लॉकडाउन दिवस क्र २ | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मार्च 26, 2020

लॉकडाउन दिवस क्र २

शहरातील सुशिक्षित जनता जीव धोक्यात घालून सूचना डावलून सुपर मार्केट आणि किराणा समोर चिकटून लाईन लावत असताना, एक सुंदर चित्र महाराष्ट्रातील डेअरीत पाहायला मिळाले

दूध संकलन केंद्रातील सोशल डिस्टंसिंग

दूध संकलन केंद्रातील सोशल डिस्टंसिंग -सदर चित्रे लॅक्टेलीस व्यवस्थापकीय संचालक राहुल कुमार यांच्या वाल वरुन साभार आहेत. 

दूध जमा करायला आलेले शेतकरी अतिशय संयमाने एकेमकांपासून ३-४ फूट अंतरावर उभे आहेत, डेअरी ने देखील लक्ष्मणरेखा आखून या प्रक्रियेला सोपे केले आहे.

मित्रांनो याला सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे असं नाव दिले गेले आहे.

कोरोना विषाणू ला रोखण्याचा हा एक अप्रतिम उपाय आहे.  ३ फुटांपेक्षा जास्त दूर विषाणू पसरत नाही.  म्हणून प्रसार टाळण्यासाठी असे अंतर ठेवून वागण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रीदवाक्य –  शक्यतो घराबाहेर पडू नये आणि खूपच अनिवार्य काम असेल तर, अशा प्रकारे सामाजिक अंतर, सोशल डिस्टंसिंग ठेवून वागावे.

 

यानंतर आपण दुग्धव्यवसायाकडे वळूया.

नफ्यातील दुग्धव्यवसाय पायरी क्र १

खर्च मोजणे 

नफा = उत्पन्न – खर्च

उत्पन्न दूध दरांवर अवलंबून आहे, म्हणून खर्च कमी करून नफा वाढवणे हा उत्तम मार्ग आहे.

खर्च कमी करण्यासाठी खर्च मोजला पाहिजे.

खर्च कसा मोजावा.

सुरुवात म्हणून एक महिना भराचा खर्च मोजू शकता.

खर्चातील प्रमुख घटक खालील प्रमाणे

  1. चारा
    1. ओला (हिरवा) चारा /मुरघास
    2. सुका चारा
  2. पशुखाद्य / कॅटल फीड
  3. सप्लिमेंट्स / पूरक पदार्थ
  4. औषध उपचार खर्च
  5. डॉक्टर व्हिसिट फी
  6. फवारणी खर्च
  7. लसीकरण खर्च
  8. जागा भाडे
  9. पगार (गडी, आणि स्वतः राबत असाल तर त्याचा देखील खर्च पकडावा)
  10. इतर खर्च (वीज बिल, पाणी, गाडी भाडे, पेट्रोल आणि वर समाविष्ट नसलेले परंतु थेट दुग्ध व्यवसाय शी संबंधित खर्च )

वरील सर्व खर्च महिना भरासाठी लिहून काढा आणि बेरीज करा.

तुमच्या कडे किती गाई जनावरे आहेत त्यानुसार प्रति गाय खर्च तुम्हांला कळेल.

हे सर्व लिहिण्यासाठी तुम्ही साधी वही, मोबाईल किंवा संगणक वापरू शकता.

अधिक सोप्या पद्धतीने करण्यासाठी पॉवरगोठा ॲप वापरून तुम्ही खर्च नोंदवू शकता.

तुमचा प्रतिमाह आणि प्रतिगाय खर्च किती आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा

खर्च मोजल्यानंतर तो कमी कसा करू शकतो यावर उहापोह करू.

लॉकडाऊन दिवस १ ची पोस्ट येथे वाचा 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत