नोंदवही Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

नोंदवही

दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण

Deworming in cows marathi | डी-वर्मिंग जंतनिर्मूलन

अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमचे महिन्याला प्रति गाय हजारो रु आणि दिवसाला १ लिटर पर्यंत दूध हानी वाचवू शकते ? पुढे वाचा. विचार करा, कारखाना तुम्ही चालवताय आणि आत मध्ये दुसरीच कंपनी तुमच्या कच्च्या मालापासून आपले उत्पादन तयार करत आहे. भरीस भर म्हणून कारखाना आणि कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी देखील खराब होते आहे, ज्याचा तुम्हाला दंड बसत आहे. कारखाना आजारी पडतो आहे. दूध-व्यवसायात हे कसे होते ? आदरणीय पाहुण्यांमुळे. कोण आहेत हे आगंतुक ? यांचे नाव काय ? जंत – परजीवी, कृमी, parasite, worm इत्यादी मित्रांनो, शाळेत शिकलो आहे, मातीत किंवा घाणीत हात घालून त्यावाटे आपल्या पोटात जंत […]

पुढे वाचा

दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स । Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

Powergotha - पॉवरगोठा

Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti काही वेळा काही साध्या  गोष्टी आपण क्लिष्ट किचकट करून टाकतो.  दुग्ध-व्यवसाय भलेही थोडा किचकट आणि अवघड असेल, पण त्यात नफा कमविण्याचे शाश्वत मार्ग आहेत. ते काटेकोरपणे पाळले तर प्रत्येक जण नफ्यात धंदा करू शकतो. काय आहेत त्या ७ गोष्टी ज्याने तुमचा धंदा किफायतशीर होऊ शकतो. #१ मुक्त संचार गोठा – कमी खर्च, कमी कष्ट मुक्त गोठ्यात, गाईंना फिरण्याचे स्वातंत्र्य आणि २४ तास स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. गाईंना बंदिस्त, तणावपूर्ण जीवनापासून आणि मालकाला गाईची जागा बदलणे, शेण उचलणे, गाई धुणे, खरारा करणे आदी कष्टदायी कामांपासून मुक्तता मिळते खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ […]

पुढे वाचा

दुग्ध व्यवसाय आणि लॉकडाऊन दिवस क्र १

लॉक डाऊन दिवस क्र १ नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा काल रात्री २४ मार्च २०२० रोजी ८ वाजता केली. आज पासून पुढील २१ दिवस आपल्याला ही बंदी निभवायची आहे. लॉकडाऊन का जरुरी आहे, त्यावर उहापोह पोस्ट च्या शेवटी आहे. तत्पूर्वी आपण हे २१ दिवस सत्कारणी कसे लावू शकतो हे पाहू. या संपूर्ण बंदी मधून मूलभूत सेवा आणि वस्तू वगळल्या असून दूध त्या वगळलेल्या वस्तूंमध्ये समाविष्ट आहे.   म्हणून आपली हालचाल दुग्धव्यवसाय चालवण्यापुरती चालू राहील.  बाकीच्या सर्व हालचाली बंद होऊन आपण जास्तीत जास्त वेळ घरात घालवावा लागेल.  हेच अपेक्षित आहे आणि हाच […]

पुढे वाचा

दूध धंद्यातील नोंदी कोणत्या, कशा आणि कुठे ठेवाल ?

नफ्यातील दुग्ध व्यवसाय - Dairy Farming in Maharashtra Marathi

नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे. दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल.   त्याच बरोबर त्यांच्या विरोधी मत असणारे आणि त्यांना परावृत्त करणारे दूध व्यावसायिक सुद्धा भरपूर आहेत.     कारण एकच – दूध धंदा परवडत नाही.   आधीच दुष्काळ, मुरघास केलेला नाही, लाळ्या खुरकूत ची साथ, वर्षभर कमी राहिलेले दूध दर आणि सतत आजारी पडणारी जनावरे. […]

पुढे वाचा

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दूध-धंदा करताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुधाचा उत्पादकाला मिळणारा दर . दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि उदाहरणार्थ 2018 मध्ये तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर खाली होते.  शासन निर्णयाप्रमाणे दर लागू झाले नसल्यास 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत होता.  २०२० मध्ये ही लॉक डाऊन संकटामुळे काही ठिकाणी दर कमी झाले आहेत.  मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय दूध-धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की.  लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर […]

पुढे वाचा

दूध धंद्यातील नफा तोटा

मित्रहो,   खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा !  प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो.   बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते.   आम्ही पॉवरगोठा.कॉम  वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे असा प्रचार सुरुवातीपासून करत आलेलो  आहोत.   कुठल्याही  व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेवून फायदा-तोटा  मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते.   लगेच पहिला प्रश्न उभा राहतो की मग नक्की हा फायदा-तोटा मोजायचा  कसा ?   आम्ही हे तुम्हाला तपशीलवार सांगतो. पुढीलप्रमाणे : ३ प्रकारचे आर्थिक […]

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]

पुढे वाचा

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित तंत्रज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देऊन तुमच्या गाईंची गळाभेट करण्यास नवीन वर्षापासून निघाले आहेत. त्यांच्याकडे तुमची माहिती (डेटा) गोळा करण्यासाठी ५०,००० टॅब्लेट्स दिले गेले आहेत. हा टॅग किंवा बिल्ला कसा असेल ? जनावरांचे टॅग पिवळ्या रंगाचा बिल्ला असून त्यावर १२ आकडी ओळख क्रमांक असेल तो ८.८ […]

पुढे वाचा

जातिवंत गाई – गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

जातिवंत संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ आणि जातिवंत गाई असाव्यात.  उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा व मुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो . परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त होते. कमी दुध देणारी व रोगप्रतिकारक शक्ति कमी असणारी जनावरे, कितीही चांगल्या सुविधा पुरवल्या तरी हा व्यवसाय फायदेशीर करु शकत नाहीत. म्हणून आपल्या गोठयात जातिवंत संकरीत गाय असली पाहिजे.   आता तुम्ही म्हणाल की, जातीवंत गाय कोठे शोधायची? ती एक तर खात्रीलायकरीत्या मिळणार नाही आणि […]

पुढे वाचा