देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
काय नाव: ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
कशासाठी: (प्रकार)
दुहेरी वापर (डीपी – DP ड्युअल पर्पज )
ऑस्ट्रोलॉर्प ही जात तशी दुहेरी वापरची आहे परंतु योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादन सुद्धा देते.
कुठून आली : (उगम)
वर्ग: इंग्लिश
ऑस्ट्रोलॉर्प ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे, किंबहुना तेथील स्थानिक जातींचा संकर आहे. ऑस्ट्रोलॉर्प हे नाव ऑस्ट्रेलियन ओर्पिंगटन या शब्दांच्या पहिल्या अक्षरातून जन्मास आले. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी म्हणजे उत्कृष्ट दुहेरी वापराची जात असून सध्या भारतात चांगल्या पद्धतीने संगोपित केली जात आहे आणि अपेक्षे प्रमाणे उत्पादन देत आहे. उत्कृष्ट वजन वाढ आणि अंडी उत्पादन ह्यासाठी ऑस्ट्रोलॉर्प ही योग्य जात होय.
कुठे मिळेल : (उपलब्धता)
सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात अनेक वैयक्तिक तसेच शासकीय अंडी उबवनि केंद्रांमधे उपलब्ध.
कसे ओळखावे : (रंग रूप)
ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प या नावा प्रमानेच काळा रंग , पिसांवर नीळसर हिरव्या रंगाची छटा अतिशय तजेलदार आणि चमकदार पीस.
डोक्यावर लाल भड़क एकेरी तुरा, चोची खाली लाल बूंद गलोल. पाय पातळ पिवळ्या तपकिरी किंवा काळ्या रंगाचे. नरांमधे झुबकेदार शेपटी तसेच उंच आणि भारदस्त शरीर.
वजन वाढ
3 महिन्यात 1 ते 2 किलो वजन वाढ
वयस्क नर 2 ते 2.5 किलो
वयस्क मादी 1.5 ते 2 किलो
अंडी उत्पादन
अंडी संख्या
अंडी उत्पादन हे पूर्णतः व्यवस्थापनावर अवलंबून आहे. तरीही सरासरी 4 ते 5 अंडी प्रती आठवडा उत्पादन मिळू शकते.
एका अंडी चक्रात सरासरी 180 ते 220 अंडी उत्पादन मिळते.
अंड्यांचा आकार
ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी मध्यम ते भारी वजनाचे अंडे देते
या अंड्यांचे वजन सरासरी 45 ग्राम ते 50 ग्राम असते.
अंड्यांचा रंग
शुभ्र् पांढऱ्या किंवा गुलाबी पांढऱ्या किंवा भूऱ्या रंगाची अंडी देते
ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी खुडूक बसते का ?
क्वचित बसते…. शक्यतो नाही
ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी परसातील मुक्त पद्धतीने संगोपनासाठी योग्य आहे का ?
ऑस्ट्रोलॉर्प ही अतिशय चांगली रोगप्रतिकार क्षम जात असून कुठल्याही वातावरणात सहज टिकून रहाते योग्य लसीकरण आणि काळजी घेतल्यास परसात किंवा बंदिस्त संगोपन साठी अतिशय उपयुक्त.
यांचा स्वभाव
लाजाळु आणि मवाळ …
त्यामुळे संगोपन आणि हाताळणी अतिशय सोप्पी असते.
महिला लहान मुले अगदी आरामात सांभाळु शकतात.
एक दिवसाचे पिल्लू
ऑस्ट्रोलॉर्प जातीचे एक दिवसाचे पिल्लू हे खालील छायाचित्रा प्रमाणे दिसते, एक दिवसाची पिल्ल ही वरुन काळ्या रंगाची तर पोटाकडून पांढऱ्या रंगाची असतात. पिल्ल नेहमी सतर्क आणि चपळ असतात.

एक दिवसाचे पिल्लू: ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
एक महिन्याची पिल्ले
ऑस्ट्रोलॉर्प जातीची एक महिन्याची पिल्ले ही खालील छायाचित्रा प्रमाणे दिसतात, पिलांमध्ये नर मादी ओळखणे सोप्पे होते.

एक महिन्याचे पिल्लू: ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
वयस्क मादी
ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प जातीची वयस्क मादी खालील छायाचित्रा प्रमाणे दिसते

वयस्क मादी : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
वयस्क नर
ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प जातीचा वयस्क नर खालील छायाचित्रा प्रमाणे दिसतो.

वयस्क नर : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
इंद्रजीत घाटगे.
डिसेंबर 29, 2018 at 1:56 pmएका दिवसाच्या एका पिल्लाची किंमत काय आहे (ब्लॅक आस्ट्रेलॉर्प आणि RIR). आणि किती दिवसात पिल्ले मिळणार?
Reply please