पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते. वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे
पुढे वाचा
देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती, त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे. म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे. ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. १. खिल्लार गाय सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. !!!! मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय ! खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये. ही दुष्काळी जात […]
पुढे वाचा
मित्रहो, खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा ! प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो. बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते. आम्ही पॉवरगोठा.कॉम वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो आहोत. कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते. लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा कसा ? आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे : ३ प्रकारचे आर्थिक […]
पुढे वाचा
शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत. इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]
पुढे वाचा
गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित तंत्रज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देऊन तुमच्या गाईंची गळाभेट करण्यास नवीन वर्षापासून निघाले आहेत. त्यांच्याकडे तुमची माहिती (डेटा) गोळा करण्यासाठी ५०,००० टॅब्लेट्स दिले गेले आहेत. हा टॅग किंवा बिल्ला कसा असेल ? जनावरांचे टॅग पिवळ्या रंगाचा बिल्ला असून त्यावर १२ आकडी ओळख क्रमांक असेल तो ८.८ […]
पुढे वाचा
जातिवंत संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ आणि जातिवंत गाई असाव्यात. उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा व मुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो . परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त होते. कमी दुध देणारी व रोगप्रतिकारक शक्ति कमी असणारी जनावरे, कितीही चांगल्या सुविधा पुरवल्या तरी हा व्यवसाय फायदेशीर करु शकत नाहीत. म्हणून आपल्या गोठयात जातिवंत संकरीत गाय असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की, जातीवंत गाय कोठे शोधायची? ती एक तर खात्रीलायकरीत्या मिळणार नाही आणि […]
पुढे वाचा
मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची […]
पुढे वाचा