मुक्त गोठ्याची रचना – सोप्या ५ युक्त्या । Mukta Sanchar Gotha Design

मुक्त गोठ्याची रचना करताना करायच्या सोप्या ५ युक्त्या (मुक्त संचार गोठा डिझाईन Mukta Sanchar Gotha Design )
बरेचदा पशुपालक शेतकरी विचारणा करतात की मुक्त गोठ्याचा प्लॅन, किंवा डिझाईन पुरवा म्हणून. शक्यतो प्रत्येकाची उपलब्ध जागा आणि इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने एक ढोबळ, ठोकळा प्लॅन देणे अवघड ठरते. आपापल्या परसातील, गोठ्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर शेतकऱ्यांचे गोठे पाहून मुक्त गोठ्याची रचना केलेले फायदेशीर ठरते. पॉवरगोठा करायचा असेल तर हे करताना खालील ५ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि अंगभूत कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळेल.
#१ मुक्त गोठ्याचा आकार

मुक्त संचार गोठा डिझाईन रचना mukta sanchar gotha design
मुक्त गोठ्याचा आकार आणि डिझाईन तुमच्या सध्याच्या गोठ्याची रचना आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या जागेनुसार तुम्ही ठरवलं पाहिजे.
पण हे करताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात
1. पॉवरगोठ्या मध्ये प्रत्येक गाईला २०० वर्ग फूट (200 sq Feet) कमीत कमी जागा मोकळी फिरायला मिळाली पाहिजे. म्हणजेच तुम्ही मुक्त गोठ्या मध्ये १ गुंठे जागा असेल तर ५ गाई सहज सांभाळू शकता.
2. तुम्ही भविष्यात गोठा वाढविणार असाल, तर आयताकार गोठा करून मध्ये गव्हाण आणि शेड करू शकता. आयताच्या छोट्या बाजूने गोठा आणि शेड वाढविणे सोपे पडते.
3. अशा प्रकारे जागा निवड करावी, की तुमच्या गोठ्याच्या आजूबाजूची मोठी झाडे सावली देण्यासाठी उपयुक्त पडतील
#२ मुक्त गोठ्या मध्ये पाण्याची सोय

मुक्त गोठ्यात चुन्याचा उपयोग
मुक्त गोठा बनविल्यानंतर गाईंना पिण्यासाठी २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
हे करताना खालील काळजी घ्यावी.
- गव्हाण किंवा टाकी मध्ये पाणी उपलब्ध केले असल्यास, त्यात शेवाळ लागणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणूनच वेळोवेळी लक्ष ठेवून पाणी बदलण्याची काळजी घ्यावी.
- सिमेंट ची गव्हाण असल्यास, त्यात चुन्याचा वापर करून तुम्ही ती निर्जंतुक तसेच शेवाळ मुक्त करू शकता.
- उन्हाळ्याची काहिली होत असल्याने पाणी गरम होते. यासाठी तुम्ही गव्हाण तात्पुरत्या शेड/सावली किंवा मंडप मध्ये ठेवू शकता. हे करताना पुन्हा शेवाळ लागू नये म्हणून वेळच्या वेळी पाणी बदलावे.
#३ मुक्त गोठ्या मध्ये सावली आणि शेड (Mukta Sanchar Gotha Design Shed )

मुक्त संचार गोठा रचना माहिती – mukta sanchar gotha design
मुक्त गोठ्यामध्ये गाईंना बसायला कोरडी जागा मिळणे हा सर्वात मोठा उपयोग आणि फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे गाईंना गार सावली मिळणे होय.
ही गोष्ट संकरित गाईंसाठी अधिक उपयुक्त आहे.
उष्णतेमुळे गाईंचा तणाव वाढून, हवणे, कमी दूध देणे, आजारी पडणे असे प्रकार होतात.
हे टाळण्यासाठी गार सावली उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
यासाठी तुम्ही तुमच्या मुक्त गोठ्याच्या एकूण आकाराच्या २० टक्के जागा सावली मध्ये उपलब्ध केली पाहिजे.
ही सावली तुम्ही झाडांची नैसर्गिक पद्धतीने किंवा शेड ची कृत्रिम सावली देऊ शकता. मुक्त गोठ्याचे फोटो येथे आणि येथे पहा. पॉवरगोठा करताना झाडांची सावली देण्यासाठी युक्ती क्रमांक १ मध्ये सांगितल्याप्रमाणे असलेली झाडे वापरू शकता.
शेड ची कृत्रिम सावली असेल, तर पत्रा किंवा छत कमीत कमी १२-१३ फूट उंच असावे, जेणेकरून हवा खेळती राहील आणि गाईंना कमीत कमी त्रास होईल.
Fogger फॉगर वापरत असाल तर, गोठ्याची जमीन ओली होणार नाही, याची काळजी घ्यावी.
#४ मुक्त गोठ्या मध्ये गव्हाणीची जागा आणि रचना (Mukta Sanchar Gotha Design Manger )

मुक्त संचार गोठा रचना – गव्हाण Mukt Gotha Design
1. गाई चारा खाताना पूर्व पश्चिम उभ्या राहतील अशी व्यवस्था असल्यास उत्तम. म्हणजे सूर्याची किरणे चारा खाताना तिथे पर्यंत पोचतील आणि लघवीमुळे ओली झालेली जमीन लवकर सुकते आणि आजाराची शक्यता कमी होते.2. पाणी पिणे आणि चारा ह्या जागा विरुद्ध आणि दूर असल्यास गाईंचा आपोआप व्यायाम होतो आणि आरोग्य चांगले राहते.
3. शक्य असल्यास हेड लॉक वापरावेत. जेणेकरून गाईंना एकमेकांचा चारा खाणे शक्य होत नाही.
4. पॉवरगोठा करताना मुक्त गोठ्या मध्ये गव्हाण शक्यतो अशा जागी असावी, जेणेकरून चारा टाकणाऱ्या व्यक्तीस गोठ्या मध्ये जावे लागणार नाही. बाहेरूनच चारा टाकता येईल. अशा प्रकारे आपण गोठ्यात बाहेरील जिवाणू त्या व्यक्तीच्या पायाला लागून जाण्याची शक्यता कमी करू शकतो. म्हणजेच जाळी कंपाउंड लगत गव्हाण करावी, किंवा मधोमध शेड आणि गव्हाण असल्यास शेडच्या मध्यभागातून जाण्या येण्याची वाट करावी आणि दोन्ही बाजूला कप्पे करावेत.
5. गव्हाण जमिनी लगत असल्यास गाईंना नैसर्गिक रित्या चरण्याची संधी मिळते.
#५ मुक्त गोठ्या मध्ये कंपाउंड आणि कप्पे (Mukta Sanchar Gotha Design Compound)

मुक्त गोठा डिझाईन रचना – कालवड कप्पा mukta sanchar gotha design
1. मुक्त गोठ्या मध्ये शक्य असल्यास कालवडींचे, गाभण गाईंचे वेगळे कप्पे करावेत.
2. आजारी पडलेल्या गाई गोठ्याच्या बाहेर बांधाव्यात. अधिक बारकाईने कप्पे करण्यासाठी येथे माहिती वाचा.
3. मुक्त गोठ्याला शक्य असल्यास जाळीचे कंपाउंड करावे आणि अँगल, खिळे स्क्रू, आणि खांब बाहेरच्या बाजूला असावेत. म्हणजे गाय अंग जाळीला घासत असेल तर तिला गंज लागलेल्या खिळा किंवा अँगल मुळे संसर्ग आणि बाधा होणार नाही.
4. जाळीचे शक्य नसल्यास, काही शेतकरी, बांबू किंवा लोखंडी पाईप वापरून देखील कंपाउंड करतात आणि यशस्वीपणे गाई मुक्त गोठ्यामध्ये पाळतात. अशा वेळी हिंस्र पशु, कुत्रा इ पासून जनावरांना त्रास होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी.

मुक्त संचार गोठा रचना mukta sanchar gotha design
अशा प्रकारे पॉवरगोठ्या मध्ये मालकाचे कष्ट कमी होते, शेण उचलण्याचे आणि पाणी देण्याचे कामे कमी होतात. गाईंची जागा बदलण्याचे काम ही कमी होते.
तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये वरील पैकी काय काय रचना केली आहे ते कमेंट करून सांगा किंवा आमच्या फेसबुक पेज वर आम्हाला कळवा
हे ही वाचायला आवडेल तुम्हाला : दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण
जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. त्या पलीकडे जाऊन जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Datta
जुलै 13, 2020 at 2:35 pmMla mukt gota kraycha aahe plz loan milel ka
Rahul Rajendra Shende
जुलै 13, 2020 at 5:39 amMast
निलेश सुधाकरराव ठाकरे
जुलै 12, 2020 at 1:38 pmमाझ्याकडे जागा आणि शेड उपलब्ध आहे त्यामद्ये गवळाळू जनावरे 10-12,जर्सी गायी 2 ,म्हस 1, व बकऱ्या 10-12 आहे मला संपूर्ण दुग्ध व्यवसायामध्ये उतरायचे आहे कृपया माहिती पुरवावी
अमोल नवले
जून 16, 2020 at 1:14 pmनवीन गोठा उभारणीसाठी काही लोन करता येईल का ?
येत असल्यास त्यासाठी काय प्रक्रिया असेल आणि कीती दिवसात कर्ज मंजूर होईल ?
Sanket vilas abdagire
मे 22, 2020 at 5:13 pmAll information regarding farm was nice information regarding dairy farm is useful for us thanku for sharing this nice information
.. I have been aslo seeting up an dairy farm with deshi cows
Bhushan ni shinde
जुलै 13, 2020 at 7:34 amआपण वेळोवळी करत असलेल्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातील पशुपालक nakiich आर्थिक क्षमतेने मजबूत होईल….
प्रभाकर बाळासाहेब कैचे
मे 19, 2020 at 10:33 amमी राष्ट्रीय गोरक्षा मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे मला तालुका निहाय गो शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे माहीत द्या
Mithun Rananaware
मे 18, 2020 at 9:10 amशेण व्यवस्था कशी करण्यात आली आहे
Hanmant Shelke
मे 18, 2020 at 2:00 amपशुसंवर्धन
Sachin
मे 17, 2020 at 7:27 pmMast
Mr.Datit Mahendra
मे 17, 2020 at 2:49 pmMast sir
Atul
मे 17, 2020 at 8:34 amU
Raju Lambhate
मे 17, 2020 at 2:15 amVijay
संतोष फणसे
मे 17, 2020 at 1:41 amगाईंना अंग घासण्यासाठी एका लाकडी गोल खांबाला काथ्या गुंडाळला आहे जेणे करून त्यांना हवे त्या वेळेस गाई अंग घासू शकतात, गोठ्यात गाई ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी 1 महिन्यांनी चुना मारला जातो
टीम पॉवरगोठा
मे 17, 2020 at 2:33 amछान सर,
मुक्त गोठा मध्ये गार सावली, खरारा करण्यासाठी जागा, आणि बसायला कोरडी जागा असेल तर तो पॉवरगोठा च आहे.
तुमचे फोटो तुम्ही फेसबुक पेज ला किंवा whatsapp ला पाठवू शकता. https://facebook.com/powergotha
kadam santosh ramrao
मे 18, 2020 at 2:52 amgoat form mahite dya
Dhanraj Sathe
मे 17, 2020 at 1:29 amDhanraj Sathe