मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट
आपण येथील –> मुरघास निर्मिती लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली. तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले.
आज आपण पाहूया प्रत्यक्ष मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू.
मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड
प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू.
एका एकरात किती चारा तयार होतो ?
एका एकर जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो.
या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो.
मक्याची लागवड कशी करावी ?
त्यासाठी आपण एका एकरात १० किलो मका पेरावा. २ फूट रुंदीचे सरी घेऊन ८ इंचावर बी पेरावे.
किती दिवसात मक्याचे पीक मुरघास चाऱ्यासाठी तयार होते ?
पेरणीपासून साधारणतः ८०-९० दिवसांत मका पीक मुरघास बनविण्याच्या उद्देशासाठी अनुकूल होते.
मका मुरघासासाठी तयार झाला का हे कसे ओळखावे ?
मुरघास बनविण्यासाठी आपल्याला चिकातील मक्याची आवश्यकता असते. बॅग किंवा बांधकामातील सायलेज (मुरघास ) साठी ६०-६५% ओलावा असलेलं मक्याचे पीक गरजेचं असते.
आता हे ६५% ओलावा कसा काय बरं ओळखावा ?
तर मक्याचं कणीस आडवा कापल्यावर दुधाची रेघ दिसते (मिल्क लाईन ) ती मक्याच्या दाण्याच्या अर्धा आणि पाऊण भाग याच्या मध्ये असली पाहिजे. तसेच मक्याचा पाला हातात घेऊन चोळला तर ओल लागली पाहिजे.

मुरघास निर्मिती – मिल्क लाईन – चिकातील मका
ही वेळ पीक पेरणीपासून ८०-९० दिवसांत येते.
पीक कापले ! आता पुढे काय ?
पीक कापणीनंतर ओलाव्याचे अतिरिक्त प्रमाण असेल तर थोडा वेळ ते सुकू द्यावे. २-३ तास सुकू द्यावे. कधी- कधी ४-५ तास सुद्धा वाळवावे लागते. ओलावा किती आहे हे पाहून सुकविण्याचा काळ ठरवावा.
त्यानंतर त्याची कडबा कुट्टी यंत्राने कुट्टी करावी. १-२ इंच बारीक तुकडे झाले पाहिजेत.
ह्या नंतर ती कुट्टी थेट बॅगेत किंवा बांधकामात भरावी.
लक्षात ठेवा! –> कोणत्याही परिस्थितीत कुट्टी केल्यानंतर चारा वाळू देऊ नये. त्यातील पोषणमूल्ये नाश पावतात.
मोठा खड्डा किंवा बांधकाम असेल तर कुट्टी थेट बांधकामात किंवा खड्ड्यात पडली पाहिजे आणि लगेच हवाबंद करण्यासाठी तुडवली किंवा press केली गेली पाहिजे.
मुरघास मध्ये काय काय मी मिक्स करू ?
मुरघासाचे कल्चर (मिश्रण) उपलब्ध असल्यास ते तुम्ही त्यावर दिलेल्या सूचनांनुसार वापरू शकता.
याव्यतिरिक्त ईतर गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर किंवा त्याबाबत चे अज्ञान यामुळे तुमचा मुरघास हमखास बिघडू शकतो.
म्हणूनच जर तुम्ही पहिल्यांदाच मुरघास बनविणार असाल तर मीठ, युरिया वगैरे काहीही त्यात टाकू नये.
फक्त आणि फक्त मक्याची कुट्टी बॅगेत किंवा बांधकामात टाकावी.
मुरघास निर्मिती – बॅगेत मुरघास भरताना !
या फोटोत दाखविलेल्या बॅग्स ६०० किलो च्या आहेत. साधारणतः ५ फूट उंचीच्या आहेत.

मुरघास निर्मिती – बॅग मुरघास
त्यात कुट्टी भरताना फक्त १-२ फुटाचा थर टाकावा आणि त्यानंतर तो चांगल्या प्रकारे तुडवावा म्हणजे त्यातील हवा निघून जाईल.
तुडविल्यानंतर पुन्हा १-२ फूटाचा थर भरून पुन्हा तुडवावा.
अशा प्रकारे बॅग भरताना प्रत्येक थर तुडवला गेला पाहिजे म्हणजे हवा पूर्ण निघून जाण्यास मदत होते, आणि चारा सडण्याची भीती राहत नाही.
त्यानंतर बॅगेचे तोंड गोळा करून त्यावर आधी चिंधी बांधावी आणि त्यानंतर त्यावर रस्सीने बांधून बॅग पॅक करावी. थेट रस्सी बांधल्याने बॅग कचून हवा आत घुसण्याची भीती असते.
मुरघास निर्मिती : खड्ड्यात मुरघास बनवताना
३ ते ५ फूट खोल खड्डा खणून त्यात मुरघास बनवावा. खड्डा खणताना काढलेली माती नंतर वर राहिलेल्याला थरावर झाकण्यासाठी उपयोगी पडते.
खड्ड्यात भरण्यापूर्वी, प्लास्टिक चा कागद अंथरावा. मका पीक कुट्टी करून थेट खड्ड्यात पडला पाहिजे.
कुट्टी एका ठिकाणी आणि खड्डा लांब किंवा दुसऱ्या ठिकाणी असे करू नये. पहिल्या प्रयत्नात कोणतेही अतिरिक्त पदार्थ मिसळू नये. फक्त कुट्टी केलेला मका.
खड्ड्यात मका पडल्यानंतर ट्रॅक्टर ने तो तुडवावा, प्रत्येक १-२ फुटाचा थर टाकला कि व्यवस्थित तुडवून घ्यावे, जेणेकरून हवा निघून जाईल.
खड्ड्याचे कोपरे किंवा जिथे ट्रॅक्टर पोचू शकत नाही अशा जागेवर माणसांनी स्वतः तुडवावे.
शेवटचा थर तुडवल्यानंतर प्लास्टिक कागदाने वरून झाकून घ्यावे आणि माती टाकून खड्डा संपूर्णतः झाकून घ्यावा.
पावसाचे पाणी साठणार नाही अशा ठिकाणीच खड्ड्यातील मुरघासाचे नियोजन करावे.
अहो, मी एका गाईला किती मुरघास चारावा? आणि मी वर्षभरासाठी किती चारा साठवून ठेवू ?
अंदाजे एका गाईला तिच्या वजनानुसार २० तें २५ किलो मुरघास रोज लागतो.
म्हणजे वर्षातील ३६५ दिवसासाठी ९१२५ किलो म्हणजे ९ टन चारा लागेल. ५०० किलोच्या १८ बॅग भराव्या लागतील.
म्हणजेच एका गाईच्या वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याची सोय करण्यासाठी २० गुंठ्यांमध्ये मका पेरावा लागेल. फक्त ६ महिन्यांसाठी नियोजन असेल तर १० गुंठे मका एका गाईसाठी पुरेल.
तुम्ही जर सायलेज किंवा मुरघास केला असेल किंवा करत असाल तर आम्हाला प्रतिक्रियांमधून कळवा.
तुम्ही समजावले, पण तरीही मुरघास बनविणे आम्हाला खूप किचकट वाटते.
हरकत नाही !
पुढील व्हिडीओ पहा – बॅग मुरघास निर्मिती .
या व्यतिरिक्त कोणत्याही शंकांसाठी या पेजवर खाली कॉमेंट क्षेत्रात प्रतिक्रिया लिहा.
—————————————————————————————-
तुम्हाला हेही वाचायला आवडेल : दुग्धव्यवसायातील यशाची चतुःसूत्री
—————————————————————————————–
गोठ्याचे उत्तम व्यवस्थापन, जातिवंत गाय निर्मिती, सर्व प्रकारचा गोठ्यातील हिशेब, आणि दुग्धव्यवसाय संबधी माहिती, तसेच उत्पादने साठी खालील लिंक वरून पॉवरगोठा डेअरी फार्म मॅनेजमेंट ॲप डाउनलोड करा.
दिपक भोसले
मार्च 20, 2021 at 2:22 am10 गुंठे मक्का आहे 50kgच्या किती बँग लागतील
नाना गराडेकर
सप्टेंबर 13, 2020 at 3:48 pmमकेची कणीस काढून उरलेल्या कणीस-विरहित मकेचा मुरघास करता येईल का ?
Bhausaheb Shirole
मे 30, 2020 at 2:41 amInspired
Lahu रकटे
मे 9, 2020 at 7:30 amमुरघास बद्दल पूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे…
मला एक प्रश्न आहे की सध्या माझ्या कडे ज्वारी चा कडबा खूप आहे तर मला त्या पासुन मुरघास करता येइल का तरी याबद्दल मला मार्गदरशन करावे .
धन्यवाद
अमोल बिबवे
एप्रिल 22, 2020 at 1:57 pmसर बनवलेला मुरघास हा साधारण किती दिवसात खाण्यासाठी सुरू करावा आणि किती दिवसांपर्यंत टिकून राहतो तसेच 500 kg ची बॅग फोडल्यानन्तर किती दिवसांत संपवली पाहिजे?
सुरज भणगे
एप्रिल 22, 2020 at 9:40 amमूरघास बॅग पाहिजेत
विशाल चव्हाण
एप्रिल 22, 2020 at 3:34 amछान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
Aniket chavan
एप्रिल 22, 2020 at 2:06 amकिती दिवस मका बॅग मध्ये भरून ठेवायचा
सुय॔कांत नरसिंगराव शेळके
एप्रिल 21, 2020 at 6:56 amपाच टन मुरघास लागेल. दर पाठवा.
टीम पॉवरगोठा
एप्रिल 21, 2020 at 7:34 amhttp://murghas.com येथे मुरघास विक्रेत्यांची यादी आहे.
Santosh uddhav mulik
एप्रिल 21, 2020 at 6:55 am1 एकर मका कुटी साठी किती फुट जागा लागते
ओंकार यादव
एप्रिल 21, 2020 at 5:00 amसर आपण इतकी छान माहिती दिल्याबद्ल मी आपला मनापासून आभारी आहे.
सर मुरघास खराब झ्हाला हे आपल्याला कशावरून समजतं नेमक काय होत ते आम्हाला कळवावे
धन्यवाद
टीम पॉवरगोठा
एप्रिल 21, 2020 at 7:33 amबुरशी लागते. किंवा बुरशी सदृश होतो चारा.
उघडल्यावर लक्षात येते.
जनावरांना खाण्यास अयोग्य.
रमेश चंद्रकांत म्हसे
एप्रिल 22, 2020 at 1:55 amखूप चांगली माहिती आहे सर मी आता 4 बॅग मोरघास केला आहे पण त्यात मी मीठ वापरलेआहे
Sanchit Mohan Nikam
फेब्रुवारी 15, 2020 at 4:49 amSir maji pahili vel aahe murghar tayar karnyachi tari me tyamadhe Mix kay karu aani kiti pramanat karu tyachbarober mala bag kute bhet til.
राज गोट फार्म
नोव्हेंबर 1, 2019 at 4:13 amसर पॉवर गोठा ॲप वर ५०/१०० किलो मुरघास उपलब्ध आहेत का तिथे फक्त ६०० आणि १००० किलो च्या बॅग दाखवत आहेत.
Sahil lokhande
ऑक्टोबर 8, 2019 at 5:49 amMurghasasathi konti maka chi lagvad karavi
Sanjay Kapare
एप्रिल 15, 2020 at 9:57 amVery Nice, Motivating.
Thank You…!!!
मुरघास निर्मिती – पॉवरगोठा-PowerGotha
सप्टेंबर 14, 2019 at 12:03 pm[…] माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा प्रत्यक्ष मुरघास निर्मिती २ […]
SAIRAJ VISHWAS DAINGADE
ऑगस्ट 27, 2019 at 5:03 pmI want one day training for making murghas ,what is the process to get training by u
Sahil lokhande
जुलै 20, 2019 at 5:35 amBag kute miltat
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 4, 2019 at 9:37 amApp download kara ani you can order through app
गावडे संजय मारूती
जून 22, 2019 at 10:05 amमूर घास तयार करताना ताक व गुळाची पाणी शिपडावे का
कुमार हासे
मे 5, 2019 at 10:49 amमुरघास बँग बंद करते वेळी शेवटी वाळलेली कुट्टी टाकावी का?
टीम पॉवरगोठा
मे 11, 2019 at 12:56 amनाही
फक्त आणि फक्त ६०-६५% पाणी असलेला ओला चारा मुरघास बॅगेत असावा. योग्य तऱ्हेने हवाबंद करावा.
टाकायचाच असेल तर सायलेज कल्चर टाकू शकता.
Dhananjay Nimbalkar
डिसेंबर 9, 2018 at 12:25 pmWhere could I get these empty bags both polythene as well as outer bag ? What is its cost in the market? I don’t have space to keep one ton bag or I don’t have bigger space to make more moorghas pls advise
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 11, 2018 at 12:16 amCall on 9112219612
Mahesh
नोव्हेंबर 26, 2018 at 4:20 pmMala hattighas kinva usachevade murghas banvanyasathi vaparta yeil ka
टीम पॉवरगोठा
नोव्हेंबर 28, 2018 at 12:45 amहो येतात,
ऊसाचे वाडे शक्यतो वापरू नयेत.
गौरव चापले
ऑक्टोबर 28, 2018 at 1:54 pmसर कनीस पण कुट्टी करायचे आहे का?
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 28, 2018 at 3:50 pmनक्किच करायचे
त्यात प्रथिने आहेत
गणेश क्षीरसागर
एप्रिल 23, 2020 at 2:50 amगुळ टाकला तर चालेल का
shreenivas Dengale
ऑगस्ट 16, 2018 at 7:09 ammurghas 50kg bags miltil ka ?
दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ? – पॉवरगोठा-PowerGotha
जुलै 23, 2018 at 2:30 pm[…] मुरघास निर्मिती -२ […]
Nitin
मार्च 20, 2018 at 5:07 amSir mla jwari cha murghas banvaycha aahe chalel ka
धिरज भोसले
फेब्रुवारी 9, 2018 at 11:14 pmमुरघासाचे फायदे काय आहे ? उत्तर अपेक्षित
madan dhakne
जानेवारी 31, 2018 at 8:08 amखुप छान माहीती आहे.
प्रशांत खजाने
डिसेंबर 30, 2017 at 7:01 amधन्यवाद #TEAMPOWERGOTHA आपण पुरवत असलेली माहिती खूप उपयुक्त असून सर्व शेतकऱ्यांसाठी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे. मि प्रशांत खजाने,राहणार औरंगाबाद . आपल्या वेबपेज चा नियमित पाठक आहे. माझ्याकडे १५ देशी गायी असून सध्यातरी आम्ही मुरघास विकत घेतो आहोत , लवकरच अजून २० गायी घेण्याचा आमचा मानस असून, आमची मुरघास निर्मिती ची इच्छा आहे, प्रायोगिक तत्वावर १५ गायींसाठी मुरघास बनवायचा असून त्या साठी साधारण किती एकरात मक्याची लागवड करावी? मक्याचे कुठले बी वापरावे? ह्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
email: [email protected]
Prasanna
डिसेंबर 9, 2017 at 7:02 pmSir mazykade Makka nhi. Mi makkyachi kutti vikat gheun Murghas banvu shakto ka. Agar ho aslyas mi kashya prakarchi Kutti vikat ghyayla pahije
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 11, 2017 at 1:23 amमका विकत घेऊन मुरघास बनवा, कुट्टी नाही. तुऱ्यात आलेला मका १-२ रुपये किलो ने मिळेल.
नंतर त्याची बॅग भरण्यापूर्वी कुट्टी करावी. कुट्टी जास्त वेळ वाळू द्यायची नसते.
Prasanna
डिसेंबर 9, 2017 at 6:54 pmSir mazyakade maka nhi mi makkyachi Kutti vikat gheun Murghas tayar karu shakto ka
वैभव संपत शिंदे
नोव्हेंबर 16, 2017 at 3:19 pmसर मला पण मुरघास करायचंय माझा हा पहिलाच प्रयत्न आहे माझ्याकडे 40 गुंठे मका आहे मला मार्गदर्शन करावे
टीम पॉवरगोठा
नोव्हेंबर 21, 2017 at 6:56 amमुरघास निर्मिती साठी 9112219603 येथे कॉल करा.
Bhimrav bhavar
ऑक्टोबर 30, 2017 at 4:10 pmSir 1 ekarala Kiti kharch yeto
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 31, 2017 at 12:24 am१ एकर मध्ये १८-२२ टन चारा तयार होतो. मका तयार करण्याचा खर्च तुमचा तुम्हाला माहित असेल. मका तयार करण्यास अंदाजे १-२ रुपये खर्च पकडला आणि अजून १-२ रुपये कुट्टी करून बॅग भरण्यासाठी पकडला तर अंदाजे ८० हजार ते १ लाख पर्यंत खर्च येईल. त्यात तुमच्या २ गाईंचा १८-२० महिन्याचा हिरवा चारा साठवून ठेवला जाईल.
हे सर्व आकडे अंदाजे असून प्रत्यक्ष खर्चात फरक येऊ शकतो.
सर्व प्रक्रिये नंतर मजुरी, कष्ट आणि सोय या गोष्टी लक्षात घेतल्या तर मुरघास अतिशय फायदेशीर ठरतो.
दत्तात्रय कोंढारे
ऑक्टोबर 30, 2017 at 11:21 amMala pn banvycha ahe
Anil Narake
ऑक्टोबर 9, 2017 at 11:46 amसर मुरघास मका,शाळू याच्या व्यतीरिक्त आणि कशाचा बनवतात ?
श्री बापूसाहेब सोपान तांबे
ऑक्टोबर 9, 2017 at 6:07 amपावरगोठा टिमचे खुप खुप धन्यवाद! पशुपालकांना ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद
Akshay s kawale
ऑक्टोबर 8, 2017 at 4:32 pm50 shelya sathi murghas tyar karycha aslyas ,
Kiti yek kar maka lava lagel
Akshay s kawale
ऑक्टोबर 8, 2017 at 4:31 pm50 shelya sathi murghas tyar karycha aslyas ,
Kiti yek kar maka perava lagel
vikas jadhav satara
ऑक्टोबर 8, 2017 at 8:38 amGood information sir
Mayur Rangnath Pagire
ऑक्टोबर 8, 2017 at 8:33 amकणसे काढलेली मका मुर घासासाठि चालते का
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 8, 2017 at 11:14 amचालेल, पण त्यातली शक्ती कमी झालेली असेल, खरी शक्ती कणसांमध्ये असते,
कणसांसकट च मुरघास करावा.
Santosh unde
ऑक्टोबर 8, 2017 at 7:21 amमि संतोष उंडे. रा.मातापुर, तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर.
मुरघास तयार करण्यासाठी सर्व प्रथम चांगली वाढ झालेली हिरवीगार मका असावी. मकेची ट्रॅक्टर चलीत मशीन किंवा मोटार चलीत मशीनच्या साहाय्याने एकाच वेळी सर्व बारीक कुट्टी करून घ्यावी. त्यात गुळाचे पाणी मिठ चवीनुसार टाकून घ्यावे अशा प्रकारे तयार झालेली कुट्टी बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या 600ते800किलो वजनाच्या बॅग घेऊन त्यात आतून प्लास्टिक पेपर वापरून कुट्टी माणसाच्या साह्याने दाबून भरावी. तसेच दुसरा पर्याय असा खड्डा खणून प्लास्टिक पेपर वापरून कुट्टी माणसाच्या साह्याने दाबून भरावी. 45 दिवसानंतर जनावरांना खाण्यास सुरुवात करावी. हा मि माझा अनुभव सांगत आहेत. फोन नंबर 9766017194
Ramesh
सप्टेंबर 20, 2017 at 10:51 amमला मुरघास बनवण्यासाठी 50 किलोच्या बॅग हव्या आहेत त्या कुठे मिळतील कृपया पत्ता द्यावा
Ramesh
सप्टेंबर 20, 2017 at 10:50 amबॅग मधील मुरघससाठी कोणते मिनरल मिक्सचर वापरावे
राहुल अर्जुन खुळे
सप्टेंबर 16, 2017 at 2:53 pmबॅग मधील मुरघससाठी कोणते मिनरल मिक्सचर वापरावे
Mahadev Balkrishna Dodke
सप्टेंबर 11, 2017 at 3:34 pmMi agri diploma kela aahe mala ya madhe business Karu sakto ka tyabadal mahit Mikel ka
Ajinkya badakh
सप्टेंबर 4, 2017 at 4:36 amMurghasacha rate kiti aahe 500k.g cha
संजय कोरडे मु.सिंगापुर ता पुरंदर जि.पुणे
सप्टेंबर 2, 2017 at 10:05 amखूप छान माहिती मिळाली सर
संजय केदा शिरसाठ
ऑगस्ट 26, 2017 at 9:09 amसर,शेळी पालन मूरघास वर करू शकतो .तुम्ही शेळ्या साठी लागणारी कुटी तयार करून देतात .मो .न.९४०३४६०२७०
Dr. Vijay Nilkanth
ऑगस्ट 21, 2017 at 7:27 amkonti maka (Breeds of Maize or any other) murghas sathi changli aaste ??
kiti divsanchi maka murghas sathi yogya aahe ?? milk line kiti divsani yete?
Silage culture cha akhada changla brand?
Dr. Madhav Kusekar
ऑगस्ट 8, 2017 at 9:06 amNice information.
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 8, 2017 at 1:46 pmधन्यवाद सर
विजयसिंह देशमुख.
ऑगस्ट 6, 2017 at 11:03 pmThanks for your valuable guidance.
विजयसिंह देशमुख.
ऑगस्ट 6, 2017 at 10:53 pmसर, मी ५०किलो च्या ब्यागेत मुरघास बनवने साठी लागणार्या मशिनरी ,ब्याग इत्यादिचे शोधात आहे.बरिच माहीती मिळाली आहे, व्यावसायिक स्तरावर मला हा प्रोजेक्ट करावयाचा आहे.प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी व ईतर बाबींचे सखोल मार्गदर्शन व सल्ला हवा आहे.तरी कृपया सहकार्य करावे हि विनंती
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 7, 2017 at 11:56 amसर,
नक्कीच तुम्हांला सर्व मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल.
कृपया पुढील लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरा. –> येथे क्लिक करा
विजयसिंह देशमुख.
ऑगस्ट 11, 2017 at 2:07 pmसर, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, कृपया सहकार्य करावे अशी विनंती करतो.
पॉवरगोठा टीम
ऑगस्ट 11, 2017 at 5:44 pmसर, तुमचा ई-मेल चेक करा.
टीम चा कॉल येईल तुम्हांला
Rohidas khairnar
एप्रिल 23, 2020 at 1:28 amसर मुरघास बकरी खातात का बकरींसाठी कोणता मुरघास वापरावा
अशोक काळे
ऑगस्ट 4, 2017 at 11:41 pmमुक्त संचार गोठ्याची माहिती पाहिजे
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 7, 2017 at 12:13 pmसर,
मुक्त-संचार गोठ्याचे लेख येथे (मुक्त गोठा फोटो) आणि येथे (गोठ्याची माहिती) क्लिक करून वाचा
अधिक माहिती साठी येथे क्लिक करून फॉर्म भरा
sudhir deshmukh
ऑगस्ट 4, 2017 at 12:35 pmSir murghas sathi gul ani yurya minaral mixar solt kiti v kase vaprave
Pawan
जुलै 24, 2017 at 1:00 pmThanks for your valuable guidance
Akshay
जुलै 22, 2017 at 11:13 amMurghasachi bag kute milel ani 500kg chi bag kiti rupies la milel Ani ho eka cow la kiti murghas dhyava 25-30Kg dila tar bakiche kahi chara dhyava lagel ka sir
पॉवरगोठा टीम
ऑगस्ट 7, 2017 at 12:18 pmलवकरच बॅग उपलब्ध करून देऊ.
गाईला मुरघास म्हणजे ओला चारा, याबरोबरच सुका चारा तसेच पशुखाद्य सुद्धा द्यावे.
nikhil
जून 17, 2017 at 5:43 amsir gai ani mhashi sathi lagnarya murghasheche praman vegle aheka aheka
पॉवरगोठा टीम
जून 21, 2017 at 1:13 amनिखिल जी,
गाई आणि म्हशींना त्यांच्या वजनानुसार मुरघास खायला द्यावा. २०-२५ किलो पर्यंत मुरघास किंवा हिरवा चारा तुम्ही रोज देऊ शकता.
पांडुरंग
जून 2, 2017 at 1:18 amमला मुरघास बनवण्यासाठी 50 किलोच्या बॅग हव्या आहेत त्या कुठे मिळतील कृपया पत्ता द्यावा
-Powergotha Team
जून 2, 2017 at 4:05 amSaheb
7588330163
Ya number var call Kara
nitesh bhiwapure
मे 27, 2017 at 2:21 pmnice
Er. B.M.Veer
मे 24, 2017 at 4:39 pmHya veles 2 acre mdhe murghas karnar aahot… pehlyanda murghas tyar krnar aahot tri aapn shetavr yeun jr murghas bnvaych prshikshn dil tr br hoil….
टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 7, 2017 at 12:21 pmबनवायच्या वेळी, आगाऊ दिवस पॉवरगोठा टीम ला ई-मेल किंवा कॉल करून ट्रेनिंग ठरवा.
Suhas
मे 24, 2017 at 11:25 amDhanyawad powergotha