दूध धंद्यावर बोलू काही – मुक्त गोठा आणि चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी युक्ती
मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत.
चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra)
आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो.
सांगू ना ?
मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो.
का ? ते ठाऊक आहे का ?
अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात. नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

शरद बगाटे यांच्या मुक्त गोठ्यातील एक क्षण
दूध धंद्यावर बोलू काही – चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी युक्ती (Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti)
मुक्त गोठ्यात चुन्याचा उपयोग
- मुक्त गोठ्या मध्ये केलेल्या गव्हाणी ला आतून चुना मारून घ्यावा. यामुळे पाण्याला शेवाळ लागत नाही. शेवाळ लागलेले पाणी पिल्याने जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. चुना मारल्यानंतर ७-८ तास वळवावा आणि मग गव्हाण पाण्यासाठी वापरावी.

2. आपल्या गोठ्याचे गेट/दरवाजा जेथे असेल तेथे ४-५ दगड वापरून एक चौकोन करून त्यात चुन्याची फक्की टाकावी. आपण किंवा कोणीही इतर गोठ्यामध्ये आत जाताना आपले बूट/चप्पल या फक्कीत घासून मगच आत जावे. यामुळे बाहेरील घातक जिवाणू जे चप्पल ला चिकटले असतील ते गोठ्यात शिरत नाहीत. आणि रोगांपासून जनावरांचा बचाव होतो.
मुक्त गोठ्यासाठी उन्हाळ्यात विशेष टीप (Dairy Farming in Maharashtra Tips)
उन्हाने अंगाची काहिली होत आहे, ४०-४५ अंश सेल्सिअस मध्ये माणसाला जगणे अवघड झाले असून मुक्या जनावरांची काय कथा ? जनावरांना उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो.
- गोठ्यात जर पत्र्याचे शेड असेल तर उन्हामुळे पत्रा तापून जनावरांना त्रास होतो आपल्या जनावरांना उन्हापासून वाचवण्यासाठी पत्र्यावरती चुन्याचे पाणी टाकून लेप द्यावा. सूर्याचे किरण सफेद रंगावरून परावर्तित होऊन पत्रा थंड राहण्यास मदत होते. तेवढ्या प्रमाणात उन्हापासून आपण बचाव करू शकतो.
- –
- आपली गव्हाण किंवा पाणी पिण्याची टाकी प्लास्टिक ऐवजी सिमेंट ची असेल तर त्या प्रमाणात पाणी थंड राहण्यास मदत होते.
- इतके ऊन आहे की, कुठलेही पाणी गरम होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शक्य असेल तर गव्हाण चार बांबू वापरुन एक छोट्या शेडनेटच्या सावलीत ठेवू शकता. परंतु अशा पाण्याच्या टाकीत सूर्यकिरण पोचत नसल्याने, पुन्हा शेवाळ लागण्याची शक्यता असते. म्हणून खबरदारी एवढीच घ्यावी की ७-८ दिवसांत पाणी पूर्ण बदलावे / टाकी धुवून घ्यावी.
जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Prathamesh Madhav Kulkarni
जून 4, 2020 at 5:19 pmIm Interested , please guide me I have land in near nashik area
Abhinandan herwade
मे 12, 2020 at 11:14 amMaji 10 gunte jamin ahe tar taymade gota karaycha ahe plz help me
Sudhakar Chavan
मे 11, 2020 at 6:56 pmछान माहिती
मा. किरण (दादा) शेंडगे.
मे 11, 2020 at 3:31 pmमला. 30 Hf गाई चा मुक्त गोठा करायचा आहे. पण भांडवल नसल्यामुळे करु शकत नाही. माझी खुप इच्छाशक्ती आहे.मला कुठे शासकीय कर्जाची माहिती असेल तर सांगा
Ankush shinde
मे 11, 2020 at 3:11 pmखूप छान माहिती मिळाली ध न्य वा द सर
प्रसाद अशोक सोनवणे
मे 11, 2020 at 3:09 pmसर नमस्कार
मला सुरवातीला 5 ते 6 गाईचा दूध व्यवसाय करायचा आहे त्या साठी मला योग्य मार्गदर्शन करा…मी राहणार मुंबई चा आहे गावी जमीन वगरे आहे तर मला नोकरीच्या भानगडीत पडायचं नाही आहे त्या मुळे मला मार्गदर्शन करा
कांबळे डेअरी
मे 11, 2020 at 6:42 amखूप छान माहिती मिळाली भविष्यात आम्ही मोठा गाय व म्हशीच्या प्रकल्प सुरू करणार आहेत तरी आपली माहिती आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा करतो
धन्यवाद
Purushottam tupe
मे 11, 2020 at 12:40 amखूप छान माहिती दिली सर..
Sumit Shinde
मे 10, 2020 at 4:41 pmमला म्हशिच्या दुधाचा व्यवसाय करायचा आहे. मला जमेल तेवठी माहीती द्या. मो.नं 9765078301
धन्यवाद..
Mahesh Mansuke
मे 10, 2020 at 3:11 pmMaza 32*120 cha shed aahe mla 50 gaincha mla mukt sanchar sathi kiti kharch yeil aani panyachi kothe aasavi copaund kiti unchiche aasave Angeles kiti futavr aasava please margdarshan krave 9527128222 Baramati katewadi
बाबासाहेब नवनाथ टेकाळे
मे 10, 2020 at 6:02 am10 गायी साठी किती जागेत करावा गोठा
टीम पॉवरगोठा
मे 10, 2020 at 11:20 amप्रति गाय कमीत कमी २००-२५० स्क्वे फूट जागा रिकामी हवी
२० % जागेत शेड हवे
२ गुंठे जागा कमीत कमी लागेल
Yogesh Patil
मे 10, 2020 at 4:15 amChan mahiti milani. Velevar gayi gabhan jane sathi upay sanga.
लक्ष्मीकांत कापसे
मे 9, 2020 at 4:41 pmमला ३0जनावराचा गोठा बांधायचा आहे
शेड साठी किती खर्च येतो
डिझाईन मिळेल का❓
९९२११४५३१८-व्हाटस्प
Nitin Bhos
मे 9, 2020 at 12:50 pmदहा गायींसाठी मुक्त गोठा किती बाय कितीचा हवा
टीम पॉवरगोठा
मे 10, 2020 at 11:20 amप्रति गाय कमीत कमी २००-२५० स्क्वे फूट जागा रिकामी हवी
२० % जागेत शेड हवे
२ गुंठे जागा कमीत कमी लागेल
Mayur ashok kalekar
मे 9, 2020 at 11:37 amSend me all details
विशाल रामचंद्र फडतरे
मे 9, 2020 at 9:09 amखूप छान माहिती दिली सर
Satish garje
मे 9, 2020 at 7:19 amChan mahiti ahi very nice