उच्च प्रतीचं स्वच्छ दर्जेदार दूध-उत्पादन कसे करावे !
स्वच्छ दूध निर्मिती

नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Clean Milk Production – Dairy Farming in Maharashtra Marathi
दुध धंद्याला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी दुधाला उच्च दर मिळणे जरुरी आहे. अर्थशास्त्रातील सामान्य गणितानुसार, एखाद्या वस्तूला किंवा सेवेला उच्च किंमत मिळण्यासाठी त्याची ग्राहक वर्गामध्ये उच्च दर्जा किंवा दुर्मिळ वस्तू म्हणून ख्याती असली पाहिजे. दूध हि गोष्ट दुर्मिळ नाही. भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच दुधाला देखील दर मिळण्यासाठी उच्च आणि उत्तम प्रतीचे दर्जेदार दूध निर्मितीची खूप निकड आहे.
ही गरज ओळखून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये काही दुग्ध-पुरवठादार रुपये ७० ते ८०/- प्रती लिटर ने दूध विक्री करत आहेत. हाच किंवा असाच उच्च दार आपल्या सामान्य शेतकऱ्याला देखील का मिळू नये हा उहापोह पॉवरगोठा टीम वेबसाईट च्या स्थापनेपासून करीत आहे.
शेतकरी बांधवानो आणि पशुपालक मित्रांनो, दुधाचा उच्च दर्जा कमविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (standard operating procedure – SOP) म्हणजेच एक नियमित प्रचालन प्रणाली नुसार आपल्या गोठ्याची आणि जनावरांची निगा आणि व्यवस्था बघणे महत्त्वाचे आहे.
यामध्ये दोन गोष्टी ओघानेच येतात. ते म्हणजे १) जातिवंत (उच्च दर्जाची ) दूध उत्पादक जनावरे २) उच्च दर्जाचा गोठा
१) उच्च प्रतीची जातिवंत जनावरे – जातिवंत गोपैदास
जातिवंत (उच्च कुलीन ) किंवा भरपूर दूध देणारी अशी गाय तुम्हाला कोणी बाजारात विकताना दिसणार नाही. ती आपल्याला आपल्या गोठ्यामध्येच निर्माण करावी लागेल. त्यासाठी ब्रीडिंग प्रोसेस (रेतन प्रक्रिया) आपण नियंत्रित केली पाहिजे. जातिवंत गाय कशी निर्माण करायची ते आपण अगोदरच गोपैदास लेख या लेखामध्ये पहिले आहे.
त्या लेखातील सारांश सांगायचं म्हणाल तर – कालवडीला २७५ ते ३०० किलो वजन होईपर्यंत रेतन न करणे, उच्च प्रतीच्या बैलाचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करणे, सर्व गाईंना टॅगिंग (नंबर चे बिल्ले लावणे) करणे, रेतन केल्याची नोंद आपल्या नोंदवहीत लिहिणे, एकाच वंशावळीत त्याच त्याच बैलाचे वीर्य न वापरणे इत्यादी गोष्टी येतात.
या जातिवंत गाईची काळजी देखील त्याच प्रकारे अतिशय लक्षपूर्वक घेतली पाहिजे. तिला वेळोवेळी लसीकरण केले पाहिजे. तिचे सड आयोडीन मध्ये बुडवून काढले पाहिजेत. कोणत्याही प्रकारे दगडी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
उच्च प्रतीचा हिरवा चारा तिला नेहमी खाऊ घातला पाहिजे. मुक्त गोठ्या मध्ये गव्हाण बांधून तिला तिच्या वेळापत्रकानुसार खायची आणि पाणी प्यायची व्यवस्था केली पाहिजे.
२) उच्च दर्जाचा गोठा
शक्यतो आपला गोठा मुक्त गोठाच असला पाहिजे. ज्यात आपण कमी कष्टामध्ये जास्त गाई अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो.
या गोठ्यामध्ये HF गाईंसाठी गारवा मिळावा म्हणून उंच शेड किंवा झाडाची सावली असावी. गोठ्याचे तापमान वेळोवेळी तपासावे.
वेळोवेळी गोठ्या मध्ये निर्जंतुकीकरण करून आपला गोठा जिवाणूमुक्त (बॅक्टेरिया मुक्त) ठेवला पाहिजे. गोठ्या मध्ये स्वच्छता राखली पाहिजे. मुक्त गोठ्यामध्ये ऊन पडत असेल तर आपोआप शेण वाळून साफसफाईची गरज राहत नाही. मात्र पारंपरिक गोठ्यात कोबा वगैरे असेल तर वेळच्या वेळी सफाई करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
प्रतिजैविके विरहित दूध (बॅक्टेरिया फ्री मिल्क)
गाईंना आजारी पडल्यास औषधे दिली जातात. यात प्रतिजैविके म्हणजे अँटी-बायोटिक्स चे प्रमाण खूप असते. यामधील काही प्रतिजैविके थेट दुधामध्ये आढळून येतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये जर अशा प्रकारची प्रतिजैविके दुधामध्ये दिसल्यास त्या दुधाचा दर्जा कमी पकडला जातो. हे दूध मानवी आरोग्याला हानिकारक समजले जाते, म्हणजेच अंतिमतः त्या दुधाला कमी प्रतीचे मानून त्याचा परिणाम त्याला कमी दर मिळण्यात होतो.
उच्च दर्जाचे दूध म्हणजे प्रतिजैविके विरहित आणि सोमॅटीक पेशी संख्या (somatic cell count) – पांढऱ्या आणि तत्सम पेशींचे दुधातील प्रमाण, कमी असणे होय. अशा प्रकारच्या दुधाला परदेशात खूप मागणी असते. भारतीय दूध निर्यात दर्जा प्राप्त ना करू शकण्याची दुधातील प्रतिजैविक आणि सोमॅटीक पेशींचे जास्त प्रमाण ही मुख्य कारणे आहेत.
मुक्त गोठ्यामध्ये गाय आजारी पडू नये याची काळजी आपोआप घेतली जाते. गाय आजारी कमीवेळा पडली की तिला बरे करण्यासाठी प्रतिजैविकांची गरज भासत नाही किंवा कमी प्रमाणात ही औषधे लागतात. परिणामतः दुधात दिसणारी प्रतिजैविके कमी होऊन दुधाचा दर्जा वाढतो.
त्या व्यतिरिक्त उच्च प्रतीचा हिरवा चारा, मिनरल मिक्श्चर, पेंड, खनिजे यांचा पुरवठा, लसीकरण, उच्च दर्जाची रेतन प्रक्रिया इत्यादी गोष्टींमधून उच्च प्रतीच्या दुधाची निर्मिती संभव आहे.
उच्च प्रतीच्या दुधाची निर्मिती, महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला दुधाला दर मिळवून देणे हे पॉवरगोठा टीम चे स्वप्न आहे. अशा प्रकारचा नफ्यातील दूध धंदा करण्याची तीव्र इच्छा असेल तर, खालील ऑनलाईन व्हिडीओ कोर्स तुमची मदत करू शकतो.
आपल्या कुटुंबासाठी व ग्राहकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची निर्मिती करणे हेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्य ध्येय असले पाहिजे. स्वच्छ दूध म्हणजे ते केवळ आरोग्यदायीच नव्हे तर त्यामध्ये प्रतिजैविके,अफ़्लाटॉक्सिन, कीटकनाशके इ. सारख्या अपायकारक घटकांचा अंतर्भाव असता कामा नये. मानवी आरोग्यास इजा पोचवणाऱ्या विविध प्रतिजैविकांचा अंश, विषारी द्रव्यांचे दुधामधील प्रमाण किंवा दुधामधील भेसळ इ. घटकांपासून आपल्या दुधाचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजकाल समाजघटकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये याच मुद्द्यांवर जनजागृती होत असल्याने पुढे जाऊन स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची मागणी बाजारात जोर धरणार आहे हे नक्की.
Rohidas Rikame
मे 10, 2020 at 2:40 pmSir mala pan mahiti havi hoti
Sanjay Patil
मे 9, 2020 at 7:09 amउपयुक्त माहिती
Bharat Wankhede
फेब्रुवारी 28, 2020 at 12:10 pmSir, mala dairy farm suru karyacha ahe tar tyasathi mala dairy farm training chi garaj ahe, tar powergotha madhe training program kewa Ani kuthe rahil yachi mahiti deu shakal Kay…
टीम पॉवरगोठा
मार्च 2, 2020 at 3:47 pmसर
तुमचे संपर्क क्रमांक आणि माहिती support @ powergotha .com येथे ई-मेल करा
संदिप
डिसेंबर 20, 2019 at 7:33 amसर मला दुध व्यवसाय सुरू करायचा आहे मला या व्यवसायाती काहीच माहिती नाही तरी मला मार्गदशण आहे मला कुठे मिळेल
Sandip mo.8554950300
Gokul Kharde
डिसेंबर 27, 2017 at 2:37 pmSir, khup important mahiti tumhi share karat aahat
Amach gothyach kam chalu aahe. Uttam darjachya pure HF gay kuthun ghyavya tya baddal mahiti havi aahe. Amach 100 gainch mukt gothyach structure ubh karnyach kam chalu aahe. At least, suruwatila 10-20 gay ghyavya lagtil tya jar uttam milalya tar pudhil pure blood line maintain hoil.
Sir, plz ya baddal margdarshan kara
Cont no. 9011111499
Harshal
ऑक्टोबर 20, 2017 at 6:12 amKhup chan information…..I’m interested mob no.9552701111
रोहित पाटील
सप्टेंबर 30, 2017 at 5:54 amसर आपण दिलेली माहिती खुप चांगली आहे . आम्ही आपणास कुठे भेटू शकतो आम्हाला आणखीन थोडे मार्गदर्शन हवे आहे …८७४९०१८४३६/ या वर फोन करून कळवा pls
योगेश राजपूत
मार्च 30, 2017 at 10:17 amसर आप के द्वारा दी गयी जानकारी बहुत उपयोगी है सर प्लीज आप के द्वारा ट्रेनिंग पोग्राम हो या आप कही लेक्चर हो तो प्लीज इनकी जानकारी जरूर दीजिये हमारे पास कल्याण से 14 किलोमीटर की दुरी पर murbaad रायता गाओ में 50 देसी ब्रीड की गोमाता हे साहीवाल राठी थारपारकर कोंक्रेज गिर और लाल कंधारी गाय हे जमीन 20 aker हे आप से बहुत कूच सिखने की तमना हे सर प्लीज जानकारी दीजिये कहा आना है ट्रेनिंग के लिए
8286298368 ।9699395710 ये न हे सर
[email protected] ये ईमेल हे
Swapnil Punde
मार्च 5, 2017 at 8:07 amउत्तम मार्गदर्शन सर…मला आपल्या गीर गायीच्या संकरीकरणातून तयार करण्यात आलेल्या ब्राझिल मधील ब्राह्मणी या गायीबद्दल माहिती हवी होती…ती कुठे अन कशी मिळेल त्या गायीच्या वळुच्या विर्य उपलब्धता याबाबत माहिती मिळावी
Dattatraya Shamrao Chavan
जानेवारी 26, 2017 at 2:40 pmThis very useful and Important information should reach each and every farmer.
Maharashtra Government should intervene and use its department and Machinery for this!
Shailesh Madane
फेब्रुवारी 2, 2017 at 12:55 pmधन्यवाद
Vikas pawar
जानेवारी 14, 2017 at 12:21 pmNice innovation