्चात क्वालिटी दूध |
Even the photos are quite aptly depicting the overall good health of animals and the simplicity of the loose housing system which needs to be adopted by farmers for reducing costs and increasing returns at individual farmer level through milk business.
© Powergotha.com| पॉवरगोठा.कॉम | 2020