शहरातील सुशिक्षित जनता जीव धोक्यात घालून सूचना डावलून सुपर मार्केट आणि किराणा समोर चिकटून लाईन लावत असताना, एक सुंदर चित्र महाराष्ट्रातील डेअरीत पाहायला मिळाले दूध जमा करायला आलेले शेतकरी अतिशय संयमाने एकेमकांपासून ३-४ फूट अंतरावर उभे आहेत, डेअरी ने देखील लक्ष्मणरेखा आखून या प्रक्रियेला सोपे केले आहे. मित्रांनो याला सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे असं नाव दिले गेले आहे. कोरोना विषाणू ला रोखण्याचा हा एक अप्रतिम उपाय आहे. ३ फुटांपेक्षा जास्त दूर विषाणू पसरत नाही. म्हणून प्रसार टाळण्यासाठी असे अंतर ठेवून वागण्याचा सल्ला दिला जातो. ब्रीदवाक्य – शक्यतो घराबाहेर पडू नये आणि खूपच अनिवार्य काम असेल तर, अशा प्रकारे […]
पुढे वाचा
लॉक डाऊन दिवस क्र १ नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा काल रात्री २४ मार्च २०२० रोजी ८ वाजता केली. आज पासून पुढील २१ दिवस आपल्याला ही बंदी निभवायची आहे. लॉकडाऊन का जरुरी आहे, त्यावर उहापोह पोस्ट च्या शेवटी आहे. तत्पूर्वी आपण हे २१ दिवस सत्कारणी कसे लावू शकतो हे पाहू. या संपूर्ण बंदी मधून मूलभूत सेवा आणि वस्तू वगळल्या असून दूध त्या वगळलेल्या वस्तूंमध्ये समाविष्ट आहे. म्हणून आपली हालचाल दुग्धव्यवसाय चालवण्यापुरती चालू राहील. बाकीच्या सर्व हालचाली बंद होऊन आपण जास्तीत जास्त वेळ घरात घालवावा लागेल. हेच अपेक्षित आहे आणि हाच […]
पुढे वाचा
नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे. दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल. त्याच बरोबर त्यांच्या विरोधी मत असणारे आणि त्यांना परावृत्त करणारे दूध व्यावसायिक सुद्धा भरपूर आहेत. कारण एकच – दूध धंदा परवडत नाही. आधीच दुष्काळ, मुरघास केलेला नाही, लाळ्या खुरकूत ची साथ, वर्षभर कमी राहिलेले दूध दर आणि सतत आजारी पडणारी जनावरे. […]
पुढे वाचा
दूध-धंदा करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुधाचा उत्पादकाला मिळणारा दर . दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात. जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि उदाहरणार्थ 2018 मध्ये तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर खाली होते. शासन निर्णयाप्रमाणे दर लागू झाले नसल्यास 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत होता. २०२० मध्ये ही लॉक डाऊन संकटामुळे काही ठिकाणी दर कमी झाले आहेत. मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय दूध-धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की. लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर […]
पुढे वाचा
दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते. मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. हो , आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत. अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!! तुमची का-कु आली लक्षात ! सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन डेअरी फार्म मॅनेजमेंट नोंदवही तुमची मदत करू शकते. तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ? अशी टेक्नॉलॉजि आहे का ? तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल […]
पुढे वाचा
पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते. वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे
पुढे वाचा
देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती, त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे. म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे. ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. १. खिल्लार गाय सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. !!!! मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय ! खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये. ही दुष्काळी जात […]
पुढे वाचा
आपण येथील –> मुरघास निर्मिती लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली. तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले. आज आपण पाहूया प्रत्यक्ष मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू. मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू. एका एकरात किती चारा तयार होतो ? एका एकर जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड […]
पुढे वाचा
मित्रहो, खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा ! प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो. बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते. आम्ही पॉवरगोठा.कॉम वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो आहोत. कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते. लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा कसा ? आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे : ३ प्रकारचे आर्थिक […]
पुढे वाचा
शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत. इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]
पुढे वाचा