दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?
दूध-धंदा करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुधाचा उत्पादकाला मिळणारा दर . दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात. जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि उदाहरणार्थ 2018 मध्ये तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर खाली होते. शासन निर्णयाप्रमाणे दर लागू झाले नसल्यास 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत होता. २०२० मध्ये ही लॉक डाऊन संकटामुळे काही ठिकाणी दर कमी झाले आहेत. मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय दूध-धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की. लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर […]