मुक्त गोठ्याची रचना करताना करायच्या सोप्या ५ युक्त्या (मुक्त संचार गोठा डिझाईन Mukta Sanchar Gotha Design ) बरेचदा पशुपालक शेतकरी विचारणा करतात की मुक्त गोठ्याचा प्लॅन, किंवा डिझाईन पुरवा म्हणून. शक्यतो प्रत्येकाची उपलब्ध जागा आणि इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने एक ढोबळ, ठोकळा प्लॅन देणे अवघड ठरते. आपापल्या परसातील, गोठ्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर शेतकऱ्यांचे गोठे पाहून मुक्त गोठ्याची रचना केलेले फायदेशीर ठरते. पॉवरगोठा करायचा असेल तर हे करताना खालील ५ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि अंगभूत कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळेल. #१ मुक्त गोठ्याचा आकार मुक्त गोठ्याचा आकार आणि डिझाईन तुमच्या सध्याच्या गोठ्याची रचना आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या […]
पुढे वाचा
मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत. चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो. सांगू ना ? मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो. का ? ते ठाऊक आहे का ? अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात. नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई […]
पुढे वाचा
दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते. मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत. अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!! तुमची का-कु आली लक्षात ! सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी फार्म मॅनेजमेंट नोंदवही तुमची मदत करू शकते. तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ? अशी टेक्नॉलॉजि आहे का ? तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल […]
पुढे वाचा
मधमाशा मध का साठवतात ? आणि मध कधीच खराब का होत नाही? मध मधुर म्हणजे उच्च प्रतीच्या, उच्च तीव्रतेच्या शर्करांनी युक्त असतो. मधमाशा मिनिटाला ११००० पेक्षा जास्त वेळा पंख फडफडवत असल्याने त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते. हि गरज असा उच्च शर्करायुक्त मध पूर्ण करू शकतो. ज्या काळात फुलांना बहर नसतो, त्या काळात त्यांना अन्नाची कमी पडू नये, म्हणून मधमाशा त्यांच्या पोळ्यामध्ये मध साठवणूक करतात. अति थंडीच्या ठिकाणी हिवाळ्याची ही सोय असते. तुम्हाला माहिती आहे का, की मधाला शक्यतो एक्सपायरी डेट नसते. कधीच मध खराब होत नाही. ना जिवाणू ना बुरशी लागते. बरे हा मध, खराब का […]
पुढे वाचा