दंगल, हंगेरी, आणि दुग्धव्यवसाय ?? काय बोलताय काय ? उत्कंठावर्धक गोष्ट आहे, शेवटपर्यंत वाचा. १९६० च्या दशकात लाझलो पोल्गर यांनी आपल्या होणाऱ्या बायकोला पत्रे लिहिली. त्यात लग्नासाठी एक अट घातली. होणाऱ्या मुलांना तुफान प्रतिभाशाली बनवायचे या एकाच उद्देशाने आपले लग्न असेल. क्लारा यांनी ती मान्य केली. युक्रेन सोडून क्लारा लाझलो यांच्याकडे हंगेरी मध्ये आल्या. दोघे मिळून कोणती कला किंवा विषय धरून मुलांना प्राविण्य द्यायचे याबद्दल विचार करत होते. बहुभाषी बनवायचे (खूप साऱ्या भाषा येणारी मुले) की गणिती पंडित बनवायचे – मुलगी झाली तर १९६०-७० च्या काळात महिला गणितज्ञ कोणीच नव्हते, खूप प्रसिद्धी मिळाली असती. पण त्यांनी तिसरा पर्याय निवडला. कोणता […]
पुढे वाचा
मुक्त गोठा आणि त्याचे महत्त्व या विषयी पॉवरगोठा मधून बरेचदा लिहिले आणि बोलले गेले आहे. मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती, फोटो मिळावे या साठी भरपूर पशुपालक मित्रांचे संदेश, ई-मेल, वेबसाईट वर कमेंट रुपी विनंत्या आल्या आहेत. चांगल्या दुग्ध-व्यवसायासाठी मुक्त गोठा आणि सोप्या युक्ती (Dairy Farming Maharashtra) आज मुक्त गोठ्यामधील छोट्या परंतु भरपूर लाभदायक १ युक्ती तुम्हांला सांगू इच्छितो. सांगू ना ? मुक्त गोठ्यात गाई संभाळल्यामुळे गाई निरोगी राहतात असे आम्ही म्हणतो. का ? ते ठाऊक आहे का ? अर्थातच याआधी सांगितलेल्या आणि वेबसाईट वर लिहिलेल्या गोष्टी – गाई स्वच्छंदी, तणावमुक्त राहतात. नेहमी कोरड्या जागी बसतात त्यामुळे स्वच्छ राहतात. कास ओली होत नाही आणि गाई […]
पुढे वाचा
नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे. दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल. त्याच बरोबर त्यांच्या विरोधी मत असणारे आणि त्यांना परावृत्त करणारे दूध व्यावसायिक सुद्धा भरपूर आहेत. कारण एकच – दूध धंदा परवडत नाही. आधीच दुष्काळ, मुरघास केलेला नाही, लाळ्या खुरकूत ची साथ, वर्षभर कमी राहिलेले दूध दर आणि सतत आजारी पडणारी जनावरे. […]
पुढे वाचा
दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते. मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत. अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!! तुमची का-कु आली लक्षात ! सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी फार्म मॅनेजमेंट नोंदवही तुमची मदत करू शकते. तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ? अशी टेक्नॉलॉजि आहे का ? तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल […]
पुढे वाचा
काय नाव: ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) कशासाठी: (प्रकार) उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर ) ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड आइलैंड ह्या बेटावर उगम तेथून निवडक पैदाशी द्वारे जगभर प्रसारीत. इंगलंड मधील काळ्या छातीचे मलय कोम्बड्यांन पासून ही जात तयार करण्यात आली अशी इतिहासात नोंद आहे. अमेरिका आणि उपराष्ट्रामधे मुक्त पद्धतिने अंडी उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध जात आहे. कुठे मिळेल : (उपलब्धता) सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात अनेक […]
पुढे वाचा
कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेतील हा अजून एक लेख. देशी कुक्कुटपालन करताना शेतकरी वर्गाला पडणारे १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. खाली वाचा. 1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ? जातीची निवड ही कोंबडीची उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी. प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा. मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते 1. मांस उत्पादक गिरीराजा वनराजा श्रीनिधी कलिंगा ब्राउन कुरोइलर 2. अंडी उत्पादक रौड आइलैंड रेड ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प देलहम रेड स्वर्णधारा ग्रामप्रिया ग्रामश्री मंजुश्री ब्राउन लेगहॉर्न 3. दुहेरी वापराच्या […]
पुढे वाचा
दुग्ध-व्यवसायाची तुम्हाला कितपत माहिती आहे. हे एक मजेशीर क्विझ खेळून पहा. पहा तुम्ही पाचवी पास आहात का अव्वल नंबर चे एक्सपर्ट. मुक्त गोठा, मुरघास, गव्हाण, संकरित गाय अशा सोप्या साध्या कल्पनांवर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे.
पुढे वाचा
शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत. इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]
पुढे वाचा
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत – बॅगेतील मुरघास निर्मिती. चिकातील मक्यापासून अतिउत्तम मुरघास छोट्या छोट्या ४०-४५ किलो च्या बॅगेत भरला जातोय. हायड्रोलिक मशीन ने व्हॅकुमिंग करून सायलेज बॅग मधील हवा काढली जाते. ४५ दिवसांनी चारा तयार होतो आणि बॅग उघडली कि ५० दिवसात तो संपवावा लागतो. बॅग लहान असल्याने एकट्या माणसाला किंवा स्त्रीला सुद्धा ती उचलता येते. ६-८ रुपये प्रति किलोंनी हा चारा विकला जातो. श्री शैलेश राचकर, रा विझोरी, माळशिरस, सोलापूर यांच्या सहयोगाने आणि डॉ शैलेश मदने यांच्या समवेत पॉवरगोठा.कॉम.
पुढे वाचा