सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi

सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi
पॉवरगोठा बनवून दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जातिवंत गाय निर्मिती हे मुख्य ध्येय असते. त्यासाठी नैसर्गिक रेतन ऐवजी कृत्रिम रेतन चा सल्ला हमखास दिला जातो.
बहुसंख्य शेतकरी, आज चांगली जातिवंत, जास्त दूध देणारी संकरित कालवड किंवा गाय तयार करण्यासाठी कृत्रिम रेतन चाच उपयोग करतात.
हे करत असताना, इन-ब्रीडिंग (भावकीतील प्रजनन) टाळण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळ्या वळूचे वीर्य (सिमेन) वापरण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येक पिढी मध्ये वेगळा वळू वापरला पाहिजे.
आता हे कसे साध्य होईल – तर नोंदी केल्याने.
कोणत्या क्रमांकाच्या गाईला कोणता वळू लावला, हे लिहून ठेवायचे. काही शेतकरी कॅलेंडर वर, काही जण वही वर तर काही जण पॉवरगोठा अँप मध्ये लिहून ठेवतात.
गाईचा क्रमांक तर कळला आम्हाला. वळू चा क्रमांक कोठून आणायचा ? सोपे आहे, डॉक्टरांना विचारा. त्यांच्याकडील वीर्यकांडी वर ती सर्व माहिती लिहिलेली असते.
आता या वळूच्या क्रमांकासोबत अजून ही बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते.
सिमेन बनवणाऱ्या कंपन्या त्यांचे उत्पादन विकले जावे तसेच शासकीय नियमावलीचे पालन करण्यासाठी ही माहिती साठवून ठेवतात आणि ती मोफत कोणीही वाचू शकते.
जे शेतकरी कृत्रिम रेतन करतात त्यांनी तर ही हमखास वाचली पाहिजे.
सिमेन स्ट्रॉ म्हणजे काय ?
कृत्रिम रेतन करण्यासाठी, उच्च गुणवत्ता असणारे वळू, सीमेन कंपनी तसेच विद्यापीठ, शासकीय संस्थांद्वारे सांभाळले जातात. हे वळू प्रत्यक्ष वापरण्या ऐवजी, त्यांचे वीर्य काढून नायट्रोजन बॉक्स मध्ये विविध वीर्यकांडी मध्ये साठवून ठेवले जाते.
याचा फायदा असा की
- एकदा काढलेले वीर्य, बऱ्याच गाईंसाठी वापरता येते.
- तसेच प्रत्येक वेळी असा वळू गाईच्या जागेवर नेण्याची गरज नाही.
- वळू मेल्यानंतर ही वीर्यकांडी वापरता येते.
वीर्य कांडी वर काय काय माहिती उपलब्ध असते ? How to Read Semen Straw Marathi
बरीच माहिती उपलब्ध असते. वळू चा नाव/क्रमांक, वळूच्या आईचा क्रमांक, वडिलांचा क्रमांक, वळूच्या आईने एका वेतात दिलेलं कमाल (जास्तीत जास्त ) दूध, वळू पासून झालेल्या कालवडीने दिलेले जास्तीत जास्त दूध किंवा वळूच्या वडिलांच्या आईने दिलेले एका वेतातील दूध इत्यादी नोंदी उपलब्ध असतात. यातील बहुतांश माहिती तुम्ही पॉवरगोठा अँप मध्ये सोप्या पद्धतीने लिहून ठेवू शकता.
अवघड वाटत असले तरी विश्वास ठेवा, ही माहिती ऑनलाईन वाचता येते, २ मिनिटांत
पण बहुतांश शेतकऱ्यांना ती कशी वाचावी, कोठे शोधावी याची माहिती नसते.
हे सांगण्यासाठीच आज या लेखाचा छोटा प्रपंच !
कुठलीही सिमेन स्ट्रॉ किंवा वीर्यकांडी खालील प्रकारे दिसते.
नीट झूम करून वाचा.
BAF-HFCB-HADAGA,HFCB,BAIF 01-01-20 6160 आणि बारकोड
अशी ही वीर्यकांडी वरील अक्षरे आहेत
आता या बैलाच्या वंशावळीबद्दल माहिती मिळविण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या आहेत.
#कृती १
सिमेन कांडी वरील माहिती वाचा.
आपण आधीच वरील फोटो मध्ये माहिती वाचली आहे.
#कृती २
गुगल मध्ये माहिती शोध (search)
BAF-HFCB-HADAGA,HFCB,BAIF 01-01-20 6160 आणि बारकोड या ओळीतील कोणतीही २-३ शब्द गुगल मध्ये शोधा.
आम्ही शोधलेले शब्द खालील प्रमाणे
हवे असलेले उत्तर
आता वरील स्क्रिनशॉट मध्ये पाहिल्याप्रमाणे, पहिलीच ओळ हे आपले हवे असलेले उत्तर आहे.
#कृती क्र ३
वरील लिंक –> baif.org.in या वेबसाईट वर सायर डायरेक्टरी आहे, तिची PDF लिंक आहे.
ही लिंक उघडल्यावर अशी दिसते.

सायर डायरेक्टरी स्क्रीन : सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi
तुम्ही लॅपटॉप किंवा कंप्युटर वर उघडली असेल, तर CTRL + F ही कळ (key) दाबून hadaga किंवा hfcb ही अक्षरे त्यात शोधा
खालील प्रमाणे उत्तर येईल.

सायर डिरेक्टरी CTRL F : सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi
म्हणजेच पान क्र २३ वर ओळ क्र ४२ वर आपल्याला हव्या असणाऱ्या बैलाची माहिती आपल्याला मिळाली.
काय माहिती आहे ?
hadaga नावाचा बैल असून, त्याचा टॅग क्रमांक ६२४५२ आहे. त्याच्या आईचे नाव जानकी (वळू च्या आईला शास्त्रीय भाषेत DAM असे म्हणतात ) आणि टॅग क्रमांक 60256 आहे.
वळूची जन्मतारीख २२/०२/२०१३ असून,
HFCB (Holestein Freisian cross breed) संकरित म्हणजे ७५% HF आणि २५ % S (साहिवाल) चे गुण असणारा वळू आहे.
वळू च्या आईचे एका वेतातील साधारण दूध 6160 लिटर असून, वळू च्या वडिलांच्या आईचे कमाल एका वेतातील दूध 7884 लिटर आहे. वळू च्या वडिलांचे नाव Hiren आहे.
आपल्याला हवे असेल, तर आपण जानकी आणि हिरेन संबंधी देखील अधिक माहिती मिळवू शकतो.
आतापुरते एवढे पुरे ! होय ना ?
हीच माहिती आपल्याला गुगल ने सुद्धा search पेज वर दाखविली होती, आपल्याला कसे वाचावे माहित असेल तर माहिती मिळवणे अधिक वेगाने साध्य करता येते.
मोबाईल मध्ये सर्च करताना
तुम्ही मोबाईल मध्ये search करत असाल, तर PDF प्रोग्रॅम मध्ये search चे बटण वापरून हीच माहिती खालीलप्रमाणे दिसते.

सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi

सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती कशी वाचावी ? How to Read Semen Straw Marathi
आता यातील, कोणती कोणती माहिती पॉवर गोठा ॲप मध्ये लिहून ठेवता येते.
खालील स्क्रिनशॉट पहा.

पॉवरगोठा ॲप मध्ये कशी माहिती भरावी : सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती Semen Straw Marathi

पॉवरगोठा ॲप मध्ये माहिती कशी लिहावी:
सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती Straw Marathi
आश्चर्य आहे ना ?
आईचा क्रमांक, आईची दूध उत्पादन क्षमता, वडील बैल क्रमांक, वडिलांच्या आईची दूध उत्पादक क्षमता ही माहिती पॉवरगोठा ॲप मध्ये सहज साठवून ठेवता येते.
वरील उदाहरणामध्ये १२३४५ ही गाय HADAGA बैल आणि ५६७७८ या गाईपासून जन्मली आहे.
तिच्याविषयी अधिक माहिती खालील प्रमाणे साठवून ठेवता येते.
१२३४५ नंबरच्या गाईच्या च्या आई ला HADAGA या बैलाचे वीर्य वापरून रेतन केले आहे.
१२३४५ च्या आईचा क्रमांक ५६७७८ शेतकऱ्याच्या च गोठ्यातील असून तिचे एका वेतातील दूध शेतकऱ्याने मोजून ३००० लिटर भरले आहे.
गुगल मधून माहिती काढून वडिलांच्या आईचे दूध म्हणजे जानकीचे दूध ६१६० लिटर लिहून ठेवले आहे.
अर्थातच आता १२३४५ या गाईला BAIF ६२४५२ – HADAGA हा बैल वापरला जाता कामा नये. कारण तिच्या आईला ५६७७८ या गाईला, HADAGA वळू पासून रेतन केल्यानंतर झालेली कालवड म्हणजे १२३४५ गाय होय.
डॉक्टर रेतन करण्यास आले असता त्यांना शेतकऱ्यांनी ही माहिती द्यावी म्हणजे इन ब्रीडिंग टाळून उच्च क्षमतेच्या गाई निर्मिती शक्य होईल.
धन्यवाद ! काही शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून लेखाची प्रेरणा झाली त्यांनाही धन्यवाद.
काही शंका असल्यास टिपणी करून विचाराव्यात.
*****
इतर शेतकऱ्यांना कळावे म्हणून माहिती जास्तीत जास्त शेअर करा. हे करताना खालील काळजी घ्या.
सदर लेख कॉपीराईट पॉवरगोठा अधीन असून, कोणीही लेख पुनर्प्रसारित करताना या ब्लॉग ची ओरिजिनल लिंक बद्दल सांगणे आवश्यक आहे.
सिमेन कांडी चा फोटो श्री. दीपक (रा. थोपटेवाडी) यांच्या सौजन्याने आहे.
बैलाचा फोटो NDDB यांच्या लिंकवरून घेतला आहे.
हे ही वाचायला आवडेल तुम्हाला : पॉवरगोठा म्हणजे काय ?
तळटीप: जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Subhash Kumar Pandey
एप्रिल 29, 2021 at 3:51 amBaif semen asli hai ya nakli kaise pahchane uska trika
अक्षय रावस
ऑक्टोबर 4, 2020 at 4:38 amमाझ्या गाईचे 5वेत झाले आहेत पण आता ह्या पाचव्या वेतला गाईचे दूध 8 लिटर वरून डायरेक्ट 2.5 लिटर झाले आहे. काय झाले असेल
Dr Appaso bhupal ghatge
ऑगस्ट 26, 2020 at 7:41 amGood information sir
Pradip palkar
ऑगस्ट 22, 2020 at 3:10 amExcellent
Dr.ganesh sale
ऑगस्ट 22, 2020 at 2:19 amgood informations sir
mahadev shashishekhar shreshthi
ऑगस्ट 20, 2020 at 7:31 amछान माहिती
Ghanshyam lokhande
ऑगस्ट 18, 2020 at 6:43 amKhup chan…
Sagar Ghorpade
ऑगस्ट 17, 2020 at 2:46 pmम्हशी च्या रेतन करतांना पण अशी माहिती असते का कांडी वर
नोंदवही - दूध धंद्यातील 50 विविध नोंदी कोणत्या, कशा आणि कुठे ठेवाल ?
जुलै 18, 2020 at 3:02 am[…] सिमेन स्ट्रॉ / वीर्यकांडी वरील माहिती … […]
Atul patil
जून 10, 2020 at 6:30 amSemen abs che semen asel tar kuthe milel list
Bhushan shinde
जून 8, 2020 at 2:54 amछान अतिशय सुरेख माहिती देताय आपण