स्मार्ट दुग्धव्यवसाय – दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या । Dairy Farming in Maharashtra

दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या (tips for Success Dairy Farming in Maharashtra)
#काय आहे गुपित दुग्ध व्यवसायातील यशाचे?
स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात.
जरा विचार करा – मेहनतीने कमविलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामी होणे, एखादी लस विसरल्याने मरतुक होणे, किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते भांडवलाचे पैसे अक्षरशः महिन्या-२ महिन्यांत फुंकले जातात.
दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते.
असो, दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या आहेत.
#१ प्रजनन नियोजन – Pregnancy planning
तुमच्या गोठ्यात प्रत्येक वेळी दूध उत्पादन समसमान असले पाहिजे. त्यासाठी गाई व्यायन्याचे नियोजन तुम्ही करू शकता.
म्हणजे माझ्या गोठ्यात ९ गाई असतील तर दर ४ महिन्यांनी त्यातील ३ गाई वेल्या पाहिजेत. म्हणजे वर्षभर दूध अंदाजे एकसमान राहील (अर्थात सर्व गाईंची दूध देण्याची क्षमता पण एक सारखी असावी).
नवीन गोठा सुरु करताना दर ४ महिने नंतर ३३% गाई (ज्या एक सारख्या गाभण अवस्थेत आहेत) विकत आणू शकतो.

Jativant Gaai – Dairy Farming in Maharashtra Marathi
#२ चारा व्यवस्थापन – Fodder Management
कुठल्याही वेळी, तुमच्या कडे पुढील वर्षभर पुरेल इतका चारा असला पाहिजे. कोरडा चारा साठवून ठेवता येतो.
हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास करण्याचा पर्याय आहे.
पहिल्या पावसानंतर येणाऱ्या पिकाचा मुरघास करून पुढील वर्षाच्या पूर्ण चाऱ्याचे नियोजन करणे म्हणजेच स्मार्ट दुग्धव्यवसाय
मुरघास निर्मिती बद्दल येथे वाचा

मुरघास – Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti
#३ कमी खर्च कमी कष्ट नियोजन (Low cost Dairy farming )
खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ कामगार किंवा गडी मुक्त गोठ्यामध्ये जास्त जनावरे सांभाळू शकतो. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. ठराविक संख्ये नंतर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन – दूध काढणी यंत्राचा उपयोग करावा.

Mukta Sanchar Gotha – Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti
#४ स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी
स्वच्छ दूध निर्मिती साठी कासेची काळजी घेऊन प्रि-डीप, पोस्ट-डीप वापरावे.
वेळच्या वेळी CMT सीएमटी किट वापरून दगडी चाचणी करावी, आणि सुप्त अवस्थेतील दगडी ओळखून अधिक भयंकर दगडी ला आळा घालावा.

सी एम टी चाचणी – Dairy Farming in Maharashtra
वेळच्या वेळी लसीकरण, डिवर्मिंग (जंतनाशक औषध) आणि बायो सिक्युरिटी स्प्रे मारून घ्यावा.
गाई बसण्याची जागा, आणि गाईची कास कोरडी असावी. मुक्त गोठ्यामध्ये गाई बसण्याची जागा कोरडी ठेवणे सहज शक्य होते.
#५ नोंदवही – धंद्याचा हिशोब
तुम्हाला गणित येत नसले तरी इथे तक्रार करायची नाही. अधिक प्रगती आणि अधिक व्यवसाय वाढीसाठी दूध धंद्याच्या शक्य तितक्या नोंदी काटेकोर पणे वेळच्या वेळी ठेवाव्यात.

दूध धंद्याचा हिशोब – Dairy Farming in Maharashtra
MBA म्हणजे उद्योगाच्या व्यवस्थापकीय शिक्षण मध्ये लाखो रुपये भरून विद्यार्थी धंदा चालवण्याचे म्हणजे व्यवस्थापन करण्याचे शिक्षण घेतात. त्यात वेळच्या वेळी निरनिराळे निर्णय कसे घ्यावेत, त्यासाठी काय काय माहिती – डेटा data लागेल याचा प्रामुख्याने समावेश असतो.
तुम्ही जर व्यवसाय करताय तर त्यात वेळोवेळी, नवीन गाय आणणे, एखादी गाय विकणे, चाऱ्याचे नियोजन, कामगारांचे नियोजन, साधने हत्यारे आदींचे नियोजन, प्रजनन नियोजन, गोठा वाढविणे इत्यादी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील – अर्थात व्यवसायात वाढ करून प्रगती करायची असेल तरच !
वर्षानुवर्षे नियमित नोंदी केल्यास धंदा कुठे होता, कुठे आहे, आणि कुठे नेऊ शकतो याचा अचूक अंदाज मालकाला येतो.
मग हे करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती लिहून ठेवणे, नोंदी करणे महत्वाचे आहे. नोंदी तुम्ही वहीवर, कॉम्पुटर वर किंवा छापील नोंदवही मध्ये करू शकता.
आणि सर्वाधिक सोप्या पद्धतीने सर्व नोंदी करण्यासाठी पॉवरगोठा अँड्रॉइड ॲप वापरा.
सोप्या मराठी भाषेत दुग्धव्यवसायातील सर्व किचकट नोंदी आपल्या मोबाईल मधून दररोज घरबसल्या करा.

दुग्ध-व्यवसाय अँप – Dairy Farming in Maharashtra
जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Salim Patel
जुलै 9, 2020 at 11:38 amI am also looking forward to start Dairy farming in Latur Maharashtra by this year itself. Need your expertise & consultancy for same.
Salim Patel
+919867580376
[email protected]
sandip ghadge
जुलै 7, 2020 at 4:59 pmपाच ही नियम अगदी योग्य आहेत याशिवाय दूध व्यवसाय गाईचे संगोपन होऊच शकत नाही. वासरांचे संगोपन कशे करायचे त्या साठी कोणता चारा खुराक द्याव. भाकड अवसतेथ आणि गाभण अवसतेथ कोणता खुराक द्यावं याची महती द्यावी.धन्यवाद…
Patkar
जुलै 7, 2020 at 10:45 amKarvadi gab rahan nahit
Malhari japkar
जुलै 7, 2020 at 10:10 amदगड़ी निट कशी करायची सांगा ना
अमच्या गाई ला जालिए
Ajay Vishnu Jadhav
जुलै 7, 2020 at 6:46 amI am interested for diary fram new project,
Plz help for Nabard yojna
Send this details my mail I’d is [email protected]
Ajay Vishnu Jadhav
जुलै 7, 2020 at 6:45 amI am interested for diary fram new project,
Plz help for Nabard yojna
Send this details my mail I’d
अमोल शेळके
जुलै 7, 2020 at 3:38 amदुग्ध वेवसायासाठी जातिवंत कालवडी -गायी हव्यात.
असेल तर please कळवा 7768891559(जी )संभाजीनगर ता. कन्नड
Bhausaheb Kapadnis
जुलै 7, 2020 at 3:33 amमला दुधाचा धंदा चालू करायचा आहे
ओंकार वाळुजकर
मे 13, 2020 at 4:04 pmनमस्कार पाॅवर गोठा टिम मि एक दुध उत्पादक आसुण माझा ३० गाईंचा गोठा आहे व मला पाॅवरगोठा हे ॲप हव आहे परंतु आपले ॲप हे फक्त ॲंडराॅईड युजर साठी आहे व माझ्याकडे i phone आसल्या कारणाने मला हे ॲप वापरता येत नाही आपन लवकरच i phone साठी हे ॲप उपलब्ध करुण द्यावे हि विनंती
Nikhil amane
मे 13, 2020 at 5:39 amSir mi ek engineer ahe pan mi dudhacha vavsay krto 4 year zale mla proper niyojan Ani changya jatichya cow and buffalo chi mahiti havi
Abhinandan herwade
मे 12, 2020 at 10:52 amI am interested for diary fram new project,
Plz help for Nabard yojna
Send this details my mail I’d
[email protected]
सचिन वालचंद सस्ते
मे 11, 2020 at 7:51 pmतूमचे पाच नियम सव॔ खरे आहेत. पन आपल्या महाराष्ट्रात मध्ये दूधाचा भाव आजच्या घडीला फक्त वीस रुपये आहे. मग मला सांगा वीस रूपये मध्ये प्रगतशील दुग्ध व्यवसाय कसा करायचा. विचार करण्या सारखी गोष्ट.
Siddheshwar zode
मे 11, 2020 at 4:31 pmAmhala hya dnyanachi kup garaj aye
Prashant prakash jadhav
मे 11, 2020 at 3:58 pmI am interested milk farming
To please guide information
Bhujbal sagar ashok
मे 11, 2020 at 1:03 pmCan you make all the information in pdf
Pratapsingh
मे 11, 2020 at 9:17 amVery nice business minded information..
Ritesh santosh chaudhari
मे 11, 2020 at 8:44 amNice information
Anil Kawalagaonkar
मे 11, 2020 at 8:19 amनवीन वेवसाय चालू करण्या साठी चे मार्गदर्शन करा
सचिन बाजीराव चव्हाण
मे 11, 2020 at 5:46 amगाभण जनावर राहण्याच नियोजन होत नाही
Nitesh Patle
मे 13, 2020 at 1:35 pmVery nice information, I am also interested will start shortly. Pls send all information in to my mail
Sagar Nikam
मे 11, 2020 at 5:36 amVery Nice information shared
Avinash Amrutkar
मे 11, 2020 at 4:35 amMla kraych ahe dairy forming sir thodi mahiti havi ahe
Krantisinh A Jadhav
मे 11, 2020 at 4:28 amखूप महत्वाची माहिती मिलाली
Sagar garud
मे 11, 2020 at 2:58 amValuable information ahe khup chan mahiti det ahet shetkaryana
Balaji Annashaeb Baravker
मे 11, 2020 at 2:40 amएकच नंबर निर्णय आहे
Vipin Ramdas is
मे 11, 2020 at 1:07 amIf any where I can cal
Abhijeet Taware
मे 10, 2020 at 3:01 pmVery nice information Sir.
गणेश मोरे
मे 11, 2020 at 4:26 pmअतीशय सुंदर माहिती आहे पाठवत राहवे
Vinayak
मे 10, 2020 at 2:11 pmCan you make all the information in pdf ?