गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित तंत्रज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देऊन तुमच्या गाईंची गळाभेट करण्यास नवीन वर्षापासून निघाले आहेत. त्यांच्याकडे तुमची माहिती (डेटा) गोळा करण्यासाठी ५०,००० टॅब्लेट्स दिले गेले आहेत. हा टॅग किंवा बिल्ला कसा असेल ? जनावरांचे टॅग पिवळ्या रंगाचा बिल्ला असून त्यावर १२ आकडी ओळख क्रमांक असेल तो ८.८ […]
पुढे वाचा
स्वच्छ दूध निर्मिती दुध धंद्याला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी दुधाला उच्च दर मिळणे जरुरी आहे. अर्थशास्त्रातील सामान्य गणितानुसार, एखाद्या वस्तूला किंवा सेवेला उच्च किंमत मिळण्यासाठी त्याची ग्राहक वर्गामध्ये उच्च दर्जा किंवा दुर्मिळ वस्तू म्हणून ख्याती असली पाहिजे. दूध हि गोष्ट दुर्मिळ नाही. भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच दुधाला देखील दर मिळण्यासाठी उच्च आणि उत्तम प्रतीचे दर्जेदार दूध निर्मितीची खूप निकड आहे. ही गरज ओळखून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये काही दुग्ध-पुरवठादार रुपये ७० ते ८०/- प्रती लिटर ने दूध विक्री करत आहेत. हाच किंवा असाच उच्च दार आपल्या सामान्य शेतकऱ्याला देखील का मिळू नये हा उहापोह पॉवरगोठा टीम […]
पुढे वाचा
जातिवंत संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ आणि जातिवंत गाई असाव्यात. उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा व मुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो . परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त होते. कमी दुध देणारी व रोगप्रतिकारक शक्ति कमी असणारी जनावरे, कितीही चांगल्या सुविधा पुरवल्या तरी हा व्यवसाय फायदेशीर करु शकत नाहीत. म्हणून आपल्या गोठयात जातिवंत संकरीत गाय असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की, जातीवंत गाय कोठे शोधायची? ती एक तर खात्रीलायकरीत्या मिळणार नाही आणि […]
पुढे वाचा
मधमाशा मध का साठवतात ? आणि मध कधीच खराब का होत नाही? मध मधुर म्हणजे उच्च प्रतीच्या, उच्च तीव्रतेच्या शर्करांनी युक्त असतो. मधमाशा मिनिटाला ११००० पेक्षा जास्त वेळा पंख फडफडवत असल्याने त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते. हि गरज असा उच्च शर्करायुक्त मध पूर्ण करू शकतो. ज्या काळात फुलांना बहर नसतो, त्या काळात त्यांना अन्नाची कमी पडू नये, म्हणून मधमाशा त्यांच्या पोळ्यामध्ये मध साठवणूक करतात. अति थंडीच्या ठिकाणी हिवाळ्याची ही सोय असते. तुम्हाला माहिती आहे का, की मधाला शक्यतो एक्सपायरी डेट नसते. कधीच मध खराब होत नाही. ना जिवाणू ना बुरशी लागते. बरे हा मध, खराब का […]
पुढे वाचा
मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची […]
पुढे वाचा