पोल्ट्री-कोंबडीपालन लाखो रुपये मिळवून देणारे यशस्वी कडकनाथ कोंबडीपालन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पासून ३० किलोमीटर अंतरावरील खळवे गाव येथे शिवनेरी ऍग्रो फार्म चे मालक श्री स्वप्निल वाघमारे (रा. अकलूज) यांनी यशस्वीरीत्या मध्य प्रदेश मधील कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्म चा हा व्हिडीओ आणि -डॉ. शैलेश मदने यांच्या सोबतची मुलाखत. ७०० हुन अधिक कोंबड्या मुक्त गोठ्या मध्ये आनंदाने नांदत असल्याचे आपण पाहू शकता.
पुढे वाचा
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत – बॅगेतील मुरघास निर्मिती. चिकातील मक्यापासून अतिउत्तम मुरघास छोट्या छोट्या ४०-४५ किलो च्या बॅगेत भरला जातोय. हायड्रोलिक मशीन ने व्हॅकुमिंग करून सायलेज बॅग मधील हवा काढली जाते. ४५ दिवसांनी चारा तयार होतो आणि बॅग उघडली कि ५० दिवसात तो संपवावा लागतो. बॅग लहान असल्याने एकट्या माणसाला किंवा स्त्रीला सुद्धा ती उचलता येते. ६-८ रुपये प्रति किलोंनी हा चारा विकला जातो. श्री शैलेश राचकर, रा विझोरी, माळशिरस, सोलापूर यांच्या सहयोगाने आणि डॉ शैलेश मदने यांच्या समवेत पॉवरगोठा.कॉम.
पुढे वाचा