दूध दर खाली वर होताना बऱ्याच वेळा बोलले जाते की पिण्याचे पाणी देखील २० रुपये लिटर ने मिळते, आणि दुधाची किंमत त्यापेक्षाही कमी आहे. हे बोलणारा आणि ऐकणारा त्याचा राग व्यक्त करत असतो. केलेल्या मेहनतीचा योग्य परतावा न मिळणे याबद्दल आलेल्या निराशा आणि रागातून असे व्यक्त होते आणि ते साहजिकच आहे. पण हे योग्य आहे का ? खरच दुधाची किंमत पाण्यापेक्षा कमी केली जाते का ? उत्तर देण्याआधी एक गोष्ट वाचू चला (उत्तर लेखाच्या शेवटी आहे, पूर्ण लेख नीट समजून वाचला तरच उत्तर समजेल आणि तुमचे जीवन ही बदलून जाईल) गोष्ट अशी – गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चालले असताना अनुयायांनी […]
पुढे वाचा
अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमचे महिन्याला प्रति गाय हजारो रु आणि दिवसाला १ लिटर पर्यंत दूध हानी वाचवू शकते ? पुढे वाचा. विचार करा, कारखाना तुम्ही चालवताय आणि आत मध्ये दुसरीच कंपनी तुमच्या कच्च्या मालापासून आपले उत्पादन तयार करत आहे. भरीस भर म्हणून कारखाना आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी देखील खराब होते आहे, ज्याचा तुम्हाला दंड बसत आहे. कारखाना आजारी पडतो आहे. दूध-व्यवसायात हे कसे होते ? आदरणीय पाहुण्यांमुळे. कोण आहेत हे आगंतुक ? यांचे नाव काय ? जंत – परजीवी, कृमी, parasite, worm इत्यादी मित्रांनो, शाळेत शिकलो आहे, मातीत किंवा घाणीत हात घालून त्यावाटे आपल्या पोटात जंत […]
पुढे वाचा
Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti काही वेळा काही साध्या गोष्टी आपण क्लिष्ट किचकट करून टाकतो. दुग्ध-व्यवसाय भलेही थोडा किचकट आणि अवघड असेल, पण त्यात नफा कमविण्याचे शाश्वत मार्ग आहेत. ते काटेकोरपणे पाळले तर प्रत्येक जण नफ्यात धंदा करू शकतो. काय आहेत त्या ७ गोष्टी ज्याने तुमचा धंदा किफायतशीर होऊ शकतो. #१ मुक्त संचार गोठा – कमी खर्च, कमी कष्ट मुक्त गोठ्यात, गाईंना फिरण्याचे स्वातंत्र्य आणि २४ तास स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. गाईंना बंदिस्त, तणावपूर्ण जीवनापासून आणि मालकाला गाईची जागा बदलणे, शेण उचलणे, गाई धुणे, खरारा करणे आदी कष्टदायी कामांपासून मुक्तता मिळते खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ […]
पुढे वाचा
मुक्त गोठ्याची रचना करताना करायच्या सोप्या ५ युक्त्या (मुक्त संचार गोठा डिझाईन Mukta Sanchar Gotha Design ) बरेचदा पशुपालक शेतकरी विचारणा करतात की मुक्त गोठ्याचा प्लॅन, किंवा डिझाईन पुरवा म्हणून. शक्यतो प्रत्येकाची उपलब्ध जागा आणि इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने एक ढोबळ, ठोकळा प्लॅन देणे अवघड ठरते. आपापल्या परसातील, गोठ्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर शेतकऱ्यांचे गोठे पाहून मुक्त गोठ्याची रचना केलेले फायदेशीर ठरते. पॉवरगोठा करायचा असेल तर हे करताना खालील ५ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि अंगभूत कराव्यात म्हणजे जास्तीत जास्त फायदा मिळेल. #१ मुक्त गोठ्याचा आकार मुक्त गोठ्याचा आकार आणि डिझाईन तुमच्या सध्याच्या गोठ्याची रचना आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या […]
पुढे वाचा
दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या (tips for Success Dairy Farming in Maharashtra) #काय आहे गुपित दुग्ध व्यवसायातील यशाचे? स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात. जरा विचार करा – मेहनतीने कमविलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामी होणे, एखादी लस विसरल्याने मरतुक होणे, किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते भांडवलाचे पैसे अक्षरशः महिन्या-२ महिन्यांत फुंकले जातात. दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते. असो, दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या आहेत. […]
पुढे वाचा
मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत. चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो. सांगू ना ? मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो. का ? ते ठाऊक आहे का ? अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात. नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई […]
पुढे वाचा
दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते. मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत. अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!! तुमची का-कु आली लक्षात ! सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी फार्म मॅनेजमेंट नोंदवही तुमची मदत करू शकते. तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ? अशी टेक्नॉलॉजि आहे का ? तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल […]
पुढे वाचा
मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची […]
पुढे वाचा